लतादीदी व त्यांचे विचार

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
29 Aug 2012 - 2:05 am
गाभा: 

लतादीदी यांचा विचार
छ्त्रपती शाहु महाराजांनी १९३४ मधे कोल्हापुर येथे जयप्रभा स्टुडिओ उभारला त्याकाळी व आज पर्यत हे महाराष्ट्राचे वैभव आहें
नंतर हा स्टुडिओ १९४४ मधे चित्रमह्र्षी श्री भालजी पेंढारकर यांनी महाराजांकडुन विकत घेतला
गानकोकिळा लतादीदी यांनी सुमारे पन्नास वर्षापुर्वी हा स्टुडिओ भालजींकडुन खरेदी केला होता.सुमारे १२ एकर जागेत पसरलेल्या या वैभवात अनेक मराठी तसेच हिंदी कलाकार मोठे झाले व नावारुपास आले,येथे अनेक मराठी हिन्दी चित्रपट निर्माण झाले व येथे नेह् मी शूटिंग चालुच असते, काही वरषापुर्वी यातील अर्धा भाग लतादीदी नी विकला,आता उर्वरीत सुमारे साडेपाच ते सहा एकराचा भागाची विक्री सुरु केली आहे
संदर्भ दै.प्रभात पुणे पान ९ दि.२७आगस्ट२०१२
लतादीदी या आदरणीय व्यक्ती आहेत यात शंका नाही पण या वैभवाची विक्रीचा विचार पटत नाही ,असे मला वाट्ते पण शेवटी ही त्यांची वैय क्तीक मिळ्कत आहे, माझ्या प्रमाणे तुम्हाला हा विचार कसा वाट्तो--

प्रतिक्रिया

सुनील's picture

29 Aug 2012 - 2:07 am | सुनील

उत्तर ह्या धाग्यावर दिले आहे.

चित्रगुप्त's picture

29 Aug 2012 - 3:47 am | चित्रगुप्त

हा स्टुडियो विकणे हा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय म्हणावा लागेल.
अश्या प्रकारे जुन्या, ऐतिहासिक महत्वाच्या वास्तु वगैरे विकणे हे संपूर्ण समाजाच्या, देशाच्या अत्यंत करंटेपणाचे लक्षण होय.
लताबाईंच्या गान-कौशल्याबद्दल वादच नाही, परंतु आता या वयात त्यांना यातून मिळणार्‍या पैशांचा काय उपयोग आहे? परदेशात अगदी लहान-सहान जागा देखील अतिशय काळजीपूर्वक जश्याच्या तश्या जतन केल्या जातात, त्यावरून स्फूर्ती घेऊन (गरज पडल्यास पदरचा पैसा घालून) त्यांनी हा स्टुडियो जतन केला पाहिजे.

हुप्प्या's picture

29 Aug 2012 - 10:26 am | हुप्प्या

या वयात त्यांना या पैशाचा काय उपयोग आहे? असे प्रश्न आपल्याला विचारण्याचा काय हक्क आहे?
अफाट प्रतिभेने , मेहनतीने, स्वकर्तृत्वाने ह्या बाईंनी पैसे मिळवले आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून झगडत त्या इतक्या उच्च शिखरावर पोचल्या आहेत. तेव्हा तिथे पोचताना त्यांनी मिळवलेले पैसे हे सर्वथा त्यांचे आहेत. अजून पैसे मिळवायचे का दानधर्मात घालवायचे का खर्चायचे का उधळायचे हे सर्वस्वी त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्यांचे वय काय वगैरे मुद्दे गैरलागू आहेत. आपण काही साम्यवादी राजवटीत रहात नाही की सगळे धन सरकारच्या हवाली करायला लागेल.
समजा त्यांना वा त्यांच्या निकटच्या आप्तेष्टाला कुठलीशी व्याधी आहे आणि त्याकरता दिवसाला त्या लाखो रुपये खर्च करतात आणि म्हणून त्यांना पैसे हवे आहेत. काय असेल ते असो.
त्यामुळे कोल्हापूर महापालिका, विविध श्रीमंत या लोकांनी जयप्रभा स्टुडिओ जतन करावा , तशी तीव्र इच्छा असल्यास. तो लताबाईंनीच जतन करावा अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे.

प्रदीप's picture

29 Aug 2012 - 11:10 am | प्रदीप

माझेच विचार तुम्ही येथे मांडले आहेत.

मी वरील प्रश्नाविषयी येथे टिपण्णी केली आहे.

विनायक प्रभू's picture

29 Aug 2012 - 9:17 am | विनायक प्रभू

वास्तु, ठेवा, जतन वगिरा वगिरा सगळे ठीक.
बो.क.बो.भा.
कोण पुढे येणार आहे?
येणार असाल तर मी तयार आहे.
नाही तर सर्व चर्चा व्यर्थ.

प्रभाकर पेठकर's picture

29 Aug 2012 - 2:31 pm | प्रभाकर पेठकर

सुमारे १२ एकर जागेत पसरलेल्या या वैभवात अनेक मराठी तसेच हिंदी कलाकार मोठे झाले व नावारुपास आले.

