लसुनी मश्रुम आणि बेबी कॉर्न.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
13 Sep 2012 - 5:29 pm

DSC_03880001

साहित्यः

बटण मश्रूम १०-१२ नग
बेबी कॉर्न १०-१२ नग
तेल २ ते ३ मोठे चमचे (टेबल स्पून)
लसूण २ ते ३ मोठे चमचे
कांदा १ मोठा
टोमॅटो १ मध्यम
हळद १/२ लहान चमचा ( टी स्पून)
तिखट १/२ लहान चमचा
गरम मसाला १/२ लहान चमचा
मीठ चवीनुसार
कोथिंबीर मुठभर

तयारी:

मश्रूमचे चार चार तुकडे करून घ्या.
बेबी कॉर्नचे (तिरपे) तुकडे करून घ्या.
२ ते ३ मोठे चमचे होतील एवढा लसूण बारीक चिरुन घ्या.
कांदा बारीक चिरुन घ्या.
टोमॅटो मिक्सर मधून फिरवून त्याची प्यूरे करून घ्या.
कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.

कृती:

एखाद्या छोट्या कढईत अथवा फ्राय पॅन मध्ये तेल गरम करा. तेल चांगले तापले की त्यात बारीक चिरलेला लसूण टाकून मध्यम आंचेवर लाल होई पर्यंत परतुन घ्या. लसूण लाल झाला की त्यावर बारीक चिरलेला कांदा लाल होईस्तोवर परतुन घ्या.
कांदा नीट परतला गेला की त्यावर ३ मोठे चमचे टोमॅटो प्यूरे टाकून परता. त्यावर मीठ, हळद, तिखट, गरम मसाला टाकून परतत राहा.
आता त्यावर मश्रूम टाकून परता. मश्रूम मध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे पाणी टाकताना सांभाळून. आपल्याला रस्सा भाजी करायची नसून अंगचाच मसाला असला पाहिजे. थोड्यावेळाने मश्रूमला पाणी सुटेल. गरज भासल्यास अगदी १-२ मोठे चमचे (टेबलस्पून) पाणी टाकून परतत राहा. मश्रूम जसे शिजत जातील तसे आकाराने जरा लहान होतील. साधारण शिजले की त्यात बेबी कॉर्न आणि, सजावटी साठी थोडी बाजूला ठेवून, कोथिंबीर घाला.

मंद आंचेवर शिजवा. गरज भासेल त्या नुसार १-२ चमचे पाणी घाला.

बेबी कॉर्न जरा करकरीतच राहू द्या.

आता भाजी बाऊल मध्ये काढून उरलेल्या कोथिंबीरीने सजवा.

शुभेच्छा...!

प्रतिक्रिया

जाई.'s picture

13 Sep 2012 - 6:14 pm | जाई.

झकास

sagarpdy's picture

13 Sep 2012 - 6:22 pm | sagarpdy

कातील!

गणपा's picture

13 Sep 2012 - 6:26 pm | गणपा

तोंपासु

रेवती's picture

13 Sep 2012 - 7:11 pm | रेवती

अगदी मस्त!
हा प्रकार पोळीबरोबर खाण्याचा आहे की स्नॅक म्हणून?

प्रभाकर पेठकर's picture

13 Sep 2012 - 7:55 pm | प्रभाकर पेठकर

पोळी, परोठा, फुलका, पुर्‍या इ.इ. बरोबर, मुख्य पदार्थ म्हणून जेवणात.

प्रचेतस's picture

13 Sep 2012 - 8:24 pm | प्रचेतस

येकदम जबरी झालीय पाकृ.

निवेदिता-ताई's picture

13 Sep 2012 - 8:28 pm | निवेदिता-ताई

मस्तच

सानिकास्वप्निल's picture

13 Sep 2012 - 8:30 pm | सानिकास्वप्निल

पाकृ आवडली :)

अर्धवटराव's picture

13 Sep 2012 - 9:19 pm | अर्धवटराव

ही पाकृ मला जमेल असं वाटतय :)

अर्धवटराव

ज्योति प्रकाश's picture

13 Sep 2012 - 11:33 pm | ज्योति प्रकाश

जबरदस्त पाकृ व फोटो .

