नानकटाई

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
27 Aug 2012 - 1:45 am

.

साहित्यः

२५० ग्रॅम मैदा
२०० ग्रॅम तूप रूम टेंपरेचरला असलेले (अनसॉल्टेड बटर वापरले तरी चालेल, मी तेच वापरले आहे)
११० ग्रॅम पिठीसाखर
३५ ग्रॅम रवा
२५ ग्रॅम बेसन
१/४ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टीस्पून वेलचीपूड
१/४ टीस्पून केशर
पिस्त्याचे काप

.

पाकृ:

प्रथम एका मिक्सिंग बाऊलमध्ये बटर व पिठीसाखर एकत्र करा व ते हलके, पांढरे होईपर्यंत बीट करा.
त्यात रवा, बेसन, वेलचीपूड व केशर घाला.
थोडे-थोडे करून मैदा घालून बीटरने एकत्र करा.
मिश्रण कणकेप्रमाणे गोळा होऊ लागेल तसे बीटर बंद करा.

.

बेकिंग ट्रेवर व्हॅक्स पेपर लावून घ्या.(नसल्यास तुपाचा हात फिरवा ट्रेला)
तयार कणकेचे छोटे पेढे करुन घ्या व हलकेच मधोमध अंगठ्याने दाबा.
बेकिंग ट्रेवर थोड्या थोड्या अंतरावर रचून ठेवा.
ओव्हन १८० डिग्रीवर प्री-हीट करुन घ्या.
प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये ट्रे ठेवून १८० डिग्रीवर ७-८ मिनिटे बेक करा.

.

७-८ मिनीटांनी ट्रे बाहेर काढून अंगठ्याने दाबलेल्या ठिकाणी पिस्त्याचे काप लावा व पुन्हा ओव्हनमध्ये ७-८ मिनिटे बेक करा.

.

नानकटाई तयार झाल्या की कुलिंग रॅकवर काढून पूर्ण गार होऊ द्या.

.

हवाबंद डब्यात भरुन ठेवा.
वाफाळत्या चहाबरोबर सर्व्ह करा . नुसत्याही छान लागतात :)

.

प्रतिक्रिया

मोदक's picture

27 Aug 2012 - 2:01 am | मोदक

पाककृतीचे फटू दिसले नाहीत.. वर्णन दिसले नाही.. धागा वाचला नाही....

:-)

अग्ग्ग्ग्ग्ग्ग!
भारी भारी भारी.
आणखी दहाएक दिवसांत जरा वेळ मिळाल्यावर करून बघीन व कळवीन.
आपली इद्यार्तीनी,
र्‍योती.

कौशी's picture

27 Aug 2012 - 3:31 am | कौशी

करून बघण्यात येईल.

अन्यथा या पाकृ तील फोटु "सेक्सी वाटण्याच्या" लिस्ट मध्ये अ‍ॅडवले असते ...

अर्धवटराव

शुचि's picture

27 Aug 2012 - 4:53 am | शुचि

कसली हसतेय : )

५० फक्त's picture

27 Aug 2012 - 8:26 am | ५० फक्त

धाग्यातल्या फोटोमुळे डोळ्यासमोर अंधारी आल्याने मी 'सेक्सी वाटाण्याच्या ' असे वाचले,... असो.

बाकी पाकृ लई बेक्कार, नशीब आमच्याकडे ओव्हन नाही ते. बाकी ते पिस्ते पहिलाच लावले तर काय जळुन जातील काय ?

मस्त मस्त मस्त!!!! चहाबरोबर (बुडवून) नानकटाई काय भारी लागते.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2012 - 6:09 am | अत्रुप्त आत्मा

फोटुत घुसायचं तंत्र शोधा रे कुणितरी ... ;-)

स्पंदना's picture

27 Aug 2012 - 7:16 am | स्पंदना

आत्म्यान अस विचाराव? मग आम्ही काय कराव? ह्या आजकाल्ची भुतबी काय खरी नाही उरली. काय दम नाही ह्या भुतांच्यात. पुर्वीची कशी एकदम भारी असायची एकदा लागली की संपलच.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2012 - 11:35 am | अत्रुप्त आत्मा

@काय दम नाही ह्या भुतांच्यात. पुर्वीची कशी एकदम भारी असायची एकदा लागली की संपलच.>>> अस व्हय...? कय हे ना...! व्हरच्युअल जगातली लिमिटेशन्स आड येतात,नाय त लागलो अस्तो,हात पाय धुवुन मागे...!

