कवितांचे प्रकार

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in काथ्याकूट
15 Sep 2012 - 6:37 pm
गाभा: 

राम राम मंडळी

आम्ही नुकतेच आमची समज वाढवण्याच्या प्रयत्नात काही काव्य प्रकार समजून घेतले. त्यातले काही आम्ही प्रसवून सुद्धा पाहिले. आमचा हा प्रयत्न गोड मानावा. काही चुका असल्यास माफ कराव्यात. सुधारणेस वाव असतो असे आमचे मत आहे. त्यामुळे एक ना एक दिवस आम्ही नक्की साहित्यिक या पदवीला लायक होऊ असा आमचा विश्वास आहे. तोवर आशीर्वाद असावा ही णम्र इनंती :)

वैदिक काव्य

आगमनाने तुझ्या रे सूर्या धरती प्रकाशित
सारे प्रफुल्लित होत पाखर किलबिलत
किती उपकार होत मानवाचा तु तारक
प्रेरक जीवनाचा मी सूर्या तुझाच पूजक

पुराण काव्य

अरे अरे नाना झालास हुशार
काव्याचे प्रकार समजले
अक्षरेही मोजा यमक जुळवा
रस तो आणावा काव्यामधे
डोलती रसिक हालवती मान
झाले सभाजन आनंदित
नाना म्हणे देवा गातो मी भजन
आणिक किर्तन आनंदाने

आधुनिक काव्य

मी तिला पाहिले अन तिने मला पाहिले
तिला मी पाहिले अन मला तिने पाहिले
एकमेकांनी एकमेकांना पाहिले पाहिले
मान फिरवूनी चालू लागलो | पुन्हा न भेटाया

पुन्हा ती भेटली अन मी ही भेटलो तिला
पुन्हा मी भेटलो अन ती ही भेटली मला
पुन्हा पुन्हा ते आम्ही भेटलो एकमेकांला
मान फिरवूनी चालू लागलो | पुन्हा न भेटाया

आधुनिकोत्तर

मान गुढग्यात
मुडपून बसलेला असतांना
डास चावला म्हणून
चावलेल्या जागी चापट मारुन
हुळहुळणारा कुल्ला चोळत
तो उभा राहिला
अन
त्याच्या नजरेत भरुन आला विषाद
त्याच सनातन प्रश्नाचा
सर्व जाणीवा बधीर झालेल्या असतांना
अस्तित्वाची जाणीव करुन देणार्‍या
डासाचे आभार मानावेत
की
टेंडर मधे पैसे खाणार्‍या
नगरसेवकाला शिवी हासडावी...
ह्या विवंचनेतच तो चालू लागला अनामिक दिशेने.

आधुनिकोत्तरपश्चात

सम्जैनासे झाल्लंय
वाट टू डू वाटनाटटू डू
डोन्ट क्नो
किम् करिष्यामि
अरंकरेक्याकोईब्ताओ

प्रगल्भ अर्थात "पुढचे"

फुस्स...

निवेदन : "पुढचे" प्रकार असलेल्या काव्याचे रसग्रहण करणार्‍या सदस्यास "पुढीलसम्राट" ही पदवी देण्यात येईल.

प्रतिक्रिया

मन१'s picture

15 Sep 2012 - 6:51 pm | मन१

त्यातही आधुनिक, आधुनिकोत्तर फक्कड जमलय.

आता जरा बालकवी, मर्ढेकर ह्यांच्या विषयी पेशल पेशल विडंबनं पण येउ द्यात.

यकु's picture

15 Sep 2012 - 6:58 pm | यकु

आधुनिकोत्तर

आणि

आधुनिकोत्तरपश्चात

वर ठ्यां ठ्यां हसलो नाना..
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))
=))

मिपावरील काव्यजमातच्छेदक कंपूच्या प्रतिभेला ढुसणी मारणारा धाग्या काढल्याबद्दल आभार..
दोनचार दिवसाची बेगमी झाली.. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2012 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितेचे प्रकार कोणते आहेत अशा उत्सुकतेने आणि मोठ्या अपेक्षेने वाचकांनी धाग्यावर क्लिक केल्यावर अपेक्षाभंगाचा प्रसंग येऊ शकतो. असे होऊ नये म्हणुन विकी पानावरील कविता या पानाचा दुवा देऊन ठेवतो.

बाकी, नाना चेंगट यांनी काव्याचे जे चेंगट प्रकार पाडले आहेत त्याच्याशी आम्ही काही सहमत नाही.

मनातल्य मनात : क्याफेचं दुकान बरं चालु होतं आता ते पाडुन पुस्तक प्रकाशनाचं छापखाना टाकला. छापखान्यात पुस्तकाची पानं जशी छापली जातात तसे रुपये छापले जातील असं स्वप्न पाहिलं आणि तेही मोडलेले दिसतं. मराठी संकेतस्थळावर दोन चार उत्तम लेख लिहुन पाच पन्नास प्रतिसाद मिळाल्यावर आपला वाचकवर्ग मोठा आहे, आपण उत्तम साहित्यिक होऊ असं दिवास्वप्न पडायला लागलं वाटतं. साहित्यिक होण्यासाठी आपल्या मित्राला मनःपूर्वक शुभेच्छा खरडवहीत देऊन याव्या म्हणतो :)

-दिलीप बिरुटे

कविता : भन्नाटच !

