आगीत तेल ओतणारी नवीन घटना घडली आहे. इस्लामी देशांची पुन्हा आगळीक जगासमोर आली. म्हणून त्यातून जग धडा घेणार नसला तरी आपण घ्यायला हवा आहे.
सध्या भारतभर चालू असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या बातमीची गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. सरकार पातळीवर किती दखल घेतली जाईल माहीत नाही. पण सामान्य नागरीकांना याची जाणीव म्हणून हा प्रपंच.
या बातमीची प्रसार माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. काही मोजक्याच वर्तमानपत्रात ती छापून आली आहे. वृत्तवाहीन्यांनी दखल घेतली असे वाटत नाही.
बातमी अशी आहे.
जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या पाकिस्तानच्या कारस्थानाला इस्लामी देशांची फूस मिळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जगभरातील मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ' ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामीक कंट्रीज ' च्या (ओआयसी) नुकत्याच मक्का येथे झालेल्या शिखर परिषदेत जम्मू-काश्मीरचा उल्लेख स्वतंत्र देश असा करून या देशांनी आपला भारतविरोध दाखवून दिला असून , त्यांच्या या उल्लेखाला भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.
(भारताने नेहमीप्रमाणे तिव्र निषेध व्यक्त केल आहे.)
सवीस्तर बातमी येथे वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15534791.cms
म.टा.च्या कालच्या छापील अंकात अजून मजकूर आहे. तो असा.
"ओ.आय.सि."च्या शिखर परीषदेत जगभरातीतल मुस्लीम राष्ट्रांना त्यांच्या संघर्षात पाठिंबा देण्यासाठी 'सॉलिडिटरी विथ अदर मेंबर स्टेटस' या ठरावा अंतर्गत जम्मू-काश्मीरचा उल्लेख करण्यात आला आहे. 'सोमालिया, सुदान, अफगाणिस्तान, जम्मू-काश्मीर, इराक, येमेन, आयव्हरी कोस्ट, युनियन ऑफ कॉमोरॉस आणि तुर्कीश-सायप्रस गणराज्यातील नागरिकांना त्यांच्या लढ्यात पाठिंबा देण्यासाठी 'ओ.आय.सि.' त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील' असे म्हणले आहे.
प्रतिक्रिया
20 Aug 2012 - 12:29 am | अर्धवटराव
घरचं झालं थोडं अन व्याह्यानं धाडलं घोडं...
आधि देशवासीयांना रोजीरोटीच्या झगड्यात आकंठ गुंतवुन ठेवायचं , मग असुरक्षीततेचा धाक निर्माण करायचा, वरुन काश्मिर वगैरे मसल्यांवर फाजील पुरोगामित्व मिरवण्यार्या व्यक्तींना/आंतरजालीय विद्वानांचं मुक्त कौतुक करायचं ... अशा छान छान वातावरणात देशाचा सामान्य नागरीक काय विचार करणार काश्मिर वगैरे मुद्द्यांचा... झालं मग.. सरकार निषेध व्यक्त करायला मोकळं.
अर्धवटराव
20 Aug 2012 - 7:22 am | चौकटराजा
एक सरदारजी काही वर्षापूर्वी माझ्या ऑफिसात आला होता. पुण्यात वाढलेला व उत्तम मराठी बोलणारा.
त्याशी खलीस्त्नानची मागणी याविषयी बोलणे निघाले त्यावेळी तो म्हणाला ही मागणी १९४७ साली केली असती तर ती योग्य होती. म्हणजे त्यावेळी पूर्वेस भारतीय सैन्य व पश्चिमेस पाक सैन्य हा गुंता सोडवत त्या राष्ट्राला दिवस काढावे लागले असते. आता भारतातील बरेचसे रिसोर्सेस वापरल्यानंतर या मागणीला
काही अर्थ नाही.
वल्ल्ल्भभाई पटेलाना त्याचे वेळी हरिसिंगाने निक्षून सांगितले असते की आम्ही स्वतंत्रपणे राहू तर त्या
मागणीला काहीतरी अर्थ होता. सरदारजीच्या खलिस्थान च्या मागणी सारखाच . आता काश्मीर हे भारताचे
नाही असे म्हणण्याला काही अर्थ नाही.
