एक काथ्याकुट कसा असावा?

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
17 Jul 2012 - 11:25 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

काथ्याकुट - म्हणजे काथ्या कुटणे - काथ्या म्हणजे काय? हे किती जणांना माहित आहे? असो...
तर काथ्याकुटात तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे हे जाणण्यासाठी हा धागा (कदाचित वांझोटा)

काथ्याकुटाचा:

पहिला मुद्दा :
विषय कसा असावा?
तर माझ्या मते हा एखादा ईमेलप्रमाणे असावा..( आलेल्या ईमेलप्रमाणे एका वाक्यातच तो उघडावा की नाही हे सांगणारा)

दुसरा मुद्दा: आषय:
आषय हा नेहमी विषयाला अनुसरुन असावा. यात प्रेषकाने स्वतःचे विचार नीट आणि मुद्देसूद मांडावेत. यात अधिक आणि उणे दोन्ही बाजू नीट प्रेषकाने मांडावेत.

तिसरा मुद्दा: वरील विषयावर प्रेषकाने स्वतःचे विचार मांडावेत. सारांश द्यावा.

चौथा मुद्दा: हा ओपन फोरम असावा. यात प्रेषकाने हस्तक्षेप करु नये.

याव्यतिरिक संपादक मंडळाने वेळोवेळी दखल घेऊन चर्चा ऑन ट्रॅक आहे की नाही याची काळजी घ्यावी. अवांतर प्रतिसाद टाळता येतील याची काळजी घ्यावी.

बर्‍याचदा, धागाकर्त्याचे/तिचे/ म्हणने वेगळेच असते आणि सुर वेगळाच लागतो.. तसेच प्रतिसादकंचे. म्हणजे म्हणायचे वेगळे आणि होते ते भलतेच.. याला पर्याय नाही. :)

मुद्दामः
१. बर्‍याचदा घुसखोर येतात, त्यांना पिटाळुन लावावे.
२. चर्चा ही चर्चेपर्यंत सिमीत रहावी याची सदस्यांनीच काळजी घ्यावी.
३. भेदभाव आणि तत्सम प्रतिसाद्/चर्चा/टोमणे यांना वेळीच आवर घालण्याची व्यवस्था असावी.
४. स्त्री-पुरुष, शाकाहार-मांसाहार, निवासी-अनिवासी संबंधी धाग्यांवर विषेश लक्ष ठेवावे.

बाकी जाणकारांनी प्रकाश टाकावा.
ज्यांना तक्रार वटतेय त्यांना प्रसाद दिला जाईल :दर्शनासाठी व्यनीत यावे. :)

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2012 - 9:54 am | प्रभाकर पेठकर

माझ्य मते काथ्याकुटात घ्यायच्या विषयास पुरेसे गांभिर्य असावे.
विषय मांडणार्‍या प्रेषकाने आपली मते आणि त्या मतांचा आधार म्हणून काही मुद्दे मांडावेत.
प्रतिसादकांनीही विषयाचे गांभिर्य ओळखून, घाई टाळून, विचार करून प्रतिसाद द्यावेत.
प्रेषक आणि प्रतिसादक दोघांनीही विरुद्ध मते मांडणार्‍याच्या विचारांचा आदर करून त्या (विरुद्ध) मतांना खोडून काढण्याचा प्रयत्न आपले मुद्दे नीट मांडून गांभिर्यानेच करावा.
एखाद्याचा एखादा मुद्दा नीट कळला नसेल, त्यातून काही वेगळा सुर निघत असेल तर त्यावर 'मुद्दा कळला नाही जरा उलगडवून सांगणार का?' असा प्रश्न मुख्य फलकावर किंवा प्रतिसादकाला व्यनितून विचारावा.
धाग्याचे गांभिर्य हरवू नये, चर्चा भरकटू नये म्हणून, काही खोडसाळ विधाने असतील तर ती खरडफळ्यावर करावित.
प्रत्यक्ष समोरासमोर बोलण्यातील सभ्यता संस्थळावरही सांभाळावी.

धन्यवाद.

