मंडळी,
मी घरी (खालापूर येथे) गेलेले. माझ्या घरातुन महड येथे जाण्यास १५ मिनिटे लागलात. काल मी विचार केला घरी बसण्यापे़क्षा जरा मढास जाऊन यावे. ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . (मी नास्तिक असल्याने देवळात जात नाही. पण देवळात जी शांतता असते त्याला तोड नाही.) गाडी काढली आणि निघाले.जरा लवकरच निघालेले कारण चतुर्थी,अंगारकी,एकादशी.. अशा दिवशी भक्तगणांचा उत्साह ऊतु जात असतो.
पण माझा इतका विरस झाला .....
तिथे जाऊन मला असे दिसले की महड फाट्याचे तोंड वाहनतळ झाले आहे. त्याच्या समोर "हाळ" नावाचे गाव आहे तिथे बस स्टँड झाला आहे. चालत चालत गेले कारण सायकल सुद्धा शिरेनाशी झाली होती :( आणि जे बाहेरुन येणारे लोक होते ते तिथेच जवळपास जेऊन खरकटे,उष्टे अन्न,कागद तिथेच टाकून जात होते. खुप राग आला. पुढे जायची इच्छा होईना !!!
कशीतरी करुन मढास आत गेले आणि देवळात एखाद्या शांत कोपर्यात टेकावे म्हणुन मंडपात गेले तर तिकडे लहान मुले खेळत होती,मोठी माणसं त्यांना तशीच ओरडत होती. तिथे खरंतर अथर्वशीर्ष चालू होतं पण त्याकडे कोणाचही लक्ष नव्हतं. जो तो आपल्याच नादात आणि देव कधी भेटतोय ह्या विवंचनेत!!
शेवटी तशीच घरी परत गेले.
जी शांतता मिळवण्यासाठी तिथे चालेले होते ती मला मिळालीच नाही :(
तिकडे फक्त बाजार मांडलेला देवाचा आणि भक्ताच्या भक्तीचा !!!!
प्रतिक्रिया
23 Jun 2008 - 5:48 pm | संजीव नाईक
आपण नास्तिक असल्याने देवळात जात नाही. पण स्माशानात जरा जाऊन बघा जी शांतता असते त्याला तोड नाही.
संजीव
23 Jun 2008 - 6:00 pm | ऋचा
स्मशानातील शांतता भितीदायक असते साहेब.
देवळातली प्रसन्न असते.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
23 Jun 2008 - 9:27 pm | ध्रुव
--
ध्रुव
23 Jun 2008 - 9:37 pm | शितल
इथे अमेरिकेत तर स्मशान ही इतके छान असते, फुलाचे वेगवेगळे गुच्छ असतात ठेवलेले, मस्त हिरवळ असते, मला तर फार आवडले, आणि तेथे जिवतपणी जाण्याची ही इच्छा आहे.
23 Jun 2008 - 9:43 pm | ब्रिटिश टिंग्या
>>तेथे जिवतपणी जाण्याची ही इच्छा आहे.
तिथे असलेल्या लोकांना घाबरवण्यासाठी? :?
23 Jun 2008 - 11:03 pm | शितल
हा हा हा
मेलेल्या माणसाना घाबरवण्यासाठीच.
23 Jun 2008 - 6:00 pm | शितल
मला म॑दिरात जायला आवडते, पण तुला खर्॑च शा॑तता हवी असेल तर चर्च मध्ये जात जा,
अग देवळात घ॑टेचा निनाद, स्त्रोत, आणि लोका॑नी केलेल्या प्रार्थना ह्या मुळे देवळाचे जिव॑तपण वाटते.
पुण्यापासुन काही अ॑तरावर बालाजीच्या देवळाची प्रतीकृती उभी केली आहे, तु जमल्या जाऊन ये, खुप छान आहे.
23 Jun 2008 - 6:36 pm | आनंदयात्री
जातो पण अशा चतुर्थी वैगेरे टाळुनच ..
23 Jun 2008 - 10:57 pm | वरदा
देऊळही शांत असतं पण मंगळवार, संकष्टी असे दिवस सोडले तर....
