म सा सं - पैशे कोण देणार??

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
23 Jun 2008 - 10:44 am
गाभा: 

अ भा म सा महामंडळ या विनोदी संस्थेच्या झालेल्या सभेत, येते मराठी साहित्य संमेलन हे अमेरीकेत घ्यायचे ठरवले आहे. अमेरीकेतही अनेक मराठी साहित्यप्रेमी राहतात त्यामुळे तेथील रसिकांनाही सहित्य संमेलनात सहभागी होण्याचा आनंद मिळावा ही गोष्ट समजू शकते.

पण महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते. महाराष्ट्रातील जनता तो पैसा कररुपाने आणि महसूलरुपाने सरकारी तिजोरीत जमा करत असते त्यामुळे त्या पैशांवर फक्त महाराष्ट्रीय (महाराष्ट्रात राहणार्‍या) जनतेचाच अधिकार आहे.

अमेरिकास्थित मराठी मंडळींनी त्यांच्या हौसेखातर संमेलने जरूर भरवावीत परंतु त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारीही त्यांनीच घ्यावी. महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा त्याकरता खर्च होऊ नये असे वाटते! अमेरिकास्थित मराठी माणसे खोर्‍याने पैसा कमावतात त्यामुळे साहित्य संमेलनाची हौस स्वत:च्या पैशांनी भागवणे त्यांना सहज शक्य आहे असे वाटते!

आपले मत काय?

आपला,
(सर्व कर भरणारा एक प्रामाणिक महाराष्ट्रीय नागरीक) तात्या.

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

23 Jun 2008 - 11:16 am | अमोल केळकर

पण महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते

१०० % सहमत
सान फ्रान्सिस्को ने ठाणे आणी रत्नागिरी वर मात करुन संमेलन आपल्याकडे ओढुन घेतले. भारतात कुठेही असते ( इंदोर, बडोदा, हैद्राबाद) तर सर्वसामान्य साहित्यप्रेमी स्वतःच्या खर्चाने गेला असता पण सान फ्रान्सिस्को ला जाणे परवडेल का?
तेथील मंडळाने ७०-७५ हजारात जाऊन येण्याची सोय केली आहे म्हणे. पण ही रक्कम ही खुप आहे. ज्यांचा पासपोर्ट नाही त्यांनी तर आत्तापासुन फिल्डींग लावायला पाहिजे.

नंदन's picture

23 Jun 2008 - 11:26 am | नंदन

आहे. ह्या संमेलनाला हजेरी लावता येईल याचा व्यक्तिश: आनंद जरी होत असला, तरी त्याचवेळेला महाराष्ट्रातील अनेक रसिकांना ह्याला पारखे व्हावे लागेल. शिवाय काही मूठभर लेखक सोडले तर, इतर लेखकांनाही प्रत्येकी जवळपास लाखभर रूपये मोजून संमेलनाला येणं शक्य होणार नाही. महाराष्ट्र सरकारनेही २५ लाखांचं अनुदान देण्यापेक्षा तो पैसा ग्रंथालयांची अवस्था सुधारण्यात, त्यांच्या कर्मचार्‍यांचे थकलेले पगार देण्यात वापरावा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धमाल मुलगा's picture

23 Jun 2008 - 12:29 pm | धमाल मुलगा

नंदन ह्यांनी केवळ साहित्य संमेलनाच्या परदेश वारीसाठीच्या अनुदानाबद्दलच नव्हे तर ग्रंथालयांची अवस्था सुधारण्याबाबत आणि थकित पगारांबाबत उपस्थित केलेला मुद्दा विचार करण्याजोगा आहे.

अमोल केळकर ह्यांच्या

तर सर्वसामान्य साहित्यप्रेमी स्वतःच्या खर्चाने गेला असता पण सान फ्रान्सिस्को ला जाणे परवडेल का?
तेथील मंडळाने ७०-७५ हजारात जाऊन येण्याची सोय केली आहे म्हणे. पण ही रक्कम ही खुप आहे. ज्यांचा पासपोर्ट नाही त्यांनी तर आत्तापासुन फिल्डींग लावायला पाहिजे.

ह्या मताशीही सहमत.

चाणक्य's picture

23 Jun 2008 - 11:34 am | चाणक्य

महाराष्ट्रातील जनता तो पैसा कररुपाने आणि महसूलरुपाने सरकारी तिजोरीत जमा करत असते त्यामुळे त्या पैशांवर फक्त महाराष्ट्रीय (महाराष्ट्रात राहणार्‍या) जनतेचाच अधिकार आहे.

१००% सहमत तात्या. सरकारने या वर्षी अनुदान अजिबात देऊ नये.
चाणक्य

आर्य's picture

23 Jun 2008 - 11:49 am | आर्य

तात्या मुद्दा अगदी बरोबर आहे, कुणाला परवडणार आहे तिकडे जायला ?

अमेरीकेतील मंडळींना जर संमेलनात सहभागी व्हायचे आहे तर महाराष्ट्रात या ! नाहीतर हौशी साहित्य संमेलन भरवा ! सरकारने अनुदान अजिबात देऊ नये

सरकारी धेंडांना अमेरीका बघयची असेल तर स्वतंत्र अभ्यास सहल करा (स्टडी टुर) ;) त्याला मराठी साहित्य संमेलनाचा मुखवटा नको

मराठी संमेलन प्रेमी (आर्य) X(

भडकमकर मास्तर's picture

23 Jun 2008 - 1:40 pm | भडकमकर मास्तर

सरकारी धेंडांना अमेरीका बघयची असेल तर स्वतंत्र अभ्यास सहल करा (स्टडी टुर) त्याला मराठी साहित्य संमेलनाचा मुखवटा नको
सहमत...
मराठी साहित्य संमेलन ही एक खाजगी संस्था आहे, त्यांनी वाट्टेल तिथे संमेलन घ्यावे पण मग सरकारचा म्हणजेच लोकांचा पैसा वापरू नये...
स्वतः पैसे उभे करावेत... आणि ते काही तिकडल्या बड्या मंडळींना अवघड नाही...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

23 Jun 2008 - 8:06 pm | स्वाती दिनेश

मराठी साहित्य संमेलन ही एक खाजगी संस्था आहे, त्यांनी वाट्टेल तिथे संमेलन घ्यावे पण मग सरकारचा म्हणजेच लोकांचा पैसा वापरू नये...स्वतः पैसे उभे करावेत...
अगदी खरं,१००%सहमत!
(पण हे घडायचं तरी कसं? :? )
स्वाती

अवलिया's picture

23 Jun 2008 - 11:55 am | अवलिया

अमेरिकास्थित मराठी मंडळींनी त्यांच्या हौसेखातर संमेलने जरूर भरवावीत परंतु त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारीही त्यांनीच घ्यावी

१०००००००००००००^१११११११११११११११११११११११११ सहमत

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

बेसनलाडू's picture

23 Jun 2008 - 12:27 pm | बेसनलाडू

येथील मूळ चर्चाविषय व आतापर्यंतच्या प्रतिसादांशी तत्त्वतः सहमत.
(तात्त्विक)बेसनलाडू

मराठी साहित्यिक महामंडळ 'अखिल भारतीय' (?) आणि त्याचे साहित्य संमेलन सानफ्रिस्कोत?

