अरेरे आणि अगग हे दोन उद्गार. दोन्हीचे अर्थ वेगळे होतात
अरेरे हा शब्द एखाद्याबद्दल सहानभुती दाखवताना वापरला जातो. अरेरे या शब्दाला जोडून आपोआपच बिच्चारा हे शब्द अध्याहृत असतात. एखाद्याची परीस्थिती काळजी वाटण्याजोगी असेल / फारच कणव येण्याजोगी असेल तर अरेरे बिच्चारा च्च्च्च्च्च वाईट झाले हो. असे शब्द येतात.
अरेरे.म्हंटल्यानंतर ऐकणार्याच्या मनात आपोआपच एक कणव तयार होते. सहानभुती ची मदतीची भावना येते.
हताशपणा /आपण काही करू शकत नाही अशी काहिशी हतबलतेची /करुणतेची भावना येते
अगग हा शब्द एखाद्या वस्तुचे वर्णन करायला त्या वस्तुची व्याप्ती अफाट असेल तर वापरतात. पाडगावकरांचे एक गाणे आहे
"अगगगगगग केवढा फणस् आई.आज्जोबांचे पोट सुद्ध एवढे मोठे नाही " किंवा अग्गग केवढी मोठी चढण , किंवा अगग केवढा हा धावांचा डोंगर . एकूण काय अगग हा शब्द वस्तुची विशाल व्याप्ती सांगतात.
अगग हे शब्द ऐकतात मनात एक आव्हान स्वीकारण्याची भावना येते.
दोन्ही शब्दातला फरक इथेच थांबत नाही.
मराठीत "अग" किंवा"ग" हे संबोधन स्त्री ला संबोधण्यासाठी वापरले जाते." अग इकडे ये. किंवा तुला म्हणून सांगते ग " या वाक्यांवरुन कोणीतरी एखाद्या स्त्री ला बोलावते आहे किंवा एक स्त्री दुसर्या स्त्रीशी बोलते आहे हे लगेच लक्षात येते
"अरे " किंवा" रे" हे संबोधन पुरुषाला संबोधण्यासाठी वापरले जाते. काय रे काय करतो आहेस ? बाहेर जातोय रे " या वाक्यावरून कोण्या पुरुषा ला काहीतरी विचारले आहे किंवा कोणी पुरुष दुसर्या पुरुषाला काही सांगतो आहे हे कळते
"अग" या शब्दाला "ग" शब्द जोडून " अगग" हा शब्द तयार होतो. या दोन्ही शब्दानी मिळून बनणार्या शब्दाने निर्माण होणार्या शब्दामुळे निर्माण होणारी भावना मात्र आव्हान स्वीकारण्याची किंवा अफाट व्याप्तीवाचक होते.
या उलट "अरे" या पुरुषवाचक शब्दाला "रे" हा आणखी एक पुरुषवाचक शब्द जोडून बनणारा "अरेरे" हा शब्द मात्र करूणतेची /हतबलतेची दयेची भावना निर्माण करतो
तुम्हाला काय वाटत? अरेरे.. आणि अगग या दोन्ही शब्दात एक काव्यात्मक न्याय दडलेला आहे.
अरेरे...अगग
गाभा:
प्रतिक्रिया
27 Jul 2012 - 10:50 am | स्पा
तुम्हाला काय वाटत?
अरेरे
..अरेरे आणि अगग या दोन्ही शब्दात एक काव्यात्मक न्याय दडलेला आहे.
अगग
27 Jul 2012 - 11:28 am | प्यारे१
आम्ही बर्याचदा .... 'अबब! ऊसच ऊस!' असं उद्गारार्थी वापरतो 'प्रेक्षणीय' काही दिसलं की. ;)
27 Jul 2012 - 3:09 pm | नाना चेंगट
अरेरे कसला फडतुस धागा आहे...
अगग किती लिहितात नै विज्युभाई
27 Jul 2012 - 3:32 pm | मी_आहे_ना
थोडक्यात तुम्हाला "पुरुष म्हणजे अरेरे आणि स्त्रिया म्हणजे अगंगं" म्हणायचंय का?
;)
27 Jul 2012 - 7:47 pm | पक पक पक
अरेरे अरे ये क्या हुवा ,मैने न ये जाना... ;)
27 Jul 2012 - 7:47 pm | पक पक पक
अरेरे अरे ये क्या हुवा ,मैने न ये जाना... ;)
27 Jul 2012 - 7:47 pm | पक पक पक
अरेरे अरे ये क्या हुवा ,मैने न ये जाना... ;)
27 Jul 2012 - 7:47 pm | पक पक पक
अरेरे अरे ये क्या हुवा ,मैने न ये जाना... ;)
27 Jul 2012 - 8:24 pm | इरसाल
चार चार वेळा सांगायची गरज नव्हती.
27 Jul 2012 - 11:08 pm | पक पक पक
अरेरे ये मैने एकीच बार डाला था ये चार बार कैसे हुवा यहीच समझमे नय आया..... :crazy: :crazy: :crazy:
28 Jul 2012 - 4:08 pm | तिमा
आम्ही म्हातारे झाल्यापासून, नवीन पिढी काय म्हणते ते आम्हाला कळत नाही, त्यावर उपाय म्हणून, आम्ही काही कळले नाही तरी, आलटून पालटून अरेवा, अरेरे, अरेच्च्या आणि अरे कूल असे उद्गार काढतो.
28 Jul 2012 - 5:11 pm | सोत्रि
अगग...
अरेरे...
- (काव्यात्मक) सोकाजी
28 Jul 2012 - 5:24 pm | चित्रगुप्त