गाभा:
माझ्याकडे सध्या Nokia e5 हा फोन आहे . यामध्ये मी opera mini किंवा opera mobile वापरुन मिसळपाव किंवा ईतर मराठी साईट चांगल्या प्रकारे वाचु शकतो .(opera:config मध्ये बदल करुन ) परंतु मराठी लिहीता येत नाही . (माझे नाव मराठित असल्यामुळे मि मिपावर log in सुध्दा होउ शकत नाही.)
opera mini मधे मराठी कॉपी पण करता येत नाही .
शिवाय मिपावर एकदा लॉग इन केल्यावर आणि गमन न करता बाहेर आल्यावर पुन्हा user name आणि password का टाकावा लागतो ? (चेपुवर नाहि टाकला तरी चालतो) मिपावरच्या टेकी * लोकांकडुन काहितरी उपाय अपेक्षीत !!!
(* -- जे लोक सदा संगणकासमोरच टेकलेले असतात.)
(उपाय मिळाल्यावर धागा उडवला तरी चालेल.)
प्रतिक्रिया
30 Aug 2012 - 2:50 pm | नाना चेंगट
>>मिसळपाव वर मोबाईलद्वारे कस लिहायच ???
टाईप करुन.
30 Aug 2012 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा
यावर एकच नामी उपाय-देवनागरी लिपी अवगत असलेला फोन घेणे,आणी त्यावर युसी ब्राऊझर उतरवुन,तो वापरणे.
माझे जवळ अत्ता सॅमसंग प्राइमो आहे... (यावर ९ भारतीय भाषा लिहिण्यास उपलब्ध आहेत.आणी किपॅडही चांगलं असल्यानी टाईपिंगही दनादन जमतं )
१ नंबर खेळतो हा फोन.
30 Aug 2012 - 2:59 pm | नाना चेंगट
>>>१ नंबर खेळतो हा फोन.
कुणाशी आणि कुठे? खिशात ठेवतात ना फोन म्हणून विचारले.
30 Aug 2012 - 3:09 pm | वैनतेय
__/\__
30 Aug 2012 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा
@खिशात ठेवतात ना फोन म्हणून विचारले. >>> भावना पोहोचल्या धन्यवाद...
30 Aug 2012 - 3:26 pm | sagarpdy
मोबाईल वरचे प्रश्न संगणकाला चिकटलेले लोकं कसे सोडवणार बरे? :O
हा प्रश्न मोचि** लोकांना विचारण्यात यावा हि विनंती. ;)
(** -- जे लोक सदा मोबाईलला चिकटलेले असतात.)
30 Aug 2012 - 3:30 pm | गवि
नोकिया ई५ फोन (सिम्बियन ऑपरेटिंग सिस्टीम) असल्याने त्यात मिसळपावची टायपिंग प्रणाली, गमभन, बरहा, गूगल इंडिक ट्रान्सलिटरेशन वगैरे थेट चालत नाही. ऑपेरामधेही एका कॅरेक्टरपेक्षा जास्त कन्व्हर्जन होत नाही.
पण एक उपाय आहे. तुम्ही फोनच्या ब्राउझरमधून ओव्ही स्टोअरला जा आणि इन्डि-एसएमएस हे अॅप्लिकेशन डाउनलोडवा. त्यात सरळ मराठी मेसेज टाईप होतो. (एसएमएससाठी असलं तरी मजकूर तर मराठी युनिकोडमधेच येतो) मेसेज "सेन्ड" न करता क्लोज करा. डीलीट / सेव्ह टू ड्राफ्ट्स असे ऑप्शन्स विचारले जातील, सेव्ह टू ड्राफ्ट करा. (यानंतर हवं तर इन्डि एसएमेस क्लोज करा किंवा चालूच ठेवा)
मग लगेच फोनच्या नॉर्मल एसेमेसच्या मेन्यूतून "ड्राफ्टस" फोल्डर्समधे जाऊन तिथे सेव्ह झालेलं टेक्स्ट थेट ब्राऊजरमधल्या मिपाच्या चौकटीत कॉपी पेस्ट करा.
एकावेळी सहा मेसेजेसपेक्षा जास्त लांबीचा कंटेंट टाईपता येत नाही, अशा वेळी सहा सहा मेसेज इतक्या साईझचे दोन-तीन्-चार मेसेज टाईप करुन एकामागून एक पेस्ट करता येतात. खूपच सोपं.
