जागतीक मिसळ दिन- १३ ऑक्टोबर

चिंतामणी's picture
चिंतामणी in काथ्याकूट
10 Oct 2012 - 1:34 am
गाभा: 

मिसळ म्हणले की अनेकांचे कान टवकारले जातात. हे रसायन असेच आहे. वेड लावते. मिपाकरांना मिसळ्ची महती मी काय वर्णावी.

असो.

मध्यंतरी वाचनात आले आणि काल चेपुवर वाचण्यात आले की काही मिसळप्रेमींनी १३ ऑक्टोबर हा "जागतीक मिसळ दिन" म्ह्णून साजरा करावा असे आवाहन करीत आहेत.

त्या मागचा विचार अश्या प्रकारे व्यक्त केला आहे.

रोज डे, वेलेन्तीआईन डे, हा डे, तो डे आपण पाश्च्यात संस्कृतीचे अनुकरण करून करतो,
मग आपला स्वताचा असा एक तरी दिवस असावा ह्या भावनेतून ऑक्टोबर महिन्याचा दुसरा रविवार हा जागतिक मिसळ दिवस म्हणून साजरा करावा अशी कल्पना डोळ्यासमोर आली, व बरेच मित्रांनी त्याला हो म्हणून साथ दिली...
मग होऊन जाउदे एक मराठी माणसाचा दिवस जगात, जागतिक मिसळ दिवस.
जास्तीत जास्त मिसळ प्रेमी पर्यंत हा इवेंट पोचवून, जगाला सिद्ध कौरन दाखवू कि मराठी माणूस कुठेही कमी नाही.

चला आपण सगळे यात सामील होउ.

शनिवरी सकाळी "मिसळ कट्टा" साजरा कुठे करायचा हे लिहा.

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

10 Oct 2012 - 1:43 am | चिंतामणी

मिसळी बरोबर अनेकांना "पाव" आहे की स्लाइस ह्या चर्चेत रस असेल त्यान्नी पुढिल गोष्टीनची नोंद घ्यावी.

आम्हाला मिसळीबद्दल ममत्व आहे. पण त्याबरोबर पाव किंवा स्लाइस असतील याची चर्चा नको.

चिरोटा's picture

10 Oct 2012 - 7:27 am | चिरोटा

रोज डेला एकमेकांना गुलाब देतात तसे या दिवशी एकमेकांना मिसळ द्यायची का?

शनिवरी सकाळी "मिसळ कट्टा" साजरा कुठे करायचा हे लिहा.

मुंबई,ठाणे,पुणे सोडून कुठेही चालेल.

महाराष्ट्राची खासियत असलेल्या मिसळीचा मनसोक्त स्वाद घ्या

किसन शिंदे's picture

13 Oct 2012 - 2:15 pm | किसन शिंदे

काका, मामलेदारला भेटूयात का?

चिंतामणी's picture

13 Oct 2012 - 2:40 pm | चिंतामणी

पुण्यात आहे.

तु पुण्यात येतोस का?

गणपा's picture

13 Oct 2012 - 2:51 pm | गणपा

आज चापावीच लागणार :)

मामलेदारांची मिसळ.
.
फटु जालावरुन साभार.

मिसळीचा इवलासा बाऊल पाहून दु:ख झाले. आज घरी बनवून मोठ्ठा बाऊल भरून चापली. संडे स्पेशल..!

अरे वा!! हा प्रकार चांगला आहे. आधी समजलं अस्तं तर मटकी भिजत घातली असती. असो.

पैसा's picture

13 Oct 2012 - 7:31 pm | पैसा

घरूनच सामील. मटकीची उसळ तयार आहेच!

मी-सौरभ's picture

14 Oct 2012 - 12:25 am | मी-सौरभ

मी आज मिसळ चापून साजरा करेन :)

माझीही शॅम्पेन's picture

14 Oct 2012 - 8:52 pm | माझीही शॅम्पेन

अस चटावरच श्राध्ध घातल्या सारख मिसळ दिवस साजरा करण्यात काय मजा हे कळल नाही :) आम्ही तर वर्ष-भर जेव्हा वाटेल तेंव्हा चापतो !!!!

इन्दुसुता's picture

14 Oct 2012 - 9:46 pm | इन्दुसुता

णिषेढ. त्रिवार णिषेढ.
आम्हा अनिवाश्यांना ( कोण म्हण्तोय तो.. झैरात झैरात !! कसं अगदी बरोब्बर ओळखलं ...) स्वतः करून खाणे आणि / किंवा इनो घेणे हे दोनच पर्याय असताना जागतिक मिसळ दिन सुचविल्याबद्दल परत एकदा णिषेढ.

शनिवारी सक्काळी-सक्काळी मिसळ चापून मिसळपाव-डे साजरा केला गेला आहे, याची नोंद घ्यावी..