प्रचेतस's picture

27 Aug 2012 - 12:01 pm | प्रचेतस

:)

स्पंदना's picture

27 Aug 2012 - 7:18 am | स्पंदना

ना ना ना न न न क क क टा ईईईईईईई.!

आमची तक्रार आम्हे कोणाकडे नोंदवावी? या पाककृती विभागाने उठलसुठल स्वयंपाक घरात काम वाढताहेत.

प्रचेतस's picture

27 Aug 2012 - 8:29 am | प्रचेतस

खल्लास.

तर्री's picture

27 Aug 2012 - 9:11 am | तर्री

नानकटाई घरी करतात / करू शकतात हाच पहिला धक्का. मग फोटो आणि पाकृ चे आणि दोन सुखद धक्के !
"वाफाळत्या चहाबरोबर सर्व्ह करा " हया वाक्याने धक्क्यातून सावरलो व कल्पनेत हरवलो आहे.

निवेदिता-ताई's picture

27 Aug 2012 - 9:18 am | निवेदिता-ताई

मस्त,मस्त,मस्त........सादरीकरणास १०० पैकी १०० मार्क...

अक्षया's picture

27 Aug 2012 - 2:30 pm | अक्षया

नानकटाई ...मस्त पाककृती आणि फोटो ..:)

मृत्युन्जय's picture

27 Aug 2012 - 10:35 am | मृत्युन्जय

खरे सांगायचे तर नानकटाई घरी करायची ही कल्पनाच फारशी आवडली नाही. बाजारात ती जास्त सहजपणे मिळते. म्हणजे तशी कच्छी दाबेली पण अगदी सहजपणे मिळते. पण ती करायची पाकृ बघुन खुश झालो होतो. तशी ही बघुन काही गंमत वाटली नाही. पण या बाई नक्की काय काय करु शकतात आणि किती निगुतीने करु शकतात हे बघण्यासाठी धागा उघडला आणि कलिजा खल्लास झाला.

असो. तरीही नानकटाई बेकरीतुन आणुनच खाल्ली जाइल. पण पाकृ आणि सजावट उत्तम.

तरीही नानकटाई बेकरीतुन आणुनच खाल्ली जाइल. - तुमच्या घरामागच्या बेकरीत नानकटाई करतात तेंव्हा वास येतो वाट्टं घरापर्यंत.

तिमा's picture

30 Aug 2012 - 10:25 am | तिमा

बाहेरच्या बेकर्‍यांत बर्‍याच ठिकाणी तुपाऐवजी मटन टॅलो (चरबी) वापरतात. शाकाहारी लोकांनी सावध रहावे.

उदय के'सागर's picture

27 Aug 2012 - 11:18 am | उदय के'सागर

-^- कम्माल आहे! एक नंबर...अप्रतिम :)

(बिच्चारे बेकरीवाले... असे तुमच्यासारखे लोक घरी एवढे झकासपैकी पदार्थ बनवायला लागले तर कसं होणार त्या बेकरीवाल्यांचं...)

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2012 - 11:36 am | प्रभाकर पेठकर

मस्तं नानकटाई.

१६व्या शतकात, सुरत मध्ये डच लोकांची कॉलनी होती. तिथे त्यानी त्यांच्या समाजासाठी पाव बनविण्यासाठी बेकरी टाकली. जेंव्हा डच भारत सोडून गेले तेंव्हा त्यांनी ती बेकरी त्यांच्या एका विश्वासू पारशी कर्मचार्‍याला, श्री. फरामजी पेस्तनजी दोतीवाला, ह्याला दिली. त्याने भारतीय चवीला साजेशी बिस्किटे बनवायला सुरुवात केली. डच पावांच्या पाककृतीं मध्ये आवश्यक बदल करून नानकटाई बनविली. 'नान' म्हणजे पाव आणि 'कटाई' (खटाई) म्हणजे त्याला लागणारे सहा जिन्नस अशा मेळातून 'नानखटाई' (किंवा नानकटाई) जन्मास आली. मुंबईच्या गुजराथी समाजाने नानकटाईला स्विकारलं आणि नानकटाईचा भाव वधारला.