नाना चेंगट's picture

16 Sep 2012 - 9:47 am | नाना चेंगट

>>>बाकी, नाना चेंगट यांनी काव्याचे जे चेंगट प्रकार पाडले आहेत त्याच्याशी आम्ही काही सहमत नाही.

आपल्या असहमतीशी आम्ही सहमत आहोत.
अहो, आमचे ते एक मत आहे. सत्य किंवा वास्तव सांगत आहोत असा अविर्भाव आम्ही कधीच आणत नाही. असो.

मनातल्या मनात दोन तीन आयडींचे विचार एकाच आयडीवर लादलेले दिसत आहेत ;)

कवितानागेश's picture

15 Sep 2012 - 7:21 pm | कवितानागेश

काहीच सम्जैनासे झाल्लंय! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2012 - 7:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>काहीच सम्जैनासे झाल्लंय!
असं नै करायचं आपल्या सर्व मित्र मंडळींचं काय ठरलंय (काहीच ठरलेलं नाही)नाना चेंगट यांनी काहीही लिहिलं तरी म्हणायचं. व्वा. उत्तम, छान, अप्रतिम, डोळ्यात पाणी आलं. असं म्हणायचं. :)

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

16 Sep 2012 - 9:55 am | नाना चेंगट

सहमत आहे.
असाच विचार आमचा सुद्धा तुमच्या बाबतीत आहे.
पण हल्ली तुम्ही काही लिहित नाही.
एक लेख लिहून व्यनी करतो, तुमच्या नावाने टाका.
तुम्हाला पण व्वा. उत्तम, छान, अप्रतिम, डोळ्यात पाणी आलं असले प्रतिसाद मिळतील. ;)

टवाळ कार्टा's picture

15 Sep 2012 - 7:26 pm | टवाळ कार्टा

भारी ....

सस्नेह's picture

17 Sep 2012 - 8:50 pm | सस्नेह

खात्री पटली !
एक दिवस नानबा इडंबन-सम्राटापासून साहित्य-सम्राट नक्की बनणार !

जाई.'s picture

15 Sep 2012 - 8:43 pm | जाई.

=)) =))

नाना वेळ जात नाहीये का? :)

नाना चेंगट's picture

16 Sep 2012 - 9:52 am | नाना चेंगट

गणपा मी लिहिलेले आवडत नाहीये का? :)

:)
हॅ हॅ हॅ, अभ्यास वाढवा.
काय हे, हे तुला सांगण्याची माझ्यावर पाळी यावी?

नाना चेंगट's picture

17 Sep 2012 - 1:33 pm | नाना चेंगट

आता शिकायचं म्हटल्यावर सगळंच शिकावं ना ? ;)

गणपा's picture

17 Sep 2012 - 1:38 pm | गणपा

धडा पहिला (आणि शेवटचा).
स्वावलंबी व्हा. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Sep 2012 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व जाणीवा बधीर झालेल्या असतांना
अस्तित्वाची जाणीव करुन देणार्‍या
डासाचे आभार मानावेत
की
टेंडर मधे पैसे खाणार्‍या
नगरसेवकाला शिवी हासडावी...
ह्या विवंचनेतच तो चालू लागला अनामिक दिशेने.
>>>

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Sep 2012 - 3:00 am | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा झक्कास.

बाकी नान्या तुझी जाणीव प्रगल्भ व्हायला हवी अजून हे मात्र खरे...

नाना चेंगट's picture

16 Sep 2012 - 9:51 am | नाना चेंगट

माझे मनापासुन प्रयत्न चालू आहेत. तुमच्या सारख्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यांच्या सहाय्याने नक्की प्रगल्भ होईल अशी आशा आहे.

पैसा's picture

16 Sep 2012 - 8:39 am | पैसा

आधुनिक, आधुनिकोत्तर आणि आधुनिकोत्तरपश्चात हे प्रकार जास्त आवडले. पण हे धोरण आहे का? ब्वार्र...

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2012 - 8:55 am | राजेश घासकडवी

सालं खरं काव्य म्हणावं तर ते वेदकाळातच झालं, पुराणकाळातही काही फारसं वाईट नव्हतं म्हणायचं... पण हे त्यानंतर जे काही झालं ते भिकारच. काव्यच का, सगळ्याच बाबतीत जग रसातळाला गेलंय सालं. च्यायला आपण सगळ्यांनी दोनतीन हजार वर्षांपूर्वीच जन्म घ्यायला हवा होता. (की दहापंधरा हजार? मरो, उगाच आकड्यांवर वाद कशाला घालायचा? जेव्हा केव्हा त्या अपुरुषांनी वेद लिहिले तेव्हा म्हणायचं आहे.) पण आपल्या पितरांनीच जन्माला यायला उशीर केला, त्याची शिक्षा आपण भोगतो आहोत, दुसरं काय?