20 Aug 2012 - 9:21 am | मदनबाण
जाउदे हो... आपल जिवन सुरळीत चालु आहे ना ! मग कशाला चिंता करा ?
शब्दछल करणार्या मंडळींना असे धागे काढुन वारंवार संधी दिल्याबद्दल तुमचे अभिनंदन. ;)
20 Aug 2012 - 10:32 am | नितिन थत्ते
१९४७ च्या ऑक्टोबरपासून २०१२ च्या २० ऑगस्टपर्यंत परदेशातील संघटना/लोक काय म्हणतात यावर अवलंबून भारत सरकारने आपले काश्मीरविषयक धोरण/कृती ठरवले/बदलले आहे असे उदाहरण कोणी देईल काय?
मला वाटते कधीच नाही. तेव्हा परदेशी संघटना काय म्हणतात यावर "किरकिर" कशाला करायची?
20 Aug 2012 - 11:19 am | चिंतामणी
:o
तुमच्यासारख्या विचारवंताकडून अश्या प्रकारची प्रतिक्रीया अपेक्षीत नसली तरी अगदीच धक्कादायक नाही. आश्चर्य जरूर वाटले.
सध्या भारतभर चालू असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या बातमीची गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. सरकार पातळीवर किती दखल घेतली जाईल माहीत नाही. पण सामान्य नागरीकांना याची जाणीव म्हणून हा प्रपंच केला आहे.
काश्मीर पाठोपाठ केरळ आण आसाम तीच वाट चालत आहेत असे दिसत आहे. तेथील गोष्टींचा फायदा घेउन इतरत्र अशांतता माजवून भारताच्या वाटचालीला खीळ घालण्याचे काम ज्या प्रवृत्ती करीत आहेत आणि त्यांना मदत करणारे कोण आहेत हे सगळ्यांना समजावे आणि थोडाफार अवेअरनेस वाढवावा यासाठी हा प्रयत्न आहे.
बाकी "काश्मीर" प्रश्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेउन त्याचा विचका करणारे आहेत हे मी सांगायची गरज नाही.
20 Aug 2012 - 2:57 pm | नितिन थत्ते
माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.
20 Aug 2012 - 5:44 pm | मदनबाण
तुमच्यासारख्या विचारवंताकडून अश्या प्रकारची प्रतिक्रीया अपेक्षीत नसली तरी अगदीच धक्कादायक नाही. आश्चर्य जरूर वाटले.
प्रतिसादातले हे वाक्य आवडले आणि प्रतिसाद द्यायची पद्धत सुद्धा ! ;)
20 Aug 2012 - 5:02 pm | विकास
मला वाटते नितिन यांना म्हणायचे आहे, की जे काही भारतसरकारने काश्मीरसंदर्भात केले त्याला भारतसरकार आणि त्यात असलेले राजकीय नेतृत्व जबाबदार आहे, परदेशातील संघटना/लोक जबाबदार नाहीत.
20 Aug 2012 - 6:50 pm | नितिन थत्ते
माझ्या प्रतिसादाचा विपर्यास नको !!!!
मला म्हणायचं आहे की परदेशातले लोक काय म्हणतात याला भारताने नेहमीच (अगदी काश्मीर प्रश्नाला युनोत नेणार्यांनीसुद्धा) फाट्यावरच मारलेले आहे.
20 Aug 2012 - 7:05 pm | विकास
खुलाशाबद्दल धन्यवाद. :-)
मात्र काश्मीर प्रश्न चिघळत राहीला आहे आणि देशाच्या सीमेस त्यावरून घोका आहे, हे देखील वास्तव आहे. अर्थात हे आपल्यास मान्य नसेल तर मुद्दा वेगळा आहे... पण जर प्रश्न चिघळतच गेला असेल असे वाटत असेल तर त्याला बाकी कोणी नाही तर आपलेच सरकार जबाबदार आहे असे वाटत नाही का?