अत्रुप्त आत्मा's picture

13 Sep 2012 - 11:42 pm | अत्रुप्त आत्मा

चिंतामणी's picture

14 Sep 2012 - 1:02 am | चिंतामणी

सुरेख. मश्रुम (अनेकांना याचे वावडे असते) आणि बेबी कॉर्न दोन्ही गोष्टी आणि त्यांचे कॉम्बीनेशन आवडते.
फक्त जरा लसुणाचीच भिती आहे. तरीसुद्धा ट्राय करणारच.

अवांतर- जरा थोडे अजून फोटू टाकायचा प्रयत्न करा.

श्रीरंग_जोशी's picture

14 Sep 2012 - 2:17 am | श्रीरंग_जोशी

बघायलाच इतकी आकर्षक आहे तर खायला किती खास असेल...

पिवळा डांबिस's picture

14 Sep 2012 - 2:53 am | पिवळा डांबिस

जनातलं:
सुरेख फोटो...
पेठकरबुवांच्या रेसेपीबद्दल काय बोलणार, ती फक्कड असतेच.
डिशची चवही सुरेखच असणार...

मनातलं:
ते बेबी-कॉर्न घातल्यानंतर आणि कोथिंबीर घालायच्या अगोदर जर चार खाडीची सुंगटा त्यात घातली तर काय बहार येईल!!
नाय म्हणजे जी भाजी आता अप्सरास्वरूप आहे ती देवतास्वरूप होईल!!!!
:)

पिडाकाका, पण आमच्यासारख्या गवताळांसाठी ती दैत्यासम होईल, त्याचं काय.. :)

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2012 - 10:20 am | प्रभाकर पेठकर

कुठल्याही पाककृतीत स्वतःच्या आवडीनुसार आणि स्वजोखमीवर हवे तसे बदल करण्यास परवानगी आहेच. जे कांही नवनिर्माण होईल ते (उत्तम झाल्यास) मिपावर, अगदी स्वतःची पाककृती म्हणून, उपलब्ध करून द्यावे.

पियुशा's picture

14 Sep 2012 - 11:37 am | पियुशा

रेसेपी झकास अन सोपी आहे :)
पण ज्यांना मश्रुम आवडत नाही त्यांनी पनीर वापरले तर चालेल ? पनीर अन स्वीट कॉर्न कॉम्बो कसा लागेल ?

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2012 - 2:01 pm | प्रभाकर पेठकर

पनीर वापरले तर चालेल ? पनीर अन स्वीट कॉर्न कॉम्बो कसा लागेल ?

उत्तर वरती दिले आहे.

पियुशा's picture

14 Sep 2012 - 11:37 am | पियुशा

रेसेपी झकास अन सोपी आहे :)
पण ज्यांना मश्रुम आवडत नाही त्यांनी पनीर वापरले तर चालेल ? पनीर अन स्वीट कॉर्न कॉम्बो कसा लागेल ?

कच्ची कैरी's picture

14 Sep 2012 - 11:55 am | कच्ची कैरी

एकदम झक्कास्स्स्स्स्स्स्स !!!!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2012 - 2:05 pm | परिकथेतील राजकुमार

काकानु मश्रुमला पर्याय सांगा.

'तुम्हीच ठरवा' वैग्रे उत्तर नको. तुम्हीच सुचवा.

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2012 - 8:28 pm | प्रभाकर पेठकर

मश्रूमला पर्याय (गुणवत्ते नुसार), टोफू. अर्थात बिनकर्ड.

गुणवत्तेचा विचार नाही करायचा म्हंटलं तर पनीर, भोपळी मिरची, ओले मटार इ.इ.इ.

मांसाहारात, बोनलेस चिकनचे तुकडे.

