२५ जुन- १९८३

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in काथ्याकूट
25 Jun 2008 - 11:48 am
गाभा: 

२५ जुन १९८३ भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी दिवस .या दिवशी भारताने कपिल देवच्या नेतॄत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. आज या गोष्टीला २५ वर्ष पुर्ण झाली. सांघिक कामगिरी, अष्टपैलू -मेहनती खेळाडू यांच्या जोरावर भारतीय संघाने दैदिप्यमान यश संपादन केले.

नुकताच त्यावेळच्या भारतीय संघातील खेळाडुंना २५ लाख रु. देऊन दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. (ज्यावेळी संघ भारतात कप जिंकुन आला त्यावेळी बोर्डाकडे खेळाडुंना द्यायला पैसे नव्हते. लता मंगेशकरांचा एक कार्यक्रम ठेवुन बोर्डाने कसेबसे १ लाख रु. सर्वांना दिले.)

आजच्या व्यावसायिक खेळाडुंना मिळणार्‍या रकमेपेक्षा २५ लाख ही रक्क्म फार मोठी नाही. परंतु सर्वांच्या चेहेर्‍यावरचे समाधान आणी आपण देशासाठी काही तरी करु शकलो ही भावना या पैशापेक्षा खुप मोठी होती.

कुणा मिपाकरांना त्यावेळच्या काही आठवणी सांगता येतील का?

प्रतिक्रिया

II राजे II's picture

25 Jun 2008 - 12:03 pm | II राजे II (not verified)

कोणा कडे ह्या मॅच ची पुर्ण रेकॉर्डीग आहे का ????

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

क्षणचित्रे आहेत माझ्याकडे..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

सुनील's picture

25 Jun 2008 - 12:12 pm | सुनील

सुनील गावस्कर यांनी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभात अगदी आवर्जून मराठीत भाषण केले होते, असे आठवते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ध्रुव's picture

25 Jun 2008 - 12:24 pm | ध्रुव

अशा आठवणी कायमच आपल्या बरोबर राहातील...
जर मला बरोबर आठवत असेल तर आजच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराला ४० वर्षे पुर्ण झाली आहेत.

--
ध्रुव

स्वाती दिनेश's picture

25 Jun 2008 - 12:29 pm | स्वाती दिनेश

आणि कपिल "मला मराठी येत नाही." हे वाक्य मराठीतून बोलला होता ते ही आठवले.
खूप दंगा मस्ती करत विश्वकप पाहिला होता..तेव्हा कलर्ड टीव्ही इतके सर्वत्र झालेले नव्हते.आमच्याकडेही कृष्णधवल टीव्हीच होता. जाहिरातींचा सुकाळू नसल्याने ड्रींक ब्रेक मध्ये मैदानावर खेळाडू आणि पंचाचे पेयपान इ. दाखवत असत. ते खेळाच्या मैदानाबाहेर काय बोलतात त्याची फार उत्सुकता होती. त्यावेळी अर्थातच स्टंपजवळ मायक्रोफोन वगैरे प्रकार नव्हतेच.पण खूप मजा आली होती त्यावेळी..
स्वाती

सहज's picture

25 Jun 2008 - 12:37 pm | सहज

ती १७५ धावांची खेळी व हा अविस्मरणीय झेल.

मनस्वी's picture

25 Jun 2008 - 1:21 pm | मनस्वी

मला हे चित्रण सापडले.... कपिलच्या नजरेतून आनंद आणि समाधान ओसंडून वहातेय!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

झकासराव's picture

25 Jun 2008 - 2:21 pm | झकासराव

मी त्यावेळी वय वर्षे तीन असल्याने त्यावेळचे काहीच आठवत नाही.
पण नंतर एका क्लिपिंग मध्ये कपिलचा तो झेल पाहिला. जबराच झेल होता.
राजे बहुतेक स्टार क्रिकेट वर दाखवणार आहेत मॅच परत.
त्याविषयी जास्त माहिती मिळाली तर मी सांगेनच जर अजुन दुसर्‍या कोणाला माहीत असेल तर त्यानी सांगा. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

भडकमकर मास्तर's picture

25 Jun 2008 - 2:53 pm | भडकमकर मास्तर

मी तिसरीत होतो...
सगळ्या मोठ्यांबरोबर शक्य तेवढ्या उशीरापर्यंत पाहत होतो मॅच ते आठवतंय... भारताची बॅटिंग पाहिली मी, आणि मग लवकर झोपलो .....
आणि दुसर्‍या दिवशी रविवार होता बहुतेक... सकाळी उठून मला आनंदाची बातमी कळाली...
त्या दिवशी पुण्यात हत्तीवरून साखर वाटली होती, असा फोटो पेपरला होता दुसर्‍या दिवशी....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

25 Jun 2008 - 3:10 pm | विसोबा खेचर

हम्म!

