कुणाचा दोष सांगा ?

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
10 Sep 2012 - 10:31 pm
गाभा: 

मिपाकर मित्रहो,

आपल्याला आपले म्हणणे विचारण्या अगोदर एक अगदी छोटीशी गोष्ट .
एक व्यावसायिक फोटोग्राफर असतो. त्याच्याच देशातून असाच फिरताना त्याला एका समुद्रकिनार्‍यावर एक पुतळा दिसतो. त्या पुतळ्यावर वार्‍याने वाहून आणलेला पाचोळा स्थिरावलेला असतो. त्या पुतळ्याच्या मस्तकावर एक कावळा विष्ठाकर्म करीत असताना तो फोटोग्राफर " अरेरे काय या पुतळयाची अवस्था ! " या विचाराने फोटो काढतो. व ही बाब इतरांच्या नजरेला यावी म्हणून तो सदर फोटो एका ठिकाणी प्रसिद्ध करतो.

होते काय की , तो पुतळा कोणा महान नटाचा, महान खेळाडूचा नसतो तर त्या देशाच्या राष्ट्रपुरूषाचा असतो. तो राष्ट्रपुरूष ज्या समाजात जन्मलेला असतो त्या समाजातील काही माणसे तक्रार गुदरतात की" आमच्यामहान विभूतीची विटंबना करणारे छायाचित्र चित्रकाराने प्रसिद्ध केले आहे. सबब त्याला जबर शिक्षा झाली पाहिजे"
चित्रकाराचे म्हणणे" मी फक्त फोटो काढला व प्रसारित केला आहे. पाचोळा वार्‍याने आणून सोडला आहे
कावळा काही मजकडे नोकरीला नाही की त्याच्या कृत्याची अप्रत्त्यक्ष जबाबदारी मी घ्यावी मग सदर राष्ट्रपुरूषाची विटंबना मी कशी काय् केली ? "
वार्‍याला विचारले तुझी बाजू काय ? तो म्हणाला "मी निसर्गनियमानी बांधला गेलो आहे बाकी नो कॉमेंटस ! "
कावळ्याला विचारले तर तो उत्तरला "मी पुतळयावर विष्ठाकर्म केले आहे हे अमानुष कृत्य आहे म्हणता ? अहो मी अमानूषच आहे ? मी एक पक्षी आहे हो ! "

तुम्ही सांगा यात दोष फोटोग्राफरचा , वार्‍याचा की कावळयाचा ? की कशाचाच नीट विचार न करता राष्ट्रपुरूषाची विटंबना फोटोग्राफर ने केली अशी अवास्तव फिर्याद दाखल करणार्‍याचा ?

प्रतिक्रिया

शुचि's picture

10 Sep 2012 - 10:41 pm | शुचि

फोटोग्राफर चा. "Mind your own business" is the best policy.
त्याला सांगीतले कोणी नको त्या गोष्टीत नाक खुपसायला? बरा धडा शिकला. there are better ways to communicate the issue than circulating the photograph mindlessly.

सर्वाधिक दोष फोटोग्राफारचाच. फोटोसोबत योग्य बातमी द्यायला हवीच, पण त्याबरोबर त्या कावळ्याला देखील हाकवायला हवे होते. मी फक्त बोट दाखवणार, कामा तुम्ही करा हा कुठला न्याय ?
(बाकी माणसांच्या वर्तनाचा भाग सध्या राखीव)

मला तर बाई फार राग येतो अशा लोकांचा. मीटींगमध्येही काही लोक कोणतीही जबाबदारी न घेता फुकटचे सल्ले तरी देतात किंवा मनोरंजनासाठी त्या मीटींगला असतात. फुक्कट्चे फौजदार. :(

तुम्हाला करता येत नाही ना मग तुमचे सल्ले ठेवा तुमच्यापाशी. Either participate actively or keep your mouth shut!!!

हिंदूस्थानात असे असंख पुतळे आहेत,व निर्जीव पुतळ्यांवरुन सजीव माणसे मारामार्‍या कसे करतात... ते त्याने टिपायला हवे होते,अजुन जास्त प्रसिद्धी मिळाली असती !,वेडा कुठचा समुद्र किनारी जल-पर्‍यांना पाहायचे सोडुन "पुतळ्याचे" फोटो काढत सुटला ! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2012 - 10:51 pm | अत्रुप्त आत्मा

@की कशाचाच नीट विचार न करता राष्ट्रपुरूषाची विटंबना फोटोग्राफर ने केली अशी अवास्तव फिर्याद दाखल करणार्‍याचा ? >>>दोष फिर्याद दाखल करणार्‍याचाच... !