वा! वा! बातमी वाचून धन्य वाटले. भारत इतका विशाल झाल्याचे वाचून अत्यानंद झाला. (याला यु.एस. ऑफ ए. ची मान्यता आहे काय?)
यापुढची सर्व साहित्य संमेलने आता बहुतेक सिंगापूर, मेलबॉर्न, टोक्यो, लंडन, पीटर्सबर्ग, मॉरिशस इ. ठिकाणी भरणार तर..

'अवघे विश्वचि माझे घर, ऐशी मति जयांची थोर...' असे आमंत्रित साहित्यिक आता दरवर्षी नवनवे देश पहात फिरतील
आणि मराठी साहित्य केवळ प्रवासवर्णनांपुरतेच मर्यादित होईल असे वाटते. त्यामुळे सर्वसामान्य वाचकाला 'याचि पुस्तकी याचि डोळा'
परदेश वार्‍या घडवण्याचे पुण्यही त्यांच्या पदरात पडेल हेही नसे थोडके.

सांगली- जयसिंगपूर बसने दुधगावला दररोज येणार्‍या-जाणार्‍या रसिक वाचकाला परदेश परचक्षूने बघण्याची ही संधी सर्व साहित्यिक मंडळी महागाईच्या दिवसात फुकट मिळवून देणार असल्याने परदेशी (?) भरणार्‍या यापुढील सर्व साहित्य संमेलनांना त्या त्या देशाच्या चलनात एक हजार कोटी विनाशर्त अनुदान द्यावे ही सरकारला नम्र विनंती.

तसेच एअरबस ३८० हे विमान विकत घेण्यासाठी आणि त्याच्या इंधन-देखभाल खर्चासाठी गेलाबाजार पाच-सातशे कोटी युरोचे अनुदानही अ.भा.म.सा.मं. ला सरकारने द्यावे ही फारच नम्र विनंती.

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2008 - 11:30 pm | मुक्तसुनीत

सांगली- जयसिंगपूर बसने दुधगावला दररोज येणार्‍या-जाणार्‍या रसिक वाचकाला परदेश परचक्षूने बघण्याची ही संधी

भले शाब्बास , विसुनाना !

ईश्वरी's picture

23 Jun 2008 - 1:01 pm | ईश्वरी

>>...... महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते. .....अमेरिकास्थित मराठी मंडळींनी त्यांच्या हौसेखातर संमेलने जरूर भरवावीत परंतु त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारीही त्यांनीच घ्यावी. .....

तात्यांच्या मताशी १००% सहमत.
शिवाय अमेरिकेतही सॅनफ्रान्सिस्को पासून अति लांब अंतरावर रहाणार्‍या प्रत्येक मराठी रसिकाला या संमेलनाला हजर रहाणे शक्य होईल असे मला नाही वाटत. इस्ट कोस्ट ते वेस्ट कोस्ट प्रवासाच्या विमान तिकीटीला बर्‍यापैकी पैसे मोजावे लागत असल्याने फॅमिलीसकट प्रवास करणे सहजासहजी शक्य नसते.
हे संमेलन भारतातच भरवायला हवे. ज्या अमेरिकनांना संमेलनास उपस्थित रहायचे आहे ते आपापला खर्च करून भारतात येऊ शकतात.
ईश्वरी

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 1:09 pm | विसोबा खेचर

ज्या अमेरिकनांना संमेलनास उपस्थित रहायचे आहे ते आपापला खर्च करून भारतात येऊ शकतात.

माझ्या मते हेच अधिक सोयीचं आहे. अमेरीकेत संमेलन भरवणे ही काहितरी भलतीच टूम निघाली आहे.

ईश्वरी म्हणते त्याप्रमाणे खुद्द अमेरिकेतल्या मंडळींनाही कुटुंबासमवेत एका टोकाकडून दुसर्‍या टोकाला जाणे परवडणारे नाही. बे एरियात एवढे लाख्खो रुपये खर्चून साहित्य संमेलन भरवण्याची टूम काढून फुकटात आपली अमेरीकावारी करायची हौस साहित्य महामंडळातील काही हलकट लोक भागवू पाहात आहेत हेच खरं!

आपला,
(मराठी आंतरजालीय सहित्यिक) तात्या.

भडकमकर मास्तर's picture

23 Jun 2008 - 1:33 pm | भडकमकर मास्तर

फुकटात आपली अमेरीकावारी करायची हौस साहित्य महामंडळातील काही हलकट लोक भागवू पाहात आहेत हेच खरं!

सहमत...
आजच्या लोकसत्तेमध्ये ,मुखपृष्ठावर ... "... आपल्या पुठ्ठ्यातल्या लोकांना अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी ..." अशी वाक्यरचना होती, त्याने भलतीच मौज वाटली... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

24 Jun 2008 - 2:10 am | पिवळा डांबिस

शिवाय अमेरिकेतही सॅनफ्रान्सिस्को पासून अति लांब अंतरावर रहाणार्‍या प्रत्येक मराठी रसिकाला या संमेलनाला हजर रहाणे शक्य होईल असे मला नाही वाटत. इस्ट कोस्ट ते वेस्ट कोस्ट प्रवासाच्या विमान तिकीटीला बर्‍यापैकी पैसे मोजावे लागत असल्याने फॅमिलीसकट प्रवास करणे सहजासहजी शक्य नसते.

हे विधान पटत नाही. जी मराठी मंडळी दरवर्षी/ वर्षाआड भारताची फेरी करू शकतात त्यांना एक वर्ष कोस्ट टू कोस्ट प्रवास परवडत नाही हे पटण्यासारखे नाही. इथल्या लोकांच्या बाबतीत इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर नॉर्थ अमेरिकेत (अमेरिका/ कॅनडा) कुठेही जाता येणे फार अवघड नसावे. ती नसेल तर संमेलन फ्रिस्कोला झाले काय किंवा रत्नागिरीला, काहीच फरक पडत नाही. नाही का?

चतुरंग's picture

24 Jun 2008 - 2:49 am | चतुरंग

डांबीसकाका, वर्षा/दीडवर्षाला भारतात फेरी मारणे तिथे आपल्या घरी राहणे, आई-वडील नातेवाइकांना भेटणे हा भागच निराळा आहे. त्यामागचा उद्देशच वेगळा आहे. ती वारी सुद्धा माझ्यासारख्या पुष्कळांना जडच जाते पण आपण ती करतो, आपल्यासाठी आपल्या लहानग्यांसाठीही त्याचे महत्त्व वेगळेच असते.
आज बॉस्टनहून सॅ.फ्रा.ला विमानाने जाऊन यायचे म्हटले तरी ३ जणांच्या फॅमिलीला कमितकमी २००० ते २५०० डॉलर खर्च आहे. तिथे हाटेलात रहायचे म्हटले तर वेगळा खर्च. इतके पैसे खर्च करुन साहित्य संमेलनाला कोण जाणार? कितीही मराठी आणि साहित्यप्रेमी असलो तरी मी नक्कीच जाणार नाही! कारण गाठ शेवटी व्यवहाराशी येऊन थांबते.
तेव्हा हा फक्त इच्छाशक्तीचा नव्हे तर अर्थशक्तीचाही प्रश्न आहेच.

