मदत: कोडे आणि बुध्यांक चिकित्सा

चिखलू's picture
चिखलू in काथ्याकूट
13 Jul 2012 - 10:57 pm
गाभा: 

एका IQ टेस्ट बद्दल मला मदत हवी आहे.
कंपनीत आजच ही टेस्ट दिली आणि काही कोड्यांची उत्तरे पटकन जमली नाही. डोक्यातून किडा जात नाही, उत्तर आणि लॉजिक समजत नाही तोपर्यंत.
ही टेस्ट बुध्यांक काढण्यासाठी वापरली जाते आणि Percentile पद्धतीनुसार निष्कर्ष काढले जातात. पूर्ण नाव रॅवेन् प्रोग्रेसिव्ह मॅट्राईसेस टेस्ट. गुगल वर अधिक माहिती मिळेल. इथे मुद्दाम देत नाही.

यात २X२ किंवा ३X३ मॅट्रिक्स असतो, ४ किंवा ९ पैकी एक न दिलेली आक्रुती शोधायची.
लॉजिकसाठी आडवे, उभे प्रोग्रेशन जुळले पाहिजे. काही ठिकाणी कर्णानुसारही जुळलेत.

खाली दिलेल्या चित्रात एकुण ५ कोडी आहेत. मला २,३ व ५ बद्दल लॉजिक समजले आहे. (तरी या सगळ्या कोड्यांसाठी प्रत्येकाची पद्धत समजून घ्यायला आवडेल.)
उदा. ५ मध्ये जर बाहेरील वळी (किंवा गाठ) जर "+" धरली आणि आतली "-" तर प्रोग्रेशननुसार त्यांची बेरिज होते आणि उत्तर माझ्यामते ५ येते.

यावर जरा चर्चा होउन जरा ज्ञानात भर पडावी ही अपेक्षा.....

Puzzles' Image

प्रतिक्रिया

फ्रायडे रात्र असल्याने आमचा पास.

पक पक पक's picture

13 Jul 2012 - 11:06 pm | पक पक पक

माझा धागा (भिकार सावकार)का उडवला गेला त्याच कोड अजुन सुट्त नाय मला ,अन हे काय नविन... ;)

अपूर्व कात्रे's picture

14 Jul 2012 - 12:15 am | अपूर्व कात्रे

पहिल्या कोड्याचे उत्तर ३ नंबरची आकृती आहे. कर्णानुसार जुळते. चौथ्या कोड्याचे उत्तर ७ नंबरची आकृती असू शकते.

मला भेटायला आलेल्या दोन ९ वी तील शाळकरी विद्यार्थ्यांबरोबर बसून ही कोडी सोडवायचा प्रयत्न केला आहे, बरोबर असतील त्याचं श्रेय त्या दोघांचं; एक आहे साब्रिना इबारा (Sabrina Ibarra) आणि सॅम वू (या आडनावाचा उच्चार असा का ते सांगणं मला कठीण आहे!) (Sam Ng):

१. या आकृतीत ३ मूळ आकार आहेत, लहर, टोक आणि त्रिकोण (Wave, Peak, Triangle: WPT). वरून खाली येतांना तिन्ही कॉलम मध्ये WPT हा क्रम कायम रहातो. प्रत्येक आकाराची तीन रुपं आहेतः टोक नसलेला आकार, तळ नसलेला आकार आणि टोक आणि तळ दोन्ही सलेला आकार (ज्याला आपण 'साधारण' आकार म्हणुयात). तर 'लहर' (wave) या प्रकारातला 'साधारण' आकार अनुपस्थित आहे, आणि तो आहे टोक आणि तळ दोन्ही असलेला आकार (पर्यायांपैकी क्र. ५ चं चित्र).

२. आडवं किंवा उभं गेलं तर आकार एकाच क्रमाने बदलतातः चौकोन, रेषा, फुल्या. या क्रमाने विचार केला तर मोकळ्या ठिकाणची आकृती असणार रेषांची. आता प्रत्येक स्थानावरील आकृतींची संख्या पाहिली तर डावीकडून उजवीकडे ती खालील क्रमाने बदलते: पहिली रांग - ३, ४, ५; दुसरी रांग - ५,३, ४; तिसरी रांग - ४, ५, ?. म्हणजे ? या ठिकाणी तीन रेषा असलेली, म्हणजे पर्यायांपैकी क्र. ८ ची आकृती असणार.