21 Aug 2012 - 12:05 pm | रणजित चितळे
अगदी बरोबर. ठरवलेले नाही व नाही ठरवले ते अगदी बरोबरच आहे.
सार्वभौम राष्ट्र ह्यालाच म्हणतात - सहमत आपल्याशी
पण त्याच बरोबर
अवांतर असेल म्हणा व आपल्या प्रतिसादाला हे उत्तर नाही किंवा प्रतिसादा विरुद्ध नाही फक्त लिहिता लिहिता सुचले म्हणून येथे उतरवले -
प्रत्येक हल्या नंतर (मग तो सायबर हल्ला असो, ताज वर झालेला असो किंवा अजून कोठचा) आपण सबळ पुरावा देतो. मग पाकिस्तानी लोक तो अमान्य करतात. मग आपण अजून एक दोन डोजीयर देतो. तो ते धिक्कारतात. हे असे कोठवर चालायचे. शिंदे साहेब दिसायला पण मुळमूळीत (हे अगदी माझ्या कडून फारच झाले - पण मला वाटते की थोडी ईमेज मॅनेजमेंट बॉडी लॅन्ग्वेज ह्या कडे ध्यान दिले पाहिजे जरा रफ अॅन्ड टफ ..) व त्यांचे ते परराष्ट्र मंत्र्यांशी बोलणेही मुळमुळीत. जरा ताठर भूमीका घेऊन ह्या रमझानला जेव्हा विश करायला मल्लीक साहेबांनी फोन केला तेव्हा तो रागवून घ्यायला नको होता वगैरे वगैरे) त्यांनी लाथा पण मारायच्या व त्यांनीच फोन करुन रमझान साठी विश करायचे व मोठेपण मिरवून घ्यायचे हे जरा जास्तच झाले.
21 Aug 2012 - 12:34 pm | मृत्युन्जय
अगदीच अमान्य.
कुठलीही परदेशी संस्था / संघटना / देश जेव्हा असे कुठलेही विधान करते तेव्हा ते देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान असते. तत्सम संस्था / संघटना / देश काय म्हणते हे आपले धोरण ठरवण्यासाठी विचारात घेण्याची काहिच गरज नाही. परंतु अश्या वक्तव्यांन वेळीच पाचर मारणे योग्य असते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावायला नको त्यातलाच प्रकार.
कुठलीही भूमी बळकावण्याची प्रक्रिया ही अशीच असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या माध्यमांतुन अश्या प्रकारे पाठिंबा जमवला जातो. याबाबत आपली निष्क्रियता काही काळाने आपल्या विरोधातच जाते. वेळीचे निषेध नोंदवुन "रेकॉर्ड" तयार करणे महत्वाचे आहे. आपली निष्क्रियता किंवा आपले मौन हे आपल्या विरोधात जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे.
हा आता कुणाच्या वक्तव्याल किंवा दुजोर्याला किती किंमत द्यायची हे आपण ठरवले पाहिजे असे तुम्हाला म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी.
17 Aug 2013 - 9:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
आक्रित आहे. बर्याच्दा खुप समतोल प्र्तीसाद देनारि मानसं कायबाय म्ह्नाली कि कायबाय वाटतय बगा !
बराबर हाय तुमच "आता तर गळु आहे त्याचा केन्सर होउ द्या. मग बघू. आताच काय येड्यासार्कि काळजी करायचि? आदिच कोलगेटच्या फायली गायब करायला आनि जावयबापूची लफडि निस्तरयला येळ पुरत नाय. त्यात हेच्यात काय फुक्काट येळ दवडायचा?" खर्का का नाय???
19 Aug 2013 - 1:04 pm | अनिरुद्ध प
सहमत
20 Aug 2012 - 11:13 am | मृत्युन्जय
काश्मीर स्वतंत्र देश? काहितरीच कांगावा हा? भारतपुरस्कृत कांगावा असावा अशी दाट शंका आहे. पाकिस्तानने यावर लिखित आक्षेप घ्यावा. मी तर एवढे दिवस समजत होतो काश्मीर पाकिस्तानचाच भाग आहे. फक्त भारतीयांना तिथे विजा न घेता जाता येते एवढेच.
