पु.ल :महाराष्ट्राचे लंगडे व्यक्तिमत्व !

तर्री's picture
तर्री in काथ्याकूट
17 Sep 2012 - 12:46 pm
गाभा: 

नुकताच एक ब्लॉग वाचण्यात आला. ह्या ब्लॉग मध्ये अतिशय वैचारिक , पुरोगामी व बहुजनहिताय लेखन केलेले आहे. अनेक तथाकथित मान्यवरांची धोतरे , तुमानी टराटरा फाडण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कुसुमाग्रज - ज्यांना साहित्य चोरी करता ज्ञानपीठ देण्यात आले त्यांचा समावेश आहे. आता कुसुमाग्रजांवर / त्यांच्या नाटकावर शेक्पिअरचा प्रभाव होता हे स्वतः तात्यासाहेब म्हणायचे ! पण हया ब्लॉग च्या विदुषींनी वि.वा. शिरवाडकरांनी आपल्या “नटसम्राट” हया नाटकात कशी शेक्पिअरची वाक्ये उचलली आहेत ? त्याचा अती सखोल अभ्यास केला आहे. सर्व सामान्य वाचकास हे संशोधन झेपणारे नाही. म्हणून वाचण्या पासून मी परावृत्त त्यांना करत आहे व ब्लॉग चा संदर्भ जाहीर पणे देत नाही आहे. कुसुमाग्रज ह्यांचे असे वस्त्र हरण व्हायलाच हवे होते आणि ते झाले ह्याचा अतीव आनंद समग्र नाशिक नगरी प्रमाणे मलाही होतो आहे.

अती आनंदाची गोष्ट म्हणजे ह्याच विदुषींनी केलेले पु.ल. देशपांडे ह्यांच्या लेखनाची समिक्षा ! जवळ जवळ त्यांची हजामत !! “महाराष्ट्रचे लाडके व्यक्तिमत्व” असे ज्यांना त्यांचे पगारी भाट म्हणतात तेंव्हा आम्हाला अती दु:ख होते. हया विदूषकाला महाराष्ट्राने उगाचच चढवून ठेवला होता. अहो ह्यानी कधी आपले हात माती मध्ये काळे केले नाहीत , एकाही साखर कारखान्याचे जे मतदारही नाहीत व ज्यांनी कधीही शाहू महाराजांना मानले नाही (उलट एक धिप्पाड माणूस अशी त्यांची अवहेलनाच केली ) त्याला का म्हणून “महाराष्ट्रचे लाडके व्यक्तिमत्व” म्हणायचे ? हा सगळा सुनिता बाईंच्या (ह्याच त्या ज्यांनी मुक्तांगणला देणगी देवून विशिष्ठ लोकांना व्यसनांच्या गर्तेत फेकले ) “गोबेल्स नीतीचा” भाग होता.
आज हा ब्लॉग वाचल्यावर माझे डोळे ज्यांनी उघडले त्या ब्लॉग कर्तीचे कसे आभार मानावेत हेच सुचत नाही आहे !

मी ही एके काळी पापी होतो. पु.ल. चे ( ह्याची गुंडगिरी व दडपशाही इतकी होती की लोक त्याला खाजगीत भाई म्हणत असत ) लेखन मी अधाश्या सारखे वाचत असे. त्याच्या लेखनाने माझी अभिरुची इतकी बिघडवली की विचारून सोय नाही. हया बिघडलेल्या अभिरुची ची ३ उदाहरणे देवून मी माझ्या संशोधनाचा पहिला सर्ग संपवणार आहे.

१. हया पी.एल. च्या अतीसामान्य लेखना मुळे मला इतर विनोदी लेखकांचे विनोद आवडेनासे झाले होते. माझ्या आयुष्यतील आनंदच ह्याने काढून घेतला होता. शक्ती कपूर , कदर खान सारखे विनोदी नट जेंव्हा हसवून हसवून प्रेक्षकांच्या पोटात दुखावत असत तेंव्हा मी कसनुसा होत असे . शक्ती कपूर , कादरखान , ह्यांचे उच्च , दर्जेदार विनोद न समजण्याची माझी सुमार बुद्धी ! आज आठवून हसू येते . हा दोष हया साल्या पिल्याचाच !
२. पिल्या स्वतःला मोठा संगीतकार समजायचा. नुसते पेटी वाजवून काय कोणी संगीतकार होते. पण हा ही त्या पुणेकरांचा कंपूबाजपणा ! ज्या पुणेकरांनी कधी रेड्याचे रेकणे ऐकलेले नाही , त्यांचा हा संगीतकार ! माझी संगीताची जाण ह्याच्या लेखना मुळे बिघडली. बांगो , बांगो , बांगो सारख्या गाण्यावर कुले वाकडे करायचे सोडून कानावर हात ठेवण्याचा माझ्या करंटेपणाला “हाच” xxx जबाबदार. ( पु.ल. इतक्या घाण शिव्या देत असे वर xxx छापत असे – ते परत केंव्हातरी ) संगीत भूषण भप्पी लाहिरी , संगीतमार्तंड अन्नू मलिक ह्यांचे संगीत मला कधी झेपलेच नाही. आता मी संस्कृती वस्त्र सोडले आहे म्हणून मी खूप नागडा आहे. सुखी आहे. “दिल गार्डन गार्डन हो गया” सारख्या गाण्याचा परम आनंद घेता येतो.