३. प्रत्येक ओळीत डावीकडून उजवीकडे जाताना पहिल्या दोन आकृती एकमेकांवर ठेवल्या, आणि त्यांतील समान गोष्टी काढून टाकल्या तर उरतो तो आकार म्हणजे तिसरी आकृती (उदाहरणार्थ, पहिल्या रांगेतील चित्र १ हे चित्र २ वर ठेवले, आणि त्यातील समान गोष्टी [भरलेले थेंब] काढून टाकल्या तर उरतो तो आकार म्हणजे तिसरा आकार.) तिसर्‍या ओळीत या नियमाने पाहिल्यास तिसर्‍या मोकळ्या जागी असेल ती आकृती म्हणजे चौकोनात आधिकचं चिन्ह, म्हणजे पर्यायांपैकी आकृती क्र. २.

४. हे आम्हाला सर्वात अवघड कोडं वाटलं, पण या पठ्ठ्यांनी ते बरोबर सोडवलं आहे असं मला वाटतं:
या कोड्यात दोन क्रम (patterns) आहेत, म्हणून दोन वेगळी कोडी सोडवली आहेत. पहिल्यात बघा फक्त बिंदूंकडे आणि त्यांना छेदून जाणार्‍या रेषांकडे. आकृतीतील इतर सर्व आकार पुसून टाकले तर खालील क्रम दिसतो:
पहिलं घर दुसरं घर तिसरं घर
१ ली रांगः (बिंदू) (रेष+बिंदू) (रेष+बिंदू)
२ री रांग (रेष+बिंदू) (२ रेषा+ बिंदू) (रेष+बिंदू)
३ री रांग (रेष+बिंदू) (रेष+बिंदू) (?)

म्हणजे अखेरच्या रांगेतील मोकळ्या जागच्या आकृतीत एक तर (बिंदू) असेल किंवा (दोन रेषा+बिंदू) असतील (म्हणजे पर्याय १ किंवा ४)

आता दुसर्‍या प्रकार कोडं सोडवून पाहू: वरील तिसर्‍या कोड्यातील पद्धतीप्रमाणे डावीकडून उजवीकडे जातांना पहिल्या दोन आकृती एकमेकांवर ठेवल्या, आणि त्यांतील फक्त बाह्य समान गोष्टी काढून टाकल्या तर उरतो तो आकार म्हणजे तिसरी आकृती (उदाहरणार्थ, पहिल्या रांगेतील चित्र १ हे चित्र २ वर ठेवले, आणि त्यातील बाह्य समान गोष्टी [डावीकडची उभी रेषा] काढून टाकली तर उरतो तो आकार म्हणजे तिसरा आकार.)

या पद्धतीने विचार केला तर पर्यायांपैकी क्र. १ ची आकृती हीच मोकळ्या जागी बसेल.

५. लंबगोलाच्या बाहेरील थेंब म्हणजे (+) आणि आतील थेंब म्हणजे (-) अशा क्रमाने बेरजेचा विचार करून तिसर्‍या आकृती पाहिली तर

  • पहिल्या ओळीत डावीकडून उजवीकडे जातांना (+३) + (-४) = (-१) अशी (आत १ थेंब असलेला लंबगोल) आकृती दिसते,
  • दुसर्‍या ओळीत (+२) + (+१)= (+३) (बाहेर ३ थेंब असलेला लंबगोल),
  • तर तिसर्‍या ओळीत (+५) + (-३) या क्रमाने शेवटची आकृती (+२) (बाहेर २ थेंब असलेला लंबगोल) अशी असायला हवी.
  • म्हणजे पर्याय क्र. ५.

    बरोबर आहे का?

कानडाऊ योगेशु's picture

14 Jul 2012 - 1:32 pm | कानडाऊ योगेशु

कोडे क्र. ४ चे उत्तर पर्याय क्र. ७ असावे असे वाटते.
प्रत्येक ओळीतील पहिल्या दोन आकृत्या एकमेकांवर ठेवा व कॉमन असलेल्या रेषा खोडा.तिसरी आकृती मिळेल.

बहुगुणी's picture

14 Jul 2012 - 4:55 pm | बहुगुणी

आम्ही 'बाह्य' समान गोष्टी पुसणे या पॅटर्नचा विचार केला, त्या ऐवजी 'सर्वच' समान गोष्टी पुसणे हा पॅटर्न विचारात घेतला तर क्र. ७ हेच उत्तर योग्य वाटतं.