नाना चेंगट's picture

16 Sep 2012 - 1:08 pm | नाना चेंगट

मान्य ! :)

विजुभाऊ's picture

16 Sep 2012 - 10:32 am | विजुभाऊ

वा वा वा घासकडबी काका .......
वेदपूर्व कालातील अर्धप्राकृत भाषेतील त्यांची एक कविता मला अजून आठवते.
खण्ण ठण्ण ठण्ण
मण्ण भण्ण टण्ण
आसण्ण बसण्ण
टकुर्‍यावर तिच्यामायला हाण्ण.
आणि त्या नंतर वेदपूर्वार्ध कालातील ही कविता.
कष्टादप्स्चयीत भाराम्बुजल तोयं
करोती अभिषेकं गलंच गलीतगात्रंच.
आफ्टर घटोक्ती घोटयती सुरा पात्रं च पात्रंच
यावद तावद. ओढयामी नाडी सूत्रंच

अमितसांगली's picture

16 Sep 2012 - 11:57 am | अमितसांगली

तुमचा धागा वाचूनसुद्धा आज आम्ही कविता पाडली...ती कविता नक्की कोणत्या प्रकारात मोडते हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा आहे....

परिकथेतील राजकुमार's picture

16 Sep 2012 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार

आमचा नान्या प्रगल्भ व्हायला लागला की. एके दिवशी आता अध्यक्ष पण होईल एखाद्या संमेलनाचा.

बाकी यात विद्रोही कविता नसल्याने लेख अंमळ अर्धवट वाटला.

जन्मोजन्मी किंचाळणार्‍या जखमा माझ्या
आणि जिभल्या चाटणारी भटुकडी गिधाडे
भडव्यांच्या झुंडी हटवा आता
फुलु देत निळ्या क्रांतीचे धुमारे..

टवाळ कार्टा's picture

16 Sep 2012 - 10:50 pm | टवाळ कार्टा

:)

चेतन's picture

16 Sep 2012 - 4:11 pm | चेतन

काळजीपूर्वक आणि गांभीर्याने या लेखनाकडे बघितले तर लेखकाने हे लेखन 'साहित्य' अथवा 'काव्य' या प्रकारात न टाकता "चर्चा"या प्रकारात टाकले आहे. या लेखनाचा साहित्यप्रकारही "धोरण " / "विचार " या प्रकारात समाविष्ट करुन लेखकाने उगाचच आक्रस्ताळेपणा केला आहे.
लेखक हा बहुतेक मराठी भाषेचा "नव" अभ्यासक असावा परंतु वरील यमकजुळव्या प्रकारामुळे हे लेखन हास्यास्पद झाले आहे. तसेही हे लेखन कुठेही छापले जाणार नाहीच त्यामुळे मिपा या मोकळ्या रानाचा मात्र लेखकाने अत्यंत खुबीने वापर केला आहे.

दुसरे म्हणजे सरसकट मौजमजा, विडंबन या विभागात जे लेखन नोंदवले जाते त्यापेक्षा हे लेखन कितीतरी "मागचे" आहे. जे प्रसवायचे आहे ते शांतपणे न प्रसवता "आक्रस्ताळेपणे" प्रसवून लेखकाने साहित्यक्षेत्र बरबटवले आहे.

तिसरे म्हणजे कवितेविषयीचे बाळबोध व पारंपरिक समज. जे आता मोडले व बदलले पाहिजेत. लेखकाने खर तरं असले बुरसटलेले कविता प्रकार न वाचता "नवप्रगल्भ"कविंच्या कवितांचा अभ्यास केला पाहिजे. वैदिक काव्य, पुराण काव्य, आधुनिक काव्य हे प्रकार कालबाह्य झाल्याने अत्यंत टाकाउ आहेत. कृपया याची नोंद घ्यावी.

गोंधळी's picture

16 Sep 2012 - 7:21 pm | गोंधळी

सहमत :)

चौकटराजा's picture

17 Sep 2012 - 8:18 am | चौकटराजा

नानांच्या सन्मानासाठी २३ व्या शतकातील कविता सादर करण्याचा द्रष्टेपणा ( की दुष्टपणा ?) करावा म्हणतो कविता अशी..

च्स्फ्ज्स्क्फ्स्ज्फे९एइरुएरुएइरुक्ष्च द्फिईविर
दज्द्क्जेविरेव्र्फ्व च्व्क्क्फ्स्फ्क्स्ल्ल्फू;द्लक्ल्क्द || >,||

#$%&^**((*(*(_))_+)+)_)++*+_+_+_+_+_+_
,.//']]^&&**((_+++++++&*((&*(((&((&*(%&%### || >||

'.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2012 - 11:45 am | अत्रुप्त आत्मा