स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच का?

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
10 Jul 2012 - 8:01 pm
गाभा: 

स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच?

खरं तर उशीर झालाय पण आम्ही बेंचावर असल्याने रात्र आणि दिवस सारखेच आम्हाला. :)
असो
या प्रतिसादावरुन
इथे मुद्दाम चर्चा घडवत आहे. अर्थात इथे शतकी धाग्याची अपेक्षा न ठेवता फक्त चर्चा अपेक्षित आहे एवढेच. मी तज्ञ नाही, महाविचारी नाही, पण एक सामान्य माणूस आहे.

स्त्री ही दुर्लक्षित आहे, पुरुषांच्या अत्याचाराने पिडीत आहे हे कितपत सत्य आहे? आणि आजच्या जगात?
प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना जातीप्रमाणे आरक्षण देणे पटत असले तरी स्त्रिया याचा जातीयवादाप्रमणे दुरुपयोग करत नसाव्यात का? जातीयवादाप्रमाणे एखादी स्त्री सासू-सारर्‍यांवर आणि नवर्‍यावर सरळ 'केस' करुन फायदा घेत नसेल याची खात्री काय?

खरं तर स्त्रियांची शत्रू स्त्रीच आहे का? असा हा चर्चाप्रस्ताव आहे.. कारणं ही तशीच आहेत.
घराघरात मुलीला सारुरवास देणार्‍या आया (आईंचे अनेकवचन), लग्नांनंतर त्रास देनार्‍या सासू, नणंदा.
मुलाला बायकोशी कसे वागावे हे शिकवणार्‍या माता.

सत्यमेव जयते च्या पहिल्या भागात सासुने नवजात मुलगी अर्भकाला लाथाडणारी सासू. तिच्या मुलाला बायकोला मुलगाच माग म्हणणारी सासू. मुलींचे भ्रूणहत्या करा म्हणणारे महिला डॉक्टर..

माझ्या स्वतःच्या लहानपणी पहाण्यात आलेल्या मुलींचे 'अबॉर्शन' करुन नाल्यात फेकणार्‍या मुलींच्या आई.
मुलगा दिवा असतो म्हणणार्‍या बायांचा हिशेब कोण लावनार? प्रत्येक वेळी पुरुषांना दोष देणार्‍या समाजाला हा माझा खुला प्रश्न"
त्यांना हे प्रत्येकवेळी शिकवणार्‍या तुम्ही अडाणी आणि कित्येकवेळा उच्चभ्रू स्त्रियाच नाही का?

बाकी सविस्तर प्रतिसादांवरुन पुन्हा लिहिनंच.. आणि बाकीचेही लिहितील अशी अपेक्षा..

धन्यवाद.

आपला मराठमोळा.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

10 Jul 2012 - 9:02 pm | शिल्पा ब

ह्म्म्म.
सासु - सुना अन त्या सासवेचा मुलगा यावरच एक धागा काढ.

फक्त स्त्री वि. स्त्री असा विषय असेल तर " स्त्री हीच स्त्रीची शत्रु" हा वाक्प्रचार खरा करुन दाखवणारा असंख्य आहेत. दुसर्‍या कोणत्याही स्त्रीबद्दल मत्सर हा मुख्य : कारणं - जिच्याबद्दल मत्सर वाटतो तिला आपण "ती" म्हणु. - तीचे कपडे, फ्याशन सेंस चांगला असणे
तीचे दिसणे
तिचा नवरा - अन त्याचा पगार (यात तिचे दागिने, गाड्या, मोबाईल इ. प्रकार आले)
तिची हुशार अन देखणी मुलं
तीचं शिक्षण अन करीअर
तीचे इ. अट्रीब्युट्स (?)

इ. मिपाकर सांगतीलंच. अर्थात सगळ्याच हेवेदावे वाल्या नसतात पण प्रमाण प्रचंड आहे म्हणुनंच म्हण निघाली ना!! असो.

वादळी चर्चेसाठी शुभेच्छा!

राजेश घासकडवी's picture

10 Jul 2012 - 9:50 pm | राजेश घासकडवी

हिग्ज बोसॉन शोधताना जे काही इतर शोध लागले (उदा. महास्फोट म्हणजे देवाच्या मनातून स्फुट झालेलं विश्व, वगैरे) त्यातला नवीन खळबळजनक शोध म्हणजे - मनु या आयडीने लेखन करणारी व्यक्ती पुरुष नसून स्त्रीच होती. त्यावरून तर स्त्री हीच स्त्रीची शत्रू आहे हे सिद्धच होतं.

