बैंगन मसाला करी

सस्नेह's picture
सस्नेह in पाककृती
16 Aug 2012 - 2:14 pm

परवा बाजारात फिरताना उन्हाळ्यात गायब असणारी हिरवीगार ताजी रसरशीत कुडची वांगी दिसली. म्हटलं, चला, होऊन जाऊदे झणझणीत कोल्हापुरी बैंगन मसाला करी ! वांगी घेऊन घरी गेले अन लगेच तयारीला लागले.
मसाल्याचं साहित्य जमा केलं.
,
,

१ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस २ चमचे ओल्या खोबऱ्याचा चव
४-५ लसूण पाकळ्या १ इंच आले
२ चमचे तीळ १ चमचा मगजबी
हे सगळं १ वाटी पाण्यात अर्धा तास भिजत घातलं अन मग मिक्सर मध्ये वाटून घेतलं. (मी हा मसाला जास्त प्रमाणात तयार करून फ्रीझर मध्ये ठेवते. महिनाभर राहतो. कोणत्याही रश्शात घालता येतो.)
मग १ लहान कांदा बारीक चिरला. २ चमचे कोल्हापुरी चटणी (कोल्हापुरी कांदा लसूण मसाला – मार्केट मध्ये तयार मिळतो), पाव वाटी तेल, चवीपुरते मीठ अन हळद काढून ठेवले.
आता १/२ किलो वांगी धुवून देठे न काढता मध्ये काप दिला.

मग त्यांना बाहेरून थोडे तेल लावून झाकणाच्या भांड्यात ठेवून ४-५ मिनिटे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हाय मायक्रो करून ठेवली. ३ मिनिटे झाल्यावर बाहेर काढून देठांना धरून फिरवून पुन्हा ठेवली.
आता वांगी अंगच्या पाण्यातच थोडीशी शिजून मऊ झाली.

मग कढईत तेल तापवून कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घेतला. आता त्यात हळद व तयार मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतले.

मग लाल कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी घालून पुन्हा १ मिनिट परतले.

आता गॅस बंद करून वांग्यांची देठे कापून त्यात यापैकी तीन चतुर्थांश मसाला भरला. उरलेल्या मसाल्यात १ कप गरम पाणी घालून उकळले. आता त्यात भरलेली वांगी सोडून झाकण ठेवून मंद गस वर ५-७ मिनिटे ठेवले. (किंवा मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिटे ठेवले तरी चालेल.)


झाली तयार झणझणीत बैगन मसाला करी !

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

16 Aug 2012 - 2:20 pm | नाना चेंगट

नाना चेंगट यांचे निधन
भोकरवाडी (वार्ताहर) : भोकरवाडीतील एक उमदे व्यक्तिमत्व असलेले नाना चेंगट यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. याविषयी अधिक माहिती अशी की त्यांनी मरण्यापुर्वी स्नेहांकिता यांनी केलेल्या बैंगन मसाला करी या पाककृतीचे फोटो मन लावून पाहिले. त्या फोटोंकडे टक लावून पहातापहाताच त्यांची समाधी लागली आणि समाधी अवस्थेतच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून त्यांना सद्गती लाभो म्हणून सर्वधर्मीय प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्याच्या अंकात खास पुरवणी काढून लेख लिहिण्यात येईल. आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला कळवु शकता. योग्य प्रतिक्रियांना आमच्या अंकात छापले जाईल.

अर्धवटराव's picture

16 Aug 2012 - 9:52 pm | अर्धवटराव

उर्वरीत "पापी" मिपाकर लवकरच येथे येतील याची खात्री आहे.

अर्धवटराव

इष्टुर फाकडा's picture

16 Aug 2012 - 2:31 pm | इष्टुर फाकडा

काकू तोड्लत पार !!!!

अवांतर: नान चेंगाट यांच्या आत्म्यासनी वांगी लाभोत :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Aug 2012 - 11:33 pm | अत्रुप्त आत्मा

समांतर-
@नाना चेंगट यांचे निधन>>> षोका-कूल -अत्रुप्त आत्मा ;-)

सुहास झेले's picture

16 Aug 2012 - 3:17 pm | सुहास झेले

ज ह ब ह री...... !!!

अवांतर - नान चेंगाट ह्यांना वांग्याजली ;)

गणपा's picture

16 Aug 2012 - 3:28 pm | गणपा

एकदम झक्कास.

अवांतर - 'नान चेंगाट' गेलं एकदाचं बेणं.

Mrunalini's picture

16 Aug 2012 - 3:49 pm | Mrunalini

वा.... एकदम सही..... :) आता मस्त तांदुळाची भाकरी पाहिजे ह्या सोबत.. काय जबरी लागेल. मस्त एकदम.
नाना चेंगट ह्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ;)

मी_आहे_ना's picture

16 Aug 2012 - 4:46 pm | मी_आहे_ना

कातिल पा.कृ. ही पा.कृ. पाहून सर्वांच्याच अत्रुप्त झालेल्या आत्म्यांना असेच झणझणीत काही खायला मिळो!!!
(चलो कॅफेटेरिया.. झणझणीत काहीतरी शोधणे आले)

मदनबाण's picture

16 Aug 2012 - 7:20 pm | मदनबाण

आहाहा... पाकॄ आवडली. :)

पैसा's picture

16 Aug 2012 - 5:26 pm | पैसा

काय जबरदस्त पाकृ आहे! कोणीतरी आयती तयार करून आम्हास्नी आवतण धाडील काय?

