झटपट सांजोरी.

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
8 Sep 2012 - 8:25 pm

साहित्य:-उरलेला शिरा.
भिजवलेली कणिक (थोडी सैल भिजवलेली असावी).
थोडे दुध.
पिठीसाखर.
तूप.
कृती :- उरलेल्या शिर्यात थोड्या दुधाचा हबका मारावा व थोडी पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे.
पुरणपोळीप्रमाणे कणकेच्या पिठात शिर्याचे सारण भरावे.व तव्यावर तूप सोडून सांजोरी चांगली
खरपूस भाजावी. साजुक तुपाबरोबर खाण्यास तयार झटपट सांजोरी.

प्रतिक्रिया

गेल्या काहे दिवसात एकदम रापचिक पा.कृ. येथे येत होत्या. त्यानंतर ही साधीशी पाकृ.
केटरीना , करीना नंतर जानकी काकू याव्या तशी. काकू बाई प्रेमळ दिसत आहेत.

पक पक पक's picture

8 Sep 2012 - 10:11 pm | पक पक पक

:) लै झाक जानकी काकु.. :tongue:

गोंधळी's picture

8 Sep 2012 - 9:29 pm | गोंधळी

सोपी आणि मस्त पा.क्रु.

पैसा's picture

8 Sep 2012 - 9:59 pm | पैसा

सोपी पाकृ. आणि शिर्‍याचा उपयोग करण्याची आयडिया आवडली.

कच्ची कैरी's picture

9 Sep 2012 - 7:14 am | कच्ची कैरी

अच्छा तुम्ही याला सांजोरी म्हणतात का ?? आमच्याकडे करंजीच्या गोल प्रकाराला सांजोरी म्हणतात .

तरीही चुकलात...सांजोरी मध्ये मोहन भरलेले असते..

इरसाल's picture

10 Sep 2012 - 11:44 am | इरसाल

त्या मोहनचा जीव गुदमरत नाही का हो सांजोरीमधे.

बादवे : आमच्याकडे करंजीला सांजरी म्हणतात. (अहिराणी मधे)
बाकी ही बनवलेली वस्तु पुरणपोळी सदृश्य दिसत आहे. छान लागावी.

डावखुरा's picture

11 Sep 2012 - 11:10 am | डावखुरा

रवा तुपात थोडासा भाजुन घ्या..[१ चमचा तुप =४ वाटी रवा] थोडा तांबडा करुन घ्या..
३वाटी पिठी साखर+ थोडेसे दुध टाकुन [जास्त गोळा नको फक्त ओलसर] + हवी असल्यास थोडी वेलदोडे पुड+खोबर्याचा बारीक कीस पण टाकु शकतात..

**ह्या मोहनचा जीव गुदमरत नाही उलट त्याला आनंद होतो फराळाच्या डीश मध्ये जायला मिळाल्याने.. ;)

अवांतर : आणि मैद्याच्या सारणात हे मोहन भरुन[पुरण्पोळीसारखे] पुरीएवढ्या लाटुन तुपात्/तेलात तळुन काढा आणि खातांना परत गावराणी तुपासोबत चापा..सांजोरी

अति अवांतर : तुमाच्या फोटोत दिसत असलेली वस्तु करंजी सदृश्य दिसत आहे त्यात ओले किंवा कोरड्या खोबर्याची खिरापत करुन भरली की त्याला करंजी म्हणतात..

दोन्ही अतिशय फेव्हरेट पदार्थ आहेत.. :)

मोहनराव's picture

10 Sep 2012 - 7:41 pm | मोहनराव

मला का भरतात त्यामध्ये? ;)

डावखुरा's picture

11 Sep 2012 - 11:11 am | डावखुरा

:)

डावखुरा's picture

9 Sep 2012 - 9:28 am | डावखुरा

मस्त पाकृ..पण त्यासाठी आमच्याकडे शिराच उरत नाही..
पुढच्यावेळेला..शिरा मुद्दाम जास्त करना पडीन्न..
झकास-झटपट..

खादाड's picture

9 Sep 2012 - 4:24 pm | खादाड

छान झट्पट पा.क्रु.

सुरेखच...माझही आज्जी करायची हे असं ...कधी घट्ट वरण उरलं कि मग ते पुराणा सारखं शिजवून त्याच्या पोळ्या करून द्यायची...आधीच गोडघाशे आम्ही ..चटक मटक करून गट्टम करून टाकायचो

सानिकास्वप्निल's picture

10 Sep 2012 - 3:13 pm | सानिकास्वप्निल

खूप छान
आमच्याकडे ह्याला सांज्याच्या पोळ्या असे म्हणतात :)

मदनबाण's picture

10 Sep 2012 - 8:36 pm | मदनबाण

नविन पाकॄ कळली ! :)

निवेदिता-ताई's picture

13 Sep 2012 - 9:20 am | निवेदिता-ताई

खुप छान