http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16950096.cms
मुंबई पोलिस आयुक्त मोठ्या गमजा करीत होते की पोलिसांवर हल्ले करणार्यांना आयुष्यातून उठवले जाईल वगैरे. पण जिथे हे प्रकार अमाप प्रमाणात झाले त्या आझाद मैदानातील दंगलीबद्दल संतापजनक बोटचेपेपणा दाखवत आहेत. सत्कार करण्याच्या निमित्ताने ह्या पोलादी पोलीस धुरंधरावर मुस्लिम नेत्यांनी दबाव आणला आणि त्याला हा माणूस बळी पडला असे वृत्त आहे. तेव्हा असा इस्लाम खतरेमे अशा आरोळ्या ठोकत प्रक्षोभक हिंसाचार करणार्या लोकांवर कुठलीही कारवाई होणार नाही असेच दिसते आहे.
अशा गोष्टींतून स्फूर्ती घेऊन उद्या अयोध्या राममंदीरवाले, परवा मथुरा कृष्णमंदीर वाले आणि तेरवा असेच कुणीतरी अशाच किंवा याहूनही भयंकर दंगली करू लागले तर दोष कुणाचा? ह्यांनी दिवसाढवळ्या, राजेरोस कायदा हातात घेऊनही पोलिस ह्यांच्या समोर हात जोडत आहेत ह्यातून काय संदेश समाजाला मिळतो आहे?
अशा वागण्याने खरोखर धर्मनिरपेक्षता वाढीस लागेल का?
प्रतिक्रिया
25 Oct 2012 - 11:01 pm | आशु जोग
कोणत्याही सामान्य भारतीयाच्या भावना
स्वगृह यांनी मांडल्या आहेत.
या धाग्यावर जातीयवादी असा शिक्का न पडो
26 Oct 2012 - 1:43 am | मोदक
'स्वगृह' नाय वो... लेखकाचे नाव 'हुप्प्या' आहे.
26 Oct 2012 - 6:34 pm | अत्रुप्त आत्मा
@'स्वगृह' नाय वो... लेखकाचे नाव 'हुप्प्या' आहे.>>>
4 Nov 2012 - 5:23 pm | तुषार काळभोर
घ्या समजून..
26 Oct 2012 - 3:24 am | स्पंदना
एकुण कायद्यासमोर आपण सारे एक नाही आहोत.
26 Oct 2012 - 2:04 pm | कापूसकोन्ड्या
जिलेबी अधिक पिठाची गिरणी
तुम्ही दळत रहा.
26 Oct 2012 - 6:12 pm | प्रदीप
सर्वप्रथम बातमीतील सत्यासत्यता पडताळून पाहिल्याशिवाय काही अनुमाने काढणे बरोबर नव्हे. ह्यामुळे अगदी नेमकी ह्या बातमीवर काही टिपण्णी करत नाही.
पण दंगलीच्या दरम्यान पोलिसांवर हात टाकणे, त्यांच्यावरच हल्ले करणे असेच प्रकार ऑगस्ट २०११ साली यू. के. मधे झाले होते. ह्यानंतर तेथील सरकारने दंगल करणार्यांना अगदी वेचून शोधून काढले, त्यांच्या सुनावण्याही तात्काळ झाल्या, त्यातील अनेकांना अत्यंत कठोर शिक्षा देण्यात आल्या. हे सर्वच पोलिसांवर हात टाकणार अथवा त्यांच्यावर हल्ला करणारे नव्हते, त्यांचा दंगलीच्या इतर अॅक्टिव्हीटीजमधे सहभाग होता.
पण त्या दंगलीच्या दरम्यान पोलीसांवर थेट हल्ला करणार्यां तिघांना विशेष कठोर सजा नुकतीच सुनावण्यात आली आहे.
असो-- ते इतर देशांतील खंबीर सरकारे करतात. आपले पुचाट सरकार आझाद मैदानावरील दंगलीच्या संदर्भात काहीही करेल अशी आशाच बाळगणे मला तरी आता 'अवाजवी'च वाटते आहे. दंगल होऊन काही काळ लोटला की जनता ते सगळे विसरते, आता येथेच पहा, कुणीतरी "जिलेबी अधिक पिठाची गिरणी तुम्ही दळत रहा" अशी खिल्ली उडवली आहेच. तेव्हा आबांना फारसे काही करावयाची जरूरी नाही. शांत रहायचे, थोडा काळ जाऊ द्यायचा, की झाले.
