"घन घुंगूरवाळा आला,
कौलावर रुणझूण झाला"
मंगेश पाडगावकरांचं पावसावरचं हे गीत टायटल ट्रॅक असणारा "घन घुंगूरवाळा आला" हा नवीन मराठी अल्बम नुकताच मानबिंदू म्युझिक तर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. मंगेश पाडगावकरांबरोबरच लोकशाहीर विठ्ठल उमप आणि तरुण गीतकार सम्राज्ञी आणि वैभव चाळके यांच्या गीतरचना या अल्बममध्ये आहेत. प्रशांत कदम या तरूण संगीतकाराने या अल्बमला संगीत दिलं असून सुप्रसिद्ध गायिका नेहा राजपाल ,नंदेश उमप, सारेगमप फेम जितेंद्र तुपे या सारख्या कसलेल्या गायकांनी या अल्बममधली गाणी गायली आहेत. या अल्बममधील सगळ्या गाण्यांचं सुंदर संकलन करून बनवलेला हा व्हिडियो मिपावरील संगीतरसिकांसाठी शेअर करत आहोत.
या अल्बममधील निवडक गाणी तुम्ही मानबिंदू.कॉमच्या http://www.maanbindu.com/new-marathi-music-album-Ghan-Ghungurwala-Aala या लिंकवर ऐकू शकता. त्याबरोबरच तुमचे अभिप्राय आणि रेटींग्सही देऊ शकता. तुमचे अभिप्राय जाणून घेण्यास आम्ही नेहमीप्रमाणेच उत्सुक आहोत.
आपला,
(अभिप्रायेच्छुक) योगेश
[ खास मिसळपावच्या सदस्यांसाठी या अल्बमच्या ऑनलाईन खरेदीवर येत्या रविवारपर्यंत २५% सूट आहे. यासाठी http://www.maanbindu.com/offers.jsp?coupon_code=misalpav2 या दुव्याचा वापर करावा. महाराष्ट्रात कुठेही हा अल्बम कॅश ऑन डिलीव्हरी या पद्धतीने 130 रु किमतीत मागवता येईल. त्यासाठी तुम्ही तुमचा पत्ता ९९६०२८१०५५ या क्रमांकावर SMS करावा.]
प्रतिक्रिया
13 Sep 2012 - 10:55 pm | sagarpdy
ह्याच्यासाठी होय तुम्हाला यु ट्यूब व्हिडियो कसा टाकायचा हा प्रश्न पडला होता तर! ब्वार्र..
13 Sep 2012 - 11:20 pm | योगेश पितळे
आक्षी खरं! :)
असे अनेक चांगले व्हिडीयो शेअर करायचे आहेत :)
13 Sep 2012 - 11:38 pm | शुचि
सगळे मानबिंदू कंपनीचेच आहेत का? :)
14 Sep 2012 - 12:08 am | योगेश पितळे
नो! ... पण यूट्य़ूब कंपनीचे आहेत :p
14 Sep 2012 - 5:33 am | बहुगुणी
बरीचशी गाणी आणि वाद्यरचना आवडल्या, इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! जमेल तेंव्हा विकत घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.
[फक्त एक निरीक्षणः या धागाप्रवर्तकाचे सर्वच धागे फक्त मानबिंदू-निर्मित संगीताच्या 'जाहिराती'चेच असतात असं दिसतं, या धाग्यात तर केवळ किंमतच नव्हे तर चक्क मोबाईल नंबरही दिलेला आहे, हे commercial solicitation या प्रकारात मोडतं असं वाटतं, मिपाच्या धोरणात हे बसत नाही असं मला म्हणायचं नाही, पण मिपावरील लेखाचा वापर जाहिरातीसाठी केला जात असेल तर तसं स्पष्ट लिहावं असं सुचवेन, म्हणजे एखादा/एखादी कला-रसिक शिफारस करतो/करते आहे असा चुकीचा समज होणार नाही.]
14 Sep 2012 - 10:51 am | राजो
"पितळ" उघडे पडले
14 Sep 2012 - 11:09 am | योगेश पितळे
ते झाकलेले कधीच नव्हते! ;)
14 Sep 2012 - 11:07 am | योगेश पितळे
"फक्त एक निरीक्षणः या धागाप्रवर्तकाचे सर्वच धागे फक्त मानबिंदू-निर्मित संगीताच्या 'जाहिराती'चेच असतात असं दिसतं"
आपले निरीक्षण योग्य आहे! मात्र एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मानबिंदू म्युझिकने या(किंवा कोणत्याच) अल्बमची निर्मीती केली नाही, फक्त त्यातर्फे हा अल्बम प्रकाशित केला गेला आहे. तसेच या अल्बमच्या विक्रीतला ८०% भाग हा मूळ कलाकारांना दिला जातो.
"या धाग्यात तर केवळ किंमतच नव्हे तर चक्क मोबाईल नंबरही दिलेला आहे, हे commercial solicitation या प्रकारात मोडतं असं वाटतं, मिपाच्या धोरणात हे बसत नाही असं मला म्हणायचं नाही, पण मिपावरील लेखाचा वापर जाहिरातीसाठी केला जात असेल तर तसं स्पष्ट लिहावं असं सुचवेन, म्हणजे एखादा/एखादी कला-रसिक शिफारस करतो/करते आहे असा चुकीचा समज होणार नाही."
आपल्यालाही बरीचशी गाणी आणि वाद्यरचना आवडल्या. तसच मानबिंदूवरील या गाण्याचे ऐकणा-यांनी दिलेले रेटींग ४.५६/५ इतके आहे म्हणजे एकूणच ती गाणी चांगली आहेत असे मी समजतो. एक रसिक म्हणून मी जेंव्हा पहिल्यांदा ही गाणी ऐकली त्यावेळेस मलाही ती गाणी तितकीच आवडली म्हणून ती गाणी मी मानबिंदू म्युझिक तर्फे प्रकाशित केली हे ही खरे आणि इतरांपर्यंत ती गाणी पोहोचावीत म्हणून त्याबद्दल इथे लेख लिहला. त्यामुळे ज्यांना ही जाहीरात वाटते त्यांनी ते त्या पद्धतीने घ्यावं आणि ज्यांना एखादा/एखादी कला-रसिक शिफारस करतो/करते आहे असं वाटतं त्यांनी त्या पद्धतीने घ्यावे. दोघेही आपाआपल्या ठिकाणी योग्यच आहेत! कुणाचाही समज चुकीचा नाही :)
14 Sep 2012 - 7:22 pm | बहुगुणी
धन्यवाद! तुम्ही 'मानबिंदू'शी संबंधित आहात हा conflict of interest प्रांजळपणे मान्य केलात हे उत्तम, तेवढंच अपेक्षित होतं; आंतर्जालावर लिखाण करतांना लेखनविषयाशी व्यावसायिक संबंध असलेल्या प्रत्येकाने तसं मोकळेपणाने केलं तर विश्वासार्हता वाढण्यासाठी हे आवश्यक आहे असं वाटतं म्हणून.
बाकी गाणी आवडली हे मी आधीच सांगितलं होतं. कलाकारांना विक्रीतील ८०% टक्के रक्कम मानधन म्हणून मिळते हाही चांगला, कौतुकास्पद पायंडा आहे. त्याबद्दल 'मानबिंदू' चं अभिनंदन!
14 Sep 2012 - 8:00 pm | शुचि
मी माझ्या तिरकस प्रतिसादाबद्दल पितळे यांची माफी मागते. दुव्यावर जाऊन जरूर गाणी ऐकेन. गेल्या वेळेचा एक अल्बम (दुवा) खूप आवडला होता.