- सौजन्य गुगल.

बॅटमॅन's picture

27 Aug 2012 - 12:53 pm | बॅटमॅन

विंट्रेष्टिंग हिष्ट्री!

सुरतमध्ये एका मोठ्या बेकरीचे नाव "दोतीवाला" बेकरी म्हणुन आहे. तो दोतीवाला हाच असेल बहुदा. बाकी हे असले पाकृंचे फोटो पाहुन जबरदस्त भुक लागते. ह्यावर काही उपाय आहे का ?

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2012 - 5:19 pm | प्रभाकर पेठकर

होय. तीच ती प्रसिद्ध बेकरी.

आहाहा !! निर्वाण पावल्या गेलो आहे.

प्रभो's picture

27 Aug 2012 - 11:55 am | प्रभो

आहाहा!!!

मी_आहे_ना's picture

27 Aug 2012 - 12:19 pm | मी_आहे_ना

उगाच तुमचा धागा जेवणा-आधी उघडण्याचा गुन्हा (परत एकदा) झाला... आता भोगतोय!
:(

किसन शिंदे's picture

27 Aug 2012 - 12:30 pm | किसन शिंदे

मग सानिका तै, या बुधवारी तुमची पाककृती ना..! ;)
बाकी तुमच्या पाककृतींवर आम्ही पामर काय बोलणार?

फस्क्लास !!!
या पुढ्यात आल्या तर एका वेळेला अर्धा-एक किलो सहज फस्त करेन. :)

धनुअमिता's picture

27 Aug 2012 - 12:51 pm | धनुअमिता

खुपच छान दिसतायेत. तों पा सू

बॅटमॅन's picture

27 Aug 2012 - 12:53 pm | बॅटमॅन

सानिकातैंच्या घरच्यांचा प्रचंड हेवा वाटतोय :)

पियुशा's picture

27 Aug 2012 - 12:54 pm | पियुशा

यम्मी .................
लाजवाब !!! :)

सस्नेह's picture

27 Aug 2012 - 1:51 pm | सस्नेह

सुरेख पाकृ.
बाजारू बिस्किटांपेक्षा घरी बनवलेली नानकटाई चांगली.
सानिकाजी, २ शंकांचे समाधान कराल का ?
१. मला नानकटाई किंचित गोड आवडते. पण साखरेचे प्रमाण वाढवल्यास ती फुगत नाही.
२. मायक्रोवेव्हमध्ये कोणत्या मोडमध्ये करावी ?

सानिकास्वप्निल's picture

27 Aug 2012 - 2:25 pm | सानिकास्वप्निल

धन्यवाद ताई :)

>>>१. मला नानकटाई किंचित गोड आवडते. पण साखरेचे प्रमाण वाढवल्यास ती फुगत नाही

वरील दिलेले पिठीसाखरेचे प्रमाण हे तसे बरोबर आहे.. अगोड ही नाही किंवा अतिगोड ही नाही :) जास्त गोड आवडत असल्यास १ -२ टीस्पून साखर वाढवावी...

>>>२. मायक्रोवेव्हमध्ये कोणत्या मोडमध्ये करावी ?

मी ह्या ओव्हनमध्ये केल्या ,मायक्रोव्हेव मध्ये कन्व्हेक्शन मोड मध्ये कदाचित करता येतील त्याबद्दल मी पक्के नाही सांगू शकणार

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2012 - 5:15 pm | प्रभाकर पेठकर

मायक्रोव्हेव मध्ये कन्व्हेक्शन मोड मध्ये कदाचित करता येतील त्याबद्दल मी पक्के नाही सांगू शकणार.

बरोबर. कन्व्हेक्शन मोड मध्येच करावी. १८० डि. से. प्री हिटेड ओव्हन मध्ये वर दिल्या प्रमाणे ७ ते८ मिनिटात व्हावी.