20 Aug 2012 - 1:50 pm | नाना चेंगट
हं... हल्ली भारतातील दृकश्राव्य माध्यमातूनच भारतातून आसामींचे आसामात स्थलांतर अशा बातम्या येत आहेत त्यामुळे विशेष काही वाटले नाही.
20 Aug 2012 - 3:07 pm | सस्नेह
करू देत्..करू देत कलकलाट..
केला कलकलाट किति जरी काकांनी..
नेली मुक्ता ती राजहंसांनी...
काश्मीर तर भारताचेच आहे.
20 Aug 2012 - 5:36 pm | वेताळ
चालायचे..........
21 Aug 2012 - 12:49 pm | प्रदीप
वर इथे सविस्तर, व माहितीपूर्ण चर्चा दोन वर्षांपूर्वी झालेली होती, अभ्यासूंनी ती जरूर डोळ्याखालून घालावी.
21 Aug 2012 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार
' ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामीक कंट्रीज 'च्या उल्लेखात चुक काय आहे ते समजले नाही.
कागदोपत्री किंवा घोषीत नसला, तरी जम्मू-काश्मीर ह्या भागातले बहुसंख्य नागरीक हे स्वतंत्र देश असल्याच्या थाटातच वागत असतात. तिथल्या मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना अगदी अतिरेकी संघटनांना देखील एखाद्या दुसर्या देशाचे प्रमुख असल्यासारखीच तर वागणूक मिळत असते की. तिथे भारताचा झेंडा फडकवायला देखील सरकारी अनुमती लागत असते.
23 Aug 2012 - 11:39 am | संपत
बाहेरचे देश काय म्हणतात त्यापेक्षा काश्मीरच्या लोकांना काय वाटते हे जास्त चिंतेचे आहे. व्यक्तिगत अनुभव घेतला आहे कि काश्मिरी जनता 'भारता'तून आलेल्या पर्यटकांचे प्रेमाने स्वागत करते आणि तसे वारंवार बोलून दाखवते.
23 Aug 2012 - 12:13 pm | पुण्याचे वटवाघूळ
याचे कारण त्यांचा रोजगार हा पर्यटकांवर अवलंबून आहे. ते भारतातूनच नव्हे तर जगाच्या पाठीवरून कुठूनही आलेल्या पर्यटकांचे असेच स्वागत करतील. तेव्हा तुमचा नक्की मुद्दा काय ते कळला नाही.
23 Aug 2012 - 2:15 pm | संपत
माझा मुद्दा हा होता कि ते 'तुम्ही भारतीय' पर्यटक किती चांगले आहेत ते निरागसतेने सांगत असतात.. जणू काही काश्मीर भारतात आहे याची त्यांना कल्पनाच नाही.. आणि हे एक दोन ठिकाणी नाही तर सर्वत्र हाच अनुभव येतो..
23 Aug 2012 - 2:19 pm | मृत्युन्जय
एग्झॅक्टली.
ते बोलताना नेहमीचे स्वतःचा उल्लेख काश्मिरी आणी आपला उल्लेख हिंदुस्तानी असा करतात.
महाराष्ट्रात युपीतुन एखादा माणूस आला तर आपण स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणु पण समोरच्याला हिंदुस्तानी न म्हणता युपीवाला म्हणु. फरक आहे.
याबाबतीत अनेक अनुभव शेयर करु शकेन. काश्मिरी मुसलमान स्वतःला भारतीय समजत नाहित हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
23 Aug 2012 - 6:21 pm | राही
ते स्वतःला भारतीय समजत नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे खरे. पण त्यांनी स्वतःला भारतीय समजावे यासाठी काय करावे/केले जाऊ शकते? त्यांनी स्रिनगरमध्ये १५ ऑगस्टला भारतीय ध्वज स्वतःहून फडकवावा, (दिल्लीहून पूर्ण सैनिकी बंदोबस्तात चार टाळक्यांनी तिथे जाऊन नव्हे) या साठी काय करावे? सध्याचे,तात्कालिक उपाय काय असू शकतात?