27 Oct 2012 - 11:47 am | बिपिन कार्यकर्ते
+१
27 Oct 2012 - 4:23 pm | विकास
अधिक लिहीण्याची गरजच नाही. :(
सहमत.
28 Feb 2016 - 3:27 am | आजानुकर्ण
प्रदीप यांच्याशी सहमत. परंतु आता राज्यात आणि देशात ५६ इंचाची खंबीर सरकारे असल्याने ठाण्यात महिला पोलीसाला मारहाण करणारा शिवसेनेचा गुंड व लातूरला शिवजयंतीच्या दिवशी मुसलमान पोलीसाची धिंड काढणारे धर्मांध गुंड यांच्यावर खंबीर कारवाई होईल याचा मला मनःपूर्वरक विश्वास आहे. आशा आहे राज ठाकरे हे लातूरच्या प्रसंगानंतर एक मूक मोर्चा काढून पोलीसांना पुन्हा एकदा बळ देतील.
http://www.loksatta.com/thane-news/shivsena-shakhapramukh-arrested-for-a...
बाकी चालू द्या.
28 Feb 2016 - 6:05 am | विकास
ठाण्यात महिला पोलीसाला मारहाण करणारा शिवसेनेचा गुंड
किंचीत redundancy सोडली ;) तरी हे वाक्य या संदर्भात अर्धसत्य असावे असे वाटते...
शिवसेनेच्या एका शाखाप्रमुखाने ठाणे शहरात भर रस्त्यात आणि भर दिवसा एका महिला वाहतूक पोलिसाला गुरुवारी जबरदस्त मारहाण केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरातून उमटत आहेत.. असे लोकसत्तेत म्हणले आहे आणि तुम्ही ते पूर्णसत्य आहे असे समजले आहात असे वाटते. ठीकच आहे म्हणा, तसे तुम्हाला वाटले असले तर... लोकसत्ता म्हणजे सामना थोडाच आहे. तरी देखील लोकसत्तेने म्हणले आहे की शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मात्र तो माजी शाखाप्रमुख असल्याचा दावा केला आहे.
पण तरी देखील मी इंडीया टूडे पाहीला तर त्यात आदीत्य ठाकरेंचे खालील व्टिट चिकटवलेले दिसले...
म्हणजे शिवसेनेनेच जाहीरपणे या प्रसंगाचा निषेध देखील केला आहे आणि त्या गुंडाला पक्षाने कुठलेही अधिकृत पद दिलेले नाही असे सांगितले आहे. आता वृत्तपत्रांनी अधिक खातरजमा करायला शोधपत्रिकारीता करायला हरकत नाही. तरी देखील लोकसत्तेत दिलेल्या माहितीप्रमाणे, कालगुडे याच्यावर सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी दिली होती. शुक्रवारी त्याला जामीन मंजूर करण्यात आला मात्र पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने तो तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही.
याचा अर्थ काय होतो तर पोलीसांनी कारवाई केली आणि त्या कारवाईच्या मधे ना मुख्यमंत्री आले ना शिवसेनेचे नेतृत्व आले. तसे आझाद मैदानाच्या वेळेस झाले होते का? मटाच्या वरील दुव्यात म्हणल्याप्रमाणे, "या घटनेनंतर मुंबईत पोलीस आयुक्त म्हणून आलेल्या सत्यपाल सिंह यांनीही कठोर कारवाईच्या घोषणा केल्या होत्या. मात्र, मुस्लिम समाजाच्या दबावानंतर लगेचच त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे." आता नंतर कारवाई झाली का, तत्कालीन सरकारने काय भुमिका घेतली हे मला खरेच माहीत नाही आणि आत्ता स्पष्ट बातम्या मिळाल्या नाहीत. तुम्हाला माहीत असल्यास खरेच सांगा.
आता लातूर कडे वळूयात...
लातूर जिल्ह्य़ातील पानगाव येथे आंबेडकर चौकात शिवजयंतीच्या दिवशी भगवा फडकविण्यास आलेल्या कार्यकर्त्यांना सहायक उपनिरीक्षक युनूस शेख यांनी अटकाव केला होता. हा भाग संवेदनाक्षम असल्याने त्यांनी नियमानुसार ही कारवाई केली होती. तरी या कार्यकर्त्यांनी त्यांना जबर मारहाण करीत गावभर भगवा झेंडा हाती घेऊन फिरविले होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत पोलिसांना मारहाण होण्याचा हा प्रकार घडला आहे.