नगरीनिरंजन's picture

18 Jul 2012 - 11:12 am | नगरीनिरंजन

विचार चांगले आहेत पण ते कोणी पाळत नाहीत. भडकावू विषयांवर भडकावू प्रतिसाद देण्यात बहुतेकांना रस असतो.
एखाद्याने माहिती गोळा करून, स्वतःची मते मांडून चर्चाप्रस्ताव मांडला तर त्याला थंड प्रतिसाद मिळतो. एखादा विषय नवा असेल तर त्याबद्दल वाचून मतं बनवावीत असं कोणाला वाटत नाही.
उदा. माझ्या या चर्चाप्रस्तावावर लोकांची काय मते आहेत हे मला जाणून घ्यायची फार उत्सुकता होती, पण त्यावर म्हणण्यासारखे फारच कमी लोकांना आढळले.
त्यामुळे या चर्चेचे फलित काय असणार आहे हे सगळ्यांनाच माहित आहे.
असो.

मन१'s picture

18 Jul 2012 - 1:24 pm | मन१

तो चर्चाप्रस्ताव भन्नाटच होता. आमच्यासारखे कित्येक जण ननिंच्या अशा चर्चांचे नि प्रतिसादांचे फ्यान आहेत.
दरवेळीच ताबडतोब प्रतिसाद देता येइल असे नसते. दाद द्यायच्या राहून गेलेल्या चांगल्या गोष्टी एका लिमिटच्या वर उत्खनन करता येत नाहीत.(काल परवा माझे उत्खनन सुरु होते. पण काही जणांना अधिक उत्खनन करणे पटले नाही.)
तस्मात् , प्रतिसाद आले नाहीत म्हणून धागाच वाचला गेला नाही असे नसते.
धाग्याचे काश्मीर होउन तीनेकशे प्रतिसाद पडणे हाच एक निकष कसदार लिखाण ठरवायचा कसा असेल ?
तुमचे लेख भारीच आहेत.
ह्या चर्चेबद्दल :- माझे मौन आहे.

रणजित चितळे's picture

19 Jul 2012 - 9:05 am | रणजित चितळे

माझ्या हातून तो सुटला होता (बरेच दिवस जालावर नव्हतो) पण काय जेव्हा पाहिला तेव्हा तो पहिल्या वाचनातच मस्त वाटला व प्रतिसाद देईनच.

अवांतर
मला असे वाटते की मिपा वर काथ्याकुटात प्रतिसाद आला की तो लिस्ट मध्ये वरती आला पाहिजे. नाहीतर थोड्या वेळातच (कधी कधी एका दिवसातच) नजरे आड होऊन जातो. मायबोलीवर तसे होत नाही तो परत परत वर येत राहातो. व out of sight is out of mind ह्या नात्याने विरुन जातो.

सर्वसाक्षी's picture

18 Jul 2012 - 12:46 pm | सर्वसाक्षी

काथ्याकुटच असावे.

मा. संचालक/ संपादकांनी या करीता 'सल्ला/ माहिती/ मदत पाहिजे' असे एक स्वतंत्र सदर सुरू करावे म्हणजे चर्चेव्यतिरिक्त अन्य विषय काथ्याकुट या सदरात येणार नाहीत (आणि आल्यास ते योग्य सदरात टाकले जावेत.)

बाकी विषय, आशय, मांडणी हे वाचकांना योग्य वाटल्यास ते सहभागी होतील, न वाटल्यास होणार नाहीत. काही प्रतिसाद खोडसाळ वा भरकटणारे असू शकतात आणि ते गृहित धरणे बरे. धागाकर्त्याला चर्चेत कितपत रस आहे वा नुसतीच काडी टाकली आहे हे वाचक जाणतीलच. मिपाकर सुज्ञ आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2012 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मा. संचालक/ संपादकांनी या करीता 'सल्ला/ माहिती/ मदत पाहिजे' असे एक स्वतंत्र सदर सुरू करावे म्हणजे चर्चेव्यतिरिक्त अन्य विषय काथ्याकुट या सदरात येणार नाहीत

मिपाचे सर्वेसर्वा नीलकांत यांनी मिपावर काही बदल करायचे ठरवले आहेत. पैकी चौकशी, मदत पाहिजे, सल्ला, एकोळी-दोनोळीचे धागे यासाठी एक स्वतंत्र विभाग सुरु करण्याबद्दल ठरत आहे. अजुन काही विशेष आणि उत्तम असे काही बदल सुचवावे वाटत असल्यास नीलकांत, प्रशांत किंवा संपादक मंडळास व्य.नि. करण्यास हरकत नाही, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

18 Jul 2012 - 5:48 pm | नाना चेंगट

भारतीयधर्मसंस्कृतीदेशउपहास आणि भारतीयधर्मसंस्कृतीदेशप्रेम असे दोन विभाग सुरु करावे म्हणजे ज्याला जिथे जायचे तिथेच जाता येईल आणि कोणत्याही प्रकारच्या धाग्याचे जुनागडहैद्राबादकाश्मिरचंद्रपूर होणार नाही ;)