23 Aug 2012 - 7:00 pm | विकास
सत्यमेव जयतेच्या शेवटच्या भागातली ही केस स्टडी आठवली...
17 Aug 2013 - 9:13 pm | आशु जोग
किश्तवाडमधे झालेल्या घटना कानावर पडत होत्या. वर्तमानपत्रात त्याची तपशीलवार माहिती मिळत नव्हती. वर्तमानपत्रे बरेच फिल्टर्स लावून बातम्या छापतात.
त्याचवेळी इंटरनेटवर हे पेज सापडले.
facebook[डॉट]com/JammuKashmirNow
बर्यापैकी अपडेट्स आहेत.
17 Aug 2013 - 10:49 pm | श्रीगुरुजी
नेहरूंनी १९४७ साली काश्मिर प्रश्नात माऊंटबॅटनच्या सल्ल्याने इतकी घट्ट पाचर मारून ठेवली की त्यात शेपटी पूर्ण अडकून जीव जायची वेळ आली आहे. आता ती पाचर निघता निघत नाहीय्ये आणि जोर लावून काढायचा प्रयत्न केला तर शेपूट तुटणार. नेहरूंनी निव्वळ काश्मिर प्रश्नावरच नाही तर घटना, धर्माधिष्ठित वेगळे कायदे, चीनसमोर मानहानी अशा अनेक पाचरी घट्ट मारून ठेवल्या की ज्याचे परिणाम ६०-६५ वर्षांनंतर सुद्धा भारत भोगत आहे.
17 Aug 2013 - 10:58 pm | धर्मराजमुटके
डिटेलमधे वाचायला आवडेल. नाही म्हणजे गोष्टीतल्या माकडासारखी मुर्खपणामुळे मारली की मुद्दाम अशा अर्थाने !
19 Aug 2013 - 11:58 am | नानबा
हा लेख वाचला आणि एक आठवण ताजी झाली.
४-५ दिवसांपूर्वी मिपावरल्या कुठल्याशा लेखावर दिलेल्या प्रतिक्रियेत टाकण्यासाठी स्माईली धुंडाळायला http://www.sherv.net/emoticons.html या साईटवर गेलो. तिकडे "country emoticons" या भागात सहज भारताचा झेंडा शोधताना flag of jammu kashmir दिसला आणि अचंबित झालो.
जम्मू काश्मीरला जगात स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळखलं जाणं हा आपल्या सहिष्णू (किंवा लपूट) आंतरराष्ट्रीय धोरणाचा अपमान म्हणावा की आपण काश्मीरी लोकांकडे सापत्न बघण्याचा परिणाम??
19 Aug 2013 - 12:11 pm | दादा कोंडके
भारताचा नकाशा म्हणजेच एक विनोद आहे. पण वरती थत्ते चचांनी म्हटल्यासरखं, काय फरक पडतो? आपण वाळूत मान घुपसून बसायचं. :)
19 Aug 2013 - 12:17 pm | मृत्युन्जय
आपण काश्मीरी लोकांकडे सापत्न बघण्याचा परिणाम?
म्हणजे नक्की कसे हे समजुन घ्यायला आवडेल. जम्मु काश्मीरला एक वेगळा स्वायत्त दर्जा आहे हे तर सर्वांना ज्ञात आहेच. भारतातील इतर जनतेला काश्मीरमध्ये स्थावर मालमत्ता तयार करता येत नाही. शिवाय भारतीय जनतेला पाकिस्तानात नव्याने उद्योगधंदे सुरु करायलाही अडथळे आहेत. काश्मीरी जनता मात्र भारतात कुठेही मालमत्ता विकत घेउ शकते किंवा व्यवसाय करु शकते. याला सापत्न वागणूक म्हणावे काय?
काश्मीरला दिलेल्या विशेष द्दर्जामुळे इतरांनी तिथे उद्योगधंदे करता येत नसतील तर तो इतर भारतीय जनतेचा दोष मानता येइल काय?