(अवांतर - अहो आजकाल भारतातही नुसती वर्षाची लग्न-समारंभ, मुंजी वगैरेना जाऊन हजेरी लावायची असेल तर (फक्त हजेरी म्हणतोय, ही घरची कार्ये नव्हेत मित्रमंडळी, नातेवाईक इ.) वर्षाच्या सुरुवातीला बजेट ठरवून ठेवावे लागते. म्हणजे सरासरी दर महिन्याला १ कार्य म्हटले तर घरातले कोण्-कोण जाणार कसे जाणार, खर्च किती इ. तेव्हा फक्त प्रेम, आपुलकी, इच्छाशक्ती ह्याला मागे टाकणारे 'महागाई'चे चटके जवळजवळ सर्वांना आहेत!)

चतुरंग

प्रियाली's picture

24 Jun 2008 - 2:56 am | प्रियाली

लहान मुलांना सोबत घेऊन गेलं तरी त्यांना संमेलनात प्रवेश आहे का? बी एम एम अटलांटाचे काही किस्से ऐकले होते. भीक नको पण कुत्र आवर यांतली गत पालकांची होते असे ऐकून आहे. बेबीसिटींगचा वेगळा भुर्दंडही यांत गणला जावा.

सर्किट's picture

24 Jun 2008 - 7:31 am | सर्किट (not verified)

अगो,

तुज्या बालांचे बेबीशिटिंग आमी करू की गो बाये !

येवड्यासाटी श्यानहोजे ला येने का टालतीस ?

- सर्किट

प्रियाली's picture

24 Jun 2008 - 3:48 pm | प्रियाली

सर्किटकाका,

बाळीला बाळीचे बाबा सांभाळतील (किंवा बाळीच बाबांना सांभाळेल) तसेही दोघांना मराठी अगम्य आहे. मीच येते - बेलाकडे राहणे आणि त्याचा सात्विक आहार मला पसंत आहे. येण्या-जाण्याचा खर्च देता काय? ;) भारताच्या तिकिटापेक्षा नक्की कमी असेल. ;)

पिवळा डांबिस's picture

24 Jun 2008 - 5:20 am | पिवळा डांबिस

अरे बाबा चतुरंगा, तु एकदमच दुसर्‍या टोकाला असल्याने तुझ्यासारख्या लोकांना जरा कठीण आहे हे मान्य आहे. (एखादी त्यावेळेलाच फ्रिस्कोला सुरू असलेली कॉन्फरन्स नाही का शोधता येणार?:)) पण मिडवेस्ट्मधल्या लोकांना, किंबहुना इलिनॉय, मिझोरा, आर्केन्सा, टेक्सस ही जर लाईन आखली तर त्याच्या पश्चिमेकडच्या लोकांना तर शक्य आहे. पूर्वेकडच्या लोकांसाठी भविष्यात परत होईल की नऊयोरक ला!:)

बाकी बेबीसिटींग च्या मुद्द्यात दम आहे. आमचं डेमोग्राफिक वेगळं असल्याने ते माझ्या लक्षांत आलं नाही...:)

अमेयहसमनीस's picture

23 Jun 2008 - 1:08 pm | अमेयहसमनीस

मी आपल्य मताशी सहमत अहे तात्या

काळा_पहाड's picture

23 Jun 2008 - 1:22 pm | काळा_पहाड

सरकारने या वर्षी अनुदान देऊ नये.
आपल्या मताशी १००% सहमत.
बाकी आजकाल 'संयुक्तिक विचार करणाय्रांची वानवाच दिसतेय' असेच हा निर्णय वाचुन प्रत्ययास येते.

विचार करण्याचा प्रयत्न करणारा काळा पहाड

एडिसन's picture

23 Jun 2008 - 1:32 pm | एडिसन

सॅन फ्रान्सिस्को शर्यतीत आहे, अशी बातमी आल्यापासून मला भीती होतीच. पण भीती प्रत्यक्षात उतरेल असे वाटले नव्हते. साहित्य संमेलनाच्या बरोबर पुस्तक प्रदर्शने होत असतात. सामान्य वाचक ह्या निमित्ताने साहित्याच्या जवळ येतो. वाचकानांच काय प्रकाशकांना तरी परवडणार आहे का अमेरिकावारी? हे संमेलन म्हणजे शे-पाचशे लोकांचे वातानुकूलित दालनातले गेट-टूगेदर ठरणार आहे.
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

II राजे II's picture

23 Jun 2008 - 1:33 pm | II राजे II (not verified)

आपल्या मताशी सहमत तात्या !

१००% सहमत.

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

अभिरत भिरभि-या's picture

23 Jun 2008 - 1:52 pm | अभिरत भिरभि-या

सरकारने या वर्षी अनुदान अजिबात देऊ नये म्हणण्यापेक्षा लोकसत्तेतल्या बातमीत म्हटल्याप्रमाणे समांतर संमेलन भरवून अनुदान तिकडे वळवावे असे वाटते ...

वाटाड्या...'s picture

23 Jun 2008 - 7:16 pm | वाटाड्या...

"महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा त्याकरता खर्च होऊ नये असे वाटत" ह्या आपल्या विचाराशी सहमत !!!

एक विचार नक्की येतो तो असा...महाराष्ट्रात तरी आपले सरकार जनतेचा पैसा कुठे जनतेसाठी खर्च करते?? अजुबाजुची परिस्थीती पहाता ते नक्कीच कळते.

आणि अजुन एक..."अमेरिकास्थित मराठी माणसे खोर्‍याने पैसा कमावतात" हे तितकसं खरं नाही. अमेरिकेत ३०-३५ वर्षांपुर्वी जे मराठी लोक आलेत तेच जरा बर्‍या स्थितीत आहेत. अस माझं आपलं एक निरिक्षण आहे आणि ते लोक फारसं नविन पिढिला विचारत नाहीत. अर्थात ह्याला "मराठी" व्रुत्ती पण कारणीभुत आहे. आपण लोक इकडे सुद्धा एकामेकाला पाण्यात पाहतात. अहंगंड, मीपणा इ. इ...

पण इतर समा़ज तसा नाही. ह्याची कित्येक उदाहरणे आहेत. पण आजचा विषय तो नाही सबब इथेच थांबतो.

धन्यवाद..

आपला...

मुकुल

पिवळा डांबिस's picture

24 Jun 2008 - 5:16 am | पिवळा डांबिस

"अमेरिकास्थित मराठी माणसे खोर्‍याने पैसा कमावतात" हे तितकसं खरं नाही.
:)
हे वाचून गंमत वाटली. अहो हे "तितकसं" काय अजिबात खरं नाही!!
अहो च्यामारी काय चूक झाली म्हायतीय का?
सुरवातीला मुंबईहून यायच्या वेळेला एक खोरं बरोबर आणायला विसरलो...:)
आता खोरंच नाही तर पैसा येणार कुठून, तुम्ही सांगा?

आता पुढल्या वेळेला मुंबईला आलं ना की एक खोरं खरेदी केलं पाहिजे. मुंबईत तरी ते मिळतं की नाही कोणास ठाऊक! काही हरकत नाही, अगदी ग्रामीण भागात म्हणजे कोल्हापूर, औरंगाबादला जायला लागलं तरी बेहत्तर पण खोरं घेतल्याशिवाय वापस यायचंच नाही....
(ह्.घ्या.)

