मनधुंद - मनाला धुंद करणारी गाणी

योगेश पितळे's picture
योगेश पितळे in काथ्याकूट
2 Sep 2012 - 11:04 pm
गाभा: 

अनंतलता निर्मीत आणि गीतकार अखिल जोशी प्रस्तुत मनधुंद हा एक सुंदर मराठी अल्बम नुकताच ' मानबिंदू म्युझिक 'तर्फे ऑनलाईन प्रकाशित झाला आहे. पाऊस आणि प्रेम या मनाच्या खास आणि नाजूक कप्प्यात असलेल्या विषयावर आधारलेली;गीतकार अखिल जोशी यांनी लिहिलेली ९ वेगवेगळी गाणी या अल्बमद्वारे मिपाकर संगीत रसिकांना ऐकायला मिळतील.मर्डर-२, देव-D, दस कहानिया या सारख्या हिंदी चित्रपटात पार्श्वगायन केलेल्या क्षितीज तारेने प्रथमच एका मराठी अल्बमसाठी पार्श्वगायन केल आहे. त्याबरोबरच सध्याची आघाडीची गायिका डॉ. नेहा राजपाल, सारेगमप फेम वैशाली माडे,जयदीप बगवाडकर, पौलमी पेठे आणि 'हदयी वसंत फुलताना'सारखं सुप्रसिद्ध प्रेमगीत गायलेल्या आणि दत्ता डावजेकर यांची कन्या असलेल्या ज्येष्ठ गायिका डॉ.अपर्णा मयेकर असे अनेक कसलेल्या कलाकारांनी यात पार्श्वगायन केलं आहे. अल्बमचं टायटल ट्रॅक 'मनधुंद', पौलमी पेठे यांनी गायलेलं 'या प्रीतिचे आभास असे'आणि वैशाली माडे हिने गायलेली 'सांजवेळ झाली प्रिया' व 'होशील का रे माझा साजण'ही गाणी खास जमून आली आहेत. मेलोडीयस संगीतकार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या अभिजीत राणेचा हा तब्बल १२ वा अल्बम. शब्दांमध्ये असलेला गोडवा गाण्यातील हरकतीमधून आणि काही खास जागांच्या नाजूक कलाकुसरीसह स्वरांमध्ये गुंफण्याची एक खास कला अभिजीतला अवगत आहे.त्यामुळे 'गायकी'वर विशेष प्रेम करणारा वर्ग हा नेहमीच अभिजीतचा चाहता ठरला आहे आणि ती गोष्ट या ही अल्बममध्ये प्रकर्षाने जाणवते. या अल्बममधली निवडक गाणी तुम्हाला http://www.maanbindu.com/new-marathi-music-album-Mandhund या दुव्यावर ऐकायला मिळतील. गाणी ऐकून तुमचे अभिप्राय नक्की लिहा. हे सगळे कलाकार तुमच्या अभिप्रायाची वाट पहात आहेत :-)

ज्या मिपाकरांना हा अल्बम ऑनलाईन खरेदी करावासा वाटेल त्या मिपाकरांना या अल्बमच्या ऑनलाईन खरेदीवर २५% इतकी सूट देण्यात आली आहे. यासाठी http://www.maanbindu.com/offers.jsp?coupon_code=misalpav या दुव्याचा वापर करावा!
टीप: ही सूट फक्त ५ सप्टेंबर पर्यंत उपलब्ध आहे!

प्रतिक्रिया

राजो's picture

3 Sep 2012 - 11:36 am | राजो

ब्वॉर्र...

स्पा's picture

3 Sep 2012 - 11:40 am | स्पा

वा.. चांगली वाटत आहेत गाणी..
अभिनंदन

योगेश पितळे's picture

3 Sep 2012 - 1:59 pm | योगेश पितळे

आभारी आहे :)

पैसा's picture

3 Sep 2012 - 6:55 pm | पैसा

पुढे येणार्‍या गुणी गायकांची गाणी. ऐकायला चांगली वाटली.

योगेश पितळे's picture

4 Sep 2012 - 1:31 am | योगेश पितळे

धन्यवाद ज्योती!