निवेदिता-ताई's picture

16 Aug 2012 - 7:12 pm | निवेदिता-ताई

माझ्याकडे......मी बनविते असे झणझणीत की नाकातोंडातून पाणीच आले पाहिजे....
(अवांतर -- एवढे झणझणीत कसे काय खावू शकतात लोक)
नाना चेंगटांना आवडले असते...पण्ण्ण्ण्ण

पैसा's picture

15 Dec 2012 - 11:07 pm | पैसा

नक्कीच येईन.

रेवती's picture

16 Aug 2012 - 5:42 pm | रेवती

भारी आलेत फोटो!
तिसर्‍या फटूमध्ये आईस्कीम सारखे दिसते आहे ते नक्की काय आहे?

आई ग्ग !!!!
कसली भारी लालेलाल तर्री आलिये जबरी !! :)

पुष्करिणी's picture

16 Aug 2012 - 6:23 pm | पुष्करिणी

वा वा मस्तच.....नक्की करणार
मगजबी म्हण्जे काय ?

रेवतीताई : ते आइस्क्रीम चे गोळे म्हण्जे एकत्र वाटलेलं खोबरं + नारळ् + लसूण + तीळ + आलं + मगजबी आहे

ओक्के! धन्यवादस्.
मगज म्हणजे टरबूज, लाल भोपळ्याच्या बिया, पदार्थाला दाटपणा आणि चव येण्यासाठी वापरतात. पंजाबी ग्रेव्ह्यांमध्ये उपयोग जास्तप्रमाणात होतो असे ऐकून आहे.

अगदी बरोबर !
मी या मसाल्याचे मिश्रण अंड्यांच्या ट्रेमध्ये भरून फ्रीझर्मधे ठेवते. काही वेळाने त्याचे असे बॉल्स तयर होतात. ते डब्यात भरून परत फ्रीझरमधे ठेवते. म्हणजे आयत्या वेळी अंडा करी, मटकीचा रस्सा, पडवळाची किंवा दोडक्याची मसालेदार भाजी इ. मधे वापरता येतात.
धन्यवाद रेवतीताई.

जाई.'s picture

16 Aug 2012 - 6:27 pm | जाई.

मस्तच !!!

मोदक's picture

16 Aug 2012 - 7:16 pm | मोदक

खल्लास...! :-)

सानिकास्वप्निल's picture

16 Aug 2012 - 8:28 pm | सानिकास्वप्निल

जबरदस्त दिसत आहे बैंगन मसाला :)
एकदम झणझणीत !!

अर्धवटराव's picture

16 Aug 2012 - 9:56 pm | अर्धवटराव

खल्लास... किती खाऊ किती नाहि असं होतय... फक्त बनवणं बाकी आहे :(

अर्धवटराव

आधी ती हिरवी वांगी पाहुन जीव गेला. उरला सुरला ती वांगी करी बघुन निर्वतला. मला वांग्यात भरपुर तूप घालुन खायला फाऽऽर आवडत. ( आम्हाला तुपाला साजुक हे विशेषण लावायला नाही लागत ते साजुकच असत)*

तर अस जरा गेलेला जीव निवांत जाउ द्यावा म्हंटल तर नाना .....
जाउ दे आता त्याच्या श्रद्धांजली पुढे आम्हा गरीबांना कोण पुसणार?

आनन्दिता's picture

18 Dec 2012 - 11:45 pm | आनन्दिता

वांग्यात भरपुर तूप आ हा हा हा ... कसल्या कसल्या आठवणी काढतेयस गं अपर्‍णा तै.. आधीच यांच्या पाक्रु ने जीव जायची वेळ आलीये न वरुन तू अत्याचार सुरु कर!!!

मधुरा ashay's picture

17 Aug 2012 - 10:34 am | मधुरा ashay

अप्रतिम...

खरच कोल्हापुरि रन्ग आला आहे..तोन्डाला मस्त पाणि सुट्ल..

पिंगू's picture

17 Aug 2012 - 3:05 pm | पिंगू

पूर आला आहे.. वाचवा.. वाचवा...

इरसाल's picture

17 Aug 2012 - 3:11 pm | इरसाल

म्हणे ह्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी हवी.कुठुन धागा दाखवला असे झाले.
झाल्या प्रकाराचा तत्काल निशेध.

अवांतर : बाकीच्यांनी २६ ला पुण्याला १०व्याच्या कट्ट्याला जमावे.

