मित्रांनो, कुरुंदकरांच्या संकेत स्थळावर त्यांची व्याख्याने जोडण्यासाठी मदत हवी आहे. मिपावरील संगणक धुरिणांची त्यासाठी मदत मिळाली तर एक महत्वाचा ठेवा सर्वांसाठी खुला होईल.
या व्याख्यानांचा दुवा :http://www.esnips.com/thumbnails.php?album=4678391
संकेत स्थळ :http://www.narharkurundkar.com/
हि व्याख्याने संकेत स्थळावर टाकण्यासाठी मी संकेत स्थळाच्या व्यवस्थापकांना विनंती केली होती. पण या व्याख्यानांचा आकार मोठा असल्याने त्यांनी असमर्थता दर्शवित मदतीची अपेक्षा केली आहे. या क्षेत्रातील आमचे ज्ञान झाकलेलेच बरे! कृपया कोणीतरी पुढे या.
हि व्याख्याने जरूर ऐका म्हणजे तो एक 'ठेवा' का आहे ते कळेल. हि व्य्ख्याने कुरुंदकरांनी १९८३ मध्ये नांदेड येथे दिलेली आहेत. हि व्याख्यानमाला तीन दिवस चालू होती. अध्यक्ष म्हणून रणजीत देसाई यांनीही तासभर भाषण केले आहे. देसाई यांचे व्याख्यान थोडेसे अस्पष्ट असले तरी कुरुंदकरांची सर्व व्याख्याने स्पष्ट ऐकू येतात. व्याख्यानांचा विषय 'शिवाजी: ऐतिहासील कालप्रवाहांच्या संदर्भातून' असा सांगता येईल.
पहिल्या व्याख्यानामध्ये कुरुंदकर राजांच्या जन्मतिथीच्या वादापासून सुरुवात करून अंध जातीवादाच्या परंपरेवर ऐतिहासिक संशोधनाच्या अनुषंगाने ताशेरे ओढतात (वाक्य वाक्य! हुश्श). शिवाय इतिहास संशोधनातील व्याप, त्रुटी आणि वैयक्तिक हेकटपणा यावरही भाष्य करतात.
दुसर्या व्याख्यानामध्ये कुरुंदकर, घटनांच्या नाटकीकारणावर फार भर न देता ऐतिहासिक प्रवाहांच्या संदर्भात इतिहासाकडे बघण्याचा दृष्टीकोन विषद करतात. तसेच ब्राम्हण-ब्राम्हणेतर वादाच्या फोलपणावर प्रकाश टाकतात.
तिसर्या व्याख्यानामध्ये कुरुंदकरांच्या दृष्टीने राजांच्या जीवनातील सर्वाधिक महत्वाची घटना कोणती आणि का? औरंगजेब आणि शिवाजी तसेच आजच्या काळात शिवचरित्राचा अन्वयार्थ यासारख्या विषयांचा परामर्श घेतात.
सो इन टोटल, कुरुंदकर हे ताशेरे ओढतात, भाष्य करतात, प्रकाश टाकतात, परामर्श घेतात :)
लक्षात घ्या माझी टंचप्रतिभा कुरुंदकरांच्या वक्र्तुत्वाचीच काय, या व्याख्यानमालेचीसुद्धा साधी ओळखही करून देवू शकत नाही. पण तुम्ही जर हे ऐकलेत तर कुरुंदकर तुमच्या काही धाराणांवर तुम्हाला जरूर विचार करायला भाग पाडतील हे नक्की. इतके सुस्पष्ट, रोखठोक आणि लॉजिकल विचार ऐकणे हि पर्वणी आहे यावर विश्वास ठेवून हे ऐका आणि जमेल तितक्या लोकांना ऐकवा.
शिवाय कृपया ते संकेत स्थळाच बघा कोणीतरी :)
कुरुंदकरांची व्याख्याने: मदत हवी आहे
गाभा:
प्रतिक्रिया
24 Oct 2012 - 8:11 pm | इष्टुर फाकडा
व्याख्यानांची तारीख चुकली आहे. व्याख्याने १९८३ मधील नाहीत. क्षमा असावी.
24 Oct 2012 - 8:32 pm | शैलेन्द्र
आम्ही मदत नाही करु शकत, पण ती व्याख्याने उतरवुन नक्किच ऐकणार..
24 Oct 2012 - 10:37 pm | पैसा
काही लोक तरी तुम्हाला मदत करतील, पण माझ्यातर्फे एका छान लिंकसाठी धन्यवाद!
24 Oct 2012 - 10:52 pm | इष्टुर फाकडा
स्वागत आहे :)
24 Oct 2012 - 11:40 pm | विकास
सहमत!
25 Oct 2012 - 12:13 am | अभ्या..
:(
तरी लिंकबद्दल मनापासून धन्यवाद
25 Oct 2012 - 11:47 am | सुधीर
माझ्यातर्फेही अनमोल लिंकसाठी धन्यवाद!
25 Oct 2012 - 3:04 pm | इष्टुर फाकडा
स्वागत आहे :)
25 Oct 2012 - 6:57 pm | नीलकांत
इस्निपवरील व्याख्याने तशीच संकेतस्थळावर जोडता येतील. जास्त काही करायची गरज नाही.मी संकेतस्थळाच्या चालकांशी संपर्क साधतो.
बाकी कुरुंदकरांचा हा ठेवा दाखवल्याबद्दल धन्यवाद.
- नीलकांत