चिखलू's picture

14 Jul 2012 - 8:24 pm | चिखलू

बहुगुणी आणि कानडाऊ योगेशु,
तुम्ही दोघांनी Logic बरोबर सांगितले, पण माझ्यामते उत्तर हे फक्त रिकामा चौकोन आणि त्यात एक बिंदू हे उत्तर येईन.
क्रमांक ४.
माझे काही चुकते आहे का तेव्हढे मला सांगता का?

बहुगुणी, उत्तरे सगळी एकदम बरोबर आहेत. मला स्वत:ला १ नंबरचे कोडे आले नाही, पण आता समजले.
माझ्याही मेंदुचा व्यायाम झाला, व्यायाम काय, स्ट्रेस टेस्ट्च झाली..
पण मला आवडतात अशी कोडी सोडवायला..आणि तुमच्यासारखे उत्साही कुणी मिळाले की माझाही उत्साह वाढतो.
सध्या माझ्या ६ वर्षाच्या मुलाला काही असेच सोडवायला देतो आहे आणि त्यालाही जरा गोडी लागते आहे....

कानडाऊ योगेशु's picture

14 Jul 2012 - 9:20 pm | कानडाऊ योगेशु

येस. पर्याय क्र. ४ हेच उत्तर बरोबर आहे. नजरचुकीने पर्याय क्र ७ असे लिहिले गेले.

चिखलू's picture

14 Jul 2012 - 1:48 pm | चिखलू

तुमच्याकडे आलेल्या विद्यार्थाची विचार पद्धत एकदम तर्कशुद्ध आहे. मानले पहिजे त्यांना. माझा अभिप्राय त्यांना कळवालच.
आणि तुम्ही ही कोडी त्यांच्याबरोबर बसुन सोडवलीत त्यासाठी तुम्हाला +१.
माझ्याही मते असली कोडी मुलांनी लहानपणापासून सोडवली तर त्यांनाही तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागते.

अजुन कुणाचे यावर काही प्रतिसाद येतील का ते बघतो आणि मगच बरोबर की नाही याची चर्चा करतो.
पुन्हा एकदा धन्यवाद...

श्री. चिखलू: आपण त्या विद्यार्थ्यांचं कौतुक इथेच इंग्लिश मध्ये लिहाल का? ते दोघे हा धागा उत्सुकतेने पहाणार आहेत, पण त्यांना मराठी वाचता येत नसल्याने (आपल्याला श्रेय मिळतं आहे हे त्यांना कळावं म्हणून) मी मुद्दामच त्यांची नावं इंग्लिशमध्ये लिहिली होती, आपणही कौतुक इंग्लिश मध्ये लिहावं ही विनंती.

बाकी आणखी उत्तरांची मीही वाट पहातो. माझ्या मर्यादित मेंदुला व्यायाम देतांना मजा आली, त्याबद्दल आपले आभार!

चिखलू's picture

14 Jul 2012 - 8:01 pm | चिखलू

तुम्ही त्यांना श्रेय देतांना नुसते तोंडी न सांगता त्यांना मिसळपाव वर हा धागा वाचायला देणार यासाठी तुम्हाला मानल पाहिजे. मी असतो तर हे डोक्यात आलेच नसते. खर्‍या अर्थाने मिपा सातासमुद्रापार पोहोचले........

*****************************************
Hi Sabrina & Sam,
I saw your way of logical reasoning for the puzzles I placed on this thread.
First of all accept my sincere congratulations for solving this in a very logical manner. These are the questions from a test where many of my friends have failed (I will get my results on 20th July...).
You have an excellent logical ability and when I see the results from similar test, the persons with very high IQ are called Genius.
There is one more category and I feel you are in that. It is called...
GIFTED.
Please keep up your interest in this kind of logical reasoning and I am sure you will have a very bright future ahead.
All the best.
*****************************************

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jul 2012 - 11:22 am | परिकथेतील राजकुमार

मला वाटले की मिपावरती कोण काय कोडी घालतो त्यावरुन त्याचा बुद्ध्यांक कसा ओळखावा ते सांगत आहात का काय.

असो...

नाना चेंगट's picture

14 Jul 2012 - 1:19 pm | नाना चेंगट

च्यायला मिपा आता तर्कक्रिडेच्या मार्गाने जाणार काय?

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jul 2012 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार

नानाचिखलवाला

मुक्त विहारि's picture

18 Feb 2024 - 10:47 pm | मुक्त विहारि

पण, एकही सुटले नाही..