मला देवळात आवाज असला तरीही छान वाट्टं उदबत्ती, धूप यांचा सुगंध....सगळीकडे असणारी रंगीबेरंगी फुलांची आरास्...बाजूचे किती का गोंधळ करेनात मन प्रसन्न होतच....आवडत नाही ते रांग लावणं...तोच देव सगळीकडे असेल तर तिथे रांग लावून काय वेगळं पहायचय? घरी येऊन दर्शन घ्यावं की......
24 Jun 2008 - 7:41 am | विसोबा खेचर
तोच देव सगळीकडे असेल तर तिथे रांग लावून काय वेगळं पहायचय? घरी येऊन दर्शन घ्यावं की......
अगदी सहमत...
तात्या.
24 Jun 2008 - 7:45 am | धमाल नावाचा बैल
मी चुकुन देऊळही शांत असतं पण मंगळावर अस वाचलं =))
आपला,
बैलोबा.
24 Jun 2008 - 9:14 am | भडकमकर मास्तर
आपण सणांचे दिवस , संकष्टी वगैरे वगळून देवळात जातो... शांत असतं...
गर्दी / रांग असलेलं देऊळ मी टाळतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
24 Jun 2008 - 9:17 am | अमोल केळकर
ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी .
सर्वप्रथम आपले अभिनंदन !!
केंव्हा आहे लग्न ? मिपाकरांना बोलावणार आहात की नाही? ( ह. घ्या. :| )
पुढील आयुष्यास शुभेच्छा
बाकी महडच्या मंदिरात जायची तुमची वेळ चुकली. इतर दिवषी खुप शांतता असते.
24 Jun 2008 - 10:23 am | शेखर
>> बाकी महडच्या मंदिरात जायची तुमची वेळ चुकली. इतर दिवषी खुप शांतता असते.
वेळ चुकीची नसते , चुकीच्या असतात त्या आवडी -निवडी....
शेखर
24 Jun 2008 - 10:55 am | चाणक्य
वेळ का म्हणे चुकीची नसते? मंदिरात आरडाओरडा चालु असेल आणि ते आवडलं नाही तर यात आवडी निवडी कश्याकाय चुकीच्या बॉ??
चाणक्य
24 Jun 2008 - 12:14 pm | शेखर
वेळ चुकीची नसते... चुकीचे असते ते मंदिरात आरडाओरडा करणे आणी ते सहन करणे ...
शेखर
24 Jun 2008 - 11:34 am | धमाल मुलगा
मला जर निवांत शांतता हवी आसेल तर मी एखाद्या टेकडीवरच्या दुर्लक्षित अश्या महादेवाच्या मंदीरात - गाभार्यात जाऊन बसतो...
करुन पहा..विलक्षण अनुभव असतो हा.
कोणातरी पुजार्याने कधी सकाळी पुजा बांधून परत मंदीराकडे फिरकुनही पाहिलेलं नसतं....
आसपास दुकानं, त्यांचा ओरडा...'श्रध्दाळु, भाविक' गिर्हाईकं नसतात...असते ती फक्त अभिषेकपात्रातून पिंडीवर पडणार्या थेंबांची टपटप...
आपण, श्रीशंभु, थंडगार गाभारा, जोडीला हलकासा काळोख..आणि विशुध्द निकोप शांतता! बस्स...इतकंच. करुन पहा एकदा..जग थांबल्यासारखं वाटेल.
बाकी, स्मशानात जाऊन बसण्याचा सल्ला देखील मस्तच.
आम्ही पुण्यात असताना वैकुंठात जाऊन बसायचो. झकास अभ्यास व्हायचा. थंडीतही चितेच्या उबेमुळे फारसा त्रास नाही व्हायचा!
24 Jun 2008 - 11:43 am | चाणक्य
:O :O :O
चाणक्य
24 Jun 2008 - 5:28 pm | विजुभाऊ
मला जर निवांत शांतता हवी आसेल तर मी एखाद्या टेकडीवरच्या दुर्लक्षित अश्या महादेवाच्या मंदीरात - गाभार्यात जाऊन बसतो...
"याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
24 Jun 2008 - 5:32 pm | शितल
"याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात
=))
24 Jun 2008 - 5:35 pm | II राजे II (not verified)
"याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात
जबरा वुजूभाऊ !!
=))
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
24 Jun 2008 - 5:41 pm | वरदा
ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी .
अभिनंदन!माझ्याही तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!!!
"याला मराठीत एकांत असे म्हणतात" लोक अशा एकांताचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करु लागले. त्यामुळे देवच अशा एकांताला घाबरतात
हा हा हा हा.......सह्ही....
पण धमु छान आयडीया बरं का.....
24 Jun 2008 - 6:28 pm | धमाल मुलगा
च्यामारी..काय करावं आता विजुभाऊंना?
ज्यात त्यात शब्दांच्या कोलांट्या!
आम्ही गरीबांनी काही बोलावं की नाही भाऊ?
अगं ए....मी एकट्यानं जाण्याबद्दल बोललो...
मी नाही त्यातला....
आणि एकांताला आम्हाला ५१२ शनिवार पेठ आहेच की मोकळं :) देवाला कशाला त्रास तो?
24 Jun 2008 - 5:49 pm | विसोबा खेचर
ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी .
अरे वा! माझ्याही शुभेच्छा! :)
बाकी नवरामुलगा काय करतो? कुठे असतो कामाला?
तात्या.
24 Jun 2008 - 5:53 pm | ऋचा
>>बाकी नवरामुलगा काय करतो? कुठे असतो कामाला?
पुण्यातच असतो,
टाटा मोटर्स मध्ये आहे.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
24 Jun 2008 - 6:30 pm | धमाल मुलगा
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
टाटा मोटर्स? आता काय बाबा, मज्जाए एका मुलीची...रोज इंडिका, इंडिगो, सफारी मधून फिरणार बाब्बा एक मुलगी :)
24 Jun 2008 - 6:30 pm | ऋचा
>>मी नाही त्यातला....
मला वाटलं आता धमु म्हणेल "मी नाही त्यातला....कडा घाल आतला"
=)) =))
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
24 Jun 2008 - 6:53 pm | विजुभाऊ
मला वाटलं आता धमु म्हणेल "मी नाही त्यातला....कडा घाल आतला"
अग्ग्ग्ग्ग्गाआययय्याआआ
धम्या तू आता बोलणेच बंद ठेव ...काही बोललास तरी पंचाईत. नाही तरी पंचाईत........
काय करावं बॉ या बोलण्याला?
पण एक सांगु..... धमु गप्प बसला तरी ते आम्हाला आवडणार नाही.........
तुझे तोंड लग्नानन्तर एवीतेवी बंद ठेवावे लागणारच आहेच. असो
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
25 Jun 2008 - 2:35 pm | शेखर
>> तुझे तोंड लग्नानन्तर एवीतेवी बंद ठेवावे लागणारच आहेच. असो
तोंड बंद ठेवावे लागणार नसून होणार आहे....
(अवांतर : कुठलाही वेगळा अर्थ वाक्यातुन काढु नये )
24 Jun 2008 - 10:09 pm | वरदा
मला वाटलं आता धमु म्हणेल "मी नाही त्यातला....कडा घाल आतला"
=))
धमु काही खरं नाही तुझं....
25 Jun 2008 - 12:36 pm | धमाल मुलगा
काहीही बोला, सगळे मिळुन मुंडक्यावरच टाकताहेत मला..
धर की आपट..धर की आपट. अरे मी काय धोबीपछाडच्या सरावासाठी ठेवलेला पुतळा आहे का?
आता 'कडा लाव आतला' नव्हे...माझाच कडेलोट करा.
बोललं तरी पंचाईत, न बोलावं तरी गप्प कुठे बसवतंय.
ओ विजुभाऊ, सारखं सारखं घाबरवायचं नाही असं.
मी मांडवातून पळून जाईन घाबरुन..मग बसा धमीला समजावत.
दुर्जनगडावर एखादा मठ उघडून बसेन हां मी.
