साहित्य: सफरचंद १ किलो, खवा ३५०ग्रॅम, साखर १ ते सव्वा वाटी, वेलची पावडर स्वादानुसार,बदाम काप,बेदाणे,काजू तुकडे,तूप ३चमचे.
कृती: प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावी.कढईत तूप तापत ठेवावे.गॅस बारीक ठेवावा. साले काढ्लेल्या सफरचंदाच्या फोडी करुन घ्याव्या. त्यातील बिया काढून फोडी किसाव्या, किस लगेच तुपात टाकून परतावा.याच प्रकारे सगळ्या सफरचंदांचा किस करुन तुपावर टाकावा. १० मिनीटे किस परतल्यावर त्यात साखर मिसळावी. साखर विरघळली की खवा मिसळावा.बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे यापैकी आवडीप्रमाणे मिसळावे.थोडा वेळ परतावा. वेलची पावडर घालावी.बदामाच्या कापानी सजवावे.( किस लगेच परतल्यामुळे काळा पडत नाही.)
समस्त मिपाकरांना नमस्कार!!!!! पहिलाच प्रयत्न आहे पोस्ट टाकण्याचा!! करण्यापेक्षा टायपिंगला जास्त वेळ लागला!! जमेल हळूहळू!!
प्रतिक्रिया
24 Oct 2012 - 5:39 pm | अनन्न्या
फोटो समोर दिसण्यसाठी काय करावे?
24 Oct 2012 - 6:08 pm | जेनी...
मस्त गं!
करुन पाहिन .अॅप्पल असेच खायचा कंटाळा येतो :-/
हि आयडिया भारिये :)
बाय द वे स्वागत :)
24 Oct 2012 - 8:34 pm | अत्रुप्त आत्मा
फोटू झाक दिसतोय...!
मिपा वरिल बाकि बल्लवाचार्यांच्या प्रतिक्षेत.
24 Oct 2012 - 8:48 pm | डावखुरा
शॉलेट्ट
24 Oct 2012 - 9:36 pm | Madhubala
24 Oct 2012 - 10:23 pm | पैसा
मिपावर स्वागत! एकदम वेगळी पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद! फोटोही छान आलाय.
25 Oct 2012 - 3:10 am | Mrunalini
मस्त दिसतोय हलवा... करुन बघायला पाहिजे :)
25 Oct 2012 - 6:17 am | स्पंदना
सुरेख रंग आलाय. फिका पिवळा.
स्वागत आहे मिपावर तुमच.
25 Oct 2012 - 10:18 am | इरसाल
मस्त आहे हलवा.
मला एक सम्जत नाही संपादक झाले की लोक फक्त "मिपावर आप्ले स्वागत आहे करण्यापुरते का रहातात." स्वतःच्या लेखण्या म्यान करुन.
25 Oct 2012 - 7:07 am | श्रीरंग_जोशी
पाककृती आवडली.
सजावटीसाठी राष्ट्रीय साक्षरता मिशन व मर्सिडिझ बेंझ यांच्या लोगोंचे एकत्रीकरण फारच कल्पक :-).
25 Oct 2012 - 8:19 am | प्रभाकर पेठकर
मस्त पाककृती.
'अॅपल अ डे किप्स डॉक्टर अवे' असं म्हणतात पण माझ्या माझ्या डॉक्टरने 'इफ यू वाँट टू लिव्ह, कीप अॅपल हलवा फार फार अवे' असा सल्ला दिला आहे.
बाकी, सफरचंदाच्या फोडी काळ्या पडू नयेत म्हणून चिरल्यावर त्याला लगेच लिंबू रस चोळावा.
25 Oct 2012 - 12:10 pm | Maharani
"If the Doctor is Handsome/Gorgeous keep the Apple away" असेही म्हणतात....
अॅपल हलवा बाकी खुपच छान लागत असणार...करुन पाहीन....
25 Oct 2012 - 12:58 pm | आनन्दा
25 Oct 2012 - 5:11 pm | अनन्न्या
सफरचंद हलवून हलव्याची चव येत असेल तर माझी थेट काश्मीरला जायची तयारी आहे. डायरेक्ट रत्नागिरी टू काश्मीर!! एनि वे प्रतिक्रियेबद्दल आभार!
25 Oct 2012 - 7:25 pm | आनन्दा
ह. घ्या हो!