३. हयाच्या हलक्या व प्रतिभाशून्य लेखनाने माझी वाचनाची आवड बिघडवून टाकली. नव साहित्य व नव कविता हयाला कधीही जमली नाही. हया प्रतीगाम्याला कायम पुण्याचे जोशीच दिसले. रामोशी नाही दिसले ! इतके टोकदार नव साहित्य मराठी मध्ये येत होते आणि मी मात्र नस्ती उठाठेव करत होतो. ह्याचाच लेखनाने माझ्या मनात नवसाहित्याची घृणा निर्माण झाली . त्याची भरपाई म्हणून ताबडतोप त्या पुणेकराची मक्का असलेल्या नारायणपेठेचे नामकरण तातडीने “नानू सरंजामे “ पेठ असे करण्यात यावे ही मागणी मी हया संशोधनखंडाच्या अखेरीस करीत आहे. पु.ल. च्या लेखनाने बहकलेले त्याला भरघोस पाठिंबा देतीलच.

मला माहित आहे की माझ्या सारखेच अनेक पु.ल.ग्रस्त आज समाजात लाजिरवाणे जीणे जगत आहेत. पण मित्रानो घाबरू नका. संघटीत व्हा.
वेळ परिवर्तनाची आहे , प्रबोधनाची आहे , प्रवार्तानाची आहे , प्रतिक्रियेची आहे ,प्रसावायची आहे आणि प्रातर्विधीची आहे . आपला हुंकार जोरात भरा. बाहेर येवू द्या सगळी घाण तरच समाज ठेवेल तुमची जाण !
जय रेडे-स्वर !

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

17 Sep 2012 - 12:49 pm | बॅटमॅन

वेळ परिवर्तनाची आहे , प्रबोधनाची आहे , प्रवार्तानाची आहे , प्रतिक्रियेची आहे ,प्रसावायची आहे आणि प्रातर्विधीची आहे . आपला हुंकार जोरात भरा. बाहेर येवू द्या सगळी घाण तरच समाज ठेवेल तुमची जाण !
जय रेडे-स्वर !

लै भारी!!!!

पण अशा वायझेडांना अनुल्लेखानेच मारले पाहिजे असे माझे मत आहे. नैतर "बदनाम हुआ तो क्या नाम न हुआ" अशी मानसिकता असते बीग्रेडींची.

कोणीतरी yz काहीतरी ब्लॉग लिहितो.. आणि काहीबाही बोलतो..
आता माहितेय ना त्याने वाय झेड लिहिलेय .. सोडून द्या कि.. इथे चर्चा करून काय होणारे..

बर.. इथे चर्चा करून तो ब्लॉग उडवला जाणार असेल तर बाब अलाहिदा ..

असो ..
चालुद्या

शब्दा शब्दा गणिक उपरोध ठासुन भरला असला तरी साहित्यिकांबद्दल वापरलेली भाषा आवडली नाही.

तर्री's picture

17 Sep 2012 - 1:15 pm | तर्री

साहित्यिकांबद्दल वापरलेली भाषा आवडली नाही. ( तत्वत: १०० %मान्य )
वाचकाचा चस्मा काढा - विडंबनाच्याच चष्म्यातून वाचा.

बिडंबन करताना दुसर्‍यावर चिखल उडवायलाच हवा का?
तरच हसु येतं?

ते संगीत , साहित्य , विनोद हे प्राण आहेत विडंबनाचे !
जात , समाज , वगैरे चोकट आहे - ते सोडा !

ढब्बू पैसा's picture

17 Sep 2012 - 1:21 pm | ढब्बू पैसा

सदर धागा वाचून असीम त्रिवेदीच्या कार्टून्सची आठवण झाली ;)
बाकी असोच..

आदिजोशी's picture

17 Sep 2012 - 1:53 pm | आदिजोशी

संदर्भ न देता लिहिलेला हा लेख बिनकामाचा आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर टिका करताय ती गोष्टच जर लोकांनी वाचली नसेल तर टिका वाचण्याला काय र्थ उरतो?

गणपा's picture

17 Sep 2012 - 1:59 pm | गणपा

+१

तुम्ही म्हणताय म्हणुन आम्ही विडंबन मानायच?

तर्री's picture

17 Sep 2012 - 2:05 pm | तर्री

संदर्भ न देता लिहिलेला हा लेख बिनकामाचा आहे. (तसे लेखात लिहिले आहे ना हो )
तुम्ही ज्या गोष्टीवर टिका करताय ती गोष्टच जर लोकांनी वाचली नसेल तर टिका वाचण्याला काय र्थ उरतो? ( काहीही अर्थ नाही उरत तथा अभ्यास वाढवा )

उदय के'सागर's picture

17 Sep 2012 - 2:02 pm | उदय के'सागर

कृपया हा धागा उडवता येईल का? आपण कोणीच सहमत नसू जर त्या तत्सम ब्लॉगवर काय लिहीलय त्यावर आणि ज्येष्ठ साहित्यिकांबद्दल जर आपल्याला आदर आहेच तर आपण असे वाचावेच का आणि त्यावर चर्चा कराव्याच कशाला?