25 Jun 2008 - 12:44 pm | कुंदन
>>>दुर्जनगडावर एखादा मठ उघडून बसेन हां मी.
आम्ही ही येउ की दुर्जनगडावर वरात घेउन.....
टाटा मोटर्स आहे आपल्या दिमतीला ..... काय ऋचा ताई ...?
25 Jun 2008 - 2:41 pm | ब्रिटिश टिंग्या
>>दुर्जनगडावर एखादा मठ उघडून बसेन हां मी.
मग तु मद्याचे श्लोक लिहायला घे :)
25 Jun 2008 - 2:45 pm | धमाल मुलगा
च्यामारी...लफडंच झालं की हे!
>>मग तु मद्याचे श्लोक लिहायला घे
हाण तिच्याआयला.....जब्बरान् !
25 Jun 2008 - 2:54 pm | छोटा डॉन
मी आपला गडाच्या कड्यावर हुबा र्हातो ...
टाटाची गाडी आली की उचलून फेकतो दरीत ...
आपलं उचक की फेक, उचल की फेक चालूच ....
च्यायला आमच्या कंपनीची गाडी घेत नाय म्हणजे काय ???
अवांतर : जोराचा वारा सुटल्यास "टाटाची कार" उडून जाते असे म्हणतात. झालेल्या लुस्कानीची जबाबदारी आमची नाही. आम्ही आपला "तज्ञ" म्हणून सल्ला द्यायचे काम केले.
सल्लागार छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
25 Jun 2008 - 2:57 pm | धमाल मुलगा
आरं आरं आरं...
आसं म्हनु ने बाबा, आपल्या जावयबाप्पुंची कंपनी हाय ती...
तिला श्या दिल्या आन् जावयबाप्पुंना राग आला तर आपल्या ताईला नीट नांदवतील का त्ये?
25 Jun 2008 - 3:01 pm | छोटा डॉन
>>तिला श्या दिल्या आन् जावयबाप्पुंना राग आला तर आपल्या ताईला नीट नांदवतील का त्ये?
जरा वाईच घोळ झाला म्हनायचा ...
कुनालाही श्या देनं लै वंगाळ काम बगा ...
मी "माझे " सह्ब्द माघे घेतो ...
अवांतर : धम्या, चांगलं तुझ्या भल्यासाठी मी उभारणार होतो. आता मला मागे हटवलास, मर आता ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
25 Jun 2008 - 3:19 pm | धमाल मुलगा
अरेरे डान्या, तुला तर वाईट वाटलं की रे माझ्या बोलण्याचं!
वेड्या, मी फक्त शिव्या नको देऊ असं म्हणालो ;)
डोक्यावर घोंगडं घेऊन दे की फेकून किती फेकायच्या तितक्या गाड्या.....
अरे बाबा, इसको काँग्रेसी स्टाईल म्हणतात. बोलताना एक, करताना दुसरंच. ;)
25 Jun 2008 - 3:22 pm | छोटा डॉन
लेका वाईट कसलं बोडक्याचं वाटतयं ?
हे आपलं असचं ...
बाकी आपण "ह्या" बबतीत पक्का काँग्रेसी आहे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
25 Jun 2008 - 3:22 pm | ब्रिटिश टिंग्या
>>मी फक्त शिव्या नको देऊ असं म्हणालो
पहा कोण म्हणतयं शिव्या नको देऊ =))
25 Jun 2008 - 3:23 pm | विजुभाऊ
मद्याचे श्लोक
मना सज्जना मद्य पंथेची जावे
जरी तो हरी हाणीतो सुस्वभावे
ग्लास आणि बाटली; चखण्याच्या सवेही.
सवे सोबती येती मारीती गमजा
जरी आडवा झाला तरी ती मजा रे
जय जय छोटी टिंगी समर्थ.....
स्कॉच चिया सेवका वक्र कोण पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे
जय जय छोटी टिंगी समर्थ.....
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
25 Jun 2008 - 3:24 pm | विजुभाऊ
मद्याचे श्लोक
मना सज्जना मद्य पंथेची जावे
जरी तो हरी हाणीतो सुस्वभावे
ग्लास आणि बाटली; चखण्याच्या सवेही.
