राम राम मंडळी
आज आणि उद्या गटारी ! :)
सर्व मिपाकर मित्र आणि मैत्रिणींना गटारीच्या शुभेच्छा आणि प्रेमाची भेट ! :)
तुम्हाला जी आवडेल ती यामधून निवडा ! :)
शँम्पेन (निवडक चोखंदळांसाठी)
व्हिस्कीप्रेमींसाठी मस्ट :)
रमप्रेमींनो घ्या ! :)
व्होडका खास आमच्या काही दोस्तांसाठी :)
कॉकटेल लहान मुलांसाठी :)
ज्युस आमच्या मैत्रिणींसाठी फक्त ;)
सिगारेट प्रेमींसाठी (प्रत्येकी जास्तीत जास्त दोनच. जास्ती सिगारेट पिणे हे खिशाला हानीकारक असते )
बिडी (अट्टल फुकाड्यांसाठी )
चकना (सर्वांसाठी)
तर मंडळी गटारी जोरात साजरी करा
मात्र लक्षात ठेवा
१) दारु पिऊन गाडी चालवू नका
२) क्षमतेपेक्षा जास्त पिऊन स्वतःची आणि इतरांची मजा किरकिरी करु नका
३) आपली घरी कुणीतरी वाट पहात आहे हे विसरु नका
४) दारुच्या नशेत आपण माणुस आहोत हे विसरु नका
५) जुने भांडण दारुत बुडून जाऊ द्या आणि पुन्हा मैत्री घट्ट करा. दारु किंवा अग्नी समक्ष घेतलेली मैत्रीची आणभाक आयुष्यभर टिकते असे म्हणतात
६) सर्व आटपल्यावर आपल्या आपल्याच घरी जा
७) जर शहराबाहेर कुठे गेला असाल आणि परत येतांना मधे निसर्गाच्या हाकेला ओ देऊन थांबलात तर रस्त्याच्या त्या बाजुला जा जिकडे वारा पाठीवर येईल.
८) हा सर्व माल आम्ही इकडून तिकडून खास तुमच्यासाठी आणला आहे, कुठून आणला, केवढ्याला आणला, विचारुन आणला का, जिथुन आणला त्याचे नाव सांगा वगैरे कांगावा करुन वात आणू नये.
पुन्हा एकदा शुभेच्छा !! :)
प्रतिक्रिया
18 Jul 2012 - 1:05 pm | प्यारे१
गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!
आम्हाला चखणाच बास्स!
बाकी सर्कारी नियमानुसार कम्पल्सरी असल्यासारखं 'मात्र लक्षात ठेवा' आपल्याला काय पटलं नाय!
जेला जे कराचं तेला ते करुन्देत की!
बसवला टेम्पोत च्यायला!
18 Jul 2012 - 1:14 pm | सर्वसाक्षी
बिअरचा उल्लेखही नसावा?
18 Jul 2012 - 1:20 pm | मोहनराव
निषेध. काय नाना बिअरला विसरलात?
18 Jul 2012 - 1:22 pm | नाना चेंगट
एक डाव माफी असावी.
ही घ्या !
18 Jul 2012 - 1:55 pm | मोहनराव
वा! एकदम चिल्ड!!
18 Jul 2012 - 1:18 pm | ज्ञानोबाचे पैजार
स्वदेशीचा साधा उल्लेखही न केल्या मुळे नानाचा निशेढ.
देशीप्रेमी
पैजारबुवा,
सर्व बांधवांना गटारीच्या शुभेच्छा. (नानाच्या सुचना प्यायल्यावरही लक्षात राहील्या तर आपण पाणी पित आहोत असे समजावे व पेय ताबडतोब बदलावे.)
18 Jul 2012 - 1:31 pm | आदिजोशी
आमची ओल्ड मंक कुठाय??????????
गटारीच्या शुभेच्छा :)
18 Jul 2012 - 1:32 pm | चिम् चिम् मामा
आज गटारी आहे म्हणुन काय तुम्ही सर्वाना नशा करायला प्रोत्साहन देत आहात?
अहो तुम्हच्या मुळेच "न - पिणारे" पण प्यायला लागतात... पिण्याराना प्रोत्साहन मिळते... आणि सरते शेवटी काहितरी विघटित घड्ते.
तुम्हचा उद्देश जरी असा नसला तरी लोक दारु प्यायचा विचार करतात... आणि येथुनच खरी सुरुवात होते.
तुम्ह्च्या "मात्र लक्षात ठेवा" या अशा सुचना - विनवण्याकडे कोणी पाहत सुद्धा नाही...
तुम्ह्ची पोर-बाळ जेन्व्हा नशा (दारु) करतील तेव्हा असे लेख मि.पा वर टाका... किवा त्याचा सोबत बसा (आपल्याच घरी ).
या प्रतिसादाचा उद्देश फक्त आणि फक्त लोकाना जाग्रुत करण्याचा आहे... (माझा एक प्रयत्न आहे). मला शिव्या-शाप जेवढे घालायचे आहे तेवढे घाला पण मोह टाळा.
18 Jul 2012 - 1:52 pm | नि३सोलपुरकर
" दारु किंवा अग्नी समक्ष घेतलेली मैत्रीची आणभाक आयुष्यभर टिकते "
हे मस्त लिहलेस.
18 Jul 2012 - 2:49 pm | अत्रुप्त आत्मा
हार्दिक शुभेच्छा...! भरपुर खा.....प्या.... आणी पडा........ घरातच ;-)
अरे ते र्हायलं ना राव..... आपापल्या ;-)
18 Jul 2012 - 5:14 pm | ५० फक्त
याला म्हणतात बाटली फुटणे......