बाकी गणपाशी सहमत >> बिडंबन करताना दुसर्‍यावर चिखल उडवायलाच हवा का?

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2012 - 2:57 pm | प्रभाकर पेठकर

+१००० % सहमत.

लेखकाच्या भावना समजल्या पण मांडणी आणि शब्द योजना अतिशय चुकीची आणि वाचकांच्या भावना दुखावणारी आहे.

पांथस्थ's picture

17 Sep 2012 - 2:18 pm | पांथस्थ

मला वाटतं हाच तो ब्लॉग असावा - अनिता पाटील विचार मंच.

काय तुम्ही पण? आम्ही केव्हाच वाचुन सोडून दिला होता. उगा उल्लेख करायची गरज नव्हती.

मात्र आता हा लेख टंकल्याने इतर सदस्यांना बोध व्हावा म्हणुन लि़ंक देत आहे.

लोकांकडे खरच खूखूखूखूखूखूखूपच जास्त मोकळा वेळ असतो!

आदिजोशी's picture

17 Sep 2012 - 2:49 pm | आदिजोशी

विनोदी साहित्याचा खजीना उघडून दिल्याबद्दल लक्ष लक्ष वेळा धन्यवाद :) :) :)

हा हा हा!!! पहिल्या वाचनाच्या वेळी गडाबडा लोळलो होतो.

आता दया येते!

माझ्या मते हा केवळ अनुल्लेखाने मारण्याचा विषय नाही. काहीतरी केले पाहिजे.

बजरबट्टु's picture

17 Sep 2012 - 3:17 pm | बजरबट्टु

टीका कोणं करतय्...याला फार महत्व आहे. कोणी पावटा उठतो अन टीका करतो....अश्या लोकांच लिखाण मनावर नाही घ्यायच्....कशाला त्यांची दखल घेताय्....त्यांना प्रसिद्धी हवी आहे बाकी नाही.

पिलीयन रायडर's picture

17 Sep 2012 - 3:47 pm | पिलीयन रायडर

खुप खुप राग आला.. मग खुप खुप शिव्या पण घालाव्या वाटल्या... पण मग आपण जे बोलु ते समजण्या इतकी तरी त्या बाईला अक्कल असेल असं वाटलं नाही...
पु.लं विषयी वाचुन तर मला तिच्याच बद्दल वाईट वाटायला लागलय.. बिचारीला पु.लं केवळ ब्राह्मण म्हणुन त्यांच्या लिखाणाचा आनंद घेता येत नाहि.... कसली भारी गोष्ट मिस करतेय ही बाई...

काय तर म्हणे...

"पूल"चे +नाच रे मोरा आंब्याच्या बनात+ हे गाणे गेली कित्येक दशके महाराष्ट्रात वाजतच आहे. तेही लहान मुलांचे बडबडगीत म्हणून पूलची बुद्धी लहान मुलांएवढीच होती, असा अर्थ त्यातून घ्यायचा का? आपण काय शिकवतोय हा लहान मुलांना ? उद्या एखाद्या मुलाने विचारलेच मला आंब्याचे बन दाखव, तर कसे दाखविणार? ...पुन्हा 'काळा- काळा कापूस पिंजला रे ! ' उद्या एखाद्या पोराने काळा कापूस कुठे असतो ? असे विचारले तर काय दाखवायचे ? मग हें गाणे मोरा साठी आहे की चोरा साठी ? द्रोणाचार्यांनी ज्या प्रमाणे अश्वथाम्याला तांदळाच्या पिठात पाणी कालवून तेच दुध म्हणून पाजले आणि तो देखील ( दुधाची चवच माहिती नसल्या मुळे) त्या पीठ पाण्याला दुध समजत राहिला. मराठी माणूसही तसाच आंब्याचे बन आणि काळा काळा कापूस म्हणतच राहिला.

रानी १३'s picture

17 Sep 2012 - 3:56 pm | रानी १३

+१ @पिलीयन रायडर

अविकुमार's picture

17 Sep 2012 - 4:01 pm | अविकुमार

पहिलीच ओळ "कोणाही जीवाचा न घडो मत्सर" अशी आहे आणि तिलाच संपूर्णपणे हरताळ फासलाय या बाईंनी. बाकी स्वतःचे हसे कसे करुन घ्यावे याचे मुर्तीमंत उदाहरण आहेत या बाई!

अश्क्य मुर्ख बै आहे हि अनिता पाटिल

चौकटराजा's picture

17 Sep 2012 - 4:10 pm | चौकटराजा

माझी आई ८५ वर्षाची आहे . तिला अल्झाईमरचा विकार झाला आहे. ती मोठ्याने ओरडून म्हणते " ए नारायणा.... पांडुरंगा .... मला मारून टाक... टाक मारून मला ... तो कसा मारणार मला त्याला तेवढी अक्कल कुठे आहे ....??? " तिला नाचरे मोरा गाणे म्हणून दाखवले तर मला म्हणते " गाढवा तो शब्द
आंव्याच्या वनात आहे " बनात नव्हे ! " आणि बन जरी असेल तरी तो वन या शब्दाचाच अपभ्रंश आहे.
आता उपवनात हे मीटर मधे बसत नसेल म्ह्णणून वन वापरले असेल. याचा अर्थ आंव्याचे बनच नसते असा होतो काय ? केतकीचे बन असतेच ना ? ? भ्रमिष्ट झालेली आई देखील काही वेळेस नीट बोलते पण
महाराष्ट्रात काही माणसे सतत भ्रमात असल्यासारखी ब्लॉग का लिहित असतात बुवा ?