दोष व्यवस्थेचा..ज्यांनी पुतळे उभारले..नंतर दुर्लक्ष केले..त्यानंतर ते दर्शवु पाहणार्यालाच त्या कृत्याला जबाब्दार दाखवणे हे निव्वळ वेडगळपणाचे लक्षण म्हणता येईल..त्यामुळे कोणावरतरी खापर फोडलेच पाहिजे ह्या आवश्यकतेमुळे आतताईपणाच्य ह्या घटनेमागे दोष व्यवस्थेचाच...

मी_आहे_ना's picture

11 Sep 2012 - 10:14 am | मी_आहे_ना

१००% सहमत

सुनिल पाटकर's picture

10 Sep 2012 - 11:15 pm | सुनिल पाटकर

कावळा व वा-या पेक्षा मनुष्य म्हणून फोटोग्राफरला जास्त अक्कल आहे. अरेरे काय या पुतळयाची अवस्था ! " या विचाराने फोटो काढतो. व ही बाब इतरांच्या नजरेला यावी म्हणून तो सदर फोटो एका ठिकाणी प्रसिद्ध करतो.या पेक्षा एक सेवा अथवा कर्तव्य म्हणुन त्यांने पुतळयाची साफसफाई करायला हवी होती, वारा निसर्गनियमानी बांधला गेलो असेल आणि कावळा अमनुष असेल तर त्यांनी त्यांचे काम केले, फोटोग्राफरने मानवतेला शोभेल असे कृत्य म्हणजे पुतळयाची साफसफाई करणे गरजेचे होते. फोटोग्राफर दोषी

डावखुरा's picture

10 Sep 2012 - 11:23 pm | डावखुरा

भ्रष्टाचारी त्या पदावर विराजमान आहेत त्यामुळे त्या पदाचे नाव घेणे साहजिकच आहे..
पण राष्ट्रीय चिन्हांच्या बाब्तीत मी सहमत असलो तरी..भ्रष्टाचार्यांनीच प्रथम विचार करायला नको का की मझ्या ह्या अभद्र कृत्यामुळे माझ्या देशाचा त्याच्या राष्ट्रीय चिन्हांचा अपमान होईल..सामान्य माणसाने काही गैर केले तर अपराध..आणि नेत्यांनी केले तर माफी का म्हणुन?
मागे रशियात भगवद् गीतेवर बॅन आणला होता..नंतर अनेक देशांत अंतर्वस्त्रांवर्,फटाक्यांवर देवतांचे फोटो..नग्न देहावर देवतांचे चित्र हे कसे खपवुन घेतात..मग ईथ्च क पोट दुखते..
की सध्या प्रचलित असलेले घोटाळ्यांकडुन लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे फंडे..
हे त्या विधात्यालाच ठावुक..

https://www.facebook.com/photo.php?fbid=4388208701901&set=a.120524268974...

http://www.mid-day.com/news/2012/sep/100912-mumbai-Dont-gag-cartoonists-...

सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू म्हणतात,
"असीम त्रिवेदी या कार्टुनिस्टला अटक करणे हाच अत्यंत गंभीर फौजदारी गुन्हा असून या अटकेमागे असलेल्या राजकारणी व पोलीस अधिका-यांनाच अटक केली पाहिजे."

परत एकदा पोलिसांची व राजकारण्यांची चूक अजून एकाला हिरो तर करून गेलीच आणि आणखी एक धोंडा स्वताच्याच पायावर

अर्धवटराव's picture

11 Sep 2012 - 1:18 am | अर्धवटराव

दोष दोषाचाच. त्याने का म्हणुन दोषयुक्त राहावे?

अर्धवटराव

इरसाल's picture

11 Sep 2012 - 9:43 am | इरसाल

कॅमेरा आणी कॅमेरासाठीचे कार्ड किंवा रोल बनविणार्‍याचा आहे.
तसेच त्या फोटोग्राफरच्या आई-वडिलांचाही आहे.