सर्व टाळून नुसत्या बेबी कॉर्नची भाजीही चांगली लागेल.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2012 - 12:18 pm | परिकथेतील राजकुमार

धन्याचे वादस हो काका. :)

आहाहा... आधीच मश्रूम मला फार आवडते,त्यात बेबी कॉर्न ! काय मस्त चव लागत असेल ! :)

पैसा's picture

14 Sep 2012 - 8:48 pm | पैसा

असल्या पाकृ फक्त हाटेलात खायच्या असतात असा आतापर्यंत समज होता!

तुषार काळभोर's picture

15 Sep 2012 - 6:16 am | तुषार काळभोर

.

इरसाल's picture

15 Sep 2012 - 9:14 am | इरसाल

लसुण व मशरुम हे आवडते पदार्थ आहेत.
करुन पहावी म्हणतो.

ऋषिकेश's picture

1 Oct 2012 - 10:30 am | ऋषिकेश

काल हा पदार्थ ट्राय केला. घरात फक्त मला मश्रुम्स आवडतात अश्या समजातून कमी केला होता. पण या पाकृत दिलेली मापे-प्रमाण जराही न चुकवता केला आणि इतका मस्त झाला होता की फोटो काढण्यापुरताही राहिला नाही ;)

आभार!

फक्त टोमॅटो अधिक लाल असल्याने की काय माहित नाही पण ग्रेव्ही लालचुटुक झाली होती.. चवीला ब्येष्ट असल्याने फार विचार केला नाही.. मात्र वरचा रंग आणायला काही वेगळे करावे लागते का? (हाटेलातही असाच रंग असतो)

प्रभाकर पेठकर's picture

1 Oct 2012 - 4:24 pm | प्रभाकर पेठकर

जाई., sagarpdy, गणपा, रेवती, वल्ली, निवेदिता-ताई, सानिकास्वप्निल, अर्धवटराव, ज्योति प्रकाश, अत्रुप्त आत्मा, चिंतामणी, श्रीरंग_जोशी, पिवळा डांबिस, पिंगू, पियुशा, कच्ची कैरी, परिकथेतील राजकुमार, मदनबाण, पैसा, पैलवान, इरसाल, ऋषिकेश सर्वांना धन्यवाद.

@चिंतामणी,

>>>> जरा थोडे अजून फोटू टाकायचा प्रयत्न करा.

आवश्यकता भासत नाही. जी गोष्ट शब्दात वर्णन करून समजते त्यासाठी छायाचित्र देणे मला पटत नाही. अंतिम पदार्थ कसा दिसेल हे शब्दात वर्णन करता येणार नाही म्हणून आणि पाककृतीला आकर्षकता यावी म्हणून तेवढे एक छायाचित्र मी टाकतो.

@ॠषिकेश,

टोमॅटो पेक्षा जे तिखट वापरले ते बदलून पाहा. काही काही तिखटात खायचा रंग आधीच मिसळलेला असतो. असे तिखट सर्वस्वी टाळावे. काश्मिरी मिरच्याही रंगाला खुप लाल असतात. त्या आणि त्याचे तिखट टाळावे. साधे बिन रंगाचे आणि मध्यम तिव्रतेचे तिखट वापरावे. भारतात कुसुम ब्रँडची दोन तिखटे मिळतात. एक सर्वसाधारण तिखट आहे ते बिन रंगाचे असते. दुसरे आहे रेशीमपत्ती. ते मध्यम लाल, मध्यम तिव्र आणि चवीला चांगले असते. मी सहसा तेच वापरतो. रंगाची गरज असेल तर काश्मिरी मिरच्या वापरतो. कुसुम ब्रँड मिळत नसेल तर गुंटूर आणि बॅडगी मिरच्या चांगल्या आहेत. अन्यथा कुठलेही बिन किंवा कमी रंगाचे पण चांगल्या चवीचे तिखट वापरावे.
तिखटात रंग, चव आणि तिखटपणा हे तिन गुणधर्म पाहावे लागतात. हे तिन्ही गुणधर्म एकाच प्रकारच्या मिरचीत मिळत नाही. तेंव्हा दोन प्रकारच्या मिरच्या मिसळून तिखट बनवावे. जसे, काश्मिरी+बेडगी किंवा काश्मिरी +गुंटूर किंवा बेडगी+गुंटूर इ.इ.इ.