रानी १३'s picture

17 Sep 2012 - 4:59 pm | रानी १३

@ पांथस्थ,
दुवा वाचुन खुप मन्स्ताप झाला.....आपण काही करु शकत नाहि याचे वाइट पण वाटले......:(

चेतन माने's picture

17 Sep 2012 - 5:00 pm | चेतन माने

ब्लॉग काही क्षण पाहिला !!!
त्या बाईंचा सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे तो चालूद्यात !!!

मोहनराव's picture

17 Sep 2012 - 5:15 pm | मोहनराव

कीव आली या बाईच्या अकलेवर!!

पांथस्थ, क्लिकली ओ ती लिंक :( अंघोळ करून मग बाकी चर्चा ;)

तिमा's picture

17 Sep 2012 - 6:22 pm | तिमा

तो ब्लॉग कुणाचा आहे, अनिता पाटील म्हणजे कोण, या सगळ्याचा पर्दाफाश दुसर्‍या संस्थळावर झाला आहे.
http://www.aisiakshare.com/node/1190
तरी त्याच घाणेरड्या चिखलात पुन्हा दगड मारायचे काही कारणच नव्हते. यात उपरोध व विडंबनाच्या नांवाखाली स्वतःच्या मनातलेही गरळ ओकण्याचा प्रयत्न दिसतो आहे. आम्ही, विडंबनातही, आमच्या दैवतांबद्दल अशी अभद्र भाषा वाचू शकत नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Sep 2012 - 6:24 pm | निनाद मुक्काम प...

बिग्रेडी लोकांमध्ये चार बुक शिकलेली काही टाळकी असतात.
त्यांचे बौद्धिक मनोरंजन होण्यासाठी हे लेखन आहे.
कम्युनिस्ट एकेकाळी भांडवल दारांवर अशीच चिखलफेक करायचे.
ह्या ब्लॉग चा येथे उल्लेख झाल्याने समाजातील विशिष्ट प्रवृत्ती कोणत्या उद्देशाने जातीय तेढ निर्माण करत आहेत ह्याची माहिती मिळते.

ह्या लोकांना फक्त अकलेचे तारे कसे तोडायचे तेवढेच माहित आहे. अजून काही माहित नाही आणि म्हणूनच असली चिखलफेक चालू आहे.

च्यायला ह्यांच्या कुल्ल्यावर जेव्हा तथाकथित सेक्यूलर लाथा झाडतील ना, तेव्हाच ह्यांना अक्कल येईल.

नाना चेंगट's picture

17 Sep 2012 - 7:02 pm | नाना चेंगट

बाई विचारवंत असाव्यात की काय असे वाटून गेले. असो.

आशु जोग's picture

17 Sep 2012 - 7:43 pm | आशु जोग

धागाकर्त्याने छान लिहिले आहे.
उल्लेख नसला तरी मिपाकर तेवढा सुज्ञ आहे.

लेखन वाचून प. रा. यांची आठवण झाली

असो

या ब्लॉगकर्त्या 'तो' का 'ती' की टीम आहे मोट्ठी
कारण संशोधन जबरदस्त आहे

आशु जोग's picture

17 Sep 2012 - 7:44 pm | आशु जोग

धागाकर्त्याने छान लिहिले आहे.
उल्लेख नसला तरी मिपाकर तेवढा सुज्ञ आहे.

लेखन वाचून प. रा. यांची आठवण झाली

असो

या ब्लॉगकर्त्या 'तो' का 'ती' की टीम आहे मोट्ठी
कारण संशोधन जबरदस्त आहे

हुप्प्या's picture

20 Sep 2012 - 1:33 am | हुप्प्या

विडंबनाचे राहू द्या. पण मूळ ब्लॉगवरील लिखाण वाचून डोके भणभणले.
एका खरोखरी पुरुषोत्तम म्हणण्याच्या लायकीच्या माणसाच्या कवितेबद्दल, विनोदबुद्धीबद्दल इतकी खालच्या दर्जाची टीका कुणी करेल असे वाटले नव्हते.
प्रतिभासंपन्न, भाषाप्रभू, कमालीचे विनम्र, साधेपणाने रहाणारे, तत्त्वनिष्ठ, असंख्य चांगल्या सामाजिक कार्याकरता कुठलाही गाजावाजा न करता अफाट रकमांच्या देणग्या देणारे हे दांपत्य महाराष्ट्राचे भूषण आहे. शिवाजी महाराजांसारखे हेही महाराष्ट्राकरता अभिमान वाटेल असे बरेच काही करुन गेले आहेत. अशा लोकांविरुद्ध आपला जातीयवादी अजेंडा वापरुन असे लिहिणे म्हणजे हा द्वेष किती आंधळा आणि खोल भिनला आहे ह्याचे द्योतक आहे. दुसर्‍या महायुद्धापूर्वी हिटलर वगैरे मंडळींनी ज्यू लोकांविरुद्ध असेच गरळ ओकायला सुरवात केली होती. त्यांनी नंतर ज्यूंचे केले तसे इथे बामनांचे सरसकट शिरकाण होऊ नये हीच इच्छा.

