गटारी पेश्शल - मिश्र समुद्र-खाद्य खिचडी

सुनील's picture
सुनील in पाककृती
16 Jul 2012 - 12:45 am

मंडळी गेला विकांत हा गटारी वीकांत होता. त्यानिमित्ताने केलेला हा खास पदार्थ!

साहित्य
एक वाटी मिश्र समुद्र-खाद्य (कोळंबी, तिसर्‍यांच्या आतील मांस, मेकूल (Squid) आणि ऑक्टोपस

एक वाटी तांदूळ
एक कांदा
एक टोंमॅटो
हळद, लाल तिखट, मालवणी मसाला, लिंबाचा रस, आले-लसूण पेस्ट, तेल आणि मिठ (ह्या सर्व पदार्थांचे प्रमाण आपापल्या चवी नुसार ठरवावे)

कृती

१) एका वाटीत मिश्र समुद्र-खाद्य घेऊन त्याला लिंबाचा रस, मिठ, हळद, लाल तिखट, मालवणी मसाला आणि आले-लसूण पेस्ट लावून तासभर ठेवावे.

२) किंचित तेलात तांदूळ परतून घ्यावा आणि एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवावा.

३) तेलात कांदा परतून घ्यावा. कांदा शिजला की त्यात हळद, लाल तिखट, मालवणी मसाला, मिठ आणि आले-लसूण पेस्ट घालावी.

४) त्यात टोमॅटो बारीक चिरून घालावा.

५) टोमॅटो शिजला की त्यात मसाला लावलेले समुद्र्-खाद्य घालावे. किंचित पाणी घालून थोडावेळ झाकण लावून शिजवून घ्यावे.

६) नंतर त्यात परतलेले तांदूळ घालून एकजीव करावे.

७) नंतर त्यात दोन वाट्या गरम पाणी घालून, झाकण लावून सुमारे १० मिनिटे शिजवावे.

८) गरमागरम समुद्र-खाद्य खिचडी तयार आहे!!!

प्रतिक्रिया

सहज's picture

16 Jul 2012 - 11:56 am | सहज

गटारी पेश्शल असल्याने मला वाटले मॅरीनेशन अथवा शिजवताना (निदान शास्त्रापुरती) व्हाईट वाईन तरी घातली असावी :-)

शेवटच्या फटूमधे ग्लास -बाटली नसल्याने नावातून 'गटारी पेश्शल' शब्द त्वरीत वगळण्यात यावेत.

मराठमोळा's picture

16 Jul 2012 - 7:12 am | मराठमोळा

वा वा .. सुनीलशेट स्वयंपाक घरात? आणी ते पण एका आगळ्या वेगळा पाकृ सहित. क्या बात है.. :)
बाकी सहजरावांच्या प्रतिसादाशी पुर्ण सहमत. :)

अवांतरः मला वाटतं की यात खिचडी शिजवताना पाण्याऐवजी नारळाचे दुध वापरले तर जास्त चवदार होईल. :)

विंजिनेर's picture

16 Jul 2012 - 8:20 am | विंजिनेर

सोपी नॉन्व्हेज पाकृ + पांढरा-शुभ्र चॉपींग बोर्ड + प्ल्यास्टिकची भांडी + विजेच्या शेगड्या = सुनीलशेट 'हिरवी'णीकडे आलेले दिस्तात्येत :)

daredevils99's picture

16 Jul 2012 - 11:26 am | daredevils99

ही पाककृती वैदिक पद्ध्तीने कशी करता येईल?

ऋषिकेश's picture

16 Jul 2012 - 12:51 pm | ऋषिकेश

:)
मज्जाय बॉ! :P

सुनील's picture

17 Jul 2012 - 12:01 am | सुनील

धन्यवाद!

@सहजराव - शेवटच्या फटूमधे ग्लास -बाटली नसल्याने नावातून 'गटारी पेश्शल' शब्द त्वरीत वगळण्यात यावेत

त्याची वेगळी पाकृ लवकरच ;)

@ममो - सुनीलशेट स्वयंपाक घरात?
बरं असतं - अधून-मधून ;)

मला वाटतं की यात खिचडी शिजवताना पाण्याऐवजी नारळाचे दुध वापरले तर जास्त चवदार होईल.
करून पहा आणि टाका की त्याची पाकृ :)

@विंजिनेर - शेरलॉक होम्स वाचणे कमी करा, बर्रका ;)

@ऋ - आम्ही नेहमीच मज्जेत. नाय का? :)

कपिलमुनी's picture

8 Aug 2018 - 1:20 pm | कपिलमुनी

गटारी स्पेशल धागे