खट्याळ,
डांबिसकाका

पैशानं खोरं घ्यायचं! (कोंबडी आधी की अंडं??) ;)

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

24 Jun 2008 - 6:13 am | पिवळा डांबिस

अरं बाबा, तसं न्हाय! तुला बराबर समजलं न्हायी....
"रुपयं" टाकून खोरं घ्यायाचं आणि मग त्या खोर्‍यानं "डालर" वढायचे....:)
अरं ह्येच आपल्या म्हराटी मानसाचं चुकतंय बघ! इन्वेष्टमेंटबिगर कंचाबी धंदा चालतोय काय!!:)

पागुटीत डालर खोचनारा,
डांबिसकाका

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2008 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॅलीफोर्नियात अ.भा.म.सा.संमेलन होत आहे ही चांगली गोष्ट आहे. माझे मत आहे की तिकडे एक संमेलन भरवावे आणि इकडे एक !!!
महाराष्ट्र सरकार किती पैसे देते ते काही पुरणार नाहीत, या संमेलनाचा खर्च पंचवीस कोटी ग्रहीत धरलेला आहे. आम्हाला कमाल वाटली ती ही की येणा-या कोणत्याही साहित्यरसिकाचे अर्धा खर्च बेरियाचे मंडळ उचलते आहे आणि मुख्य पदाधिका-यांचा सर्वच खर्च उचलत आहे. हेवा वाटला बॉ आम्हाला त्या पदाधिका-यांचा. इतके पैसे उभे केले आहेत हा एक साहित्याचा वाचक म्हणुन जरा धक्काच वाटत आहे.
इतक्या पैशांमधे इकडे काय काय करता आले असते असा एक सात्विक विचारही डोकावून गेला.

रत्नागिरीत संमेलन भरले असते तर मजा आली असती, जाण्याचा विचारही होता, एक भारावून टाकणारे वातावरण, अनुभुती असते. परिसंवादात नवविचार ऐकायला मिळतात, असो साहित्यसंमेलनात कविता वाचायची हौस भागलेली आहे. आता संमेलन कुठेही होवो !!!
( काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही, साहित्याच्या दरबारात काही गोष्टी तोलणार नाही)

साहित्य परिषदांचे अजीव सभासदांना साहित्यसंमेलनाला मोफत घेऊन जावे अशी आमची मागणी आहे. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(मराठवाडा साहित्य परिषदेचा अजीव सभासद ,औरंगाबाद !!!)

ता.क. : तात्यांनी हा धगधगता विषय चर्चेला टाकल्याबद्दल आभार !!! साहित्य संमेलनाची सांगता होईपर्यंत साहित्य संमेलन विषय इथेच पुढेही चर्चिल्या जावे असे वाटते किंवा एखाद्या स्वतंत्र विभागात !!!

बेसनलाडू's picture

23 Jun 2008 - 9:34 pm | बेसनलाडू

सर,मी स्वतः सॅनफ्रान्सिस्को बे एरियात राहतो.येथील मंडळ (अधिकृतरित्या - म्हणजे नोंदणी झाल्यापासून) २५ वर्षे जुने आहे.हे (माझ्या माहितीप्रमाणे)अमेरिकेतील सर्वात मोठे महाराष्ट्र मंडळ आहे.पण ज्याला संमेलनास हजर रहावयाचे आहे,अशा कोणाचाही (अर्धाही)खर्च उचलण्याइतके ते श्रीमंत आहे की नाही,याबाबत मला शंका वाटते.मंडळ जो माणशी ७०-७५ हजार रु. खर्च उचलणार आहे,तो साहित्य परिषदेचे पदाधिकारी,संमेलनाचे विद्यमान व माजी अध्यक्ष,साहित्य परिषदेच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर्(म्हणजे कोण ते अद्याप मला माहीत नाही!) यांचा आहे,असे ऐकून आहे.याबद्दल तपशीलवार माहिती गोळा करून त्याचा गोषवारा येथे मांडायचा प्रयत्न करेनच,पण सामान्य रसिकांचा अर्धा खर्च जरी मंडळाने उचलायचे ठरविले,तरी हजारो रसिक येनकेनप्रकारेण संमेलनापासून वंचित राहतील,हे नक्की.
(सविस्तर)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2008 - 9:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळ जो माणशी ७०-७५ हजार रु. खर्च उचलणार आहे,तो साहित्य परिषदेचे पदाधिकारी,संमेलनाचे विद्यमान व माजी अध्यक्ष,साहित्य परिषदेच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर्(म्हणजे कोण ते अद्याप मला माहीत नाही!) यांचा आहे,असे ऐकून आहे.

सर्व अ.भा.सा.सं. चे पदाधिकारी यांचा संपुर्ण खर्च तर तेच उचलणार आहेत असे कळते आहे. बाकी आमच्या सारखे हौसे गवसे, यांचा अर्धा खर्च म्हणजे ७५ हजार रुपयात पाच दिवस आणि परत भारत असे माझ्या डोळ्यासमोर आहे. अर्थात आता त्याच्या बरेच बदलही होतील.

तपशीलवार माहिती गोळा करून त्याचा गोषवारा येथे मांडायचा प्रयत्न करेनच,
येऊ द्या माहिती !!!

पण सामान्य रसिकांचा अर्धा खर्च जरी मंडळाने उचलायचे ठरविले,तरी हजारो रसिक येनकेनप्रकारेण संमेलनापासून वंचित राहतील,हे नक्की.

ते तर होणारच आहे !!! अहो, रत्नागिरीतच जायचे की नाही याचा विचार आम्हाला करावा लागतो. तिथे बे एरियात किती येतील याची उत्सुकता आहेच !!!!

दोन हजार सभासद आहेत म्हणतात त्या मंडळाचे. त्यांच्याकडून किती पैसे घेतील, घेतले असतील, किंवा तिकडे कोणी प्रायोजक तर नाही ना त्यांना मिळाला ?

बेसनलाडू's picture

24 Jun 2008 - 12:24 am | बेसनलाडू

सर्व अ.भा.सा.सं. चे पदाधिकारी यांचा संपुर्ण खर्च तर तेच उचलणार आहेत असे कळते आहे. बाकी आमच्या सारखे हौसे गवसे, यांचा अर्धा खर्च म्हणजे ७५ हजार रुपयात पाच दिवस आणि परत भारत असे माझ्या डोळ्यासमोर आहे. अर्थात आता त्याच्या बरेच बदलही होतील.
दै.लोकसत्ता मधील बातमीशी तुमची माहिती जुळते आहे.मंडळ तितकेही श्रीमंत नसावे,हा माझा अंदाज जरा जास्तच चुकलेला दिसतो ;).मात्र ७०-७५ हजाराचा खर्च परवडणारे अमेरिकेत येऊन संमेलनाला उपस्थिती लावतील की नातलगांना भेटणे,कॅलिफोर्नियामधील इतर प्रेक्षणीय स्थळे पाहणे करतील,हा सुद्धा वेगळा विषय आहेच.
(मध्यमवर्गीय)बेसनलाडू
सर,तुम्ही आलातच तर माझ्याकडे उतरा.खाणेपिणे,स्थलदर्शन मोफत नि चोख :) संध्याकाळी संमेलन आटोपले की मस्तपैकी मासळीचे जेवण हाणू,काय म्हणता?
(आमंत्रक)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

24 Jun 2008 - 1:54 am | पिवळा डांबिस

विषय मस्तच आहे.....
चर्चा छानच रंगली आहे...
:)
माझ्या माहीतीप्रमाणे हे ८२वे साहित्य संमेलन आहे. त्याला १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. साहित्यसंमेलनाला सरकारी अनुदान २५ लाख रुपये (४०च्या हिशोबाने धरलं तर ६२,५०० डॉलर्स) मिळतं.
हे माझे आकडे नाहीत तर प्रेस मध्ये आलेले आकडे आहेत.