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2012 - 12:24 pm | प्रभाकर पेठकर

अनवधानाने, ब्राह्मणांची तुलना ज्यू लोकांशी झाली आहे. वाईट वाटले.

गणामास्तर's picture

20 Sep 2012 - 12:34 pm | गणामास्तर

पेठकर काका त्यांनी फक्त उदाहरण दिले आहे, तुलना केली आहे असे मला तरी कुठे जाणवले नाही.
असो, तुम्हाला वाईट का वाटले ते जाणून घ्यायला आवडेल.

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2012 - 12:56 pm | प्रभाकर पेठकर

व्यनि केला आहे.

कोण ती बाई अन कितीक जण तिच्या मुर्ख ब्लॉगला किंमत देतात? तिच्या मताला काय किंमत? तुम्ही तरी असले ब्लॉग वाचायला का जाता?

मृत्युन्जय's picture

20 Sep 2012 - 10:04 am | मृत्युन्जय

ब्ळॉग वाचुन मला मराठी असल्याबद्दल स्वतःचीच किळस वाटली. किती अक्कलशून्य लिहिले आहे ते. ब्लॉगरला स्वतःला तरी जे काही लिहिल आहे ते पटते आहे का? आणि कश्या भाषेत? शाहू, आंबेडकर बद्दल असे कोणी लिहिले तर आत्तापर्यंत लिहिणार्‍याच्या जातीतले कोणी शिल्लक उरले नसते. सहनशक्तीचा आणी समंजसपणाचा किती तो गैरफायदा घ्यायचा.

माझीही शॅम्पेन's picture

20 Sep 2012 - 11:19 am | माझीही शॅम्पेन

ज्याना अन्नुलेखन्नी मारायला पाहिजे त्याना इथे धागा टाकून फुकट सवंग प्रसिद्धी देताय ?

संपादक मंडळानी झोपा काढण्यापेक्षा हा वादग्रस्त लेख ताबडतोब उडवून टाकावा ही नम्र विनंती

अमोल केळकर's picture

20 Sep 2012 - 11:26 am | अमोल केळकर

सहमत

गणपा's picture

20 Sep 2012 - 1:11 pm | गणपा

संपादक मंडळानी झोपा काढण्यापेक्षा हा वादग्रस्त लेख ताबडतोब उडवून टाकावा ही नम्र विनंती

'नम्र'विनंतीची भाषा अतिशय आवडली.

या धाग्यामुळे जगात किती प्रकारची विकृत मंडळी आहेत ते कळले.
खरे तर अनुल्लेखाने मारायच्या लायकीची गोष्ट पण काहिंना ते समजत नाही म्हणुन हे लिहावे लागते.

माझीही शॅम्पेन's picture

20 Sep 2012 - 11:01 pm | माझीही शॅम्पेन

व्यक्ती तितक्या प्रकृती कदाचित तेवढ्याच विकृती असु शकतील पण त्या सर्वाकडे दुर्लक्ष केल पाहिजे
हा लेख म्हणजे मिपा ला गाल-बोट लागल्या सारख वाटताय .. बाकी सं.मं. समर्थ आहे

रेवती's picture

20 Sep 2012 - 9:51 pm | रेवती

संपादक मंडळानी झोपा काढण्यापेक्षा हा वादग्रस्त लेख ताबडतोब उडवून टाकावा ही नम्र विनंती

तुमच्या घरचे नोकर नाहीयेत संपादक.
एवढं असेल तर तुम्ही असल्या प्रकारांकडे दुर्लक्ष करायला शिका.

माझीही शॅम्पेन's picture

20 Sep 2012 - 11:10 pm | माझीही शॅम्पेन

कै च्या कै .. इथे हा लेख टाकून जवळपास तीन दिवस झालेत, त्यावर इतक्या प्रतिक्रिया आल्या नंतर काहीही कारवाई झालेली दिसत नाही..
बाकी मी सं मंडळींना नोकर समजतोय वैगरे हा तुमचा कल्पना-विलास आहे त्यामुळे तूर्तास थांबून दुर्लक्ष करतो...

ग्रेटथिन्कर's picture

20 Sep 2012 - 11:44 am | ग्रेटथिन्कर

या ब्लॉगचे ठाऊक नाही. मात्र महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक हे कॉपीबहाद्दर आहेत, हे सत्य आहे.प्रसिद्ध इंग्रजी लेखकांची शैली, त्यांचे लिखाण जसेच्या तसे बेमालुमपणे मराठीत डकवायचा प्रकार अनेक वर्षे चालू आहे.

शिल्पा ब's picture

20 Sep 2012 - 9:48 pm | शिल्पा ब

नावं अन लेखन सांगा. आम्ही आत्तापर्यंत पु.ल., अत्रे, गोनीदा, खांडेकर, कोल्हटकर, पाध्ये वगैरे अशांचंच साहीत्य वाचलंय.