काश्मीरात दारिद्र्य आहे. पण दारिद्र्य नसलेले भारतीय राज्य दाखवता येइल काय? महाराष्ट्रात मेळघाटात उपासमारीने मरणारे शेकडो - हजारो लोक आहेत. गरीब शेतकर्याची कर्जाच्या बोझ्याखाली किंवा दारिद्र्याला कंटाळुन केलेली आत्महत्या लोकांना नविन नाही. अश्या परिस्थितीत अन्याय झाला हो चा टाहो फोडुन या सर्वांनी देशाविरुद्ध बंड पुकारावे काय किंवा आपल्याला सापत्न वागणुक दिल्याचा कांगावा करावा काय?
काश्मीरमधला दहशतवाद पाक पुरस्कृत आहे असे म्हणतात. पण ज्या मोठ्या प्रमाणावर तिथे भारतविरोधी कारवाया होतात ते बघता तिथे स्थाबिक जनतेचा त्यांना पाठिंबा नाही असे म्हणता येइल काय? राजरोसपणे पाकिस्तानचा झेंडा फडकावणे, भारताचा झेंडा जाळणे, लष्कर आणि सरकारी इमारतींवर हल्ले आणी दगडफेक करणे, भारतविरोधी कारवाया करणे, फुटीरतावाद्दी कारवाया करणे हे सर्व केवळ दहशतवादी करताता काय? यात सामान्य काश्मीरी जनतेचा सहभाग अजिबात नाही काय?
खरे सांगायचे तर विशिष्ट धर्माचा अनुनय करण्यात सरकार इतके वाहवत गेले आहे की आता परिस्थिती आटोक्याबाहेर गेलेली आहे. इथे काश्मीरी जनतेला भारताने काहिही सापत्न वागणुक दिलेली नाही. त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला आहे, त्याच्यावर उपचार करायला ते तयार नाहित आणि निसर्गनिर्मीत धोंडा काश्मीरात आला (जो त्यांनी स्वतःच मारुन घेतला) याबद्दल भारतीय सरकार आणी लष्करावर आरोप करण्यात येत आहे.
19 Aug 2013 - 12:49 pm | श्रीगुरुजी
>>> तिकडे "country emoticons" या भागात सहज भारताचा झेंडा शोधताना flag of jammu kashmir दिसला आणि अचंबित झालो.
यात अचंबित होण्यासारखे काहीच नाही. १९४८ पासून जम्मू-काश्मिर हा जवळपास एक वेगळा देशच आहे. भारताने त्या राज्यात गेल्या ६५ वर्षात हजारो कोटी रूपये ओतले आहेत. त्या बदल्यात त्या राज्याकडून भारताला फारसे काही मिळालेले नाही. उलट सतत भारतविरोधी कारवाया, युद्ध, अतिरेकी हल्ल्यांना प्रोत्साहन इ. मुळे एक कायमस्वरूपी डोकेदुखी निर्माण झाली आहे. भारताचे बरेचसे कायदे काश्मिरला लागू होत नाही. त्या राज्यासाठी वेगळा ध्वज आहे व तिथे पूर्वी मुख्यमंत्र्याला पंतप्रधान असे म्हटले जात होते. नेहरूंनी देशांतर्गत एक वेगळा देश निर्माण करून एक कायमस्वरूपी समस्या निर्माण केली. त्यांच्या असंख्य गंभीर घोडचुकांपैकी ही एक गंभीर घोडचूक.
19 Aug 2013 - 1:05 pm | अनिरुद्ध प
सहमत
19 Aug 2013 - 4:30 pm | नानबा
खरंय.. सहमत..
19 Aug 2013 - 2:24 pm | प्रसाद१९७१
काश्मिर वेगळाच देश आहे ह्यात काही वाद च नाही. भारतानी जबरदस्ती ने दाबुन ठेवला आहे सैन्याच्या जोरावर.
जम्मु कदाचित भारताचा भाग होऊ शकतो.
19 Aug 2013 - 4:35 pm | आशु जोग
http://timesofindia.indiatimes.com/opinions/21806017.cms