अनोखी मुलाखत

निळकंठ दशरथ गोरे's picture
निळकंठ दशरथ गोरे in काथ्याकूट
12 Jul 2012 - 11:12 pm
गाभा: 

मित्रहो,
आपण भारतीय विज्ञानाचा अभ्यास करतो, पण तो डॉक्टर किव्हा इंजिनिअर होण्याकरिता कधी वैज्ञानिक बनण्याचा विचारही आपण करत नाहीत. वैज्ञानिक बनण्यासाठी विज्ञानाचे मुळापासून संशोधन करणे गरजेचे असते. वैज्ञानिक तयार करणारी ही एक अनोखी मुलाखत.

भाग-१
मुलाखत

सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार जर एखादी वस्तू मोठ्या पिंडाच्या भोवती फिरत असेल तर त्यावस्तूसाठी वेळ हा हळू होतो.पण मला कळत नाही,दुपारच्या वेळेला आपण कोणत्या पिंडाच्या भोवती फिरत असतो? दुपारचा वेळ म्हणजे तीन घंटे एका घंट्या समान. सवंगडी मस्त झोप घेत होते. मला काही केल्या झोप येत नव्ह्ती.कसातरी वेळ घालवावा म्हणून खालच्या मजल्यावरच्या टी.व्ही. रूममध्ये आलो. टी.व्ही. बंद होता. टी.व्ही. चालू करून चैनल पाहिले, काही मराठी- हिंदी चैनल पहिल्यानंतर इंग्लिश चैनल सुरु झाले.त्यामध्ये एका चैनलवर सूत्रधार मोठ्या आवाजात ओरडत होता.
"अमेरिकेच्या इतिहासातील अनोखा वैज्ञानिक सर रिचर्ड फेन्मन ह्यांची प्रसिद्ध मुलाखत पुन्;प्रक्षेपित केली जाणार आहे."
सुत्राधारच्या म्हणण्यानुसार कार्याकार्मची वेळ दुपारी २ ते ३ अशी होती म्हणजे आजून अर्धा घंटा बाकी होता. त्या कार्यक्रमाची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत होतो कारण मी रिचर्ड पी. फेन्मन ह्यांच्या बद्दल खूप काही वाचले होते. त्यांची भौतिकशास्त्राची पुस्तके म्हणजे विज्ञानातील ज्ञानेश्वरीच. खूप साध्या व सोप्या भाषेत विज्ञान शिकता आणि मांडता येते,हे त्यांची पुस्तके वाचणारा कोणीही छाती ठोकपणे म्हणू शकेल. पदवीत्तर शिक्षण घेत असताना त्यांना मान्हात्तन इथे बोलावण्यात आले. मान्हात्तन (लोस अल्मोस) हे काय आहे? हा साहजिकच पडणारा प्रश्न. जपानचे दोन शहरे अमेरिकेच्या अणुबॉम्बने उधवस्त केले, ते अणुबॉम्ब कोठे बनले असावे? तर ते बॉम्ब लॉस अल्मोस ह्या शहरात बनले आणि त्या प्रकल्पाला मान्हात्तन प्रकल्प म्हणून देखील ओळखले जाते.

आपल्या देशात सर डॉ. होमी भाभा हे जे व्यक्तिमत्व आहे, ते खरच खूप पूजनीय आहे. जर भाभा दुसर्‍या महायुद्धानंतर भारतात आले नसते तर कदाचित आपण विज्ञान विकासात आणखीन पन्नास वर्षे माघे गेलो असतो. भारतासाठी अणुबॉम्ब बनवून त्यांनी आपल्याला स्वयंपुर्ण बनवले. असेच काही घडले लॉस अल्मोस येथे.

एका अणूमध्ये अफाट उर्जा सामावली आहे,हे दोन जर्मन केमिस्टला सर्वप्रथम समजले, ते होते ऑटो हॉन आणि फ्रित्झ स्तोस्स्मान. हा प्रयोग दुसर्‍या महायुद्धाच्या सुरवातीला झाला.पण ह्यामध्ये एक अडथळा होता,तो म्हणजे युरानिअम ज्या अणु पासून ही उर्जा मिळणार होती, तो अणु निसर्गतः उपलब्ध नव्हता. युरानिमच्या दुसर्‍या संयुगापासून त्याला वेगळा कसा करायचे? ह्यासाठी इंग्लड,जर्मनी आणि अमेरिकेचे वैज्ञानिक कामाला लागले. ज्याच्याकडे तंत्रज्ञान त्याकडे जगाची सत्ता जाणार, हे उकल असलेले समीकरण बनले होते. युद्ध परिस्थिती पाहता इंग्लडला स्वतःचे असे शस्त्र बनवणे संभव नव्हते.म्हणून इंग्लंडचा वैज्ञानिक ताफा अमेरिकेची मदत करू लागला. अमेरिकेची ताकद वाढणार होती कारण ब्रिटीश वैज्ञानिक अनुविज्ञानात प्रसिद्ध होते. अमेरिकेसाठी जगप्रसिद्ध वैज्ञानिक ओपनहेमर, नेता बनून प्रकल्पाची दिशा ठरवत होता. ह्याच ओपनहेमरनी फेन्मन ह्यांना प्रकल्पावर काम करण्यासाठी बोलाविले.
तिकडे जर्मनीचे नेतृत्व हेईसेन्बेर्ग ह्या अणुवैज्ञानिकाकडे होते. त्याने जर्मन लोकांसाठी शस्त्र बनवावे ही तेथील लोकांची रास्त अपेक्षा. जर्मन शास्त्रज्ञ झपाट्याने प्रयोग करत होते. युद्धाच्या पहिल्या एक वर्षात जर्मन अणुबॉम्ब बनवतील असे चित्र तयार झाले होते, पण अमेरिकेला सर्वप्रथम यश आले.नंतर जे झाले ते सर्व जग जाणते. जपानची दोन्ही शहरे पूर्णपणे नेस्तनाबूत झाली.