ग्रेटथिन्कर's picture

20 Sep 2012 - 10:36 pm | ग्रेटथिन्कर

शिल्पा ब ,आपण व्यक्तीमहात्म्यवादी असाल तर आपल्याला एकही साहित्यिक कॉपीबहाद्दर वाटणार नाही.मराठीतील एक प्रसिद्ध भयकथा लेखक इंग्रजी हॉरर चित्रपटातले भयप्रद प्रसंग जसेच्या तसे आपल्या कथेत आणायचे. जरा नेट धुंडाळले तर सापडेल.

मी व्यक्तीमहात्म्यवादी आहे का नाही हे इथे बहुतेकांना माहीती आहेच...पण आपण उदा. द्यावं अशी पुन्हा आग्रहाची विनंती. हे मला माहीती नाही म्हणुनच विचारतेय.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Sep 2012 - 10:52 pm | निनाद मुक्काम प...

ग्रेट थिंकर
माझ्या मते साहित्य चोरी ह्या संकल्पनेकडे वेगळ्या दृष्टी कोनातून पहा.
आज जगात वेगवेगळ्या भागात अनेक प्रकारचे साहित्य निर्माण होते, पण त्यातील खूप कमी साहित्य जगभर वाचायला मिळते. कारण ते एकतर सर्वत्र प्रकाशित होत नाही, किंवा भाषेची अडचण
आता मला सांगा भारतात छोट्या खेड्यात किंवा गावात हॉलीवूड चे सिनेमे ह्या दोन्ही कारणास्तव पाहिले जात नाही.व चुकून लागले तर भाषे अभावी पाहिले जात नाही.
पण त्यावर आधारीत चोरी चोरी सिनेमा मात्र भारतीय जनता पाहते.
मूळ सिनेमातील नायक व नायीकेमधील नाते आपल्या भारतीय सिनेमात अजरामर अश्या गीतांद्वारे व्यक्त होते.
अश्याच रीतीने परकीय कथानक देशी मातीत रुजवताना त्यांना अस्सल भारतीय बाज
जर प्रसिद्ध भयकथा लेखक देत असतील तर क्या बिघडले.
आज आज तीन दशक सतत भयकथा ह्या आपल्याकडील क दर्जाच्या समजलेल्या
साहित्यप्रकार जो सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय आहे.
अव्याहतपणे महाराष्ट्रातील जनता वाचत आहे.
ह्यात काहीच वावगे नाही.
घाबरण्यात मजा असते.
हेच खरे.

ग्रेटथिन्कर's picture

27 Sep 2012 - 11:45 pm | ग्रेटथिन्कर

निनाद, मराठी लेखक आंग्ल भाषेतले लेखन लेखनशैली मराठीत आणतात त्यात गैर काही नाही. असे साहीत्य 'स्वैर अनुवाद' याप्रकारात मोडले जावे.परंतु अनेक सुप्रसिद्ध मराठी लेखक असे साहित्य स्वतःचे असल्याप्रमाणे खपवतात ते चूक वाटते. मुदलात तुम्ही काही नवे लिहीणार आहात की नाही? इतरांचे कॉपी करुन भलेही त्याचे भारतीयकरण मराठीकरण करु देत, त्यात काय हाशील? मराठी लेखक मग फक्त उत्तम अनुवादक म्हणावे लागतिल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Apr 2013 - 2:42 am | निनाद मुक्काम प...

थिंकर साहेब
मुळात मुद्दा असा आहे ,एखाद्याला अनुवादक म्हणा किंवा लेखक
काय फरक पडतो , तुम्हाला नी मला एक वाचक म्हणून
अनुवादक म्हणजे विजय देवधर सारखे लेखक जे परकीय कथा अनुवादित करतात.
त्यांचे ह्या शेत्रात खूप नाव आहे ,
मात्र परकीय कथा भारतीय बाजात आणायला कसब लागते
राजकपूर ला चोरी चोरी ह्या सिनेमासाठी कुणी चोर म्हणून हिणवत नाही.
आजही आपल्याकडे स्पा
ला
जेव्हा स्पा धारप असे म्हटले जाते ,तेव्हा मराठी भय कथांच्या इतिहासात धारपांचे स्थान अढळ असल्याचे आढळून येते.

अवतार's picture

21 Sep 2012 - 3:29 pm | अवतार

All propaganda has to be popular and has to accommodate itself to the comprehension of the least intelligent of those whom it seeks to reach. It must confine itself to a few points and repeat them over and over. It must be addressed always and exclusively to the masses.

सुमीत भातखंडे's picture

23 Sep 2012 - 12:20 pm | सुमीत भातखंडे

कमॉन गाइज...
हा शुद्ध जातीयवादी ब्लॉग आहे. त्यावर एखादा लेख टाकावा एव्हढी त्याची लायकी नाही. दुर्लक्ष करणे उत्तम...