मुख्य म्हणजे अण्णा हजारे यांचाही आहे. त्यांनी त्याला फशी पाडुन हे व्यंगचित्र काढायला प्रवृत्त केले.

मदनबाण's picture

11 Sep 2012 - 11:00 am | मदनबाण

काय आहे इरसाल राव आपण "धर्म निरपेक्ष" देशात राहतो ! त्यातही हे चित्र एका देशप्रेमी आणि भ्रष्टाचारी व्यवस्थेला कंटाळलेल्या युवकाने... त्याच्या मनातील भावनांना त्यांनी कार्टुन काढुन वाट दिली,पण तो हिंदू शिवाय अण्णांच्या पक्षातला !
याच देशात"भारत मातेचे" विकॄत चित्र काढणारे एमएफ हुसेन मात्र कौतुकास पात्र ठरतात ! नव्हे तर तर त्यांना हिंदूस्थानचे "पिकासो" असे संबोधले जाते !
त्यांची ती कला आणि असिमचा तो देशद्रोह !
ही सुंदर भारत माता पहा :---

आणि त्या एमएफ हुसेनची "कलाकारी" ? पहा :---

Nude 'Bharatmata' Painting by MF Hussain
आता या देशात आपण राहतो तो "धर्मनिरपेक्ष" कसा आहे, ते कळलेच असेल तुम्हाला !
(दोन्ही चित्रे जाला वरुन घेण्यात आलेली आहेत)

हारुन शेख's picture

11 Sep 2012 - 5:53 pm | हारुन शेख

मदनबाण साहेब भारत माता अमुक एक परिधान करून, भगवा झेंडा हातात घेऊन, सिंहाला टेकून उभी रहाते असे वर्णन कुठे आहे हो ? ज्या चित्रकाराने ते काढले त्याचा तो कल्पनाविलास आहे आणि त्याने कलाकाराला मिळालेले स्वातंत्र्य घेऊन ते प्रत्यक्षात उतरवले. एम. एफ. हुसैन यांनी त्यांना भावलेल्या रूपाचे चित्र काढले. एक कलाकार म्हणून त्यांनाही अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहेच की. आता कलाकाराची अभिव्यक्ती 'धर्मनिरपेक्षता' हा घटक लक्षात घेऊन होत असते असे मला वाटत नाही. त्यामुळे तुम्ही वर जी तुलना केलीय ती ओढूनताणून केली आहे. किंवा रॅडीकलाईझ करण्याकरता तश्या रीतीने मांडलीय. शिवाय तुलना केलेली चित्रं ही चित्रे काढण्याच्या वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आहेत. तेंव्हा मुळातच अशी तुलना चूक वाटते. असे प्रचारकी प्रतिसाद कलेला निरपेक्ष महत्व देणाऱ्या मिसळपाव सारख्या सुसंस्कृत संस्थळाला शोभनीय नाहीत.

मदनबाण's picture

11 Sep 2012 - 6:44 pm | मदनबाण

The Muhammad cartoons row
http://news.bbc.co.uk/2/hi/4677976.stm

France: Prophet Muhammad Cartoon Prompts Attack
http://alturl.com/u37zf

What do Muslims say about the cartoons?

Many Muslims say that the cartoons are extremely and deliberately offensive, expressing a growing European hostility towards and fear of Muslims. The portrayal of the Prophet Muhammad and Muslims in general as terrorists is seen as particularly offensive.

Some Muslims see the cartoons as an attack on their faith and culture designed to sow hatred.

Islamic tradition explicitly prohibits images of Allah, Muhammad and all the major figures of the Christian and Jewish traditions.

Has Muslim reaction to the cartoons been uniform?

Not at all - some Muslims have accused protesters of overreacting.

A weekly newspaper in Jordan reprinted some of the cartoons and urged Muslims to "be reasonable".

Websites produced by and for Muslims have shown the cartoons or linked to them. One liberal website said Muslims were making a mountain out of a molehill.

Some Muslims, mainly in Europe, have supported the re-publication of the images so that individual Muslims can make their own minds up and welcomed the debate on the issues that the cartoons have raised.

It has also been pointed out that cartoons in the Arab and Islamic press "demonising" Israelis and Americans using Jewish and Christian imagery are common.

या लेखांतील फक्त एकच वाक्य इथे देतो.

