जुने तेच सोने की----
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वाईट व चांगला काळ येत असतो किंवा जात असतो
साधारण पणे सन १९६० ते २००० या काळात मी अनेक चांगल्या गोष्टी वाचल्या,लिहिल्या व पाहिल्या,त्या काळी वाचलेल्या काही मराठी कादंबर्या- ययाती , म्रुतुंजय, छावा,असा मी असा मी,अपुर्वाई,राजा शिव छ्त्रपती,
श्री.बाबुराव अर्नाळ्कर रहस्य कथा,
रेडिओ-आकाश् वाणी पुणे - पुन्हा प्रपंच्,असा आमचा गाव्,युवावाणी,
रेडिओ सिलोन -ओवल टीन के साथी-हमीद सयानी,बिनाका गीत् माला-अमिन सयानी
दुरदशन वर पाहिलेल्या काही मालीका-(हिंदी) आलीफ लैला,अकबर द ग्रेट,बुनियाद,चंद्रकाता,रामायण्,व्योमकेश बक्शी,महाभारत्,भारत एक खोज्,मालगुडी डेज्,सर्क् स
पण २००० नंतर दुरदर्शन च्या वाहिन्या खाजगी पण झाल्या तेव्हापासुन टी व्ही पाहाणे सोडुन दिले आहे
या मालिका,रेडीओ कार्य क्रम वा पुस्तके तुम्हाला आठवतात काय? या यादीत काही राहीले काय?
मला वाट्ते जुने तेच सोने असे म्हट्ले जाते हेच खरे --
जुने तेच सोने की --
गाभा:
प्रतिक्रिया
20 Aug 2012 - 1:15 pm | अशोक पतिल
शाळेत शिकत असतांना मी त्या वेळी दक्षता हे पोलिस कार्यावरील , घडलेल्या अपराध घटनांवरील मासीक वाचत असे . ते माझे खुप आवडते मासिक होते . तसेच किशोर मासिक सुध्दा खुप आवडायचे . बाबुराव अर्नाळकर, बाबा कदम हेही आवडते लेखक होते.
20 Aug 2012 - 8:52 pm | आचारी
उडान , फौजी ,नुक्कड , चित्रहार, छयागीत, परमवीर,
20 Aug 2012 - 8:53 pm | शकु गोवेकर
आणखी काही गोष्टी आठ्वणीत आहेत्-
साप्ताहिके -पुणे येथुन निघणारी-स्वरा़ज्य
मराठी साप्ताहिके-गाव करी (नाशिक) श्री साप्ताहिक्(ललिता भुत्ता संपादिका,मुंबई) रसरंग
हिन्दी-धर्म युग, नव् नीत डायजेष्ट
ईग्रजी-द ईलेस्टेटेड विक् ली ओफ ईडीया
रेडिओ-क्रिकेट विथ विजय मर्चन्ट्,क्रिकेट विथ बोबी तल्यारखान्,आल ईडिया रेडिओ-रात्री १२ते सकाळी ६ पर्यत पुराने गीत
श्री.बाबुराव अर्नाळ्कर व श्री.श्रीकांत सिनकर रहस्यकथा व नारायण धारप गुढ्कथा
21 Aug 2012 - 10:36 am | तिमा
साप्ताहिके -पुणे येथुन निघणारी-स्वरा़ज्य
ग. वा. बेहेर्यांच्या 'सोबत' च्या आधी तुम्हाला 'स्वराज्य' आठवते ? असो. असते एखाद्याची आवड.
बाकी 'जुने तेच सोने', या मताशी मी सहमत नाही.
21 Aug 2012 - 12:39 pm | प्रदीप
'माणूस' व 'मनोहर' च्याही आधी तुम्हाला 'सोबत' आठवले?
हेच म्हणतो.
20 Aug 2012 - 9:00 pm | टवाळ कार्टा
चंपक आणि ठकठक ;)
20 Aug 2012 - 9:25 pm | मराठी_माणूस
अमृत आणि विचित्र विश्व मासिक
20 Aug 2012 - 9:59 pm | बहुगुणी
ऑल इंडिया रेडिओ वरचा सकाळी ११ची 'कामगार सभा' कार्यक्रम, विविध भारती रेडिओ वरचे संध्याकाळी ७ चा जयमाला, रात्री १० चं छायागीत, मला वाटतं १०.३० चा 'आप की फर्माईश' कार्यक्रम, रात्री ११चा बेला के फूल वगैरे गाण्यांचे कार्यक्रम, दूरदर्शनवरच्या हम लोग, यही है ज़िंदगी वगैरे मालिका....न संपणारी यादी आहे!
(......रेडिओवर गाण्यांच्या फर्माईशी करणार्यांमध्ये 'झुमरीतलैयासे...' हमखास असायचे :-) )
20 Aug 2012 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा
+१
21 Aug 2012 - 1:21 am | शकु गोवेकर
पुण्यात मे महिन्यात होणारी वसंत व्याख्यान माला श्रवणिय तसेच जंगली महाराज मंदिरात ऐकलेले प्रा.डा.शिवाजीराव भोसले,कुलगुरु,शिवाजी विद्यापिठ यांची स्वामी विवेकानंदावरिल व्याखाने,मा.अटलबिहारी वाजपेयी यांचे अलका टाकीज
चोकातील भाषण्,कर्तार सिंग थत्ते व प्र्.वा.जोग यांची शनवार वाड्यावरील भाषणे,स्.प्.कालेज मैदानावरील मोहन धारिया व नेहरु स्टेडियम वरिल ईदिंरा गान्धी याचे भाषण --
21 Aug 2012 - 12:42 pm | प्रदीप
ह्या कमोडिटीचा भाव गेल्या दशकात वर गेला असला, तरी ते आपण जोंवर विकत नाही, तोंवर 'नोशनल'च फायदा आहे म्हणायचा.