आता या बातमीत पण नरोवाकुंजरोवा पध्दतीने माहिती दिलेली आहे असे दिसतयं... म्हणजे हा गोंधळ शिवसेनेनेच घातला आहे असे वाटू शकेल... पण डिएनए मधे आलेल्या बातमीनुसार, Latur policemen attacked: NCP man led the assault, says injured आता कायं कराव! एनसिपी पण गुंड झाले का काय? ;) एकदा का मुस्लीम पोलीसास मारले असे म्हणले की झालं इन्टॉलरन्सच तुणतुणं वाजवणे सोप्पे!
त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी पोलीसांना कडक कारवाई करायला सांगितलीआहे ते वेगळेच. ... काय होतयं ते. तो पर्यंत जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा! :)
28 Feb 2016 - 12:01 pm | अर्धवटराव
शेवटी इन्टोलरन्सचा कडेलोट झालाय हेच खरं
अवांतरः
बारा वर्षं मोदिंना मिडीयाने जी वागणुक दिली त्याचा फार मोठा हातभार लागला भाजपाच्या सत्ताप्राप्तीला. तेच चक्र २०१९ करता फिरणं सुरु झालय असं वाटतं.
28 Feb 2016 - 12:29 pm | आजानुकर्ण
अहो अर्धवटराव, (काय चपखल आयडी आहे!)
डाटा असा आहे की आझाद मैदानाच्या प्रसंगानंतर तीन चार धागे काढून पानावर पाने भरुन चर्चा झाली आणि लातूर-ठाण्याच्या प्रसंगानंतर इथे एकही प्रतिसाद दिसला नाही. त्यामुळे आवर्जून येथे मी माझ्या असहिष्णुतेचे प्रदर्शन करण्यासाठी आलो. तुमचं या विषयाचं आकलन काय आहे ते सांगा की. निव्वळ हे झालंय, ते झालंय असं लिहून तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते कळत नाही. अर्धवट प्रतिसाद देण्याऐवजी पूर्ण प्रतिसाद दिला तर निदान तुम्हाला काय म्हणायचंय ते कळेल.
28 Feb 2016 - 1:00 pm | अर्धवटराव
आरशात बघितल्याचा फील आला ना? तोच उद्देश होता.
बरं मग? एव्हढया जुन्या धाग्याचा रेफरस्न कोणि नाहि लक्षात ठेवला त्तर काय आकाश कोसळलं?
अवश्य करा. तसंही असहिष्णु प्रदर्शनाच्या इव्हेण्टमधे फारसं लॉजीक नव्हतं. तिच मालिका तुम्ही कंटिन्यु केली. बीग डील.
झालय कि काथ्याकुटुन याविषयी.
इंटोलन्चसचा कडेलोट झालाय हे स्वच्छ टंकलय ना. अहो इथे देशात अराजक माजलय. मागासवर्ग, अल्पसंख्यांक, विद्यार्थी, विरोधीपक्ष, पोलिस, सेना दलं, काहि मिपाकर्स ... सर्वांना त्राही भगवान करुन सोडलय सरकारनं. आता काय बाकी राहिलं आहे?
28 Feb 2016 - 12:26 pm | आजानुकर्ण
आता इतके तोंड काळे झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख 'हे ज्यांनी केले त्याचा मला अभिमान आहे' असे बाबरी मशीद स्टाईल होर्डिंग लावून समर्थन करणार की काय? बाकी स्थानिक शिवसैनिकांनी हा सदर गुंड शाखाप्रमुख म्हणून अजूनही कार्यरत असल्याचे म्हटले आहे
http://indianexpress.com/article/india/india-news-india/video-thane-sena...
मी तेच तर म्हणतोय ना, की पूर्वीचे पुचाट सरकार जाऊन नवे खंबीर सरकार आल्यामुळे अगदी स्वपक्षीय गुंड असले तरी कारवाई होणार याची मला मनःपूर्वक खात्री आहे. माझा प्रतिसाद काळजीपूर्वक वाचा ही विनंती.
शिवाय आझाद मैदानाच्या प्रसंगावर तीन चार धागे काढून पानावर पाने भरुन चर्चा करणाऱ्या मिपाकरांनाही याची खात्री असल्याने इथे फारशी चर्चा न झाल्याने मी फक्त त्याची दखल घ्यावी म्हणून मुद्दा मांडला.