मी काय म्हणतो, सर्व मिपाकरांनी असं निकरावर येण्यापेक्षा आपले तीन मिपाकर बे एरियात आहेत. त्यांना मंडळाच्या पदाधिकार्‍यांना एक फोन करून विचारायला सांगूयात का की बाबा बे एरिया मंडळाला महाराष्ट्र सरकारकडून अनुदानाची अपेक्षा आहे का? नाही म्हणजे ती माहिती आपल्या चर्चेला वेगळं वळ्ण लावणार नाही का?
आग्रह नाही हो, पण आमचा आपला एक विचार!:)

बाकी संमेलनच भारताबाहेर घ्यायचे की नाही हा विषय असेल तर मी म्हणतो कधी कधी घ्यायला काय हरकत आहे? ८१ वेळा मोठ्या घरी गणपती बसला, एकदा छोट्या घरी बसवला तर बिघडलं कुठं? भारताबाहेर कार्यरत असलेल्या एका मराठी संस्थेला २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अखिल मराठी समाजाने ही भेट दिली तर काय मोठं नुकसान होणार आहे? महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला जाता येणार नाही मान्य आहे, पण त्यांना पुढच्या वर्षी संधी आहेच की! बाकी अमेरिकेत इतर ठिकाणी रहाणार्‍या लोकांना आर्थिक दृष्टया उपस्थित रहाणे शक्य आहे, प्रश्न इच्छाशक्तीचा आहे असे आम्हाला वाटते.

संध्याकाळी संमेलन आटोपले की मस्तपैकी मासळीचे जेवण हाणू,काय म्हणता?
हे काय? फक्त सरांनाच आमंत्रण?
आम्ही आलो तर चालणार नाही का? :)))

बेसनलाडू's picture

24 Jun 2008 - 4:32 am | बेसनलाडू

तुम्हीही या काका.आपण तुम्हांला 'अखिल अमेरिकन मिसळपाव साहित्य संमेलन'चा घरगुती अध्यक्ष करूया ;)
(निमंत्रक)बेसनलाडू
बाकी मंडळाने दरमाणशी दरदिवसा १०-१५ हजार रुपये खर्चायची तयारी दर्शविली असेल,तर मंडळाला सरकारी अनुदानाची अपेक्षा नाही,असे वाटते.
(अंदाजपंचे)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

24 Jun 2008 - 5:01 am | पिवळा डांबिस

थॅन्क्यू मिष्टर बेसनलाडू,
ते अध्यक्ष वगैरे जाऊ द्या, पण जर आलो तर जरूर कळवू.:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jun 2008 - 7:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर,तुम्ही आलातच तर माझ्याकडे उतरा.खाणेपिणे,स्थलदर्शन मोफत नि चोख संध्याकाळी संमेलन आटोपले की मस्तपैकी मासळीचे जेवण हाणू,काय म्हणता?
बेला,
मला परवडणारं नाही इतक्या दुर येणं, पण आपलं निमंत्रण सही दिलसे पोहचलं !!!
साहित्यानं माणसं जोडल्या जातात की नाही, माहित नाही. पण संमेलनाच्या निमित्तानं मराठी माणसं जोडल्या जाताहेत हीच एक आनंदाची गोष्ट दिसत आहे. आम्ही आपले आभारी आहोत !!!

-दिलीप बिरुटे

प्रियाली's picture

23 Jun 2008 - 9:22 pm | प्रियाली

इतके खर्च करून साहित्यसंमेलने, तीही आता परदेशांत कशाला हवीत? त्यापेक्षा एक करावे, बे एरियातील मंडळींनी साहित्य संमेलन आयोजित करावे. भारतातील सर्व साहित्यिकांना, इतर खंडातील साहित्यिक आणि रसिकांना इ-साहित्यसंमेलनाचे एक संकेतस्थळ काढून कॉन्फरन्स-जोडणीने जोडून घ्यावे. जो तो आपापल्या घरी बसून साहित्य संमेलनाचा आनंद घेऊ शकेल.

बेसनलाडू's picture

23 Jun 2008 - 9:29 pm | बेसनलाडू

भारतातील आंतरजालाचा वेग लक्षात घेता ई-संमेलन महाकठीण गोष्ट आहे.समांतर साहित्य संमेलनाची कल्पना तितकीशी वाईट नाही.अशा समांतर संमेलनाच्या ठिकाणी कॉन्फरन्स करणे अधिक सुलभ होईलसे वाटते.
(तांत्रिक)बेसनलाडू

प्रियाली's picture

23 Jun 2008 - 10:18 pm | प्रियाली

प्रतिसादाखाली ह. घ्या सांगायचे राहून गेले.

भारतातील आंतरजालाचा वेग लक्षात घेता ई-संमेलन महाकठीण गोष्ट आहे.

मान्य आहे परंतु अनेकांचा खर्च मंडळाने देऊ करण्यापेक्षाही कठीण व्हावे का?

बेसनलाडू's picture

23 Jun 2008 - 10:27 pm | बेसनलाडू

मान्य आहे परंतु अनेकांचा खर्च मंडळाने देऊ करण्यापेक्षाही कठीण व्हावे का?
एम टी एन् एल् च्या ब्रॉडब्यान्ड कनेक्शनचा अनुभव (!) घेतल्यापासून चित्र जरासे आशादायक बनले आहे हे खरे असले तरी महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागांत असलेले बी एस् एन् एल् चे कनेक्शन नि डायल-अप्स यांना रिप्लेस् करायचा खर्च अमेरिकेत येऊन संमेलनास हजेरी लावणार्‍या निवडक माणसांच्या दरदिवसा दरमाणशी १५हजार रुपये (असे पाच दिवस) या खर्चापेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे :)
(अंदाजपंचे)बेसनलाडू
बाकी,शेरेटन,क्राउन प्लाझा,हिल्टन आणि मेरिअट् मध्ये वगैरे रहायची व्यवस्था करण्याऐवजी बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांच्या घरी आमंत्रितांची ५ दिवसांची व्यवस्था केली गेली,मंडळाच्या सदस्यांच्या गाड्यांनी एअरपोर्ट पिक-अप्स नि ड्रॉप-ऑफ्स तसेच सॅनफ्रान्सिस्को दर्शन उरकता आले,तर हा दरदिवसा दरमाणशी १५ हजाराचा खर्चही वाचेल :)
(काटकसरी)बेसनलाडू

प्रियाली's picture

23 Jun 2008 - 10:31 pm | प्रियाली

जेथे कनेक्शन चांगले आहे तेथे लोकांना (त्या त्या गावात) एकत्र जमून एका हॉलमध्ये असे केले किंवा एखाद्या जमण्याच्या ठीकाणी जलद कनेक्शनची जोडणी करून घेतली तर अगदी घरात बसून नको परंतु गावात बसून तरी करता यावे.