सस्नेह's picture

27 Aug 2012 - 9:40 pm | सस्नेह

धन्स पेठकरकाका.
झट्पट नानकटाई होण्यासाठी मायक्रोव्हेव बरा. येत्या रविवारी नक्की करणार !

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2012 - 5:17 pm | प्रभाकर पेठकर

दोनदा झाल्याने (कसा कोण जाणे) हा प्रतिसाद बाद केला आहे.

वाव... तोंडाला पाणी सुटले. मी लहाण असताना रोज सकाळी एक खारी आणि टोस्ट घेउन माणुस यायचा. त्याच्याकडे पण ह्या नानकटाई मिळायच्या. त्याची आठवण झाली हा फोटो बघुन.

मैत्र's picture

27 Aug 2012 - 7:15 pm | मैत्र

नानकटाई इतकी भारी घरी करता येते यावर विश्वास बसत नाही!

ज्यांना हे शक्य नसेल त्यांच्या साठी -- सातारच्या पालेकर बेकरीची नानकटाई झकास आहे. नुकतीच ट्राय केली आहे.
पुण्यात गणराज हॉटेलच्या समोरच्या गल्ली मध्ये त्यांचं दुकान आहे तिथे मिळते. इतकी उत्तम क्वालिटी विकतच्या नानकटाई मध्ये कधी मिळाली नाही. योगायोगाने त्यांच्या मूळ मालकांशी बोलल्यानंतर त्याचं कारण वापरल्या जाणार्‍या पदार्थांच्या दर्जामध्ये आहे असं कळलं.

पेठकर काका -- त्यांनी खटाई चा संदर्भ खट्टा याच्याशी सांगितला आणि गुजरात मध्ये ते दही घालतात असं सांगितलं.

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2012 - 8:55 pm | प्रभाकर पेठकर

खटाईचा एक अर्थ आंबट असा आहे. हे खरे आहे. पण, इथे 'खटाई' शब्द वेगळ्या अर्थाने वापरला आहे.

गुगलवर नानकटाई (नान खटाई) शोधल्यास नानखटाईचा इतिहास वाचावयास मिळतो. तिथे खटाई ह्या पर्शियन भाषेतील शब्दाचा अर्थ 'चीन मधील (पाव)' असा दिला आहे तसेच पर्शियन भाषेनुसारच 'खटाई' म्हणजे सहा जिन्नस वापरून केलेला पाव असाही आहे. हेच नांव नानखटाई ह्या 'कुकीज'ना ही वापरले गेले. ही सोळाव्या शतकातील पाककृती आहे.

संदर्भः
In the 16th century, the Dutch explorers came to India for setting up posts for trading spices in India.Surat was a highly occupied city then .So they started a bakery in Surat for making breads for their consumption .The bakery had five parsee employees.When the Dutch left India,they handed over the bakery to one of its trusted employees named 'Mr.Faramji Pestonji Dotivala'.And soon the bakery became 'Dotivala Bakery' .

The name Nan Khatai has been attributed to the Persian for “Bread of Cathay” (Nan, which means bread in Persian, Khatai which means from Cathay or China) as well as Persian for “Bread made with six ingredients”

प्रास's picture

2 Sep 2012 - 10:21 am | प्रास

भारतीय भाषांमध्ये 'ष' चा उच्चार अनेकदा 'ख' करतात. वरती पाककृतीत सहा घटकांचा उल्लेख आहे, तेव्हा षट् --> षटाई --> खटाई झालं असावं का, असा विचार करतोय.

बाकी, (नेहमीप्रमाणे) हा धागा पाहिला. तूर्तास....

जाई.'s picture

27 Aug 2012 - 9:04 pm | जाई.

मस्त!!!

हे फोटो म्हणायचे की काय? मस्त आहे! कृती सोपी वाटतेय. केली तर समजेल किती सोपी/कठीण आहे ती!

सुहास झेले's picture

27 Aug 2012 - 9:28 pm | सुहास झेले

धाग्याची नोंद घेतली आहे .... ;-)

प्रतिक्रिया देण्यासाठी शब्दांची कमतरता जाणवतेय.....लगे रहो :) :)

खूप दिवसांपूर्वी खाल्लेल्या नानकटाईची (आणि ती आवर्जून आणणार्‍या वडिलांची!) आठवण करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद! आजच करून पहाणार!

