साहित्य :
१/२ वाटी मूगाची डाळ , १ वाटी तुरीची डाळ , लसूण (६ ते ७ पाकळ्या), ताजं खोबरं (एक वाटी),बडीशोप (एक चिमूट), मीठ , लाल तिखट , हळद , हिरवी मिरची ,कढीपत्ता
३ कांदे , १ बटाटा , २ टमाटो , तेल ,जिरं ,मोहरी.
कृति :
१कांदा ,बटाटा व टमाटो च्या फोडी करून घेणे.
दोन्ही डाळी नीट धुवून गरम पाण्यात शिजण्यास ठेवणे.डाळ शिजत आली की त्यात थोडा कढीपत्ता (कच्चा) घालणे.
२ कांदे लांब चिरून घेणे ; लसूण फक्त ठेचून घेणे ; पाऊण वाटी खोबरं व बडीशोप मिक्सरमधे वाटून घेणे ;
तेलावर जिरं ,मोहरी ची फोडणी करून त्यात हिरवी मिरची (तुकडा),कढीपत्ता घालून त्यात चिरलेला कांदा घालणे.
कांदा चांगला लाल होत आला की त्यात ठेचलेली लसूण घालणे नीट परतून झाल्यावर त्यात वाटण घालावे. वाटण कांद्याशी एकजीव झाले
की त्यात लाल तिखट ( नेहमीपेक्षा दुप्पट), हळद( अगदी चिमूटभर ) घालून थोडा वेळ परतावे नंतर कांदा ,बटाटा व टमाटो च्या फोडी घालून थोडा वेळ वाफेवर ठेवावे.
{ एका बाजूला डाळी शिजत असू द्या.}
फोडणी झाल्यावर शिजलेली डाळ त्यात घालून १५ मिनीटे उकळविणे.चवीप्रमाणे मीठ घालून त्यात शिल्लक खोबरं व कोथिंबीर घालणे.
ही आमटी बासमती पेक्षा जाड्या तांदूळाच्या भाताबरोबर जास्त छान लागते.
चवीप्रमाणे लाल तिखट आणि लसूण यांचे प्रमाण कमी जास्त करावे पण कमी असल्यास मुरबाडी झटका अनुभवता येणार नाही.
प्रतिक्रिया
27 Jun 2008 - 11:51 am | स्नेहश्री
छान पाउस आणि गरम गरम आमटी.
वा!!!!! क्या बात है.......!!!!!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
27 Jun 2008 - 12:25 pm | गिरिजा
हे पहिल्यांदाच ऐकतेय.. पण भारी लागत असणार नक्कीच! आता पुढच्या वेळेस घरला गेले की हा बेत नक्की!
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
27 Jun 2008 - 8:01 pm | चित्रा
मुरबाडी आमटी म्हणजे टिटवाळ्याजवळच्या मुरबाडकडची का हो?
28 Jun 2008 - 10:00 am | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
अगदी बरोबर ओळखलंत.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
28 Jun 2008 - 10:00 am | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
अगदी बरोबर ओळखलंत.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
27 Jun 2008 - 11:33 pm | चकली
एवढी छान रेसिपी दिल्याबद्द्ल धन्यवाद
चकली
http://chakali.blogspot.com
28 Jun 2008 - 12:06 pm | विसोबा खेचर
मुरबाडी आमटीच्या पाकृबद्दल धन्यवाद..
तुझ्याकडे ही आमटी खाल्ली आहे. क्लासच लागते. आता घरी नक्की करणार... :)
आपला,
(आमटीप्रेमी) तात्या.