साहित्य: १ वाटी दूध, १ वाटी दही, १ वाटी तूप, २ वाट्या हरबरयाच्या डाळीचे पीठ, एक वाटी साखर, १ वाटी पिठी साखर
कृती: प्रथम एक जाड बुडाच्या कढईत पिठीसाखर सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून मध्यम आचेवर ढवळत राहावे. काहीवेळाने मिश्रण कडेने सुटू लागेल. त्यानंतर कढई खाली उतरवावी. मिश्रण चांगले घोटून घ्यावे. त्यात पिठीसाखर घालून पुन्हा एकदा चांगले ढवळून घावे. आता मिश्रण घट्ट होऊ लागेल. वड्यांच्या ट्रे ला तुपाचा हात फिरवून घ्यावा आणि त्यात हे घट्ट झालेले मिश्रण थापावे. वरून मनाप्रमाणे बदाम, चारोळी, पिस्ते याने सजावट करावी. थोड्या गार झाल्यावर वड्या कापाव्यात.
प्रतिक्रिया
27 Oct 2012 - 3:32 pm | इरसाल
जो पर्यन्त मिपावर फटु टाकत न्हाई तोपर्यन्त लोक वाचुन प्रतिस्सद न देताच जातील.
आनी पाकृ जरा मोठी डिटेलमधे टाका.
27 Oct 2012 - 4:08 pm | भ्रमणकुत्रा
जितक्या वाट्या == नाव .. अर्धा वाटीसाखार जास्त नाहि का चाल्णार
27 Oct 2012 - 4:16 pm | अनन्न्या
मी पण या वड्या अशाच करते, पण साहित्य थोडे वेगळे घेते. डाळीच्या पिठाऐवजी मुगाचे किंवा मुगडाळीचे पीठ आणि दह्याऐवजी एक वाटी ओले खोबरे घेते. पीठ एकच वाटी आणि साधी साखर दोन वाट्या!!
तुमच्या प्रमाणात करुन पाहीन.