अनोखी मुलाखत भाग-२
सूत्रधार:
वैज्ञानिक कलेचे अरसिक असतात.जगातील सर्वात सुंदर कलाकृती देखील वैज्ञानिकांना मोहित करत नाही? ह्या बद्दल आपले काय मत आहे?
फेन्मन:
माझा एक मित्र आहे, तो एक उत्तम कलाकारही आहे.त्याला कलेबद्दल खूप आस्था व प्रेम आहे. तो एकदा माझ्याकडे सुंदर फुल घेऊन आला. माझ्या जवळ आला आणि म्हणाला "किती सुंदर फुल आहे ना?" माझ्या चेहऱ्याकडे पाहून तो पुढे बोलताच राहिला,"कवीच्या डोळ्यांनी पाहशील तरच हे फुल सुंदर दिसेल,जर तुझ्या वैज्ञानिक डोळ्यांनी पाहशील तर हे फुल एक उदासीन वस्तूच दिसेल." तो माझ्यावर खूप रुक्ष होता.
खरेतर जी सुंदरता त्या फुलामध्ये होती, जी माझ्या मित्राला आणि दुनियेला दिसली, ती मलाही दिसली. हा पण माझ्या मित्रा एवढा मी त्याचा प्रेमी नसेल. पण सुंदरतेबरोबर मी त्या फुलामध्ये इतरही खूप काही पाहतो. जो माझा मित्र कधीच पाहत नाही. मी त्या फुलांच्या लहान-लहान पेशींचा विचार करतो, सुंदरता ही वरील दृष्यावरच आहे असे नाही. खूप सूक्ष्म पेशीमध्येदेखील सुंदरता असते. फुलांचा रंग कीटकांना आकर्षित करण्यासाठी असतो. कीटक नंतर परागकण वाहण्याचे काम करतात.ह्या सर्व गोष्टीमध्ये एक नैसर्गिक सुंदरता आहे,ती मी अनुभवतो. फुलांमध्ये सुगंध कोठून येतो?प्रत्येक फुलाचा रंग व सुगंध वेगळा का?प्रत्येक फुलाची जीवनक्रमा तशीच का?फुलाचा देखावा तसाच का?
विज्ञानात फुलाबद्दल पडणारा प्रत्येक प्रश्न त्या फुलाबद्दल आतुरता व रहस्य वाढवत राहते.मला वाटत नाही की अश्या दृष्टिकोनामुळे फुलाची सुंदरता कमी होत असेल,उलट ती खूप अंशी वाढून जाते. मला कळत नाही, हे जग वैज्ञानिकाला असे का ओळखते?
खरतर निसर्गाची कोडी सोडवणारा माणूस कलेचा अरसिक कसा असेल? फरक एवढाच आहे की कलेचा माणूस निसर्गाला शब्दात किंवा चित्रात कैद करतो तर एक वैज्ञानिक त्याला गणितात. हा काही लोकांना गणित अवघड वाटते,त्यामुळे ते सर्वाना अरसिक घोषित करतात.
सूत्रधार:
विज्ञानविर्हित गोष्टी तुम्हाला आकर्षित करतात का? जसे की मानवी इतिहास,तत्वज्ञान इ.
फेन्मन:
माझ्या तरुण वयात मी विज्ञानाशीच निगडीत राहिलो. मला विज्ञानातच उच्चतम रस मिळत गेला. तरुण वयात एक वैज्ञानिक बनण्यासाठी जे काही आवश्यक होते ते मी खूप कष्टाने करत गेलो. मानवी तत्वज्ञान जाणून घेण्याइतका धीर माझ्यात नव्हता. अभ्यासक्रमात ह्यांचा उल्लेख येत असे पण मी त्यांना शक्य तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.
हा पण माझ्या उतारवयात ह्या गोष्टीचा खूप संबंध आला. त्यावेळी मी काही पुस्तके,नियतकालिके,मासिके वाचत होतो. तरीपण मला वाटते की, मी माझ्या थोड्याफार बुद्धिमत्तेला विज्ञानातच रोवून ठेवले.
सूत्रधार:
लहानपणीच्या काही आठवणी?
