बरक्या फणसाचे गरे

हर्षद बर्वे's picture
हर्षद बर्वे in पाककृती
23 Jun 2008 - 3:36 pm

ओळ्खीच्या खात्रीलायक कोकणातल्या आंबेवाल्यांकडून किंवा आपले कोणी कोकणात असेल तर त्यांच्याकडे सांगून एक छानसा कलींगडाच्या आकाराचा "बरका फणस" कच्चा असताना घरी आणावा. कच्चा असताना अशासाठी कारण ह पिकला की अतिशय मऊ होतो.आणि लगेच फोडावा लागतो. नाहीतर चव उतरते....आंबटपणा येतो ई.
फोडताना खाली वर्तमानपत्राचा कागद पसरावा, हाताला खोबरेल तेल फासावे.....नुसते लाऊन पुरत नाही.ही काळजी फणसाचा चीक ह एक तापदायक प्रकार आहे त्याचा कमीत कमी त्रास व्हावा यासाठी.
बरका फणस हा देठाच्या बाजूला पकडऊन उभा धरावा आणि दुसर्या हाताने देठाखालुन फाडावा(हा फणस फोडायला कोयता, सुरी अशी हत्यारेही लागत नाहीत.)
याचे गरेसुद्धा सहज काढता येतात आणि चवीला अत्यंत मधुर असतात. त्यांचा आस्वाद घ्यावा.

तळटीपा :
१) कोकणातल्या माणसाकडून असे मुद्दाम लिहिले आहे, कारण भय्याकडे मिळणारे फणस हे बहुतेक वेळा "कापा फणस" असतात आणि ते केरळ किंवा कर्नाटकामधून आलेले असतात....केरळी नारळ आणि कोकणातला नारळ यांच्या चवीत(गोडव्यात) जसा फरक असतो तेवढाच फणसात सुद्धा असतो.

२)फणस पिकलेला असला तर घरी येइपर्यंत वाटेतच फुटू शकतो म्हणून कच्चा आणावा....

३) "कलींगडाच्या आकाराचा" लिहिण्याचे कारण एवढ्या आकाराच्या फणसामधे ५० ते ७५ गरे निघतात.तेवढे ४ जणांसाठी पुरतात.बरका फणस लवकर संपवावा अन्यथा तो पाघळू लागतो.
आणि अनुनभवी व्यक्तींनी जपून आडवा हात मारावा. फणस हे प्रकरण काही जणांना पचावयास जड जाते

४) फणस खाऊन झाला की आठळ्या (फणसाच्या बिया) मिठाच्या पाण्यात उकडून घ्याव्यात. सोलून खाव्यात अथवा सोलून त्याची ऊसळ करून खावी छान लागते.

५) आठळ्या खायच्या नसल्या आणि उसळ सुद्धा करावयाची नसली तर कचर्यात फेकुन देउ नयेत.
घराच्या आजूबाजूला किंवा आपण भटकंती ला जाउ तेंव्हा शक्यतो पावसाळ्यात ईकडे तिकडे फेकाव्या. फणसाचा मोठा वृक्ष होतो. आपण विशेष कष्ट न घेता झाडे येतात, त्याला नंतर फणस सुद्दा येतात आणि लाकूड सुद्धा कठीण टिकाऊ आणि म्हणूनच किमती असते.

आपला
हर्षद बर्वे.