आणि ह्या सगळ्याच कमोडिटीज खतरनाक असतात, अगदी प्रचंड व्होलटिलिटी असते त्यांच्या भावांत. तेव्हा त्यांपासून माझ्यासारख्या सामान्य माणसाने दूरच राहिलेले बरे.
21 Aug 2012 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार
सन २००० ते २०१२ हा काळ पृथ्वीवरील लोकांसाठी सुखाचा होता. मग २०१२ साली तुम्ही परत लिहायला लागलात.
21 Aug 2012 - 2:04 pm | पुण्याचे वटवाघूळ
"जुने तेच सोने की...." या टायटलवरून आपल्या जुन्या गोष्टी कशा चांगल्या आणि पाश्चिमात्यांचे अंधानुकरण कसे वाईट अशा स्वरूपाचा मजकूर असेल आणि त्यातून आणखी एक द्विशतकी धागा निघेल असे वाटून पॉपकॉर्न आणले पण होते. पण वेगळाच मजकूर बघून थोडी निराशाच झाली बघा.
21 Aug 2012 - 2:05 pm | पुण्याचे वटवाघूळ
बाकी जुन्यातले चांगले म्हणाल तर सत्यकथा नावाच्या मराठी मासिकात वेगवेगळ्या लेखकांचे चांगले लेख येत असत. ९वी-१०वी ला मराठीतले बरेच धडे हे याच मासिकात प्रकाशित झालेले लेख होते. १९७८-७९ मध्ये ते मासिक बंद पडले. त्यावेळी मी लहान होतो आणि हे मासिक वाचनात आले नव्हते. पण नंतर मराठीतले धडे वाचल्यावर हे मासिक वाचायची उत्सुकता वाढली. एका परिचिताकडून सत्यकथाचे काही जुने अंक नागपूरात जरीपटका लायब्ररीत आहेत हे समजल्यानंतर ते अंक बघायला मुद्दामून पुण्याहून नागपूरला गेलो होतो. ही गोष्ट १९९६-९७ सालची. सध्या ते अंक तिथे आहेत की नाही हे माहित नाही. असल्यास ते जरूर वाचावेत इतक्या उच्च दर्जाचे लेख त्यात होते.
21 Aug 2012 - 2:11 pm | स्पा
वाचनीय लेख आणि प्रतिसाद
21 Aug 2012 - 2:28 pm | चिरोटा
नवनीत गाईड्स्,अनमोल गाईड्स हा आमचा अमूल्य ठेवा होता.
22 Aug 2012 - 2:01 am | सुनील
२१ अपेक्षित
22 Aug 2012 - 1:22 am | बन्याबापू
किशोर मासिक,बालचित्रवाणी :)
22 Aug 2012 - 11:45 am | सागर
शकुजी एकदम उत्तम धागा सुरु केला आहेत.
मुळात जुन्या आठवणी जपणे व त्यात रमणे हा मनुष्यस्वभाव आहे आणि त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.
आजची पिढी कदाचित आमच्यावेळी आयपॉड, टच स्क्रीन्स किती बरे होते याबद्दल अजून १५-२० वर्षांनी चर्चा करु शकतील.
२००० साल अगोदरच्या गोष्टींबद्दल बोलायचे झाले तर माणूस जास्त नॉस्टेल्जिक होतो व आजच्या आयुष्याच्या तुलनेत जुन्या गोष्टींच्या आठवणी आपल्याला जास्त आनंद देतात. याचे प्रमुख कारण म्हणजे २००० नंतर प्रचंड वेगाने आयुष्यात झालेला बदल. संगणक युगातील क्रांतीने संवादाची परिभाषाच बदलून टाकली.
जुन्या काळातील एखाद्या लेखकाच्या हस्ताक्षरातील मिळालेल्या उत्तराची तुलना फेसबुकावर त्या लेखकाने आपल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराशी होऊ शकत नाही.
मला वाटते म्हणूनच २००० सालच्या अगोदरचा काळ एक अपूर्व असा आनंद देऊन जाणारा वाटतो.
आधी आपण मामाच्या गावाला आनंदाने जायचो व मामालाही ते आवडायचे, ते सर्व आतुरतेने आपली वाट बघायचे.
आजच्या काळात तो भावनिक ओलावा शिल्लकच नाही असे मला नाही म्हणायचे पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपले कोष जपायला लागलो आहोत असे म्हणता येईल.
अवांतर : मला मराठीतील एक शून्य शून्य मालिका आठवते आहे. तसेच भारत एक खोज, चाणक्य, रंगोली (अजूनही सुरु आहे) असे अनेक कार्यक्रम आठवत आहेत.
28 Aug 2012 - 11:48 am | सन्कु
चान्दोबा, टीपु सुल्तान, अलिफ लैला :-)