फेन्मन:
माझ्या घरी एक ब्रिटानिका एनसाक्लोपेडिया आहे. मी जेव्हा लहान होतो,त्यावेळी माझे वडील मला जवळ घेऊन माझ्यासाठी हे वाचत असत. आम्ही वाचून त्याचा उच्चार करीत असू. ते कसल्यातरी dinosaur बद्दल वाचून दाखवत होते. पंचवीस फुट उंच,सहा फुट रुंदी. मग ते मधेच थांबून मला त्या प्राण्याबद्दल विचारात असत. माझे त्या प्राण्याबद्दल काय आकलन झाले आहे,हे ते जाणून घेत असत. असा जीव जो आमच्या अंगणात उभा राहून सरळच आपल्या दुसऱ्यामजल्यावर डोकाऊ शकेल. हा पण तो खिडकीतून आत येऊ शकणार नाही. कारण त्याचा चेहरा खूप मोठा आहे आणि तो मध्ये आलाच तर खिडकी तोडूनच येईल.
आम्ही जे वाचत गेलो ते अनुभवत गेलो.आणि मी ते करायला शिकलो. जे वाचत आहे त्याचे भौतिक रूप डोळ्यासमोर साकारात होतो. मी माझ्या कुमारवयात देखील ब्रिटानिका एनसाक्लोपेडिया वाचत होतो. अशा अवाढव्य गोष्टी डोळ्यासमोर आणत होतो. पण अशा आक्राळ-विक्राळ गोष्टीची भिती कधीच वाटली नाही. ना अशा कोणत्या प्राण्याने स्वप्नात येऊन काही त्रास दिला. मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की एवढा विशाल जीव ह्या पृथ्वीवरून एकाच वेळेस नाहीसे झाले आणि कोणाला कळाले देखील नाही?
माझे वडील दुसऱ्या शहरात कामासाठी राहत होते. आठवडा सुट्टीसाठी जेव्हा ते घरी येत तेव्हा संध्याकाळच्या वेळेला ते मला जवळच्या जंगलात घेऊन जात. जंगलात होणाऱ्या घडामोडी आणि निसर्गाचा समतोल ते समजावून सांगत. आमच्या घराजवळच्या काही स्त्रियांना नेहमी वाटत की त्यांच्या पतीदेवानी देखील त्यांच्या मुलाला असेच बाहेर घेऊन जावे. त्या स्त्रीयांचे ऐकून माझ्या वडलांनी एकदा सर्वाना त्याच जंगलात आणले. आणि एक निळा गळा असलेला पक्षी दाखवला. तो पक्षी पाहताच आम्हा मुलांमध्ये एकच गोंधळ सुरु झाला. त्या पक्ष्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फ्रेंच मध्ये काय? माझे वडील काहीच बोलत नव्हते. आम्ही त्या पक्ष्याची विविध भाषेतील नावे शिकलो.त्यांनी मला पक्ष्याला निरखून बघण्यास सांगितले आणि पक्ष्याबद्दलच्या नोंदी घेण्यास सांगितले. त्यांनी मला वैज्ञानिक दृष्टीकोन दिला.
लहानपणी एका खेळण्याबरोबर खेळत असताना, एक गोष्ट समजली, खेळण्यात एक छोटा बॉल होता.खेळणे पुढे ढकलले की बॉल माघे येत होता. मी ते खेळणे घेऊन वडिलांकडे गेलो. त्यांनासर्व सांगितले,तेव्हा ते म्हणाले," हे असेच का होते? हे मला माहित नाही, पण ह्या गुणधर्माला जडत्व असे म्हणतात,त्यामुळे वस्तू आपली पूर्व स्तिथी राखून ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुला बॉल विरुद्ध दिशेने जाताना दिसला." मी त्यांनी सांगितल्यानंतर खुपदा गाडीला माघे-पुढे करून पाहिले. खरच वडील म्हणत होते ते एक सत्य होते.ह्याप्रकारे माझ्या वडिलांनी मला निसर्गाचे नियम शिकवले. ह्या शिकण्यामाघे कसलाही दबाव नव्हता. त्यांनी खूप प्रेमाने शिकवले.
प्रतिक्रिया
13 Jul 2012 - 2:14 pm | गणेशा
अप्रतिम.. १ नंबर उत्तर.
13 Jul 2012 - 7:32 pm | पैसा
मुलाखतीचं भाषांतर आहे ना? चांगलं जमलंय. असेच आणखी लिहा.