18 Jul 2012 - 6:49 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या वयात ?
19 Jul 2012 - 12:07 pm | अत्रुप्त आत्मा
बाटलीला वय असतं का ?
©º°¨¨°º© धरा ©º°¨¨°º© :-p
19 Jul 2012 - 12:16 pm | परिकथेतील राजकुमार
अभ्यास अभ्यास नाही गुर्जी ह्या क्षेत्रात तुमचा.
अहो बाटलीच्या वयावरुन तिची किंमत हजारोत कमी जास्ती होत असते. :) आहात कुठे ?
19 Jul 2012 - 12:47 pm | अत्रुप्त आत्मा
वयावरुन तिची किंमत हजारोत कमी जास्ती होत असते. Smile आहात कुठे ?>>> खरं आहे....आमचा तसा कसलाच अभ्यास नाही... ;-)
18 Jul 2012 - 3:00 pm | श्रावण मोडक
जाहिरातबाजीचा क्षीण प्रयत्न या घासून गुळगुळीत झालेल्या टिप्पणीऐवजी थोडं खरमरीत विचारतो, या सगळ्या ब्रँड्सकडून किती टक्के? ;-)
बिडीचं नाव काय आहे?
18 Jul 2012 - 5:05 pm | अमोल केळकर
सर्वांना शुभेच्छा :)
विजय मल्ल्या साहेबांनी श्रावणाच्या पुर्वसंधेला एक निवेदन सादर केले आहे.....
कुत्रा पाळा, मांजर पाळा, घोडा पाळा.....
वाटल्यास गाढव पण पाळा....
पण कृपया
श्रावण पाळू नका !
विमान केंव्हाच रस्त्याला लागले आहे, आता भिक मागायला लाऊ नका :)
( पुढे ढकललेल्या इपत्रातून साभार )
18 Jul 2012 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रकाटाआ.
नाना, माझं आपलं ठरलं आहे. नो गटारी वटारी. थोड्या वेळानं शीडीवर सॉरी चकतीवर पिच्चर पाहणार आहे. पिच्चर आहे. Tanu Weds Manu. गाणं आवडलं तर पोच द्या. :)
-दिलीप बिरुटे
18 Jul 2012 - 6:47 pm | रमताराम
नुसत्या स्मायल्या काय टाकल्या आहेत. कमी त कमी फटू तरी टाकायचे. खरंतर आखाड-पार्टी अॅरेंक करायची... पाहिजे तर वैदिक पद्धतीने कर, आमची हरकत नाही.
अवांतरः मुद्दा क्र. ७ अनुभवाचे बोल काय हो? ;)
18 Jul 2012 - 6:50 pm | परिकथेतील राजकुमार
'योगप्रभू' पद्धतीने चालणार असल्यास त्यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा. ते कालपासूनच पार्टी आयोजित करण्याच्या मूड मध्ये आहेत.
20 Jul 2012 - 11:07 pm | नंदन
ररा, नानासाहेब 'वारा येईल त्या दिशेने पाठ फिरवतात' हा तुमचा आरोप गर्हणीय आहे! ;)
18 Jul 2012 - 8:05 pm | सोत्रि
वाहव्वा!
नान्यासहित सर्वांना गटारीच्या शुभेच्छा !
- (रोजच गटारी करणारा) सोकाजी
18 Jul 2012 - 8:56 pm | संदीप चित्रे
कायतरी गल्लत दिसतेय ना!
'मॉकटेल' लिहायचं होतं का?
आणि आजकाल किती मैत्रिणी फक्त ज्युस पितात? ;)
बाकी गटारी जोरात साजरी करा :)
18 Jul 2012 - 10:09 pm | सुनील
काय ही सांस्कृतिक अधोगती :(
हटकेश्वर हटकेश्वर !!!
18 Jul 2012 - 10:12 pm | राजेश घासकडवी
नाना कितीही वयस्क असले तरी सोत्रिंची 'लहान मूल' अशी संभावना करणं काही बरोबर वाटलं नाही. सोत्रिसुद्धा अशी चेष्टा ते खपवून कसे घेतात कळत नाही ब्वॉ. ;)
19 Jul 2012 - 9:51 am | टिवटिव
:)
19 Jul 2012 - 11:23 am | सोत्रि
दिल दरिया आणि ..... असं काही म्हणतात, तसे काहिसे आहे माझे ;)
-(दरिया दिल) सोकाजी
20 Jul 2012 - 8:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे सोकाजी, तुझ्यातही एक मूल नाही का दडलेलं?
-- अदिती दवणे.
20 Jul 2012 - 11:41 pm | सोत्रि
त्याचीही सध्या पौगंडावस्था सुरू झालीय बहुतेक ;)
- (प्रौढ) सोकाजी
21 Jul 2012 - 12:17 am | आशु जोग
OK
don't loose ur heart
मग त्या पौगंड मुलामधे एक मूल दडलेले असेल
शोधा म्हणजे सापडेल
खोजनेसे भगवान भी मिलते है
(संशोधक) जोग
19 Jul 2012 - 2:09 am | रामपुरी
हिंदीतून मराठीत केलेले भाषांतर वाचून...
"क्षमतेपेक्षा जास्त पिऊन स्वतःची आणि इतरांची मजा किरकिरी करु नका"
दोन चार पेग मारूनच लिहीलंय काय?
19 Jul 2012 - 9:43 pm | टवाळ कार्टा
_/|\_ :)
20 Jul 2012 - 10:48 pm | आशु जोग
सूचना अति उपयुक्त
शेवटची सूचना वाचून
नाना चेंगट हे चालू व्यक्तिमत्व असले पाहिजे असे निरीक्षण नोन्दवतो
20 Jul 2012 - 10:50 pm | आशु जोग
देशावर फार प्रेम असल्याने
'देशी'चाच पुरस्कार करेन