युद्धानंतर जर्मन वैज्ञानिकवर आभाळ कोसळले. सर्व देशांनी जर्मन वैज्ञानिकचे विसा नाकारले, ज्यांनी हिटलर सारख्या खलनायकाला मदत केली अश्या वैज्ञानिकाना आपल्या देशात थारा नाही. हेईसेन्बेर्ग आणि स्चोदिन्गेर ह्या परिस्तिथीमुळे फार दुखावले. ही परिस्तिथी सुधारण्यासाठी एक वैज्ञानिक पुढे आला तो होता इंग्लिश शास्त्रज्ञ पॉल डीराक,त्याच्यामते हेईसेन्बेर्गने जे केले ते योग्यच होते कारण, "लोकशाहीमध्ये महान बनणे सोपे असते हुकुमशाहीमध्ये नाही." ह्या वक्त्याव्यावर एका वाहिनेने त्यांना उलट प्रश्न केला " पण ह्यांनी हिटलरला मदत केली त्याचे काय?" ह्या प्रश्नाला चोख व सडेतोड उत्तर देऊन डीराकने मानवतेची उंच इमारतच बांधली. “काही शतकानंतर लोक हिटलरला विसरतील पण हेइसेन्बेर्गला नाही, त्याच्या कार्याला नाही."

कार्यक्रमाला पाच मिनिटे बाकी होती जाहिरातीचा भडीमार चालू होता. तेवढ्यात टी.व्ही. रूम मध्ये दोन-तीन मुले आली. आमच्याच विंगची होती.
'अरे महावीर,स्टारगोल्डवर हम दिल दे चुके सनम येत आहे, ते लाव ना. माझी आवडती मूव्ही आहे.'
'अरे खूप महत्वाचा कार्यक्रम सुरु होणार आहे, प्लीज मला तो पाहू द्या. मी तुला त्या मूव्हीची सीडी आणून देतो. पण आता मला हा कार्यक्रम पाहू दे. ' मी म्हणालो.
'ठीक आहे रे, पण सीडीचे तेवढे लक्षात ठेव म्हणजे झाले.'
'हो नक्की आणतो.'
सर्वजण आनंदात निघून गेले. पण इकडे कार्यक्रम सुरु होऊन पाच मिनिटे झाली. फेन्मन ह्यांच्या कार्याचा आढावा घेणारा माहितीपट दाखवला गेला होता. तो भाग,मी पाहू शकलो नाही,ह्याचे खूप दुखः वाटत होते.
(मुख्य मुलाखत सुरु होते.)

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

13 Jul 2012 - 12:16 am | बहुगुणी

फेनमन यांची ही मुलाखत कधीची? ती तुम्ही कधी आणि कोणत्या चॅनेलवर पाहिली? शक्य असेल तर दुवे द्या. पुढच्या भागांची वाट पहातो आहे.