हेच इतर देशांतील आणि बे एरियापासून हजार मैल दूर राहणार्‍या आमच्यासारख्या गरीब भारतीयांनाही परवडेल असे वाटते. ;)

बाकी,शेरेटन,क्राउन प्लाझा,हिल्टन आणि मेरिअट् मध्ये वगैरे रहायची व्यवस्था करण्याऐवजी बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांच्या घरी आमंत्रितांची ५ दिवसांची व्यवस्था केली गेली,मंडळाच्या सदस्यांच्या गाड्यांनी एअरपोर्ट पिक-अप्स नि ड्रॉप-ऑफ्स तसेच सॅनफ्रान्सिस्को दर्शन उरकता आले,तर हा दरदिवसा दरमाणशी १५ हजाराचा खर्चही वाचेल

आणि मला वाटलं की येणार्‍या पाहुण्यांना घरात ठेवणे आणि त्यांना गाव फिरवणे हे म. मं.च्या कार्यकारी समितीचे आद्य कर्तव्य आहे. ;) बहुधा बर्‍याच ठीकाणी तसेच होत असावे.

ध्रुव's picture

24 Jun 2008 - 8:46 am | ध्रुव

जेथे कनेक्शन चांगले आहे तेथे लोकांना (त्या त्या गावात) एकत्र जमून एका हॉलमध्ये असे केले किंवा एखाद्या जमण्याच्या ठीकाणी जलद कनेक्शनची जोडणी करून घेतली तर अगदी घरात बसून नको परंतु गावात बसून तरी करता यावे.
+१ तात्पुरते एक कनेक्शन घेऊन एका मोठ्या हॉलमध्येही हे करता येईल.
इतकाही वेग कमी नाही हो ;)
--
ध्रुव

सर्किट's picture

24 Jun 2008 - 9:51 am | सर्किट (not verified)

मिष्टर बेसनलाडू,

एकीकडे तुमचे सिस्को टेलिप्रेझेन्स भारतात टाकते आहे. परवाच माझी त्य टेलीप्रेझेन्सवर एक मीटिंग झाली. अगदी खोलीत स्वतःच हजर असल्यासारखे वाटते. सिस्को झिंदाबाद.

आणि तुम्ही म्हणता की हे रिमोट संमेलन शक्य नाही म्हणून !

असे कसे बुवा ?

अओ, पैसे खर्च केले की वाट्टेल तितकी ब्यांडविड्थ मिळते.

हो , भारतात देखील.

बघा, सिस्को ला साहित्य संमेलनसाठी स्पॉन्सर म्हणून आठवले प्रयत्न करताहेत.

तुम्ही पण चेम्बर्स ला पटवा. म्हणा बिरुटे सरांना हे संमेलन घर बसता बघता यावे ह्यासाठी सिस्कोच्य राऊटर्सचा खप वाढेल !!!

- सर्किट

बेसनलाडू's picture

24 Jun 2008 - 11:38 am | बेसनलाडू

अओ, पैसे खर्च केले की वाट्टेल तितकी ब्यांडविड्थ मिळते.हो , भारतात देखील.
हो का? मग येथल्या संमेलनावर बे एरिया महाराष्ट्र मंडळाचा जो खर्च होणार आहे,तो तिकडे वळवूया.रसिकांचा दरदिवसा दरमाणशी १५हजार रु. खर्च करण्याऐवजी मंडळाने ते पैसे सिस्कोला द्यावेत,कसे?म्हणजे संमेलन तिकडेही अनुभवता येईल आणि अमेरिकेत यायला न मिळण्याबद्दलच्या तक्रारी दूर होतील.मला या वर्षीचा बोनसही मिळेल पूर्ण! ;) :P
(सिस्कोआइट)बेसनलाडू

सर्किट's picture

24 Jun 2008 - 11:45 am | सर्किट (not verified)

:-) :-)

२५ टके मिळला असेल की मार्च मध्ये ;-)

असो, अरे हेच होणार आहे.

सिस्को स्पॉन्सर म्हणून सा सम्मेलनाला २ कोटी रुपये देईल. चेम्बर्स विलासराव शी एकांतात चर्चा करेल, आणि २०-२५ कोटी महाराष्ट्र सरकार सिस्कोचे राऊटर्स घेण्यात घालवेल.

हे मराठी बाणा दाखवून २५ लाख वाचवणारे लोक, २५ कोटी आनंदात खर्च करतील ;-)

- सर्किट

नंदन's picture

24 Jun 2008 - 11:52 am | नंदन

>>> चेम्बर्स विलासराव शी एकांतात चर्चा करेल, आणि २०-२५ कोटी महाराष्ट्र सरकार सिस्कोचे राऊटर्स घेण्यात घालवेल.

यालाच "राऊटिंग" (किंवा रि-राऊटिंग) म्हणत असावेत. 'राऊ ते राऊटेड : महाराष्ट्राचा एक प्रवास' ह्या विषयावर परिसंवादही भरवता येईल की. :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सर्किट's picture

24 Jun 2008 - 11:55 am | सर्किट (not verified)

परिसंवादाची आयडिया मस्त !!!

(क्वालकॉमचे पण भले करेलच की मायबाप सरकार. ते स्पॉन्सरशिपचे बघ :-)

- सर्किट

धमाल मुलगा's picture

24 Jun 2008 - 2:11 pm | धमाल मुलगा

आणि २०-२५ कोटी महाराष्ट्र सरकार सिस्कोचे राऊटर्स घेण्यात घालवेल.

हे मराठी बाणा दाखवून २५ लाख वाचवणारे लोक, २५ कोटी आनंदात खर्च करतील

सर्किटराव,
हे राऊटर्स जर high end communication वर आधारित असलेल्या मिटिंग्जसाठी वापरता येऊ शकले तर ते पैसे व्यर्थ कसे खर्च होतील?
त्यांचा उपयोग साहित्य संमेलनानंतरही होऊ शकेल ना? कदाचित ह्या आणि अश्या प्रसंगी सबसिडाईज्ड भाडं आकारुन आणि इतर वेळी व्यावसायिक दृष्टीने उपयोग करुन त्या २५ कोटींचा योग्य तो उपभोग घेता येऊ शकेल.

अर्थात ह्यासाठी, सरकार आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी असणार्‍यांची व ते निर्णय अमलात आणणार्‍या सरकारी अधिकार्‍यांची इच्छाशक्ती असणे हेही तितकेच किंबहुना जास्त महत्वाचे.

असे झाल्यास कररुपाने गोळा केलेला जनतेचा पैसा उत्तम तंत्रज्ञान वापरात आणण्यासाठी वापरला गेल्याचं समाधानही मिळेल...आणी ते पुन्हा पुन्हा वापरताही येइलच की.
पण अनुदानास्तव दिलेले २५ लाख एकदा गेले की गेलेच !

त्याउप्पर, मराठी साहित्य संमेलनासाठी दिले जाणारे अनुदान हे भारतीय करदात्यांच्या करातुन जाणार असताना, त्याचा उपभोग मात्र भारतातील काही मुठभरच अमेरिकेत जाऊन घेऊ शकतील, संमेलनास उपस्थित राहू शकतील हे मात्र योग्य वाटत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jun 2008 - 10:13 pm | llपुण्याचे पेशवेll

कॉन्फरन्स कॉल सोडून बाकी सर्व मतांशी सहमत.....

