मसु. ही पाकृ माझी नाही.
सध्या केरळात पडिक असल्याने रोजचा भर मसाला डोसा, वडा सांबार, इडली चटनी, टिपीकल केरळा राइस (जाडा सफेद), मासे यांवर अधिक आहे.
मी रहातो तिथे रस्त्यापलिकडे सुपर बेकरी आहे.मी त्याच्याकडुनच केळ्याचे वेफर किंवा तिखट शेंगदाणे घेत असतो. पण कधीचा ते चित्रबद्ध करायला चान्स मिळत नव्हता.
आज कंपनीतर्फे इफ्तार पार्टी होती तिथे व्यवस्थितरित्या हादडुन परत येताना कॅमेरा हातात असल्याने अचानक आठवण आली.अनायसे तिथे वेफर बनवणे सुरु होते.तर तिथे चालु असलेल्या वेफर क्रिया देत आहे.
सुरुवातीला कच्चे केळे नीट सोलुन घेतात.(हायजीन को फाटे पे मारो)
मग तिथला कारागीर ते केळे एका वेफर बनवणार्या मशीनमधे दाबतो ते सरळ खाली कढइमधे उकळत असलेल्या खोबरेल तेलात पडतात.
तिथे त्यांना व्यवस्थितरित्या तळु देतात.
मग २/३ वेळा वर खाली उडवुन पुन्हा थोडा वेळ तळतात.
मग तो कारागीर एखाद्या वेफरचा तुकडा मोडुन बघतो, व्यवस्थितरित्या तळले गेले किंवा नाही.
जर तो तुकडा कुरकुरीत आढळला की शेजारी ठेवलेल्या डब्यातुन अंदाजे ५०/६० मिली मीठाचे पाणी कढइमधे तरंगणार्या वेफरवर टाकतो. ५ सेकंदानी कढइ मधले वेफर एका पसरट भांड्यात काढतो ज्याला छोटे छोटे छिद्र असतात जास्तीचे तेल निघुन जायला.
थोडावेळ त्यात ठेवुन मग त्यांची रवानगी एथे.....
महत्वाचे : वेफरला आलेला पिवळा रंग खोबरेल तेलात तळल्यामुळे असतो. आधी मलासुद्धा वाटायचे की हळदीच्या पाण्यातुन काढुन तळत असावेत.
ज्या बेकरी वाल्याकडे हे फोटो घेतले तो दिवसाला साधारण २०० किलो (केळयाचे फक्त) वेफर विकतो, बाकीचे वेगळे.
काड्या......
हे लोक फणसाच्या गराचे व रताळ्याचेही वेफर बनवतात ते नंतर कधी.
प्रतिक्रिया
8 Aug 2012 - 9:54 pm | Mrunalini
वा.... मस्तच... :) मला हे केळ्याचे वेफर्स जाम आवडतात. मीठाचे आणि अजुन एक काळि मिरीचे किंवा लाल तिखटाचे पण मिळतात. ते सुद्धा मस्त लागतात.
8 Aug 2012 - 11:09 pm | सुनील
छान. मिठाच्या पाण्याने वेफर खारट करतात हे ठाऊक नव्हते. मला काळी मिरी भुरभुरवलेले वेफर खूप आवडतात.
8 Aug 2012 - 11:25 pm | वीणा३
अतिशय आवडतात केळ्याचे वेफर :प. फणसाच्या गर्याचे वेफर कोकणात पण बनवतात. आठवूनच तोंडाला पाणी सुटलं.
9 Aug 2012 - 1:31 am | सानिकास्वप्निल
हे केळ्याचे वेफर खुप आवडतात :) तसेच टोमॅटो फ्लेव्हरचे मिळतात ते ही छान लागतात :)
रताळ्याचे वेफर कधी खाण्याचा योग आला नाही :(
9 Aug 2012 - 1:44 am | मोदक
रताळ्याचे वेफर टेस्टी असतात...