समंजस's picture

23 Sep 2012 - 1:24 pm | समंजस

ज्या ब्लॉग वर हे आधारित आहे तो ब्लॉग असे दोन्हीही लेख हे "फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन" च्या नावाखाली चालवून घ्यायला हरकत नसावी जरी रुचीहीन असले तरी :)

कधी काळी वाचलेलं आठवतेय की वर्गात मास्तरांनी फळयावर एक उभी रेष काढली आणि वर्गातील विद्यार्थांना सागितलं की ह्या रेषेला न खोडता छोटं करून दाखवावं, बर्‍याच विद्यार्थ्यांनी विचार केला परंतू नाही जमलं मग अर्थातच एका विद्यार्थ्याला सुचलं आणि त्याने त्या रेषेच्या बाजूला दुसरी एक मोठी रेष काढली ज्या मुळे अर्थातच पहिली रेष छोटी झाली (दिसायला लागली).
हे सगळं सागण्याचा खटाटोप हाच की ब्लॉग कर्त्या लेखिकेने आणि इतर तत्सम व्यक्तींनी, पहिल्या रेषेला खोडून छोटा करण्याचा प्रयत्न न करता दुसरी एक मोठी रेष काढावी किंवा प्रयत्न करावा जर दोन्ही गोष्टीं पैकी एकही जमत नसेल तर द्राक्ष आबंट म्हणून निघून जावे [अन्यथा हसं होईल :) ]

काळा पहाड's picture

24 Sep 2012 - 12:34 am | काळा पहाड

काय राव काहीही वाचून जिवाला ताप करून घ्यायचा! वेळ घालवायला बाकी पण उपाय आहेत. बाय द वे, हे आंब्याचे वन स्टाइल चे बोलणे शरद / अजित पवारांच्या कडुन पण ऐकले आहे. "यांच्या बाप जाद्यांनी कधी शेती केली होती काय" आणि तत्सम.

मनीम्याऊ's picture

24 Sep 2012 - 7:55 pm | मनीम्याऊ

अरे पण गीतकार तर 'गदिमा' आहेत. पुलनी फक्त संगीत दिलय...
पण टीका करणारीला फरक कय पडतोय म्हणा, टीका गाण्यावर नाहिच आहे.

कवटी's picture

25 Sep 2012 - 1:45 pm | कवटी

>>अरे पण गीतकार तर 'गदिमा' आहेत. पुलनी फक्त संगीत दिलय...
>>पण टीका करणारीला फरक कय पडतोय म्हणा, टीका गाण्यावर नाहिच आहे
हे लै आवडलं....
असो...
त्या ब्लॉगवरचे एकंदर लेख, त्यातील विचार, मुद्द्यांची माडणी रामटेकेंशी बरीच मिळती जुळती आहे...
अगदी आपल्या भडकमकर मास्तर आणि त्यांच्या शिष्या कु. शरदिनी तैंची जशी आहे तशीच.

sagarpdy's picture

25 Sep 2012 - 2:13 pm | sagarpdy

ते सुद्धा .... ! असो .

एडिट करताना गडबड झाली आणि भलताच अर्थ प्राप्त झाला...
मला असे म्हणायचे होते..
"त्या ब्लॉगवरचे एकंदर लेख, त्यातील विचार, मुद्द्यांची माडणी रामटेकेंशी बरीच मिळती जुळती आहे... त्यांचीच शिष्या वाटतेय अनिता.
आपल्या इथे नाही का भडकमकर मास्तर आणि त्यांच्या शिष्या कु. शरदिनी तैंची लिखाणाची पद्धत जशी मिळतीजुळती आहे अगदी तसेच."

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2013 - 1:22 pm | श्रीगुरुजी

माझ्या संग्रही पु.लं.ची अनेक पुस्तके आहेत. सर्व पुस्तकांची पारायणे झाली आहेत. अजूनही दर काही दिवसांनी मी पु.लं.चे हातात येईल ते पुस्तक वाचून मनमुराद आनंद मिळवितो.

ही बघा ब्रिगेडजंती मुक्ताफळे. मिसळपावला काय म्हणतात तेही बघा.

आदरणीय अनिता तार्इंनी २०११ मध्ये हा ब्लॉग सुरू केला. ब्लॉगवरील अभ्यासपूर्ण लेखांनी जातीयवाद्यांच्या तंबूत घबराट पसरली. ब्लॉगच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लिखाण होऊ लागले. काही ब्लॉग तर केवळ अनिता ताई यांना विरोध एवढ्या एकाच उद्देशाने काढले गेले. लोकशाहीत विरोध नोंदविण्याचा हक्क सर्वांनाच आहे. ‘अनिता पाटील विचार मंच'चे (अपाविम) संपादक मंडळ विरोधकांचा तिरस्कार करीत नाही. उलट विरोधकांची दखल घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. आमच्या ब्लॉगच्या विरोधातील लिखाण या पुढे टप्प्याने वाचकांना उपलब्ध करून दिले जाईल. ‘आमचे विरोधक' या सदरात हे लेख प्रसिद्ध होतील. ‘मिसळ पाव' या संकेत स्थळावरील लेखाने या सदराची सुरुवात करीत आहोत. ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी चालविलेले संकेत स्थळ अशी ‘मिसळ पाव'ची ओळख आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘मिसळ पाव'वर प्रसिद्ध झालेल्या लेखावरील प्रतिक्रिया वाचकांनी अवश्य वाचाव्यात.

ही जुर्रत त्या दीडदमडीच्या फेक ब्लॉगरची...

परिकथेतील राजकुमार's picture

10 Apr 2013 - 6:42 pm | परिकथेतील राजकुमार

ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी चालविलेले संकेत स्थळ अशी ‘मिसळ पाव'ची ओळख आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

यात 'मुक्ताफळे' म्हणण्यासारखे काय आहे ? हे तर जागतीक सत्य आहे.

