''ब्लॉग माझा'' या जालिय मराठी अनुदिनी स्पर्धेचा निकाल सालाबादप्रमाणे लागला आहे.
आपले लाडके मिपाकर त्या यादीत असणे अपेक्षित पण सुखावणारे आहे. सोत्रि,नरेंद्र गोळे आणि मुटे काका माहीत आहेत. याशिवाय इतरही अनेक जण मिपाकर असतील.सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा..!
दिसामाजी काही लिहीत जावे' हे ठीक, पण ते काही तितके सोपे नाही, हे आम्ही स्वानुभवाने कधीच ओळखले आहे.
काय लिहायचे जा प्रश्न नसून कसे आणि किती लिहायचे हा खरा प्रश्न असतो. शिवाय वाचणार कोण? हा तर त्याहून मोठा प्रश्न!
मिपावर येण्याचा (आणखी एक) फायदा म्हणजे स्वाक्षरीतून इतरांची मुशाफिरी पण माहीत होते. त्यामुळे बरेच छान काही वाचायला मिळते.चिकाटीने लिहीत राहून व्यक्त होणारे, आपला ब्लॉग सजवणारे मिपाकर ठळकपणे दिसतात, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन चार नवे वाचनीय लेखकु उदयाला आले तर बरेच आहे.सर्वाना पुन्हा शुभेच्छा!
दुवा: http://abpmajha.newsbullet.in/technology/technology/21385
प्रतिक्रिया
22 Oct 2012 - 7:47 pm | रेवती
अरे वा!! सर्व विजेत्यांचे आणि सहभागी होणार्यांचे अभिनंदन.
22 Oct 2012 - 11:26 pm | पैसा
सर्व लेखक आणि विजेत्यांचे अभिनंदन! सोत्रिचे खास अभिनंदन!
23 Oct 2012 - 1:01 am | श्रीरंग_जोशी
सर्वश्री गंगाधर मुटे, नरेंद्र गोळे व सोत्रि यांचे हार्दिक अभिनंदन.
यापुढेही आपल्या लेखनप्रपंचाद्वारे माझ्यासारख्यांच्या ज्ञानात भर पडावी व विचारांना योग्य दिशा मिळावी ही सदिच्छा.
23 Oct 2012 - 6:20 am | श्रेयाताई
धन्यवाद...माझ्या ब्लॉगलाही उत्तेजनार्थ बक्षीसास पात्र ठरविण्यात आले आहे.
shreya4mahajan.blogspot.com आणखी एक मिपाकर...!
23 Oct 2012 - 9:06 am | सोत्रि
अभिनंदन श्रेया!
-(मिपाकर) सोकाजी
23 Oct 2012 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार
सर्व विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन
23 Oct 2012 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
23 Oct 2012 - 9:55 am | जेनी...
सर्वांचे अभिनंदन :)
ब्लॉग मधल्या कुठल्या गोष्टीं विशेष उल्लेखनिय होत्या ..
याची माहिती दिलित तर आणखी मजा येईल ..
पून्हा एकदा अभिनंदन :)
23 Oct 2012 - 10:02 am | सर्वसाक्षी
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
23 Oct 2012 - 10:09 am | चावक
हार्दिक अभिनंदन
23 Oct 2012 - 10:10 am | मदनबाण
गंगाधर मुटे, नरेंद्र गोळे या दोन्ही काका मंडळींचे नाव असणार याची खात्री होतीच.
सर्व विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन ! :)
23 Oct 2012 - 10:20 am | मी_आहे_ना
अरे वा, गंगाधर मुटे, नरेंद्र गोळे, सोत्रि, श्रेयाताई सर्वांचे अभिनंदन!
23 Oct 2012 - 10:46 am | नि३सोलपुरकर
श्री गंगाधर मुटे, नरेंद्र गोळे, सोत्रिभो व श्रेया यांचे हार्दिक अभिनंदन व प.ले.शु.
23 Oct 2012 - 11:33 am | सुहास..
अभिनंदन !!
अवांतर : त्या मृगतृष्णा ब्लॉग मध्ये मला विषेश असे काही जाणवले नाही जेणेकरुन त्याला पहिल्या पाचामध्ये स्थान दिल्या गेले आहे
23 Oct 2012 - 12:40 pm | नरेंद्र गोळे
खेडूत ह्यांनी पुरस्कार जाहीर होताच लगेचच अभिनंदनाचा हा धागा काढून विजेत्यांचे अभिनंदन केले, म्हणून त्यांचे विशेष आभार. सर्व अभिनंदन कर्त्यांचेही मनःपूर्वक आभार.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! ए.बी.पी.माझा व प्रसन्न जोशी ह्यांनाही अनेक धन्यवाद. त्यांच्या पुरस्काराने मराठीत अनुदिनी लिहिण्याची अनेकांस प्रेरणा मिळाली. चार वर्षांपूर्वी मोजक्याच अनुदिन असत. आता दिडशे अनुदिनीकर्त्यांनी ह्या स्पर्धेत नोंदणी केली आहे. मराठीत उत्तरोत्तर अधिक सकस साहित्य निर्माण होऊन, ज्वलंत प्रश्नांना वाचा फुटो हीच ह्या निमित्ताने सदिच्छा करता येईल!
23 Oct 2012 - 12:45 pm | मूकवाचक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
23 Oct 2012 - 2:12 pm | अमोल केळकर
सर्वांचे हार्दीक अभिनंदन :)
अमोल केळ्कर
23 Oct 2012 - 5:11 pm | शशिकांत ओक
सर्व पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
23 Oct 2012 - 5:26 pm | ५० फक्त
सर्वांचे अभिनंदन.
ह्या वर्षी भाग घेतलेल्या आणि बक्षिस मिळालेल्या स्पर्धकांनी इतर लोकांना या स्पर्धेत भाग कसा घ्यावा, बक्षिस कसे मिळवावे, आपल्या ब्लॉगवर पुढच्या वर्षात नक्की कधी कुठे कसे काय टाकावे, ब्लॉगस्पॉट बरा की वर्डप्रेस,लिखाणाच्या क्वालिटिला जास्त महत्व असतं की तांत्रिक सफाईला,इथं सुद्धा कंपुगिरी चालते का ?, असेल तर कशी,अशा प्रकारचे मार्गदर्शन करावे ही विनंती. साधारण १० वी-१२ वी च्या कोचिंग क्लास मध्ये करतात तसे मार्गदर्शन अपेक्षित आहे. तसेच तज्ञ मिपाकरांकडुन या निवड झालेल्या ब्लॉगबद्दल त्यांची मते ऐकायला आवडतील.
23 Oct 2012 - 6:00 pm | गंगाधर मुटे
सर्वांचे मनःपूर्वक आभार............!
25 Oct 2012 - 6:39 pm | मी-सौरभ
विजेत्यांचे आभिनंदन अन् धागाकर्त्यांचे आभार :)
30 Oct 2012 - 1:38 pm | चिगो
लगे रहो..