यशाची सप्तपदी लिहिणारे लेखक स्टिफन कोवे यांचे दुखःद निधन.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
17 Jul 2012 - 9:04 pm
गाभा: 

श्री. स्टिफन कोवे या प्रसिद्ध लेखकाचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त वाचले.

स्टिफन कोवे यांचे "The 7 habit of effective people" नावाचे जगविख्यात असे पुस्तक आहे. आजपर्यंत २ कोटी इतक्या प्रतींची विक्री या पुस्तकाची झालेली आहे. जगातील ३७ भाषांमध्ये याचे भाषांतर झालेले आहे.व्यक्तिगत परिणामकारकता गाठण्यासाठी या पुस्तकाने अनेकांना मदत केलेली आहे.

या पुस्तकातील यशस्वी होण्याची सप्तपदी खालील प्रमाणे.

व्यक्तिगत विजयाच्या ३ पायर्‍या.

सवय क्र. १ : भविष्याकाळासाठी सक्रिय व्हा. ( Be proactive).

सवय क्र. २ : आपण जे काय करणार आहोत त्याचा शेवट कसा असेल याचा अदमास घ्या. ( Begin with end in the mind).

सवय क्र. ३ : बाहेर च्या गोष्टी योग्य त्या आशयातून समजावून घ्या. ( Put first thing first).

सार्वजनिक विजयाच्या ३ पायर्‍या.

सवय क्र. ४ : आहे त्या स्थितीत सर्वांचा फायदा होईल असा निर्णय घ्या. ( Think win-win)

सवय क्र. ५ : अगोदर समजावून घ्या आणि मगच इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. ( seek first to be understand and then to be understood).

सवय क्र. ६ : रचनात्मक संवाद आणि निर्मितीचा प्रयत्न करा. ( Synergize).

नूतनीकरणाची शेवटची पायरी.

सवय क्र. ७:: स्वतःचे कौशल्य सदोदित प्रगल्भ करत जा. ( sharpen the saw).

मला या पुस्तकातील श्रवण क्षमता हा विषय मनापासून आवडला आणि बर्‍यापैकी फायदाही झाल्याचे नमुद करावे वाटते.

या प्रतिभावंत लेखकाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली आणि एकदातरी हे पूस्तक वाचावे ही शिफारस.

द्वारकानाथ कलंत्री.

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

17 Jul 2012 - 9:30 pm | अर्धवटराव

स्टिफन साहेबांना श्रद्धांजली.
बर्‍याच मित्रांकडुन या सप्तपदी विषयी ऐकलं आहे. थोडंफार वाचलं देखील... पण मग ते पुस्तक हारवलं :(

अर्धवटराव

स्टिफन कोवेंना श्रद्धांजली.

सुधीर's picture

18 Jul 2012 - 10:54 am | सुधीर

स्टिफन कोवें यांना श्रद्धांजली.
मानवी स्नेहसंबंध या विषयाशी निगडीत असलेला "थिंक विन-विन" (वर म्हटल्याप्रमाणे सवय क्र. ४) हा विचार आवडला होता.
आठव्या सवयीवर त्यांच नंतर अजुन एक पुस्तक आलं.
"The 8th Habit: From Effectiveness to Greatness" -
तुमच्या आतला आवाज ओळखा, इतरांनाही त्यांच्या आतला आवाज ओळखण्यास उद्दुक्त करा. Find your voice and inspire others to find theirs
(पुस्तकं अजून वाचलेली नाहीत, सध्या वाचत असलेली पुस्तकं वाचून संपली की वाचण्याचा मानस आहे)

कपिल काळे's picture

18 Jul 2012 - 5:18 pm | कपिल काळे

स्टिफन कोवें यांना श्रद्धांजली.

सर्कल ऑफ कन्सर्न आणि सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स

क्वाड्रंट २ प्रिन्सिपल

ही काही कायम लक्षात राहण्यासारखी तत्वे त्यांनी मांडली.

विटेकर's picture

18 Jul 2012 - 6:09 pm | विटेकर

मी एके काळी या विषयांवर training program conduct करायचो..
फार आवडते मला ते पुस्तक !
Character Ethics Vs Personality Ethics
Reaction Vs Response , paradigm Shift etc
फार मजा यायची हा प्रोग्राम करताना !
जीवनाकडे बघण्याची भारतीय दार्शनिकांची द्रूष्टी आणि कोवे यांचे तत्वज्ञान याची सुसंगती लावता येते.. ..
गांधीजींचा उल्लेख त्या पुस्तकात दोन वेळा आला आहे. अनेकवेळा भारतात यायचे ते !

मैत्र's picture

20 Jul 2012 - 6:42 pm | मैत्र

माझं आवडतं पुस्तक..

Character Ethics Vs Personality Ethics
Paradigm Shift,
Quadrant 2
Think Win-Win

अतिशय महत्त्वाच्या काळात पुस्तकाचा अत्यंत उपयोग झाला.
गेल्या वर्षी त्यांच्या मुलाच्या (शॉन / स्टीफन कवी) उत्तम व्याख्यानाला उपस्थित होतो.

अमेरिकन self help धर्तीचा सर्व प्रयोग असला तरी quick fix पेक्षा character, conscience, begin with end in mind
हा एकूण Think Big पद्धतीच्या अमेरिकन विचारसरणी पेक्षा खूप वेगळा भाग होता.

सेव्हन हॅबिट्स नक्कीच वाचनीय आहे. काही प्रमाणात अवलंब करता येऊ शकतो आणि चांगला परिणाम नक्कीच होतो..
जगातल्या कोट्यावधी लोकांना उत्तम विचार देणार्‍या या लेखक विचारवंताला श्रद्धांजली.

P.S.: Sean Covey यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकन उच्चार 'कवी' किंवा 'कव्ही' असा आहे ' कोवे' किंवा ]कोव्हे' नाही. मीही २०११ पर्यंत कोवे च समजत होतो..