दिवाळी स्पेशल!!
साहित्यः जाडसर दळलेले बेसन पाव किलो, साजूक तूप पावणे दोन वाट्या, साखर अडीच वाट्या, थोडेसे दुध, अर्धा चमचा वेलची पावडर, बदाम काप सजावटीसाठी, चिमुट्भर केशर अगर केशरी रंग.
क्रुती: प्रथम बेसन एका परातीत घ्यावे. दोन चमचे तूप गरम करून त्यात घालावे. थोडया दुधाचा हबका मारावा. पाच मिनिटे पीठ झाकून ठेवावे. त्यानंतर पाच मिनिटानी रव्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे. कढईत बाकीचे तूप घेवून, त्यात बेसन घालून तांबूस रंगावर भाजून घ्यावे. दुसय्रा पातेल्यात साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करावा. पाक एकतारी पेक्षा थोडा जास्त असावा पण दोन तारी नको.पाक तयार होत आल्यावर त्यात वेलची पावडर, केशर मिसळावे. तयार पाक भाजुन ठेवलेल्या बेसनात मिसळून मिश्रण गैसवर ठेवावे. मिश्रण आळत आले की थाळ्याला तूपाचा हात लावून त्यात ओतावे. थाळा हलवून मिश्रण सेट करावे. बदामाच्या कापानी सजवावे. तासाभराने आवडीप्रमाणे वड्या पाडाव्या.
दिवाळी असल्यामुळे तूपाच्या प्रमाणाचा विचार न करता मनसोक्त खावे.
प्रतिक्रिया
5 Nov 2012 - 6:59 pm | प्रभाकर पेठकर
मस्त पाककृती.
मी आजपर्यंत खाल्लेलं मोहनथाळ गडद चॉकलेटी रंगाचं होतं, हे इतकं पिवळं कसं? अर्थात, चव महत्त्वाची.
गडद चॉकलेटी मोहनथाळवर चांदीचा वर्ख छान दिसतो.
5 Nov 2012 - 7:14 pm | अनन्न्या
बेसन भाजले तेव्हा रंग छान तांबूस होता. कदाचित पाकातिल रंगामुळे असा रंग आला असावा. असे असेल का?
5 Nov 2012 - 7:39 pm | प्रभाकर पेठकर
असेल तसेही असेल.
केशर इतर चवींवर मात करतं. ज्याला आपण इंग्रजीत ओव्हरपॉवर म्हणतो. मोहनथाळचा आत्मा म्हणजे भाजलेल्या बेसनाची खमंग चव आणि त्याला गोडाची साथ.चांदीचा वर्ख दृष्य परिणाम साधण्यासाठी. अशी आपली, माझी धारणा आहे.
5 Nov 2012 - 7:17 pm | रेवती
छान पाकृ. फोटू चमकदार आलाय. ;)
5 Nov 2012 - 7:33 pm | गणपा
आली आली दिवाळी आली.
चविष्ट पाककृती.
पण हा दिड तारी पाक करायचा म्हनजे माझ्यासारख्या येरागबाळ्याचं काम नोहे.
आपला पास बॉ.
कुणी खाऊ घालतय का? याची वाट पहाणे आले.
5 Nov 2012 - 8:05 pm | अनन्न्या
एकतारीनंतर १-२ मिनिटे ठेवून गैस बंद करावा. झाला दीड तारी. आणि पाकक्रुती निपुणांना हे अवघड नक्कीच नाही. आणि खाऊ घालायचे म्हणाल तर समोर डीश मिपाकरांसाठीच आहे !!!!!
5 Nov 2012 - 7:40 pm | मदनबाण
नर्मदा मैयाचा मिळालेला प्रसाद म्हणुन मोहनथाळ हा पदार्थ चाखला आहे... मस्त लागतो. :)
5 Nov 2012 - 9:25 pm | रेवती
परिक्रमेच्यावेळी का? ;)
5 Nov 2012 - 10:45 pm | मदनबाण
परिक्रमेच्यावेळी का?
नाही,माझे तिर्थरुप गरुडेश्वरला गेले होते तेव्हा तिथुन येताना आमच्यासाठी मोहनथाळचा प्रसाद घेउन आले होते.
5 Nov 2012 - 8:15 pm | निवेदिता-ताई
सुंदर......... करुन पाहिन दिवाळीत
5 Nov 2012 - 10:12 pm | जेनी...
वॉव ...फोटो एकदम झक्कास आलाय .
आईला पाठवणार ही रेसिपि .:)
थँक्स अनन्या .
5 Nov 2012 - 10:20 pm | Madhubala
मला फोटो का दिसत नाहि.?
5 Nov 2012 - 10:22 pm | सोत्रि
ह्यासाठी कृपया गणेशाशी संपर्क साधावा ;)
- (फोटो बघू शकणारा) सोकाजी
5 Nov 2012 - 11:33 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त झालाय मोहनथाळ... :-)
अता हाही पदार्थ इतका सोपा आहे,करायला... आणी चविला तर लाजवाब आहे. तरी मांगलिक प्रसंगी लाडू ऐवजी पानात कध्धिही का दिसत नाही? हे १ कोडंच आहे.
6 Nov 2012 - 12:50 am | वीणा३
मस्त दिसतोय एकदम. पण गोड विशेष आवडत नसल्याने पास :(.
6 Nov 2012 - 7:56 am | कच्ची कैरी
बरेच दिवस झालेत दिवस काय महिने झालेत मोहनथाळ खाऊन :( आता करायलाच हवा !धन्यावाद आठवण करुन दिल्याबद्दल :)
http://mejwani.in/