ह्या सर्व 'लाभार्थीं' कलाकारांनी पुढे येऊन हा स्टुडिओ लतादिदींकडून विकत घ्यावा आणि जतन करावा. किंवा मराठी आणि हिन्दी चित्रपटसृष्टीने पुढे येऊन हे कार्य करावे. पण त्याही आधी चित्रपटसृष्टीतील जे तळागाळातले कामगार आहेत त्यांच्या निवृत्ती वेतनाची आणि आरोग्यसेवेची व्यवस्था करावी.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Aug 2012 - 2:40 pm | परिकथेतील राजकुमार

शकु मामी.

आमच्याकडे दै.प्रभात येत नसल्याने ही बातमी माहितीच नव्हती.

बाकी कोण ह्या लतादीदी ? आणि मिपाकरांना विचारल्याशीवाय त्यांनी असा आगाऊपणा केलाच कसा ?

प्रदीप's picture

29 Aug 2012 - 4:34 pm | प्रदीप

बाकी कोण ह्या लतादीदी ?

झालं, आता ही शकी 'आमच्या सोनेरी दिवसांना लता आणि फत्ता ह्यांच्या गाण्याने कसे रंग आणले' त्यावर चार वाक्ये लिहीणार, मग इथले होऊ घातलेले म्हातारे त्यावर पन्नास वाक्ये भरभरून लिहीत बसणार!! कशी रे मुलं तुम्ही!!

आमच्या वेळी मूकपटांत काय एकेक गाणी होती रे! काय सांगू तुला!! अहाहा... त्या मधुर गाण्यांचे सूर अजून माझ्या म्हातार्‍या (आणि आता वयोमानानुसार बहिर्‍या) कानात रूंजी घालताहेत! पण मग कुणी कर्नाटकी, अंबावाली आल्या, 'त्या माझ्या काळच्या सोनेरी, चंदेरी, प्लॅटिनमवी.... वगैरे गाण्यांना त्यांनी बाजूस सारले. मग तुमची ती लत्ता का फत्ता कोण ती आली. तिने तर सगळेच भष्ट करून टाकले.

--- बळवंतराव कुरसूंडीकर अर्थात प्रदीप*
वय वर्षे ८९ वट्ट

*'प्रदीप' हे नाव मी चार पाच दशकांपूर्वी , तत्कालिन तरूणात वावरता यावे म्हणून घेतले. अजून ते नाव तसे टाकाऊ झालेले आहे असे वाटत नाही, तेव्हा इथे त्याच नावाने वावरतो.

शकु गोवेकर's picture

30 Aug 2012 - 1:02 am | शकु गोवेकर

हा स्टुडिओ विकण्यापुर्वी लतादीदी नी हा विचार केला असावा की या व्यवहारानंतर या रकमेतुन जन उपयोगी वास्तु बांधावी जसे त्यांनी पुण्यात दीनानाथ होस्पिटल बांधले आहे तसे,

कपिलमुनी's picture

30 Aug 2012 - 2:09 pm | कपिलमुनी

दीनानाथ होस्पिटल जनउपयोगी आहे हे कोणी सांगितले ??

"जयप्रभा स्टुडिओ ही माझी मालमत्ता आहे. तेथे चित्रीकरण करण्यासाठी कोणी येत नसल्याने तो पडून आहे.
त्याच्या देखभालीचा खर्च मी स्वतः करीत आहे. या परिस्थितीत स्टुडिओ विकायचा मी निर्णय घेतला आहे,''

असं लतादीदींकडून म्हणणं आहे. जे अतिशय रास्त आहे. याउपर ज्याची त्याची मालमत्ता आणि तिचा व्यवहार(हेरिटेज, पुरातत्व विभागाच्या इत्यादि नियमांच्या / कायद्यांच्या विरुद्ध नसलेला व्यवहार) करण्याबाबत इतर कोणी मतप्रदर्शनाचा संबंधच येत नाही. किंवा असं म्हणू की मतप्रदर्शनच फक्त करु शकतो. दंगा नाही.

सरकारला किंवा अन्य संस्थांना वाटते आवश्यकता जपण्याची? जर उत्तर "हो" असेल तर मग झाले होते का अ‍ॅप्रोच लतादीदींना खरेदी करतो असं म्हणून?

हलवायाच्या घरावर तुळशीपत्र , आयजीच्या जिवावर इत्यादि बर्‍याच म्हणी आठवल्या. याउप्पर कालच्या मटामधे तर वाचलं की चित्रपट महामंडळ कोल्हापूर, यांनी काढलेल्या मोर्चातर्फे असा "इशारा"ही देण्यात आला की :"ज्या बिल्डरने ही वास्तू खरेदी केली आहे , त्याने स्टुडिओच्या एका विटेला जरी हात लावला तरी त्याची कंपनी जमीनदोस्त केली जाईल."

दुवा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15916441.cms

भले..

नर्मदेतला गोटा's picture

30 Aug 2012 - 9:43 pm | नर्मदेतला गोटा

सर्वप्रथम

पेपरमधील बातमी इथे ठोकल्याबद्दल
धन्स

जनरल नॉलेज वाढले