Charb, the director, said a Molotov cocktail lobbed into the offices caused the fire. He blamed "radical stupid people who don't know what Islam is," for the attack.

इरसाल's picture

11 Sep 2012 - 12:40 pm | इरसाल

मदनबाणसाहेब.
कदाचित सत्य परिस्थितीवर चित्र काढल्याने त्याची उचलबांगडी/डोली केली असावी.
बरं ते लक्ष विचलित करायला काय मुद्दा पाय्जेल का नाय ? ;)

मन१'s picture

11 Sep 2012 - 12:46 pm | मन१

चालु द्यात.

विजुभाऊ's picture

11 Sep 2012 - 2:39 pm | विजुभाऊ

तुम्ही सांगा यात दोष फोटोग्राफरचा , वार्‍याचा की कावळयाचा ? की कशाचाच नीट विचार न करता राष्ट्रपुरूषाची विटंबना फोटोग्राफर ने केली अशी अवास्तव फिर्याद दाखल करणार्‍याचा ?
चाम्दोबातील विक्रमाच्या भाषेत बोलायचे झाले तर दोश आहे. त्या फालतु बातमीला महत्व देणारांचा. अशा फडतुस फोटोला कोणी महत्व देत नाही हे लक्षात आले की त्यानंतर कोणताही फोटोग्राफर हे असले फोटो काढण्याच्या भानगडीत पडणार नाही. अशा विषयाला टी आर पी मिळत नाही हे कळल्यावर कोणताच न्यूज चॅनल ती बातमी कास्ट करणार नाही. आपसूकच अशा गोष्टीना आळा बसेल
अर्थात आज तक / तेज / इंडिया टेव्ही सारखे कडबाचघळू हिंदी न्यूज चॅनेल्स जोवर आहेत तोवर ही असली भंकसगिरी चालणारच.

ये मै चला विजुभाउक्रम व्ह्रुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म झुइन्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग
तुमने अपना मौन तोड दिया. ह्हा हा हा ह्हा.....

सस्नेह's picture

11 Sep 2012 - 4:21 pm | सस्नेह

दोष आहे मिडियावाल्यांचा. कुठलीही घटना भडक करायची हे त्यांचे ब्रीद. मग भडकू डोक्यांना निमित्त मिळतं.

मनीषा's picture

11 Sep 2012 - 7:35 pm | मनीषा

दोष फोटोग्राफरचा आहे.

एक शक्यता : - फोटो काढण्यापूर्वी त्याने चौकशी केली होती का, की पुतळा नेहमीच अशा अवस्थेत असतो किंवा कसे?
असेही असेल, की नेमक्या त्या दिवशी वादळी वारे वाहत असतील (पुतळा समुद्र किनार्‍याजवळ आहे ना ) , त्या मुळे पुतळ्यावर पाला पाचोळा जमला असेल, आणि नेमका कावळा त्या पुतळ्यावर 'बसायला' आणि फोटोग्राफर यायला एक गाठ पडली असेल, आणि त्या फोटोग्राफरने त्याच्या नेहमीच्या सवयीने क्लिक केले असेल. नंतर त्याने तो फोटो सगळीकडे प्रदर्शित केला असेल आणि तो ही अशा अविर्भावात, की जणु पुतळा नेहमीच अशा अवस्थेत असतो म्हणून. म्हणजे एकप्रकारे ही खोटी बदनामी केली असेच म्हणायला लागेल. म्हणून दोष फोटोग्राफरचा.

दूसरी शक्यता : - पुतळा खरेच कायम तशा अवस्थेत असेल. आणि फोटोग्राफरला त्याचा फोटो काढावा वाटला असेल . तर त्याने फोटो काढून आपल्या अल्बम मधे लावावा आणि फार तर आपल्या मित्र, मैत्रीणींना दाखवावा. अगदीच वाटत असेल तर फ्रेम करून घ्यावा. कारण नुसता फोटो सगळीकडे दाखवून त्याची सामाजिक बांधिलकी सिद्ध होत नाही. जर ती खरेच त्याच्याकडे असती तर त्याने मूळ प्रश्न (पुतळ्याची देखभाल ) कसा सुटेल या कडे लक्ष दिले असते. संबंधित अधिकार्‍यांना सांगून तो सोडवण्याचा प्रयत्न केला असता. त्या मुळे त्याच्या देशाची प्रतिष्ठा आणि राष्ट्रपुरूषाच्या स्मारकाचा सन्मान, दोन्ही अबाधित राहीली असती. पण त्याने तसे न करता सवंग प्रसिद्धी आणि त्या अनुषंगाने मिळणारा पैसा यालाच महत्व दिले असे दिसते. त्या मुळे प्रथम गुन्हेगार फोटोग्राफरच.

