गाभा:
तिकडे छायाचित्र टिका असा उपक्रम चालु आहे. तसा इथे पण एक उपक्रम चालु करावा असे मनात आले म्हणुन छायाचित्र परिक्षण असा मिपाक्रम चालु करत आहे. चित्र आवडले की नाही. आवडले असेल तर त्याची कारणे. आवडले नसेल तर का नाही आवडले आणि कशी सुधारणा केली असती तर अजुन चांगले झाले असते याविषली चर्चा अपेक्षित आहे. आशा आहे की मि.पा. वरच्या माझ्या मित्रांना हा मिपाक्रम आवडेल.
मि.पा. वर थोडेफार प्रतिसाद मी दिले असले तरीसुद्धा मि.पा. वरिल माझे हे पहिलेच पोस्ट. त्यानिमित्ताने लाल गुलाबाचे छायाचित्र इथे अपलोड करत आहे.
आपला
- सूर्य
प्रतिक्रिया
25 Jun 2008 - 11:16 am | विसोबा खेचर
वा सूर्या!
अरे गुलाबाचं फूल कुणाला आवडत नाही? फारच सुरेख चित्रं आहे हे!
तसा इथे पण एक उपक्रम चालु करावा असे मनात आले म्हणुन छायाचित्र परिक्षण असा मिपाक्रम चालु करत आहे.
जियो...!
तरीसुद्धा मि.पा. वरिल माझे हे पहिलेच पोस्ट.
मिपा परिवारात सहर्ष स्वागत...!
आपला,
(गुलाबप्रेमी) तात्या.
25 Jun 2008 - 11:21 am | प्राजु
नक्की प्रतिक्रीया दिली असती... पण चित्रच दिसत नाहिये हो माझ्या पिसी वर... काय करावे.. :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Jun 2008 - 11:46 am | सुमीत भातखंडे
छानच आलाय फोटो.
अभिनंदन.
25 Jun 2008 - 12:10 pm | मनस्वी
सूर्या, मला छायाचित्र आवडले.
मला फुलं आणि निसर्गाची छायाचित्रे आवडतात म्हणून हे छायाचित्र आवडले.
अजून येउदेत.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
25 Jun 2008 - 12:15 pm | सूर्य
दिसत नसेल तर कृपया आय.इ. मधुन बघण्याचा प्रयत्न करावा. मी फायर फॉक्स मधुन अपलोड केले असले तरी मलासुद्धा फायर फॉक्स मधुन दिसत नाहिये :(
- सूर्य
25 Jun 2008 - 12:23 pm | स्वाती दिनेश
ही परीक्षणाची कल्पना आवडली.
गुलाबाचा टवटवीत फ्रेशपणा आणि हिरव्या पानांच्या सिंहासनावर विराजमान ऐटदार गुलाबराज!
असा फोटो आवडला.
25 Jun 2008 - 12:57 pm | प्रगती
इतका सुंदर रंग आहे या गुलाबाचा वा!
सकाळ सकाळ इतक्या सुंदर गुलाबाचा फोटो पाठवील्या बद्द्ल धन्यवाद!
25 Jun 2008 - 1:01 pm | बेसनलाडू
गुलाबावरची टवटवी आवडली.
(टवटवीत)बेसनलाडू
25 Jun 2008 - 8:34 pm | गिरिजा
(टवटवीत)बेसनलाडू
=)) =)) =))
बाकी फोटु छान आहे..
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
26 Jun 2008 - 10:48 am | टारझन
=))
वा ! वा !! वा !!!
बेसनलाडवा असाच टवटवीत रहा ....... =)) =)) =)).... कल्पना च करवत नाही गड्या....
तो फोटोतला गूलाब कोमेजेल आज ना उद्या (नाही तर परवा नकीच)
पण मिपाचा टवटवीत बेसनलाडू तस्साच टन्नक राहील...
हाणला कोणाच्या डोक्यात तर टेंगूळ आल्याशिवाय रहाणार नाही
(टवटवीत बेसनलाडू चा पंखा) कुबड्या
http://picasaweb.google.com/prashants.space
25 Jun 2008 - 1:10 pm | भाग्यश्री
मस्तचे! रंग आणि टवटवीत पणा सुंदर..
पण फांदी दिसत नसल्याने फुल अधांतरी वाटतय! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
25 Jun 2008 - 1:44 pm | मदनबाण
सुंदर फोटो...
हा फोटो पाहुन एक फोटो मलाही इथ ध्यावा वाटतोय.....(हा वॉलपेपर आहे,,माहितीजालावरुन घेतलेला..)