@मैत्रः दही घालतात असं मीही ऐकलं होतं, पण या पाककृतीत ते घातलं नसावं याचं कारण म्हणजे बेकिंग सोड्याऐवजी बेकिंग पावडर वापरली आहे, हे असावं असं वाटतं, (बेकिंग सोडा= सोडियम बाय कार्बोनेट, हा घातल्यावर acidifying agent [दही वगैरे] आणि drying agent [starch] घालावे लागतात, बेकिंग पावडर मध्ये सोडियम बाय कार्बोनेटच्या जोडीने हे आधीच घातलेले असतात.) चूक-बरोबर सानिकाताई/पेठकर साहेब सांगतीलच :-) .

प्रभाकर पेठकर's picture

28 Aug 2012 - 12:47 am | प्रभाकर पेठकर

(बेकिंग सोडा= सोडियम बाय कार्बोनेट, हा घातल्यावर acidifying agent [दही वगैरे] आणि drying agent [starch] घालावे लागतात, बेकिंग पावडर मध्ये सोडियम बाय कार्बोनेटच्या जोडीने हे आधीच घातलेले असतात.)

बरोबर आहे. जे पीठ आंबविले असते किंवा ज्यात कांही आंबट जिन्नस मिसळलेला असतो त्यात नुसता सोडा वापरतात (सोडियम बाय कार्बोनेट) आणि ज्यात कुठला आंबट जिन्नस नसतो त्यात बेकिंग पावडर वापरतात. बेकिंग पावडर हे सोडियम बाय कार्बोनेट+टारटारिक अ‍ॅसिड्+स्टार्च ह्याचे मिश्रण असते. अ‍ॅसिडिक बेस मध्ये कार्बन निर्मितीचे कार्य जास्त चांगले होते जेणेकरून पदार्थ फुगण्यास, त्यात जाळी पडण्यात मदत होते.

फॅरनहाईटस मध्ये ते ३५६ डिग्री होतं हे नमूद करू इच्छितो! (आवडली म्हणून लगेच पाककृती करून पहाण्याची हौस, म्हणून हे स्वानुभवाने लक्षात आलं :-) )

कच्ची कैरी's picture

28 Aug 2012 - 3:11 pm | कच्ची कैरी

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट !!!!!

चिगो's picture

28 Aug 2012 - 3:48 pm | चिगो

सानिकातै, नेहमीप्रमाणेच उत्तम.. पाकृ बघून खपलो मी..

सुमीत भातखंडे's picture

28 Aug 2012 - 11:09 pm | सुमीत भातखंडे

आई शप्पथ...जबरा

सानिकाताई खूपच छान आणि सोपी पाककृती. कालच करून बघितली, चव एकदम परफेक्ट आलीये. फक्त मी नीट फेटला नाही साखर आणि बटर बहुतेक त्यामुळे गुड डे च्या बिस्कीट सारखी झालीये :प. धन्यवाद.

कॉमन मॅन's picture

29 Aug 2012 - 12:59 pm | कॉमन मॅन

अतिशय देखेणी नानकटाई.. आभारी आहे..

मदनबाण's picture

2 Sep 2012 - 10:10 am | मदनबाण

वॉव... :)

प्यारे१'s picture

2 Sep 2012 - 6:45 pm | प्यारे१

मत्तच....!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

4 Sep 2012 - 12:08 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

आहाहा......! दुपारची वामकुक्षी नंतरचा मस्त कडक मगफुल ऑफ चहा + आणि नानकटाई नावाचा सिन्(एस आय एन वाचावे) आणि माझा कोपरा.....
मस्त रेसिपी... मस्ट ट्राय!

इरसाल's picture

4 Sep 2012 - 1:16 pm | इरसाल

बुडवुन काय लागते नान-कटाई.
मस्त भिजलेला पिठुळ गोडसर स्वाद जीभेवर नुसता रेंगाळत रहातो.

tushargugale's picture

5 Jan 2016 - 7:47 pm | tushargugale

Yasathi oven konata vaparala