सरकारने आणलेले लोकपाल विधेयक हे संसदेच्या लोकसभेच्या सभागृहात बहुमताने मंजूर झाले. त्यानंतर ते मंजुरीकरता राज्यसभेत गेले. तिथे त्यावर बर्याच सुधारणा सुचवण्यात आल्या व ते विधेयक राज्यसभेच्या निवड समितीमध्ये गेले. सदर विधेयकाला संसदेत असलेल्या सर्व राजकीय पक्षांना त्यांना योग्य वाटतील अशा शिफारशी सुचवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर त्या सर्व शिफारशींबाबत निवड समिती एक अहवाल तयार करून ते विधेयक पुन्हा मंजुरीकरता राज्यसभेत पाठवेल.
एखादे विधेयक लोकसभेत अथवा राज्यसभेत नामंजूर झाल्यास ते पुन्हा दुरुस्तीकरता व शिफारशींकरता निवड समितीकडे जावे, हा त्या विधेयकाच्या मंजुरीकरताचा एक घटनासंमत मार्ग आहे.
तेव्हा सदर लोकपाल विधेयक हे अशा तर्हेने मार्गस्थ असताना पुन्हा 'आमच्या पाठीशी भारतातील १२५ करोड जनता आहे अशी दर्पोक्ती झाडत आम्ही सांगतो तसेच जनलोकपाल विधेयक आणा, अन्यथा आम्ही उपोषण करून मरून जाऊ..' अशा धमक्या देत काही मंडळी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे बसली आहेत.
आमच्या मते ही तानाशाही असून लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक आहे. सबब, आम्ही या उपोषण-नाट्याचा तीव्र निषेध करत आहोत.
-- काँमॅ.
प्रतिक्रिया
1 Aug 2012 - 12:59 pm | चौकटराजा
ते आणखी ४२ वर्षे धूळ खात पडणार नाही याची शंभर टक्के खात्री देणारे दिसता आपण ! आपण व मी
एकाच सोशल ग्रूप चे सदस्य असल्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो.
1 Aug 2012 - 1:06 pm | रणजित चितळे
तो परत देत आहे.
मला असे वाटते -
१. कोणतेही सरकार यावो - असे म्हणावेसे वाटते की कोणतीच सिस्टीम फेअर नाही आपल्या देशात. त्या मुळे राज्या सभेत गेलेले विधेयक (परत लोकसभेने पास केले पाहिजे आता असा काहिसा नियम आहे म्हणे) ह्या सत्रात पास होईलच असे सांगता येत नाही. पुन्हा रेंगाळू शकते.
२. येथे प्रत्येकाचा स्वतःचा असा एजंडा असतो. कोणी प्रसिद्धी साठी, कोणी क्षणिक लाभासाठी किंवा कोणी स्वार्थासाठी पण बिग पिक्चरचा विचार कधीच करत नाही. मुव्हिंग टुवर्डज वन गोल - हे जमत नाही.
३. एक दुस-याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग केला जातो. नेकी नाही. सातत्य नाही .
४. आपल्या देशात लोकसंख्या इतकी आहे की कोणत्याही गोष्टी करता पाठींबा तयार करता येतो अगदी अल्प मोबदल्यात. (ह्या वाक्याचा अर्थ सगळी आदोलने ह्यात मोडतात असा कृपया घेऊ नये - एक उदाहरण तमिळनाडूचे कूंडाकूलम आंदोलन. कीती खोटे होते ते . मी अशा प्रकारची खोट्या आंदोलनाचे संबंधी हे वाक्य लिहिले आहे.)
अशा परीस्थीतीत हे असेच होत राहाणार. वाळवी कोठेतरी लागली आहे व रॉकेल कोठे तरी ओतले जात आहे.
वाईट वाटते मनाला.
1 Aug 2012 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार
बॉर्र मग ?
ते तिकडे जंतर मंतर वरती जौन कळवा की. इथे मिपाची ब्यांडविडथ कशाला घालवताय ? ;)
पराण्णा हजारे
1 Aug 2012 - 1:09 pm | विजुभाऊ
लोकपाल विधेयकाचे एकवेळ बाजूला ठेवा ३३% जागा स्त्रीयांसाठी राखून ठेवायची त्या विधेयकाला लालू यादव /मुलायम /पासवान यां पुरोगामी लोकाम्चा कडाडून विरोध आहे.
1 Aug 2012 - 1:55 pm | नाना चेंगट
ओके.
3 Aug 2012 - 11:02 am | नितिन थत्ते
या प्रवासावेगळा दुसरा प्रवास सुरू झाला आहे.