पुण्याचे पेशवे

ऋषिकेश's picture

23 Jun 2008 - 10:40 pm | ऋषिकेश

चर्चा विषयाशी १००% सहमत!
पण हे सरकारला कळले तरी ते अंमलात आणायचे धाडस दाखवणार नाहि असे खेदाने म्हणावेसे वाटते :(

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मुक्तसुनीत's picture

23 Jun 2008 - 11:17 pm | मुक्तसुनीत

पैशाच्या मुद्द्यावर मूळ प्रस्तावाशी सहमत आहे. हा सगळा बनाव सरकारी खर्चात अमेरिकावारी करण्याचा दिसतो. यामागे वाचक संस्कृती, सांस्कृतिक देवाणघेवाण याबद्दल फारसा विचार दिसत नाही आहे.

दर दोन वर्षांनी बृहन्महाराष्ट्रमंडळाचा (बीएमएम )उत्सव अमेरिकेमधे होतच असतो. साहित्यिकांबरोबर इतर सांस्कृतिक/राजकीय/संशोधनादि क्षेत्रातील लोकांची हजेरी लागत असते. या पार्श्वभूमीवर , साहित्य संमेलनाचा पसारा मांडण्याचे कारण कळत नाही. बीएमएम च्या या सोहळ्याला अमेरिकाभरच्या मंडळांमधे सहकार्य असते. एकूण व्यवस्था , अर्थशास्त्र आणि लोकांचा प्रतिसाद या सगळ्याची सांगड घातलेली असते. मोठ्या प्रमाणात नियोजन केलेले असते. बे एरिया चे मंडळ (खरे तर सवतासुभा होऊन बनलेली २ मंडळे) कितीही मोठे असले तरी त्याना या प्रकारचा समन्वय साधण्याशिवाय पर्याय नाही. तसे काही होते आहे का हे अजून स्पष्ट झालेले दिसत नाही. "लोकांच्या २५ कोटींवर काही रावबहादूरांनी सहकुटुंब केलेली मज्जा" इतपत जर या संमेलनाचे स्वरूप रहाणार असेल तर ते अश्लाघ्य आहे.

चित्रा's picture

23 Jun 2008 - 11:48 pm | चित्रा

या मराठी साहित्य संमेलनाचा भार (विशेषतः प्रवासखर्च) भारतीय करदात्यांवर पडू नये हे नक्कीच.

अनन्त जोशि's picture

24 Jun 2008 - 12:03 am | अनन्त जोशि

आता पर देशात सम्मेलने घेतलि तर परदेशि सहित्यिक बनन्याचि प्रेरना तरि मिलेल...हा हा हा...जोक होता ...

विकास's picture

24 Jun 2008 - 1:00 am | विकास

असले संमेलन हे सॅनफ्रॅन्सिस्को किंवा भारताबाहेर होऊ नये असे वाटते. पण जरा वेगळे लिहावेसे वाटते -

आधी बर्‍याच प्रतिक्रीयेतून आलेला मुद्दा - देशी सरकारी पैशाने होणारा देशी तमाशा हा देशातील रसिकांपुरताच मर्यादीत असावा हे एक कारण झाले...

पण आता वाचल्याप्रमाणे बे एरीयावासी याचा खर्च उचलणार आहेत! तरी पण हे अखिल भारतीय कसे काय झाले?

माझ्या दृष्टीने मुद्दा वेगळाच आहे: "अखिल भारतीय मराठी साहीत्य महामंडळ" अशी सेवाभावी संस्था (नॉन प्रॉफिट) भारताबाहेर कसे काय आधिवेशन करते? त्यांच्या घटनेत देशाबाहेर कार्यक्रमास वाव आहे का?

येथे करदात्यांचा मुद्दा दोन प्रकारे आहे: एक म्हणजे सरकारी अनुदान आणि दुसरे म्हणजे अशा कार्यक्रमांना देणग्या देणार्‍यांना परत करसवलत - म्हणजे करवसुली कमी..

आत्ताच म.टा.चा या संदर्भात अग्रलेख वाचला. त्यातील काही वाक्ये खाली सांगत आहे:

....'मराठी ग्रंथकार सभे'ने १८८५मध्ये महात्मा जोतिबा फुले यांना साहित्य संमेलनाचे आमंत्रण दिले, तेव्हा त्यांनी अत्यंत रोखठोक शब्दांत आयोजकांना कसे खडसावले होते, याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे.

'आमचे साहित्य आम्ही निर्माण करू आणि आमच्या ग्रंथकार सभा आम्ही घेऊ. उच्चभ्रू ब्राह्माणी ग्रंथकार स्त्री-शूदातिशूदांच्या प्रश्ानवर अवाक्षरही लिहीत नाहीत. त्यामुळे अशा ग्रंथकार सभेमार्फत देश-समाजाचा अजिबात उत्कर्ष होणार नाही,' अशा शब्दांत महात्मा फुल्यांनी त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली होती. ...

आता या संमेलनाच्या निमित्ताने सॅन फ्रान्सिस्को आणि बे एरिया परिसरातील 'केएफसी' (म्हणजे केंटुकी फ्राईड चिकन) व 'मॅक' (म्हणजे मॅक्डोनाल्ड!) या दुकानादुकानांत मराठीचा गजर होईल आणि इंग्लंडमधल्या नव्हे तरी अमेरिकेतल्या साहेबाला मराठी मात्रेचे चार वळसे दिल्याचे समाधान पदरी पडेल. तेवढे पुण्य पदरात पाडून 'माय'देशी परतल्यावर पुन्हा एकदा या 'महाराष्ट्र देशी 'मऱ्हाटी' भाषेला भवितव्य उरलेच नाही!' म्हणून गळे काढून रडायला महामंडळ मोकळे होईल! १८८५च्या 'ग्रंथकार सभे'ला विरोध करताना महात्मा फुल्यांनी त्या संमेलनाच्या आयोजकांची 'घालमोडेदादा' या शब्दांत संभावना केली होती. अमेरिकेतल्या या संमेलनाच्या आयोजकांसाठीही त्यापेक्षा चांगला शब्द सुचणे कठीण आहे!

मुक्तसुनीत's picture

24 Jun 2008 - 1:17 am | मुक्तसुनीत

अर्थकारणाचा भाग वगळता , परदेशी संमेलन भरवण्याला विरोध नीटसा समजला नाही.

इंदौर, ग्वाल्हेर , बडोदे , वगैरे ठिकाणी संमेलने होतात. मॉरिशसला जागतिक मराठी परिषदेचा पहिला मोठ्ठा सोहळा होतो. आणि त्यात पुल, कुसुमाग्रज, शरद पवार वगैरे वगैरे लोक आशीर्वादाला असतात. असे असल्यास मग परदेशालाच विरोध का ? शेवटी , SFO ला संमेलन होते याचा अर्थ तिकडे मराठी समाजाचा एक छोटासा तुकडा आहे हे नजरेआड करून कसे चालेल ? हे संमेलन काही आफ्रिकेतल्या एका निर्जन भागात तर होत नाही. परदेशस्थ मराठी लोकांमधे या निमित्ताने काही सांस्कृतिक दळणवळण होईल, परदेशातील मराठी वाचक संस्कृतीला या निमित्ताने थोडा उजाळा मिळेल असे काही तरी चांगले हाती लागेलच की. " कुंपणापलिकडले शेत" यासारखे, परदेशी लोकांच्या मराठी साहित्याचे संकलन निघाले सुमारे २५ वर्षांपूर्वी. त्यानंतरच्या काळात एकतासारखी मराठी प्रकाशने , महाराष्ट्र फाऊंडेशन सारख्या १ मिलियन डॉलर्स पाठवणार्‍या संस्था, बीएमेम सारखी संमेलने , परदेशस्थांनी चालवलेली मनोगत सारखी संस्थळे या सार्‍या गोष्टी , परदेशी मराठी संस्कृती जिवंतच नव्हे तर वर्धिष्णू आहे याचे द्योतक आहेत.