प्रतिसादांसाठी तर एकदमच कंफर्टेबल..
30 Aug 2012 - 6:42 pm | उगा काहितरीच
अहो नाहि जमत हो ! कारण मराठी मध्ये असलेला कुठलाही प्रकारचा मजकुर कॉपी --पेस्ट करता येत नाही. opera mini मध्ये तर select पण करता येत नाही.
30 Aug 2012 - 10:02 pm | गवि
अहो इंडि एसएमएस डाउनलोड करुन पाहिलंत का? की तर्काने म्हणताय? ब्राउजरमधून कॉपी पेस्ट करण्याच्या प्रश्नच कुठे येतो? इंडि एसेमेस अॅपमधे मराठी टाईप करुन,सेव्ह टू ड्राफ़्ट करुन मग "नेहमीच्या एसेमेस मेनूतून" ड्राफ़्ट उघडून तिथून कॉपी करुन मिपावरच्या प्रतिसाद चौकटीत टाकणे. अॅपमधून किंवा ब्राउजरमधून थेट कॉपी नव्हे.हा प्रतिसाद मी नोकियाच्या आणखी जुन्या व्हर्शनवरुन इंडि एसेमेसमधे टाईपलाय.
...एनीवे.असोच.
31 Aug 2012 - 12:28 am | विश्वनाथ मेहेंदळे
ओ गवि, कशाला डोके फोडता आहात. ते उगाच TP करतात. आजवर त्यांना एकही उपाय मनास आला नाही. त्यांचे आपले चालू असते, उगा काहीतरीच....
तस्मात, टंकनशक्ती इथे वाया घालवू नका.
30 Aug 2012 - 3:43 pm | मोहनराव
मी सरकारी निवासस्थानात राहतो. http://www.misalpav.com/node/17219
रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो http://www.misalpav.com/node/17219
माझ्याकडे सध्या Nokia e5 हा फोन आहे
जाहिरातबाजी जोरात चालु आहे.... अजुन काय काय आहे तुमच्याकडे...
बाकी चालुद्या....
30 Aug 2012 - 3:52 pm | कपिलमुनी
मी सरकारी निवासस्थानात राहतो.>>उपाय सुचवाल ? :11/03/2011
माझ्याकडे सध्या Nokia e5 हा फोन आहे>>मिसळपाव वर मोबाईलद्वारे कस लिहायच ??? : 30/08/2012
दोन जाहिरातींमध्ये दीड वर्षांचा कालावधी आहे मोहनराव....
कशाला उगाच खेचता ....
30 Aug 2012 - 4:24 pm | मोहनराव
दीड वर्षांचा कालावधीमध्ये नक्कीच दुचाकीवरुन चारचाकीवर आले असतील...
सध्या तो बोका त्रास देतो का? कारमध्ये जाऊन झोपत असेल नाही? मिपाकरांचे उपाय कामी आले का?
30 Aug 2012 - 6:52 pm | उगा काहितरीच
ड्वाले पाणावले...!!!
(नाहि सध्याला पण तिच Honda cb twister वापरतो. पण लवकरच सरकारी निवासस्थानातुन स्वतःच्या घरी राहायला जाणार आहे.)
30 Aug 2012 - 7:00 pm | सूड
ड्वाले पाणावले...!!!
नावातच सगळं आलं घातलंत ना !! तिखट झेपलं नसेल.
30 Aug 2012 - 6:45 pm | उगा काहितरीच
प्रतिकीया लाईक करन्यात आली आहे.
30 Aug 2012 - 4:02 pm | गणपा
माताय एक से एक डिटेक्टीव्ह भरलेत मिपावर. ;)
1 Sep 2012 - 11:51 am | सुहास झेले
हा हा हा ... :) :)
30 Aug 2012 - 6:52 pm | मन१
सदर प्रतिसादातून मोहनरावांनी आपल्या डिटेक्टिव एजन्सीची उत्कृष्ट जाहिरात केलेली दिसते आहे ;)
30 Aug 2012 - 7:02 pm | मोहनराव
प्रतिकीया लाईक करन्यात आली आहे.
30 Aug 2012 - 5:14 pm | नि३सोलपुरकर
गणपाशी १००% सहमत ...
मानलं बुवा
30 Aug 2012 - 8:15 pm | इरसाल
लाइक करण्या करण्यात मिपाचं फेसबुक होवु नये.
30 Aug 2012 - 9:10 pm | उगा काहितरीच
आजकाल फेसबुक वापरनारेच फेसबुकल शिव्या घालनारेच जास्त दिसताएत...