[मॅनहॅटन हे लॉस अ‍ॅलामॉस मध्ये नाही. त्या प्रॉजेक्टला मॅनहॅटन प्रॉजेक्ट हे नाव पडलं कारण मूळ चर्चा आणि प्रकल्पाची बांधणी झाली ती अमेरिकेच्या वॉर डिपार्टमेंटच्या 'मॅनहॅटन एंजिनीअरिंग डिस्ट्रिक्ट' या कोड नावाच्या प्रकल्पात. आधिक माहितीसाठी इथे आणि इथे पहा. जवळजवळ तीस वेगवेगळ्या प्रयोगशाळा या प्रकल्पात सहभागी असल्या तरी अणुबाँबचं मुख्य संशोधन आणि निर्मिती झाली ती वॉशिंग्टन येथील हॅनफोर्ड प्रयोगशाळा, ओक रिज (टेनेसी) येथील ओक रिज नॅशनल लॅब आणि न्यू मेक्सिको राज्यातील लॉस अ‍ॅलामॉस येथील नॅशनल लॅब इथे. हॅनफोर्ड आणि ओक रिज या ठिकाणांची निवड होण्याचं मुख्य कारण म्हणजे तिथल्या कोलंबिया आणि टेनेसी या नद्यांवर जलविद्युत प्रकल्पांमधून होणारी मुबलक वीजनिर्मिती. प्लुटोनियम शुद्धीकरणातील रिअ‍ॅक्टर्स थंड करण्यासाठी आणि प्रचंड ion separation magnets मध्ये U235 ची निर्मिती करण्यासाठी ही वीज आवश्यक होती. मनुष्यवस्तीपासून दूर अशा बर्‍याचश्या निर्जन स्थळी असलेल्या लॉस अ‍ॅलामॉस प्रयोगशाळेत बाँब च्या केंद्रकासाठीचे explosive lenses आणि बांधणीसाठी लागणारे धातूचे casings बनवले गेले. पहिल्या बाँबची चाचणीही इथेच झाली.

पुढे हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकले गेलेले पहिले अणुबाँब तयार असल्याची माहिती देणारं हे जनरल हँडी यांचं आधिकृत पत्र. ]

रामपुरी's picture

13 Jul 2012 - 12:36 am | रामपुरी

पण व्याकरणाकडे आणि भाषाशुद्धीकडे जरा जास्त लक्ष दिले तर जास्त आवडेल
"म्हणून इंग्लंडचा वैज्ञानिक ताफा अमेरिकेची मदत करू लागला" च्या ऐवजी "म्हणून इंग्लंडचा वैज्ञानिक ताफा अमेरिकेला मदत करू लागला"

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jul 2012 - 1:25 pm | परिकथेतील राजकुमार

पण व्याकरणाकडे आणि भाषाशुद्धीकडे जरा जास्त लक्ष दिले तर जास्त आवडेल

हुकुमावरून...!
प्रेषक सरपंच Sun, 06/01/2008 - 23:18
लेखकाचे प्रोफाईल | सर्व लेखन | खरडवही | संदेश पाठवा.

राम राम मंडळी,

सध्या मिसळपाववर आणिबाणी सुरू आहे. सदर आणिबाणीच्या अध्यक्षीय अधिकारात आम्ही खालील वटहुकूम जारी करत आहोत त्याचे सर्वांनी पालन करावे ही नम्र विनंती..

सदर वटहुकूमाचे पालन न करणार्‍या सभासदाचे लेखन उडवले जाईल तसेच त्याचे मिसळपाववरील सभासदत्वही रद्द होण्याची शक्यता नाकारता येणार नाही!

तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावे व आजपर्यंत सुरू असलेले मिसळपाववरील हसतेखेळते व सुदृढ वातावरण बिघडवू नये ही विनंती!

वटहुकूम -

आज दिनांक ६ जानेवारी, २००८ रोजी, भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्रौ ११ वाजल्यापासून मिसळपाववर व्याकरण आणि शुद्धलेखन संदर्भातील कुठल्याही लिखाणाला संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

तूर्तास तरी ही बंदी अनिर्बंध काळाकरता सुरू राहील, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी...

मिसळपाववरील निरागसता आणि साधेपणा हरवू नये या दृष्टीने हा वटहुकूम जारी करण्यात येत आहे याचीही कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

दरम्यानच्या काळात मिसळपाववरील कथा, काव्य आदी ललित लेखन तसेच इतरही वैचारिक लेखन आणि त्या संदभातील प्रतिसादांची देवाणघेवाण अबाधितपणे सुरूच राहील, नव्हे मिसळपाववर या सगळ्याचं स्वागतच असेल, याचीही कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती...

कळावे,

आपला नम्र,
सरपंच.

रामपुरी's picture

14 Jul 2012 - 2:34 am | रामपुरी

जे आपल्याला वाटतं ते आपण लिहितो बाकी सगळं नेऊन घालतो तिकडे.................
.
.
.
.
म्हणजे बंबात

http://www.misalpav.com/node/22206#comment-412071

मुक्त विहारि's picture

13 Jul 2012 - 1:28 am | मुक्त विहारि

"बाराला दहा कमी" ... ह्या पुस्तकाची आटवण येतेच येते..

मस्त सुरुवात, क्रमशः टाकायचे विसरले का?

--टुकुल.

चौकटराजा's picture

13 Jul 2012 - 4:25 am | चौकटराजा

आमची इतिहासाची गोडी १८५७ या सालापासून चालू होत असल्याने हा लेख आवडला. दुसरे महायुद्ध हाच
जगाच्या इतिहासातील सर्वात प्रत्ययकारी व प्रलयंकारी व म्हणूनच महत्वाचा कालखंड आहे असे आम्ही मानतो. फार दूरवर परिणाम या युद्धाने घडविले आपल्या आयुष्यावर !