स्पा's picture

18 Jul 2012 - 12:50 pm | स्पा

मू मिठा करो भाई

अवांतर : ममो बेंचवर आहेत.. सर्वच मिपाकर नाही...
आपापला वेळ सांभाळून या चर्चा करायला इकडे

ह घे रे ;)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2012 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार

रोज रोज ह्या मराठमोळ्याचे धागे पाहून उबग आला आहे. आजकाल यावेसेच वटत नाही मिपावर. ;)

बाकी ममो, लेका हे असले नियम वैग्रे मिपावरती आले ना, तर मिपा सोडणारा पहिला मी असेन. भांचुत मिपाचे काय ओसाडगाव करायचे आहे का काय ? बघावे तेंव्हा १ सदस्य ऑनलाईन असलेले ?

हान वैयक्तिक टिपण्या नको वैग्रे ठिक आहे पण इतर नियम म्हणजे मिपाचे नाव बदलून दहिभात ठेवण्यासारखे आहे. मिपाचे आहे ते रुपडे आम्हाला अतिशय प्रिय आहे.

नाना चेंगट's picture

18 Jul 2012 - 1:05 pm | नाना चेंगट

आपला प्रतिसाद ओसाडगाववर वैयक्तिक टिका करणारा असून अशा प्रकारची अपमानजनक भाषा आपल्यासारख्या सदस्याकडून अपेक्षित नाही. लक्षात ठेवा ज्याप्रमाणे एक चित्र ह्जार शब्दांच्या बरोबरीचे असते त्याचप्रमाणे विद्वानांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या ओसाडगावातील एक सदस्य मिपाच्या शंभर सदस्यांच्या बरोबरीचा आहे हे मी सांगून ठेवतो. बापजन्मात मिपावर एकावेळीशंभर सदस्य पाहिले होते का याचा स्वतःच विचार करा आणि परत ओसाडगावचा अपमान करु नका.

अवांतर... ममो जरा दोन पेग मार आणि शांत बैस. काथ्या कसा कुटायचा यावर डोक्याला त्रास करुन घेऊ नकोस आणी देउ पण नकोस :)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2012 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार

आपला प्रतिसाद ओसाडगाववर वैयक्तिक टिका करणारा असून अशा प्रकारची अपमानजनक भाषा आपल्यासारख्या सदस्याकडून अपेक्षित नाही.

ह्यात 'वैयक्तिक टिका' कुठे आहे ते ध्यानात आले नाही. सत्य परिस्थिती मांडणे ह्याला जर टिका म्हणायचे असेल तर बोलणेच खुंटले. आमच्या वेळी हे असे नव्हते.

लक्षात ठेवा ज्याप्रमाणे एक चित्र ह्जार शब्दांच्या बरोबरीचे असते त्याचप्रमाणे विद्वानांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या ओसाडगावातील एक सदस्य मिपाच्या शंभर सदस्यांच्या बरोबरीचा आहे हे मी सांगून ठेवतो.

ह्या संदर्भात तुमच्याकडे काही विदा उपलब्ध आहे का ? तसेच ह्याच प्रकारे समुद्र, विहिरी, डबके ह्यांच्यातील सदस्यांची एकमेकांशी तुलना करण्यात आली आहे काय ? असल्यास त्याचे निष्कर्श काय निघाले ?

बापजन्मात मिपावर एकावेळीशंभर सदस्य पाहिले होते का याचा स्वतःच विचार करा आणि परत ओसाडगावचा अपमान करु नका.

एकदा मिपावरती आम्ही आमचेच सदस्य नाम १२ वेळा उपस्थित सदस्य ह्या यादीत बघितले होते. त्या दिवसापासून आम्ही यादी बघणे बंद केले आहे.

अवांतर... ममो जरा दोन पेग मार आणि शांत बैस. काथ्या कसा कुटायचा यावर डोक्याला त्रास करुन घेऊ नकोस आणी देउ पण नकोस

+१ सहमत.
आणि कंपनी द्यायला आम्हाल पण बोलव. अन्यथा तुझ्या पेग मध्ये माशी पडेल.

नाना चेंगट's picture

18 Jul 2012 - 1:21 pm | नाना चेंगट

>>>>ह्यात 'वैयक्तिक टिका' कुठे आहे ते ध्यानात आले नाही. सत्य परिस्थिती मांडणे ह्याला जर टिका म्हणायचे असेल तर बोलणेच खुंटले. आमच्या वेळी हे असे नव्हते.