मिपावरती सतत भाईकाका...भाईकाका, अण्णा..अण्णा, रामदास स्वामी.. रामदास स्वामी ह्याशिवाय वेगळे काही वाचायला तरी मिळते का? विशिष्ठ आडनावाच्या सदस्यांना भरभरुन प्रतिसाद कसे मिळतात ? विशिष्ठ कट्ट्यांना विशिष्ठ लोकांनाचा आमंत्रण कसे असते? संपादक होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? ह्या प्रश्नांची उत्तरे स्वतःलाच विचारल्यास, वरच्या वाक्याची खात्रीच पटेल.

'अनिता पाटील' ह्या नावाऐवजी 'अनिता जोशी / देशपांडे / कुलकर्णी' अशा नावाने सदर लिखाण झाले असते, तर ह्या संस्थळावरती कशी गंभीर आणि तत्वज्ञानी चर्चा झडली असती, लेखीकेचे 'वेगळ्या वाटेवरील विचार' म्हणून कसे कौतुक झाले असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

असो...

कपिलमुनी's picture

10 Apr 2013 - 6:51 pm | कपिलमुनी

मीपा वरच्या संपादक मंडळामद्ये आनी सभासदामद्ये आरक्षन मिळालेच पायजे!!

पराभौंनी आमच्या मागनीला पाठिंबा देउन आपन सोबत आहत ह्ये दाखवावे

प्यारे१'s picture

10 Apr 2013 - 8:01 pm | प्यारे१

संपादक : सहज आठवलेले : शिंदे, कांगले, ठाकूर नि स्वतः घुमरे/ घुमारे....

ब्राह्मण आडनावांची नवी ओळख झाली.
- अब्राह्मण प्यारे

ॐकार केळकर's picture

10 Apr 2013 - 5:52 pm | ॐकार केळकर

जे लोक म्हणतात कि अनिता पाटील कडे लक्ष देऊ नका, त्यांना फक्त प्रासिद्धी पाहिजे आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे...
त्या सगळ्यांनी लक्षात घ्या कि..
वळून तोंड खुपसून राहिले तरी येणारे वादळ येत असतेच आणि करायचे ते नुकसान करूनही जाते..
फक्त तुम्ही मला दिसलेच नाही, काही झालेच नाही करत राहता...
दादोजींचा पुतळा काढला, पुरस्कार काढला, पुस्तकातून वगळले...
राजा शिव छत्रपती सिरीयल मध्ये रामदास स्वामींना वगळले.

कोणी काहीही केले नाही.
१. संभाजी राजांना ब्राह्मणांनी मारले. त्यामुळे गुढी उभारतात.
२. शिवराज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला.
३. इतिहास विकृत केला.

असे शेकडो गैरसमज ते पसरवत आहेत आणि राहतील. आणि ह्याला निद्रिस्त हिंदू (ब्राह्मणच) जवाबदार आहेत.
तरी ज्यांना तोंड वाळूत घालून बसायचे आहे त्यांनी खुशाल बसावे.

बाळ सप्रे's picture

10 Apr 2013 - 6:25 pm | बाळ सप्रे

काही वादळ वगैरे नाहीये.. उगाच अति महत्व न देणेच योग्य.. एका पाठ्यपुस्तकातून एखादा उल्लेख वगळून, एखादा पुतळा हलवून इतिहास बदलत नाही.. इतिहास हा एका पुस्तकात असता तर इतके वर्ष टिकलादेखिल नसता..
आजकाल तर इन्टरनेटच्या माध्यमातून माहीतीचे इतके स्त्रोत उपलब्ध आहेत.. हे सगळं मिटवणं कोण्या एका ब्रिगेडला शक्य नाही.. त्या अनिता पाटिलचा ब्लॉग वाचून कितीजणांनी पु.लं.ची पुस्तक वाचणं सोडलं सांगा पाहू??
तुमची भिती "ईस्लाम खतरेमें" प्रकारचीच आहे !!

तर्री's picture

10 Apr 2013 - 6:43 pm | तर्री

थोड्या गमतीने / उपरोधाने मी हे लिहिले होते.
पु.लंच्या उच्च अभिरुची वर ही कोणाला काही जातीयता दिसत असेल तर ते हसूनच घेतले पाहिजे. त्यात कोणत्याही जातीला चिडण्याच काही करण नाही.
अनिताजीन्च्या विचाराची मात्र "धुळवड" करायलाच हवी.

अलिकडेच या बाइने(?) वाचकांचा निरोप घेतला
म्हणे आम्ही भारतातून काही काळासाठी परदेशात जात आहोत.

का ? तिकडे इंटरनेट नाही वाटते ? असो

त्यांना पुलंचा राग यायचाच. त्यांचा बोलविता पुरुषोत्तम वेगळा.

आनन्दिता's picture

11 Apr 2013 - 2:05 am | आनन्दिता

असली मंडळी जगाचा निरोप घेतील तो सुदिन!!

महाविनोदी ब्लॉग आहे तो. मी नियमितपणे वाचून पोटभर हसतो.

"एखाद्याकडे फक्त हातोडी असेल तर त्याला सगळा आसमंत खिळ्यांसारखाच दिसतो" अशा आशयाचं एक इंग्रजी वचन आहे! :)