सुपर३०. ( एक आगळा वेगळा प्रयोग).

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
19 Aug 2012 - 11:10 pm
गाभा: 

रोज वर्तमान पत्र वाचण्यासाठी घेवो अथवा एखाद्या वृत्तवाहिनीचे दर्शन घेवो, भ्रष्टाचार आणि तोही उच्चपदस्थाचा पाहिला की जीव वैतागतो, मनात विचार येतो की या लोकांना इतके कोट्यावधी रुपयांची संपन्नता असताना परत हजारो कोटीची घोटाळा करताना का मी करीत आहे आणि कधी मी थांबणार असा विचार का बरे मनात येत नाही बरे?

अश्या विचारांच्या काहिलीत असतांना सुपर३० नावाच्या संस्थेची माहिती मिळाली आणि उन्हात शितळतेचा अनुभव आला.

सुपर३० ही संस्था पटना येथे आनंद कुमार नावाचे गृहस्थ चालवतात. अगदी गरीबातील गरीब मुलांना निवडुन ( विटभट्टीतील कामगाराची मुले, उद्याची भ्रांत असणारी मुले) त्यातील ३० मुलांची निवड करुन त्यांना आयआयटी साठी तयार केले जाते. त्या मुलांचा अभ्यासाचा, राहण्या आणि खाण्याचा खर्च ही संस्था मोफतपणे करत असते. ही संस्था कोणतीही देणगी स्विकारत नाही हेही आश्चर्यच वाटते.

२००३ पासुन ही संस्था कार्यरत असुन ३० पैकी अगदी ३० मुलांची आयआयटी मध्ये निवडही झालेली कळते. आतापर्यंत २४० मुलांपैकी २१२ मुले आयआयटी मध्ये निवडीस पात्र ठरली आहेत.

आतापर्यंत अनेक देशी विदेशी संस्थांनी यावर माहितीपर चित्रफितीही बनवल्या आहेत.

बिहारसारख्या भ्रष्टाचाराच्या खाणीत असे खरे खुरे हिरे मिळावेत याचाच मला आनंद आणि हेवा वाटतो.

http://www.super30.org/index.html

http://www.youtube.com/watch?v=Kf77xM4e0UI&feature=related

ता.क. बिहार भ्रष्टाचाराची खाण असेल तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडु यापासुन मुक्त आहेत काय? असो.

प्रतिक्रिया

आयआयटी कानपुर येथून बीटेक झालेला एक बिहारी माझ्या ओळखीचा आहे. तो स्वतः जरा टीका करीत होता या सिस्टीमवर. त्याच्या मते राज्यभर एंट्रन्स घेऊन टॉप ३० लोकांना शिकवले तर ती पोरे उत्तम स्कोर करणारच. शिवाय फक्त गरीबांनाच शिकवतो असेही नाही. असो.

अन्या दातार's picture

20 Aug 2012 - 4:07 pm | अन्या दातार

सुपर३० च्या संचालकाने फक्त गरीब मुलांना शिकवावे ही अपेक्षाच का हवी? कोटासारख्या ठिकाणी किती लूटमार चालू आहे (थँक्स कोदा ;) )! त्यामानाने लक्षणीय गरीब मुलांचा फायदा होत असल्यास टिका व्यर्थ आहे.

पैसा's picture

21 Aug 2012 - 6:47 pm | पैसा

निदान काही गरीब मुलांचा फायदा होत असेल तर चांगलंच आहे!