बदललंय सगळं !

>>>>ह्या संदर्भात तुमच्याकडे काही विदा उपलब्ध आहे का ? तसेच ह्याच प्रकारे समुद्र, विहिरी, डबके ह्यांच्यातील सदस्यांची एकमेकांशी तुलना करण्यात आली आहे काय ? असल्यास त्याचे निष्कर्श काय निघाले ?

विदा वापरुन आंजावर प्रतिसाद लिहीले जात नाहीत ही साधी गोष्ट माहीत नाही.?

>>>>एकदा मिपावरती आम्ही आमचेच सदस्य नाम १२ वेळा उपस्थित सदस्य ह्या यादीत बघितले होते. त्या दिवसापासून आम्ही यादी बघणे बंद केले आहे.

त्यावेळचे मालक आता बदलले आहेत त्यामुळे यादीची पद्धत बदलली आहे ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2012 - 4:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगला चर्चाविषय.

काथ्याकुटात प्रास्ताविक, मुख्य विषय, आणि काथ्याकुट कशावर अपेक्षित आहे, त्याबद्दल काही मुद्दे काथ्याकुटात असावेत असे वाटते. बातमी असेल तर बातमीचे काही उतारे , चर्चाप्रस्तावात लिंक द्यायची असेल तर लिंक देऊन लिंकेवरील विषयाचा थोडक्यात सारांश देऊन चर्चाप्रस्ताव योग्य संदर्भासहित स्पष्ट शब्दात मांडावा.

काथ्याकुट करतांना मत कितीही पटणारी असोत-नसोत, व्यक्तिगत कोणाचा अपमान होईल अशी भाषा, असा प्रतिसाद, टाळता आला तर चर्चा उत्तम पुढे सरकते. विषयाला फाटे फोडुन मुळ काथ्याकुट हायजॅक करुन विषयाला उपविषयावर घेऊन जाणे शक्यतो टाळावे.

काथ्याकुटाच्या शीर्षकाचा आणि मुख्य मजकुराचा परस्पराशी संबंध असावा. छोटी शीर्षके असावीत. बाकी, व्यक्तिगत टोमणे, सदस्य आयडींचा विनाकारण सतत चर्चेत उल्लेख करत राहणे. व्यक्तिगत गोष्टींची चर्चा सुरु करणे. हिशेब पूर्ण करण्यासाठी दिलेले प्रतिसाद, कोणाच्या व्यंगावर आणि सार्वजनिक ठिकाणी वावरतांना ठेवायचे भान याची काळजी घेतली तर चर्चा उत्तम पुढे सरकते.

लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, तेव्हा लिहिलेले प्रकाशित करण्यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी लिहितो आहोत यात काही वावगं तर नाही, याची मनोमन खात्री केली पाहिजे असे वाटते.

संपादक मंडळाने वेळोवेळी दखल घेऊन चर्चा ऑन ट्रॅक आहे की नाही याची काळजी घ्यावी. अवांतर प्रतिसाद टाळता येतील याची काळजी घ्यावी.

संपादक योग्य अशी काळजी घेतातच. पण, संपादकांना कामाची संधीच देऊ नये, असं माझं व्यक्तिगत मत आहे. काथ्यातल्या एका एका धाग्यापासुनच पुढे उत्तम काथ्या तयार होतो आणि हा काथ्या कुठेही उपयोगाला येतो. :)

असो, अजुन खुप सुचणार आहेच. सवडीने डकवतोच. :)

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

18 Jul 2012 - 5:52 pm | नाना चेंगट

हॅ ! येवढं करायचं तर मग लेखन करुन वर्तमानपत्र, मासिकातून छापून आणवून चार पैसे मिळवलेले काय वाईट ? आंतरजालाचा काय फायदा?

नाना चेंगट's picture

19 Jul 2012 - 3:57 pm | नाना चेंगट

भाषिक असहिष्णू लोकांचे काय करावे याबद्दल कुणी मार्गदर्शन करावे ही विनंती

पैसा's picture

19 Jul 2012 - 7:48 pm | पैसा

मग सर्वसामान्य निष्कर्ष काय म्हणायचा?

शिल्पा ब's picture

20 Jul 2012 - 1:04 am | शिल्पा ब

सर्वसामान्य निष्कर्ष हा की बेंचवर असल्यास सकळ जनांस शहाणे करुन सोडायचे! ;)