"radical stupid people who don't know what Islam is," अशा लोकांनी हा हल्ला केला असेल तर मग विषयच संपला. असे लोक सगळीकडेच आहेत. सर्व धर्मात.

बाकी वरती चित्रांची तुलना चुकीची आहे या प्रतीवादाबद्दल तुम्ही काहीच बोलला नाहीत.

बाकी वरती चित्रांची तुलना चुकीची आहे या प्रतीवादाबद्दल तुम्ही काहीच बोलला नाहीत.
बोललो होतो,पण त्या प्रतिसादाला पंख फुटले !
असो... चित्राची तुलना म्हणायची तर कहा राजा भोज और कहा गंगु तेली !
ज्याला तुम्ही अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणता त्याला मी वायझेडपणा म्हणतो !

अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेउनच पैगंबराचं चित्र काढलं तर जगात दंगली माजवणारे मुसलमान इतर धर्मीयांच्या भावना दुखावणार्‍या चित्रांचं समर्थन करतात...ती सवयच आहे त्यामुळे उगाच टंकनश्रम घेण्यात काय हशील?

परिकथेतील राजकुमार's picture

12 Sep 2012 - 2:12 pm | परिकथेतील राजकुमार

शिल्पा ब.

अगदी हेच लिहायला आलो होतो.

कहर म्हणजे, बुरख्या शिवाय आपल्या बायकोला समोरच्या वाण्याकडे पण जाऊन न देणारा आमचा एक मित्र ह्या चित्राचे असेच कौतुक करत असतो.

मला कधी कधी प्रश्न पडतो (अर्थात हा कोणा एकासाठी वैयक्तिक नाही), की हे असे 'चित्रकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य' वैग्रे म्हणत गळे काढणारे, ह्या अशा चित्रकारांना पाठींबा म्हणून आपल्या नात्या गोत्यातील स्त्रियांची अशीच चित्रे काढून ती सार्वजनिक का करत नाहीत ? म्हणजे ह्या अशा धाडसाने, नुसते शाब्दिक वारे घालण्यापेक्षा 'आधी केले मग सांगीतले' असा पाठिंबा देखील दिला जाईल.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2012 - 3:48 pm | अत्रुप्त आत्मा

@दंगली माजवणारे मुसलमान इतर धर्मीयांच्या भावना दुखावणार्‍या चित्रांचं समर्थन करतात...ती सवयच आहे >>>+++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११ सवयीपेक्षा जास्त,तो माजोरडेपणा आहे, जो इस्लाम धर्म सगळ्यात श्रेष्ठ/अंतिम/अपरिवर्तनीय असल्याच्या अंधाभिमानातून येतो.

पुष्करिणी's picture

12 Sep 2012 - 6:47 pm | पुष्करिणी

शेखसाहेब,
चित्र वगैरे जाउद्या, आजच लिबियात अमेरिकचा राजदूत आणि ३ अमेरिकन कर्मचार्‍यांची कत्तल केली गेली आणि, दूतावासाला
आग लावून खाक केलं आहे. निमित्त एक सिनेमा .
इजिप्तमधेही अमेरिकन दूतावासाला टार्गेट केलंय, तिथे मशिदीतून 'ठार मारा' असले संदेश देले जात आहेत.
भारतात नाही चित्रावरून कोणाची कत्तल झाली किंवा देवळातून ' मारा' असे संदेश आले.

हे सुद्धा तुमच्या मते 'radical stupid people who don't know what Islam is' असेच असतील .

एक शंका : radical मुस्लीम लोकांनी सिनेमा बघणं इस्लामच्या विरोधी नाही का?

अर्धवटराव's picture

12 Sep 2012 - 11:06 pm | अर्धवटराव

तो चित्रपट एक निमित्त झालं... हा असंतोष तसाही बहेर पडलाच असता.