30 Aug 2012 - 8:38 pm | सोत्रि
च्यामारी,
मिपाची हीच तर खासियत आहे, मुळ धागा काय आणी चर्चा काय....
अरे त्यांनीं 'उगा काहितरीच' हा आयडी घेतला असला तरी धागा उगा काहीतरीच म्हणुन काढलेला नाही असे दिसते आहे.
जरा त्यांना टेकू लावा...आय मीन टेकी लोकांनी मदत करा.
- ( 'उगा काहीतरीच' असा प्रतिसाद न लिहीलेला) सोकाजी
30 Aug 2012 - 10:44 pm | किसन शिंदे
सोत्री, आठवतं का आशू जोगांच्या धाग्यावर झालेलं शेंगोळीचं अवांतर?? ;)
31 Aug 2012 - 12:28 am | विश्वनाथ मेहेंदळे
ओ भासं, तुम्ही नाही असे अवान्तरला प्रोत्साहन द्यायचे.....
31 Aug 2012 - 10:34 am | sagarpdy
.
1 Sep 2012 - 11:31 am | उगा काहितरीच
तुमच्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
परंतु ते app वापरुन खरच जमत नाही हो.
कारण
अ) त्याची स्क्रीन लहान आहे.
ब) qwerty कळफलक त्याला कळत नाही
क) ओपेरा मिनी मधे paste करता येत नाही.
(मी indSms freewaresysbian वरुन घेतले आहे.)
1 Sep 2012 - 4:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> परंतु ते app वापरुन खरच जमत नाही हो.
नाही जमत ना मग नका या फंद्यात पडु. सिंबियन वाल्या टच स्क्रीन हँडसेट मधे मराठी संकेतस्थळावर टंकायची अडचण आहेच. क्युलीपेड, इंडिएसेमेस, एक चायना वाल्याचं एक चांगल अॅप्लीकेशन आहे. आठवल्यावर सांगतो, त्याचा वापर करुन म्हणजे चोप्य पस्ते करुन प्रतिसाद लिहिता येतात. बाकी, ऑपेरा मधुन आपल्याला मिपा वाचता येतं ना ते बस आहे, मिपावरचे प्रतिसाद मोबीवरुन दिवसभर जमेल तसे वाचायचे ऑपेरा एक्झीट करुन लेखनावर प्रतिसादावर चिंतन-मनन करायचे, प्रतिसाद टाकायचाच का याचा विचार करायचा, आणि संध्याकाळी निवांतवेळी घोट घेत (चहाचे) प्रतिसाद टाकायचे मी असंच करतो. :)
सिंबियन ऑप्रेटींग सिष्टीम s60 v3/v5 साठी मिपावर लिहिता येईल असं एखादं अॅप्लीकेशन तयार करा रे कोणी ? बदल्यात शाबासकी देईन कोणत्याही धनाची अपेक्षा ठेवू नये. अगाऊ धन्यवाद. :)
काही मदत लागली इथेच लिहा.
-दिलीप बिरुटे
1 Sep 2012 - 6:00 pm | उगा काहितरीच
अहो मालक माझा फोन टच स्क्रीन नाही.
>>>>बाकि ऑपेरा मधुन आपल्याला मिपा वाचता येतं ना ते बस आहे, मिपावरचे प्रतिसाद मोबीवरुन दिवसभर जमेल तसे वाचायचे ऑपेरा एक्झीट करुन लेखनावर प्रतिसादावर चिंतन-मनन करायचे, प्रतिसाद टाकायचाच का याचा विचार करायचा, आणि संध्याकाळी निवांतवेळी घोट घेत (चहाचे) प्रतिसाद टाकायचे मी असंच करतो.
सध्याला मी पण असंच करतो. (नाईलाजाने...)
4 Sep 2012 - 12:15 am | आनंदी गोपाळ
मोबाईलद्वारेच काय कोणत्याच प्रकारे टंकले नाहीत तर बरे होईल असे वाटते..
4 Sep 2012 - 7:22 pm | उगा काहितरीच
तुम्हाला बरे वाटावे म्हनुन टंकने सोडुन देउ काय ??
(तेवढी चांगली कुंडली नाही हो तुमची )
5 Sep 2012 - 10:21 pm | उगा काहितरीच
hushshs... Zalo ekdach login mobile varun copy paste karun ... Pan marathi lihita yet nahi.