प्रत्येक गोष्टीत धर्म आणण्याचे आपले कसब लाजवाब आहे. सदर घटनेत एका हिंदू पोलीसालाही मारहाण झाली आहे. आणि मुस्लीम पोलीसाला त्याची भक्ती सिद्ध करावी लागली आहे.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/latur-cops-try-t...
सुदैवाने देवेंद्र फडणवीसांसारख्या कार्यक्षम मुख्यमंत्र्याला निदान पाच दिवसांनंतर का होईना या प्रसंगाची दखल घेऊन कारवाई करावीशी वाटली हाच काय तो आशेचा किरण दिसतो. बाकी इंडिया टुडे बघूनही तुम्हाला ही बातमी दिसली नाही याचे माफक आश्चर्य वाटले.
http://indiatoday.intoday.in/story/5-days-after-muslim-cop-attacked-in-l...
एनसीपीचे गुंडही भगव्या झेंड्यासाठी इतकं काही करतात हे पाहून कै.शिवसेनाप्रमुख आता कृतकृत्य झाले असतील. निदान शिवसेनेची एकहाती सत्ता आली नाही तर भगव्या झेंड्यासाठी पक्षभेद विसरुन गनिमांना धडा शिकवण्यासाठी सर्व देशभक्त एकत्र येत आहेत ही मोठी समाधानाची बाब आहे.
1 Mar 2016 - 3:19 am | विकास
नक्की कुठला संदर्भ बघू?
नाही म्हणजे हा मुद्दा उकरून काढताना तुम्ही लोकसत्तेचा संदर्भ दिला. त्यात म्हणले आहे, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मात्र तो माजी शाखाप्रमुख असल्याचा दावा केला आहे. तीन हात नाका परिसरात तो वडापावची गाडीसुद्धा चालवतो.
तर त्याच लोकसत्तेचे इंग्रजी मोठे भावंड ज्याचा तुम्ही नंतरच्या प्रतिसादात उल्लेख केलात, ते इंडियन एक्सप्रेस म्हणतय: Local Shiv Sena members though confirmed that Kalgude continues to be a shakha pramukh and owns a vada pav stall in Teen Haat Naka, Thane.
आता continues म्हणजे मराठीत माजी, का माजी म्हणजे इंग्रजीत continues? काहीच कळेनासे झाले आहे बघा! ;) आता लोकसत्तेतले प्रस्तुत लेखन पाहून त्यामधे शिवसेनेस संशयाचा फायदा मिळेल असे काही लिहीले जाईल असे वाटत नाही. तरी तुम्ही जे दोन्ही संदर्भ दिले आहेत त्यातला खरा कुठला आणि खोटा अथवा चुकीचा अथवा दिशाभूल करणारा कुठला हे सांगितलेतर बरे होईल.
तात्पर्य: अफवांवर विश्वास ठेवू नका असे म्हणण्याबरोबरच "बातम्यां"वर देखील विश्वास ठेवू नका असे म्हणावे लागत आहे बघा. आणि हो, हे म्हणताना मी कुठेही शिवसेनेचे समर्थन करायला करत नाही.
आता इतके तोंड काळे झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख 'हे ज्यांनी केले त्याचा मला अभिमान आहे' असे बाबरी मशीद स्टाईल होर्डिंग लावून समर्थन करणार की काय?
हे बघा, तेंव्हा जर बाबरीचा निषेध केला असता तर म्हणले असते खोटारडे कुठचे! जेंव्हा त्यांनी अभिमानाने बाबरी बद्दल म्हणले तेंव्हा विश्वास ठेवला होता. मग आता सोयिस्कररीत्या विश्वास ठेवायला विसरायचे का? परत एकदा लोकसत्ता एकदा इंडियन एक्स्प्रेस असे उलटसुलट कशासाठी?
शिवाय आझाद मैदानाच्या प्रसंगावर तीन चार धागे काढून पानावर पाने भरुन चर्चा करणाऱ्या मिपाकरांनाही याची खात्री असल्याने इथे फारशी चर्चा न झाल्याने मी फक्त त्याची दखल घ्यावी म्हणून मुद्दा मांडला.