सवे सोबती येती मारीती गमजा
जरी आडवा झाला तरी ती मजा रे
जय जय छोटी टिंगी समर्थ.....
स्कॉच चिया सेवका वक्र कोण पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे
जय जय छोटी टिंगी समर्थ.....
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
25 Jun 2008 - 3:35 pm | ऋचा
>>आपलं उचक की फेक, उचल की फेक चालूच ....
तु काय सुपरमॅन है स का काय?
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
25 Jun 2008 - 3:52 pm | ऋचा
>>टाटा मोटर्स? आता काय बाबा, मज्जाए एका मुलीची...रोज इंडिका, इंडिगो, सफारी मधून फिरणार बाब्बा एक मुलगी
टुकटुकटुकटुकटुकटुक!!!!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
25 Jun 2008 - 3:57 pm | ब्रिटिश टिंग्या
>>टुकटुकटुकटुकटुकटुक!!!!!
ईईईSSSS......तु "टुक टुक" मधुन फिरणारेस? :O
शब्दार्थ -
(टुक टुक - रिक्षा)
25 Jun 2008 - 4:01 pm | ऋचा
>>ईईईSSSS......तु "टुक टुक" मधुन फिरणारेस?
ए ते तुम्हाला फिरण्यासाठी ठेवलय
मी गाडीतुन जाणार!!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
25 Jun 2008 - 5:08 pm | विसोबा खेचर
अवांतर गप्पा मारण्याकरता खरडफळ्याची सोय केली आहे, त्याचा वापर करावा. एखाद वेळा गंमत समजू शकते. कृपया मिपा प्रशासनाच्या मुक्त वातावरणाचा प्रत्येक ठिकाणी गैरफायदा घेऊ नये ही विनंती...
तात्या.
25 Jun 2008 - 9:22 pm | डॉ.प्रसाद दाढे
मनःशा॑ती (लोणावळा मिसळवाली नव्हे.. खरी खरी मनःशा॑ती) मिळण्यासाठी निर्जन अरण्यातल॑ एखाद॑ जुन॑ म॑दिर शोधाव॑ आणि लावावी धुनी..
मी माझ्या मनात ठसलेली अशा प्रकारची दोनच म॑दिर॑ पाहिली. पहिल॑ देवखोल येथे.. को॑कणातल्या दिवेआगारापासून अ॑दाजे दहा किमीवर आहे.. खूप शा॑त, रम्य ठिकाण आहे
दुसर॑ कोकणातच गणपतीपुळ्यापासून थोड्या अ॑तरावर (जयगड ब॑दराजवळ) कराटेश्वराचे म॑दिर.. अति सुरेख ठिकाण. तिथे समुद्रकिनार्याशेजारीच गोड्या पाण्याचा जिव॑त झरा आहे.. अप्रतिम स्थळ.. मिपाची सहल नेली पाहिजे..
आपल्या (म्हणजे हि॑दू॑च्या) पार॑पारिक धर्मस्थळी पुष्कळदा घाणीचेच साम्राज्य आढळतें. नासक्या दूधाचा वास आणि घो॑गावणार्या माश्या हे तर ठरलेलेच मे॑बर! त्याउलट चर्चेस अतिशय स्वच्छ असतात (आपण साहेबाकडून अनेक सवयी उचलल्या.. पण स्वच्छता आणि टापटिप सोडून.. लेकाचे चर्चमध्ये बूट घालून येतात पण तरीही चर्च स्वच्छ असते.. तेच आपण चपला बाहेर काढून आत जातो तरी देऊळ कळकट असते (अपवादही असतील..). पश्चिम महाराष्ट्रातल्या एका प्राचीन ख॑डोबाच्या देवळात मी नुकताच गेलो होतो (आमचे कुलदैवत असल्याने) तिथे गावातले लग्न चालू होते आणि वर्हाडी म॑डळी तिथे म॑दिरातच पान्-त॑बाखूच्या पिचकार्या टाकित होती..आणि त्यातच आम्ही अनवाणी! मला कधी एकदा चपला घालून पळ काढतोय असे झाले