आम्ही मंडळी २५ वर्ष झाली तरी अजून त्याच नशेत आहोत!

चांगलं आहे, चालू द्या... :)

आपला,
(आस्ट्रेलिया संघाचा प्रेमी) तात्या.

विकास's picture

25 Jun 2008 - 5:30 pm | विकास

आम्ही मंडळी २५ वर्ष झाली तरी अजून त्याच नशेत आहोत!

अगदी खरे आहे. ती रात्र चांगली लक्षात आहे (भारतात रात्री दिसली होती). त्याच बरोबर लक्षात आहे पाश्चात्य खेळाडू आणि माध्यमांचा माजरटपणा... पण त्यानंतर दृष्टीकोन बदलत गेला. (इतरांचा आणि आपलाच आपल्याबद्दल) त्या दृष्टीनेपण या दिवसाचे महत्व आहे.

प्रमोद देव's picture

25 Jun 2008 - 8:48 pm | प्रमोद देव

भारतीयांना कोणत्याही खेळातले अत्युच्चपद क्वचितच मिळते त्यामुळे असे प्रसंग ते सहजासहजी विसरत नाहीत. आपण नेहमीच हरत असतो त्यामुळे कितीही वाईट पद्धतीने हरलो तरी ते कशाला लक्षात ठेवायचे. ;)
खरे तर आपण भारतीय अतिशय दिलदार आहोत म्हणूनच प्रत्येक वेळी आपण प्रतिस्पर्ध्यांना जिंकवत असतो. पण आपल्यातलेच काही अखिलाडू वृत्तीचे लोक कधीकधी स्वत:च जिंकून आपल्या ह्या लौकिकाला बट्टा लावतात आणि वर त्याची रजत जयंती देखिल थाटामाटात साजरी करतात. :D

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

संदीप चित्रे's picture

26 Jun 2008 - 2:42 am | संदीप चित्रे

कधीच विसरणार नाही (भारतात रात्री मॅच संपली)
मी १३ वर्षांचा होतो त्यामुळे जवळपास संपूर्ण सामना लक्षात आहे. माझा सहा वर्षांनी लहान धाकटा भाऊही पूर्ण मॅच संपेपर्यंत जागला होता :)
विशेष लक्षात राहिलेले क्षण --
-- गावसकर लवकर आउट झाला आणि आम्ही एकदम निराश झालो
-- श्रीकांतने उजव्या गुढघ्यावर बसत मारलेला लाजबाब कव्हर ड्राईव्ह
-- बलविंदरसिंग संधूच्या ड्रीम बॉलवर, ग्रिनीजने बॅट उंचावून 'वेल लेफ्ट' केले आणि झपकन तो बॉल आत शिरून ऑफ स्टंफ उडवून गेला
-- रिचर्ड्सची बेदरकार चाल आणि झपाट्याची खेळी
-- कपिलने घेतलेला रिचर्डसचा केवळ अशक्यप्राय झेल
-- विंडीजचा स्कोअर १२०+ झाल्यावरची घालमेल
-- मोहिंदरने घेतलेली शेवटची विकेट
-- सगळी कॉलनी रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर :)

चंबा मुतनाळ's picture

26 Jun 2008 - 8:41 am | चंबा मुतनाळ

त्या वेळेस मी मँचेस्टर, इंग्लंड मध्ये शिकत होतो.
तेंव्हा मॅचेस दिवसाच्या होत, त्यामुळे मी कॉले़जमधे होतो.
लॉर्डवर जाऊन मॅच बघायची काही ऐपत नव्हती तेंव्हा, त्यामुळे खोलीवर येऊन संध्याकाळी हायलाईट्स बघीतल्या. मात्र तेंव्हा जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर संत व त्या वेळचे स्पोर्ट्स स्टार चे पत्रकार विश्वनाथ माझ्या फ्ल्याट वर राहीले होते हे आठवते!!

मात्र त्याआधीची भारत-इंग्लंड्ची ओल्ड ट्रॅफोर्डची कसोटी मात्र मी बघायला गेलो होतो, आणी तेंव्हा गावस्कर, पाटील, परकार वगैरेंना भेटलो होतो!!