(गुलकंद प्रेमी)
मदनबाण.....
25 Jun 2008 - 2:33 pm | प्रशांतकवळे
खरच खुप सुंदर फोटो...
प्रशांत
25 Jun 2008 - 6:05 pm | अमित.कुलकर्णी
सुंदर फोटो आहे!
25 Jun 2008 - 8:10 pm | संदीप चित्रे
फोटो एकदम खास :)
25 Jun 2008 - 8:18 pm | धनंजय
फारच लोभस दृष्टिभ्रम - डेप्थ ऑफ फोकसने केलेली किमया.
लाल-हिरवी गडद रंगसंगती क्लासिकच आहे.
(मिपा वर मातब्बर प्रकाशचित्रकार आहेत - त्यांच्याकडून उत्तम चर्चा होईल, आणि काही शिकायलाही मिळेल. मिपाक्रम सुरू केल्याबद्दल "जियो!")
25 Jun 2008 - 8:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुलाबाचं चित्र लै भारी आलंय !!!
अहो सेठ, आम्ही आपली अनेक चित्र पाहिली आहेत. त्यातल्या कलेला आणि कलाकाराला आम्ही केव्हाच ओळखलंय !!!
ही म्हणजे रसिकांची परिक्षा आहे, असे वाटते :)
-दिलीप बिरुटे
(सूर्यचा मित्र चंद्र )
25 Jun 2008 - 8:31 pm | चतुरंग
भुरळ घातली! सुंदर चित्र.
चतुरंग
25 Jun 2008 - 10:01 pm | शितल
मस्त गुलाबाचा फोटो
आणि मदणबाण्ने ही मस्त फोटो चढविला आहे
26 Jun 2008 - 6:19 am | कोलबेर
सूर्य भाऊ तुमच्या चित्रावर किंचीत हिरवट पिवळ्या रंगाची कास्ट आली आहे असे वाटते. ती काढून टाकल्यावर चित्रातील आणखी डिटेल्स दिसता आहेत.
मूळ चित्र
हिरवी छटा कमी केल्यावर
26 Jun 2008 - 10:10 am | सूर्य
धन्यवाद कोलबेर भाऊ ;). मी चित्र शक्यतो ओरिजिनलच ठेवतो. पण याचे मुख्य कारण प्रोसेस करण्याचा कंटाळा हे आहे ;). दुसरे म्हणजे फोटोशॉप परवडत नाही आणि जिंप येत नाही :(. असो. पण तुम्ही हिरवी छ्टा गडद केल्यानंतरचे चित्र ओरिजिनल पेक्षा भारी दिसतेय खरे. पिवळी छटा कशी कमी केली काही सांगता येइल का ?
- सूर्य.
26 Jun 2008 - 3:11 pm | धमाल मुलगा
सुंदर!
सूर्य, फोटोसाठी निवडलेला गुलाब मस्तच. आणि फोटोही सुंदर!
त्यात कोलबेरशेठचा सिध्दहस्त फिरल्याने फोटोतला उठुन दिसणारा रंग आणि त्यावरचे उन्ह-सावलीचे खेळही अप्रतिम :)
आणखी येऊ दे.
26 Jun 2008 - 7:30 pm | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
वाह !!!!!!!! क्या बात है. झक्कास.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
26 Jun 2008 - 8:07 pm | फुलपाखरु
खूप छान आहे छायाचित्र! एकदम ताजेतवाने झाले मन ! :)
29 Jun 2008 - 7:45 pm | फुलपाखरु
माझ्या घरासमोरच्या झाडावरती अमेरिचन रॉबिन पक्ष्यानी घरटं बांधलं होते. घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे.
याच धाग्यामध्ये अपलोड केली तर चालतील का ? का नवीन धागा सुरु करायला हवा? जागा चुकली असेल तर माफ करा. इथे नवीन असल्यामुले अजुन सरावलेले नाही.
29 Jun 2008 - 7:47 pm | फुलपाखरु
अमेरिकन* रॉबिन म्हणायचे होते मला.
30 Jun 2008 - 11:38 am | पक्या
छान आहे चित्र, सूर्य
>> घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे.
याच धाग्यामध्ये अपलोड केली तर चालतील का ? का नवीन धागा सुरु करायला हवा?
फूलपाखरूजी, मला वाटतं की नविनच धागा सुरू करा. तुमच्याकडचा छायाचित्रांच्या रुपातील घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास आवडेल बघायला. येऊ द्यात लवकर.
30 Jun 2008 - 8:56 pm | फुलपाखरु
http://www.misalpav.com/node/2337