केरळात सुरणाचे वेफर्स मिळतात - तेही ठीक लागतात.
9 Aug 2012 - 1:24 pm | पांथस्थ
ते रताळं नसतं...ते टॅपिओका चे कंद असतात.
9 Aug 2012 - 1:35 am | Pearl
नवीन माहिती.
चिप्स अथ पासून इतिपर्यंत कसे बनवतात माहिती नव्हते.
9 Aug 2012 - 3:38 am | रेवती
फोटू छानच.
तळणीतच मिठाचे पाणी टाकतात हे माहित नव्हते.
घाणा तळून झाला की मिठ भूरभूरवत असतील असे वाटायचे.
आतापर्यंत बटाट्याचे फ्राईज खाल्ले होते पण लाल रताळ्याचे खाण्याची संधी आल्यावर दवडली नाही. ;)
तेही चांगले लागले.
9 Aug 2012 - 8:49 am | शिल्पा ब
मस्त. रताळे, बीट वगैरेंचे सुद्धा वेफर्स मिळतात ते मी आणते. तेवढंच हेल्दी खाल्याचं समाधान.
9 Aug 2012 - 10:02 pm | शैलेन्द्र
रताळे, बीट यांचे वेफर हेल्दी असतात हे ऐकुन आनंद झाला.. :)
9 Aug 2012 - 10:57 pm | शिल्पा ब
रताळे, बीट इ. चे वेफर्स हेल्दी असतात असं मी म्हंटलेलं नाही....हेल्दी खाल्ल्याचं समाधान असं म्हंटलंय.
10 Aug 2012 - 12:52 pm | शैलेन्द्र
"रताळे, बीट इ. चे वेफर्स हेल्दी असतात असं मी म्हंटलेलं नाही...."(पण ते खाल्याने)" हेल्दी खाल्ल्याचं समाधान असं म्हंटलंय."
:)
9 Aug 2012 - 9:42 am | सूड
फणसाच्या गर्यांचे वेफर्स भारी लागतात.
9 Aug 2012 - 10:48 am | सुप्रिया
छान माहिती आणि फोटो. ही राजेरी केळी वापरतात. म्हणून त्याचा पिवळा रंग येतो.
9 Aug 2012 - 11:22 am | गवि
वा.. मस्त..
केळ्याचे गोडसर चिप्स मिळतात ते सर्वात जास्त आवडतात. गोड म्हणजे साखर घालून गोड केलेले नव्हे, तर थोड्या पिकायला लागलेल्या पण कच्च्याच केळ्यांचे वेफर्स. त्यांना कुरकुरीतपणासोबत थोडी नैसर्गिक गोडी येते. पण मला वाटतं ते तळणीत लवकर जळतात आणि तुलनेत कमी प्रमाणात बनवले जातात. सर्वत्र झालेल्या हॉट चिप्स दुकानमालिकेच्या कृपेने कधीकधी मिळतात. पण गोडाच्या चिप्ससाठी आधी सांगावं लागतं.
बाकी या चिप्सची खरी मजा खोबरेल तेलातच..
फोटो आणि माहितीसाठी धन्यवाद....
9 Aug 2012 - 11:44 am | इरसाल
ह्याच दुकानात ते गोड वेफर पण बनवतात पिकलेल्या केळ्यांपासुन.त्याच्याकडे ते ही आहेत.पण कच्च्या केळ्यांच्या वेफर्सना जास्त मागणी असते म्हणुन गोड आठवड्यात एकदा बनवतात.
येत्या काही दिवसात जमले तर रताळे, पिकलेली केळी आणी फणसाच्या गराचे वेफरचे फोटो टाकेन.
9 Aug 2012 - 11:34 am | जागु
छान.
मी घरी भाजीच्या केळ्यांचे वेफर्स करते. ते बाजारात मिरी लावलेले येतात तसे होतात.