अर्धवटराव

वपाडाव's picture

13 Sep 2012 - 9:53 am | वपाडाव

हेच म्हणन्यासाठी मी इथे आलो होतो... टंकनश्रम वाचविल्याबद्दल धन्यवाद...

म.टा. मधील बातमी प्रमाणे: "...या सगळ्या घडामोडी आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन आर. आर. पाटील यांनी असीमवरचा देशद्रोह खटला मागे घेण्याचे आदेश दिलेत. ..."

हे विधान वाचून एक प्रश्न पडला आहे. बातमीच्या मथळ्यात म्हणल्याप्रमाणे "क्लिन चीट देणे" अथवा "देशद्रोह खटला मागे घेणे", हे कशावर अवलंबून असावे? जनतेच्या भावनेवर का कायद्यावर? पब्लीकला बरोबर वाटते का चूक हा मुद्दा तुर्तास दूर ठेवूयात. पण जर पोलीसांनी एखाद्या व्यक्तीस एखाद्या कायद्यांतर्गत अटक केली असली तर त्यावरील आरोप पत्र असे दूर करायचे अधिकार हे न्यायालय आणि राज्यपाल/राष्ट्रपती सोडल्यास कोणी वापरू शकते का?

केवळ तर्कासाठी, उ.दा. कोर्टात शिक्षा होण्याआधीच गृहमंत्र्यांनी जनेतेच्या भावना लक्षात घेऊन अरूण गवळीस क्लिन चीट देऊन सोडवू शकले असते का?

चौकटराजा's picture

12 Sep 2012 - 5:00 pm | चौकटराजा

मित्र हो मी आतापर्यंत काथ्याकूट या सदराखाली धागा काढलेला नव्हता .हा पहिलाच.
थोडी माझे मनोगत -
माझ्या मते - राष्ट्रध्वज, चिन्हे, संसद, घटना, कायदा , राष्ट्रगीते ई ई सर्व वि द पीपल ऑफ इंडिया ने तयार केली आहेत. देश म्ह़णजे लोक ,पर्यायाने देश म्हणजे लोकांचे कल्याण. देश म्हणजे फौज नव्हे, राज्य घटना नव्हे, संसद नव्हे की चिन्ह नव्हे . मग तुम्ही म्हणाल हे लोकानी तयार केलेत कशासाठी तर जनतेला हरघडी कारभारात लक्ष घालणे शक्य नाही म्हणून जनतेच्या सत्तेचे ते विकेंद्रीकरण किवा साध्या भाषेत वाटप आहे.
म्हणूनच कालपरत्वे राज्यांच्या सीमा बदलल्या, नव्याने १००० च्या नोटाही अस्तित्वात आल्या , आता आयकर पूर्णपणे रद्द करून व्यवहार कर बसवा असाही प्रवाह सुरू झाला आहे. एवढेच काय तर सर्वाना अगदी वंद्य वाटणारी राज्यघटना देखील पुष्कळ वेळा कालाची मागणी म्हणून बदलण्यात आली आहे.
ब्रिटीशानी तयार केलेली काही कलमे " राजा" या कल्पनेवर आधारित होती. ती दुर्दैवाने जशीच्या तशी
स्वीकारण्यात आली.परिणामी म गांधी, लो, टिळक, सावरकर, कसाब अफझल व आता असीम हे एकाच
कलमाखाली आरोपी ठरले आहेत. काय साम्य आहे या सहा जणात ???
ध्वज, चिन्हे, संसद यांचा मान राह्यलाच पाहिजे पण सर्वात महत्वाचे लोकांचे कल्याण . या सदहेतूने
एखाद्याने त्याचा वापर प्रकटीकरणात केला व तो गर्हणीय ठरला तर त्यावर इतर कोणत्यातरी कलमाखाली अभियोग करता येउ शकेल . तो देशद्रोह कसा आहे हे सिद्ध करणे म्हणजे देशकल्याणापेक्षा चिन्हांच्या आहारी जाणे असे होईल.
जाता जाता- रशियाचा पाडाव होताच व्ही आय लेनिन या राष्ट्रपुरूषाचे पुतळे लोकानी पाडले. तेंव्हा
हे खरे की कालपरत्वे या १२४ कलमाचा पुतळा आपण पाडला पाहिजे.