तुमच्या भाषेत याचा अर्थ "भाकरी बडव आणि खायला घाल" असा होतो?????????? :o:

इरसाल's picture

20 Aug 2012 - 3:14 pm | इरसाल

तुम्ही काय चांगले दिवस येवु देनार नाय काका.
का भाकरी बडवायच्या कामाला लावता ????:(
कायमचा त्रास होईल मला

सस्नेह's picture

17 Aug 2012 - 7:23 pm | सस्नेह

सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद !
विशेषतः सानिकाजी, गणपा, mrunalini, निवेदिता ताई इ. पाकृ मधील दर्दींनी माझ्या अडाण्या पाकृबद्दल चार चांगले शब्द लिहिलेले वाचून ड्वाले पाणावले !
पाकृ बनवणे हा माझा हातखंडा नसून दुसर्‍यांच्या पाकृ खाणे व वाखाणणे हा माझा अड्डा आहे हे माझे वैयक्तिक मत आहे. पण काही हातच्या बोटावर मोजता येणार्‍या पाकृ मला बर्‍या जमतात. त्यातलीच ही एक.
आणि हो, त्या नानबा चेंगटाच्या आत्म्याला म्हणावे की येत्या रविवारी या पाकृबरोबर बाजरीची भाकरी बनवणार आहे. मुकाट्याने देहात शिर अन ये जेवायला !

चिंतामणी's picture

19 Aug 2012 - 11:25 pm | चिंतामणी

>>> काही हातच्या बोटावर मोजता येणार्‍या पाकृ मला बर्‍या जमतात. त्यातलीच ही एक.

किती ही विनयशीलता.

जमण्याबद्दल म्हणाल तर आवडीने केले असेल तर काहिही करायला जमते. हे जमते कारण आवडते म्हणून.

तेंव्हा आवडीने इतर पदार्थसुद्धा बनवा, आणि खायला बोलवा.

वेताळ's picture

17 Aug 2012 - 7:43 pm | वेताळ

पण श्रावण संपताना अशी पाकृ टाकल्या बद्दल निषेध. अहो आता रविवारी वांगी कशाला खातोय.......मटन आणि बिर्याणी.........

सस्नेह's picture

17 Aug 2012 - 8:00 pm | सस्नेह

अरे वेताळा ! तुला रे कसला श्रावण अन कुठला अधिक महिना !
तुला बारा महिने अंडी अन कोंबडीच हवी ना रे !

अविनाशकुलकर्णी's picture

17 Aug 2012 - 10:03 pm | अविनाशकुलकर्णी

वान्गी जिव कि प्राण..
मस्त..आवडली पाककृति..

परिकथेतील राजकुमार's picture

18 Aug 2012 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार

अतिशय सुरेख 'वांगमय'.

ज्ञानराम's picture

18 Aug 2012 - 3:13 pm | ज्ञानराम

आम्ही घरी याला एक तंगडीची कोंबडी बोलतो.... मस्तच.....!!! आवडीची पाक्रु..

ज्ञानराम's picture

18 Aug 2012 - 3:13 pm | ज्ञानराम

आम्ही घरी याला एक तंगडीची कोंबडी बोलतो.... मस्तच.....!!! आवडीची पाक्रु..

प्यारे१'s picture

18 Aug 2012 - 7:37 pm | प्यारे१

राम नाम सत्य है...!
आमच्यासाठी वांगं हीच तंगडी.
बाकी एवढं तेल पाहून आलेल्या करपट ढेकरामुळे आमच्यापेक्षा वयस्कर लोकांनी दिलेली प्यारे'काका' ही पदवी सार्थ वाटू लागली आहे.

प्रचेतस's picture

18 Aug 2012 - 10:55 pm | प्रचेतस

आमच्यासाठी वांगं हीच तंगडी.

सौ चुहे खाके बिल्ली चली.......

अत्रुप्त आत्मा's picture

18 Aug 2012 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा

:)

--^--^--^--

प्रास's picture

19 Aug 2012 - 12:30 am | प्रास

हा धागा पाहिला.
अधिक काय बोलणार?

म्हणजे खास आवडीची गोष्ट. त्यातून या पाकृने तर पार खल्लास केले.

शेवटचे दोन फटु म्हणजे तर कातीलच. ज्वारी/बाजरीच्या भाकरी बरोबर खाणे म्हणजे एकदम चैन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2012 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जब्रा.

-दिलीप बिरुटे

पुनित's picture

15 Dec 2012 - 4:06 pm | पुनित

आम्हाला दिसत का नाहि

आनन्दिता's picture

16 Dec 2012 - 10:08 am | आनन्दिता

काय जीवघेणा पाक प्रकार केलाय... शेवट चा फोतु पाहून खरच जीव जायची वेळ आली!,,,

केदार-मिसळपाव's picture

19 Dec 2012 - 11:21 pm | केदार-मिसळपाव

वरिल सर्व प्रतिक्रियान्शी सहमत्...मनातल्या भावना पोहोचल्या...शेवटचा फोटो एकदम फक्कड आलाय...

ईक्दम झक्कास झालिये वा!!!!़
़य बात है