9 Aug 2012 - 2:23 pm | काळा पहाड
माझ्या अंदाजाने ही केळी आपण खातो ती मऊ केळी नसतात, तर खास वेगळ्या प्रकारची केळी असतात. ती नुसती खाता येत नाहीत. त्यांना तामिळ मध्ये वाळ्पळम म्हणतात. कुणीतरी सांगेल का की माझी माहिती बरोबर आहे का?
9 Aug 2012 - 8:51 pm | सुनील
त्याला मराठीत राजाळी म्हणतात. ती नगांवर नव्हे तर वजनावर विकली जातात. मुंबईत माटुंगा मार्केटमध्ये (स्टेशनला लागून असलेल्या) चांगली मिळतात. ठाण्यात जांभळी नाक्यावरदेखिल मिळतात.
9 Aug 2012 - 3:59 pm | प्रभाकर पेठकर
केळा वेफर्सचा कारखाना आणि माझ्या आवडत्या 'चखन्याची' जन्मगाथा वाचून (मन) भरून आले.
"आजकाल मीही कंपुबाजांच्या धाग्यावर प्रतिसाद देणे बंद केलेय. हा* अपवाद असु शकतो "
9 Aug 2012 - 9:44 pm | इरसाल
छान दणका दिलात हं !
9 Aug 2012 - 3:56 pm | प्रभाकर पेठकर
प्रकाटाआ.
9 Aug 2012 - 7:09 pm | चटोरी वैशू
ओह! मला पण आजच कळले माझे आवडते केळा वेफर्स असे बनवता ते... धन्स...
9 Aug 2012 - 9:48 pm | इनिगोय
मस्त.. तळलेले केरळी पदार्थ म्हणजे यम्मीsss ;)
9 Aug 2012 - 10:00 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त!
10 Aug 2012 - 4:27 am | शुचि
केळ्याचे वेफर्स खूप आवडतात पण कोकणचा मेवा - फणसाचे तर क्या केहेने!! . आंबावडी, काजूवडी, फणसाचे वेफर्स हा सर्व खाऊ आम्ही शाळेच्या ट्रीप ला घेऊन जायचो त्याची आठवण झाली.
अर्थात ही माहीती खूप आवडली.
10 Aug 2012 - 10:55 am | मदनबाण
वा... मस्त माहिती.
जर तो तुकडा कुरकुरीत आढळला की शेजारी ठेवलेल्या डब्यातुन अंदाजे ५०/६० मिली मीठाचे पाणी कढइमधे तरंगणार्या वेफरवर टाकतो.
हे माहिती नव्हत ! मला वाटल ज्या तेलात हे वेफर तळतात त्या तेलातच मीठ असतं... पण ते तस नाहीये असं आत्ता कळल.
रताळ्याचे वेफर खाल्ले आहेत,मस्त लागतात...मला केळ्याचे गोड वेफर जास्त आवडतात ! टॅमेटो टेस्ट वाले पण शॉलिट्ट लागतात !
(चिप्स प्रेमी) :)
10 Aug 2012 - 1:38 pm | स्मिता.
केळ्याचे वेफर्स आवडतात... त्यावर मीठ अश्या प्रकारे टाकतात ते या लेखातून कळलं. पिकल्या केळ्यांचे वेफर्ससुद्धा मस्त लागतात.
जमल्यास फणसाच्या वेफर्सचेही फोटू द्या.
15 Aug 2012 - 2:02 pm | निवेदिता-ताई
छान माहिती आणि फोटो ही
15 Aug 2012 - 5:46 pm | पैसा
असेच आणखी लाल रंगाचे दिसणारे जरा झणझणीत मसाल्याचे वेफर्स पण मिळतात. त्यांना काय मसाला असतो?
19 Aug 2012 - 2:42 am | एस
हे वेफर्स शिराझ सोबत चघळायला छान लागतात.