विरोध आयते खाण्याला असावा. करदात्यांच्या पैशाच्या अपव्ययाबद्दल असावा . परदेशी भरलेली संमेलने हा प्रकार नवा नाही आणि त्याला विरोधाकरता विरोध अयोग्य वाटतो.

विकास's picture

24 Jun 2008 - 3:20 am | विकास

परदेशी भरलेली संमेलने हा प्रकार नवा नाही आणि त्याला विरोधाकरता विरोध अयोग्य वाटतो.

माझा मुद्दा कदाचीत मी तितकासा नीट स्पष्ट केला नाही असे वाटते. तो तात्विक असण्यापेक्षा कायद्याशी संबंधीत होता आणि आहे. अ.भा. म. सा. प. ही संस्था भारतापुरती मर्यादीत आहे. तीचे "मिशन"/"ध्येय" हे भारताबाहेर कामे करायला आणि त्यात पैसे खर्च करण्यासाठीची नाही.... त्यामुळे अशा संस्थेअंतर्गत राजरोसपणे असले कार्यक्रम करणे याने अजून एक अनिष्ठ प्रथा पडते आहे असे माझे म्हणणे आहे आणि त्याला विरोध आहे.

अशा पद्धतीचा सोहळा बीएमएम खाली अथवा जागतीक मराठी परीषदे खाली झाल्यास तो योग्य आहे. (अवांतरः सध्या जागतीक मराठी परीषद काय करतेय?). थोडक्यात त्यामुळे भारतात भारतीयांसाठीचे संमेलन पण राहील ज्याचीपण गरज आहे आणि बाहेर पण संमेलन होऊ शकेल.

दुसरा भाग (ज्या साठी विरोध नाही पण लॉजिस्टी़कल इश्यू नक्की वाटतो): बीएमएम आधिवेशनाला (जेंव्हा बॉस्टन मधे झाले तेंव्हा त्याच्या कार्यकारणीत सक्रीय होतो - अंदाजे ४००० लोकं जमले होते) साधारण ३ ते ५००० लोकं जमतात - कोणी नाटकात भाग घेतल्यामुळे येतो तर कोणी भाग घेतलेल्यांबरोबर. कोणी स्थानीक (म्हणजे आजूबाजूची राज्ये धरून) असतात म्हणून तर कोणी त्यातील भारतीय कलाकारांना पहायला म्हणून. पण केवळ साहीत्यासाठी म्हणून लोकं जमणे जरा अवघड वाटते. याचा अर्थ म्हणून असा प्रयत्न करूच नये असा नाही. पण मग त्यामुळे देखील ते वेगळे म्हणून करावे असे वाटते.

मुक्तसुनीत's picture

24 Jun 2008 - 1:29 am | मुक्तसुनीत

फुल्यांनी ब्राम्हणी वर्चस्वावर , तत्कालीन ग्रंथसभेतल्या जातीपातीआधारित व्यवस्थेवर ओढलेले कोरडे आणि प्रस्तुत साहित्यसंमेलनाला मटा सारख्या टॅब्लोईडच्या संपादकाने केलेला विरोध यातील संगती मला कळली नाही. फुले-आंबेडकर-सावरकर-टिळक यांची कुठलीही वक्तव्ये आउट्-ऑफ-कॉन्टेक्स्ट घ्यावी आणि दुगाण्या झाडाव्या हे बाकी मराठी टेब्लॉईडच्या संपादकाला शोभते. असो.

सर्किट's picture

24 Jun 2008 - 4:35 am | सर्किट (not verified)

प्रकाटाआ.

- सर्किट

प्रियाली's picture

24 Jun 2008 - 5:15 am | प्रियाली

प्रकाटाआ हाच वरिजनल प्रतिसाद होता काय हो? तसे असल्यास बे एरियात साहित्य संमेलन घेणं आत्यंतिक गरजेचं आहे. भांडणांचे धडे, मराठी बाणा इ. इ. मूळापासून गिरवायला हवेत सर्केश्वर तुम्ही! कधीतरी उगवायचं आणि प्रकाटाआ सारखे प्रतिसाद देऊन जायचं... बरं दिसत नाही हो! ;)

ह. घ्या. ;)

सर्किट's picture

24 Jun 2008 - 7:00 am | सर्किट (not verified)

ह्या उत्कृष्टविष्हयावर मला नुस्ता प्रतिसाद न देता पूर्ण लेखच लिहायला हवा, म्हणून हा अल्पमती प्रतिसाद काढून टाकला आहे.

क्षमस्व.

- सर्किट

सर्किट's picture

24 Jun 2008 - 7:03 am | सर्किट (not verified)

वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे संएलनाचा खर्च कोटींमध्ये, आणि सरकारचे अनुदान फक्त पंचवीस लाख ?

बे एरियातले दहा लोक गोळा केले, की तेवढे पैशे निघतील सहज !

- सर्किट

मनस्वी's picture

24 Jun 2008 - 11:55 am | मनस्वी

साहित्य महामंडळावर "ब्लॉगविश्‍वा'तून टीकास्त्र

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

मयुरयेलपले's picture

24 Jun 2008 - 12:11 pm | मयुरयेलपले

प्रतिक्रिया लिहायच आवरल नाहि म्हणुन....
आमच्या पंढरपुरात वारि निमित्त हजारो जादा बस गाड्या सोडतात.... १०-१२ विमान जिथ संमेलन आहे तिथ सोडलि तर कसं.. :W
कारण परत "आरे भारतात आपले शाल श्रिफळ राहिले जरा घेवुन येतो.. तिकिटाला पइसे द्या " होनारच .... ;)
किती प्रोब्लेम संपतिल.... :?

आपला मयुर

मयुरयेलपले's picture

24 Jun 2008 - 12:20 pm | मयुरयेलपले

थोड लिहितो आजुन
विमान कंपनि च्या ऐड च्या बदल्यात.. प्रवास फु़कट...
वाटल्यास २५ लाख त्यांना दिले तर???
मी कर भरत नाहि... त्या मुळे मला फरक नाहि ... कर भरनार्या ना काय वाट्त??(ह.घ्या.)
आपला मयुर

विसुनाना's picture

24 Jun 2008 - 1:08 pm | विसुनाना

मिसळपावच्या जगाच्या पाठीवरील सर्व गैर- बे-एरियावासी (गैर आणि बे कसेसे वाटते. असो.) सदस्यांना सदर सहित्य संमेलनासाठी मोफत येणेजाणे, खाणेपिणे, पहाणे आणि रहाणे यांची व्यवस्था करण्यात येईल.
असे बे एरिया मराठी मंडळ या संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ;)
आता बोला.
(ह. घ्या. हे. वे.सां. न. ल.)