28 Oct 2012 - 12:53 am | एस
अहो पण त्यांनी सफरचंद हलवा असे सांगितले होते. हे तर नुसतेच लटकलंय. :P
रच्याकने, 'एक रुपयात पोटभर गाजर हलवा' या हॉस्टेलच्या फन फेअर मध्ये केलेल्या स्टॉलची आठवण आली... :)
जोक्स अपार्ट, सफरचंदाचा हलवा खरंच आवडलाय. मस्त दिसतोय. पण गोड अजिबात आवडत नसल्याने हलव्याची बात नच्छ! मला आइस्क्रीमवर चिली फ्लेक्स व ओरेगॅनो टाकून खायला आवडतं... मिपाकर बल्लवाचार्यांना आव्हान - खालील गोष्टी गोड न करता तिखट करता येतील काय? चहा, खरवस, पुरणपोळी, सर्व प्रकारचे हलवे, पेढे, गुलाबजामून, इ. इ. नुसतेच साखरेऐवजी लाल तिखट घाला असा फुटकळ सल्ला देऊ नका. पदार्थ खरोखरंच टेस्टी झाले पाहिजेत...
आणि हो, प्रपे, तुमची टिप आवडली. लागलीच अमलात आणली जाईल. :)
28 Oct 2012 - 1:04 am | एस
मी लहानपणी एकदा चहा बनवून पाहिला होता मीठ टाकून... त्याची शिक्षा म्हणून सगळा चहा मलाच प्यावा लागला होता. :) आणि एकदा चहात तूप टाकून पाहिले होते. काय करणार, याकच्या दुधाचे लोणी पुण्यात कुठे मिळणार! म्हणून गायीच्या दुधाचे तूप वापरले... काही नाही, असेच कुठे तरी वाचले होते की तिबेटमध्ये चहात याकच्या दुधाचे लोणी टाकतात. हेहेहेहेहे...
डिस्क्लेमर - कुणाला वरील प्रयोग स्वतः करायची तीव्र इच्छा झालीच तर स्वतःच्या जबाबदारीवर करावेत ;)
28 Oct 2012 - 10:06 am | अर्धवटराव
जगात नायाब शोध असेच कलंदर पद्धतीने लागलेत. तुझ्यातला वैज्ञानीक असाच जागा असु देत :D
अर्धवटराव
28 Oct 2012 - 11:30 pm | एस
बघा, याला म्हणतात कदर... इसी बात पे अर्धवटराव के लिए एक कटिंग!!
29 Oct 2012 - 6:55 pm | स्मिता.
स्वॅप्सराव, इतर पदार्थांचं माहिती नाही पण चहा निव्वळ गोड न करता तिखट/मसालेदार करता येतो. आता हिवाळ्यात अश्या चहाचा आस्वादही घेता येईल.
चहा उकळतांना त्यात भरपूर आले, चिमूटभर दालचिनीची पूड, चिमूटभर मिरेपूड, २-४ तुळशीची पाने, चिमूटभर वेलची, गवती चहा, इ. घातले की मस्त फक्कड मसालेदार चहा तयार होतो. गोडपणा नावापुरता उरतो. आता त्यात गोडाची जराही चव नकोच असेल तर साखर घालूच नका.
31 Oct 2012 - 9:41 pm | एस
प्रतिसाद तुमच्या खरडीत दिला आहे. (धाग्यापासून अधिक भरकटू नये म्हणून) :) :)
25 Oct 2012 - 1:12 pm | कच्ची कैरी
छान दिसतोय हलवा
25 Oct 2012 - 5:06 pm | अनन्न्या
मनापासून आभार!! पहिल्याच पाकक्रुतीला असा प्रतिसाद दिल्याबद्द्ल!!
25 Oct 2012 - 9:09 pm | मदनबाण
वाह्ह ! :)
(मूग हलवा प्रेमी) ;)
26 Oct 2012 - 1:45 pm | स्मिता शितूत
खवा असाच घरात आहे नविन प्रकार करून बघेन छान आहे
26 Oct 2012 - 1:56 pm | मृत्युन्जय
मस्त दिसतो आहे. मिपाला अजुन एक बल्लवाचार्य मिळाला असे समजावे की काय?
27 Oct 2012 - 4:27 pm | अनन्न्या
इतक्या लगेच बल्लवाचार्य नको, आत्ता कुठे सुरूवात आहे!! मिपाची सद्स्य मी आता झाले असले तरी वाचक जुनीच आहे. अनेक उत्तम पाकक्रुती पाहिल्यात मिपावर!
27 Oct 2012 - 6:02 pm | खेडूत
मस्त !!
आधी चिक्कू झाला आता सफरचंद हलवा!
...आता पुढे कुणाचा नंबर?
21 Nov 2012 - 3:15 pm | जयवी
अहा.....मस्त दिसतोय हलवा :)
21 Nov 2012 - 5:27 pm | ऋषिकेश
वा! नविनच पदार्थ ऐकतोय
करून बघेन एकदा