ते बाकी तुम्ही अगदी बरे केलेत. नाहीतर उद्या स्मृतीमुळे हा विषय विस्मृतीत गेला असा मिपाला कलंक लागला असता. बाकी मिपाकरांबद्दक असलेली खात्री पाहून डोळे पाण्याने डबडबले आहेत. पण तरी देखील प्रतिसाद पूर्ण करायचा प्रयत्न करतो. शिवसेनेच्या बाबतीत आपले (म्हणजे तुमचे आणि माझे) मत फार वेगळे असेल असे मला वाटत नाही. पण तुम्हाला आणि तुमच्या दुव्यांना फक्त उलटच बातम्या दिसतात. म्हणजे असे की इंडीयन एक्सप्रेस मधे आलेल्या या बातमीनुसार एक बांद्र्याचा शिवसैनिक रमेश वाळूंज, याला ३ मुली सेल्फि काढत असताना समुद्रात पडताना दिसल्या. त्याने त्यातील अंजूम खान आणि मस्तुरी खान या दोन मुलींना वाचवले आणि तिसर्या मुलीस, तरन्नूम अन्सारीस वाचवायला परत उडी मारली आणि त्यात तो गेला. (मला वाटते ती मुलगी देखील बिचारी गेली). त्याच्या मागे दोन मुली, एक मुलगा आणि बायको आहे. आणि हो बातमीप्रमाणे तेथे बरेच बघे होते. असे आधी देखील अपघात घडल्याने आता त्या भागात म्हणे नो सेल्फी झोन आहे. त्यामुळे स्वातंत्र्यावर गदा म्हणून बोंब मारायला एक मस्त कारण आहे. असो.
प्रत्येक गोष्टीत धर्म आणण्याचे आपले कसब लाजवाब आहे.
अहो साहेब, मी नाही "धर्म" आणला, तो इंडीया टूडेच्या मथळ्यात होता म्हणून तसा लिहून त्यावर भाष्य केले. तुम्ही नंतर दिलेला दुवा जरी बघाल तरी त्यात दिसेल (टिचकी मारायची देखील गरज नाही!).
http://indiatoday.intoday.in/story/5-days-after-muslim-cop-attacked-in-l...
आता आळस करत प्रतिक्रिया म्हणून तुमचेच वाक्य चिकटवतो ;) बाकी इंडिया टुडे बघूनही तुम्हाला ही बातमी दिसली नाही याचे माफक आश्चर्य वाटले.
बाकी माझे कसब काढायचेच असेल तर दाखवून द्या बरं मी किती वेळा गोष्टींमधे आपणहून धर्म आणला आहे तो? उगाच काहीतरी...
एनसीपीचे गुंडही भगव्या झेंड्यासाठी इतकं काही करतात हे पाहून कै.शिवसेनाप्रमुख आता कृतकृत्य झाले असतील.
कै. सेनाप्रमुखांचे जाउंदेत, ते त्यांच्यापाशी... तुम्हाला नाही ना आवडले एनसिपीचे असले वर्तन? तेव्हढे महत्वाचे. असो.
26 Oct 2012 - 6:30 pm | माम्लेदारचा पन्खा
भारतात सगळ्यासाठी कायदे आहेत पण सध्या फक्त कागदावर........
कायदा हातात घेणे ही आजकालची फ्याशन झाली आहे.
रमजान ईद नंतर कारवाई करणार असे ऐकले होते पण आता तर बकरी ईद उजाडली.
पोलिसांकडे अधिकार आहेत पण त्यांचे हात बांधले जातात. नेत्यांकडे ताकद आहे पण सुराज्याची इच्छा नाही.
तुमच्या आमच्यासारखे प्रचंड सहनशील लोक अजूनही ह्या पृथ्वीतलावर आहेत म्हणून सगळ्या कावळ्यांचे फावतंय....
तेव्हा तूर्तास आपल्या स्वभावाला साजेशी उक्ती दरवेळी प्रमाणे आठवली : "तुका म्हणे उगी राहावे.....जे जे होईल ते ते पाहावे( किती दिवस ???) "
बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल................
27 Oct 2012 - 11:46 am | आशु जोग
कोणत्याही सामान्य भारतीयाच्या भावना
हुप्प्या यांनी मांडल्या आहेत.
या धाग्यावर जातीयवादी असा शिक्का न पडो
27 Oct 2012 - 4:02 pm | इरसाल
आजच्या इ-सकाळमधे दिल्ली पोलीसांनी एका निरागस, मौ चेहर्याच्या माणसाला हैद्राबादमधुन पकडले आहे.
28 Oct 2012 - 8:15 pm | अन्या दातार
तुम्हाला रस्ता भटकलेला म्हणायचेय का?