मराठमोळा's picture

10 Jul 2012 - 10:03 pm | मराठमोळा

तुम्हाला माझ्यातर्फे ही सप्रेम भेट

तुमचे ज्ञान आणि आकलनशक्ती याबद्दल मी बोलणे म्हणजे मी एक काजवा..

नाना चेंगट's picture

11 Jul 2012 - 10:57 am | नाना चेंगट

हॅ ! काजव्याचा थोडा 'प्रकाश' पडतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jul 2012 - 11:10 pm | llपुण्याचे पेशवेll

ते माहीत नाही बॉ पण मनू ब्राम्हण नव्हत इतके नक्की. क्षत्रीय होता. म्हणून मनुस्मृतीत साध्या साध्या गोष्टीत इतराना ५-२५ फटक्यांची शिक्षा आणि तेच प्रमाण ब्राम्हणास मात्र ४० फटक्यांचे. कदाचित ब्राम्हण ब्राम्हणेतर वादात क्षत्रियानी पोळी भाजून घ्यायची पद्धत जुनीच दिसते. कदाचित ब्राम्हणानी मनुस्मृती वाचली असती तर बाबांच्या आधी पुण्यातल्या समस्तं भटांनी ती आधीच जाळली असती.

कदाचित बाबा ती जाळतायत म्हणल्यावर काही जणांनी कुतूहलापोटी वाचायला घेतली आणि लक्षात आले बाबांनी चुकून ही वाचली आणि हीच राबवा म्हटले तर पंचाईत व्हायची. मग बाजारातल्या सगळ्या मनुस्मॄत्या विकत घ्यायचा सपाटा समस्तांनी लावला. मग काय बाबांच्या सहकार्‍याना जाळायला एक मनुस्मृती शिल्लक नाही राहीली. मग वीरकरांच्या शब्दकोषास आवरण घालून मनुस्मृती म्हणून जाळले. भट आहेतच कावेबाज सगळे.

असो मूळ मुद्दा स्त्री चा. तर जरा प्रतिसाद वाचून मग सविस्तर प्रतिसाद देऊ.

नाना चेंगट's picture

11 Jul 2012 - 10:55 am | नाना चेंगट

गदाधारी भीम शांत हो !!

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2012 - 9:51 pm | अत्रुप्त आत्मा

नक्की ;-)

बॅटमॅन's picture

10 Jul 2012 - 10:10 pm | बॅटमॅन

एक शून्य विसरलात काय ;)

निवेदिता-ताई's picture

10 Jul 2012 - 10:22 pm | निवेदिता-ताई

सासु - सुना अन त्या सासवेचा मुलगा यावरच एक धागा काढ.<<<<<<शिल्पा -सहमत ग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2012 - 10:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रुमाल टाकून ठेवतो. :)

-दिलीप बिरुटे

सुहास..'s picture

11 Jul 2012 - 5:35 pm | सुहास..

चादर टाकुन ठेवतो.

अवांतर : राक्या , बेन्चवर आहेस का रे ??

पैसा's picture

11 Jul 2012 - 7:03 pm | पैसा

रिझर्वेशन केलस कारे?

p1

ममो ला लवकरात लवकर भरपूर काम मिळू दे अशी शुभेच्छा! म्हणजे बेंचवर असल्याबद्दल काळजी वाटणार नाही. पण मग त्याचं लिखाण कमी होईल. प्रॉब्लेम आहे खरा!

मराठमोळा's picture

12 Jul 2012 - 6:02 am | मराठमोळा

>>ममो ला लवकरात लवकर भरपूर काम मिळू दे अशी शुभेच्छा

नको हो पैसातै,
कधी नव्हे ते रिकामं बसायला मिळालय, म्हणून फोटोग्राफी आणि कुकींगची हौस पुरी करुन घेतोय. :)

>>म्हणजे बेंचवर असल्याबद्दल काळजी वाटणार नाही. पण मग त्याचं लिखाण कमी होईल. प्रॉब्लेम आहे खरा!
रिकाम्या लोकांनी काहीही खरडणे म्हणजे लिखाण नव्हे असे माझे मत आहे.. आता काही भोचक मंडळी माझे मित्र असल्याने त्यांनी अजून माझ्या पाठीत रट्टा घातलेला नाही एवढंच ;)

अविनाशकुलकर्णी's picture

10 Jul 2012 - 10:43 pm | अविनाशकुलकर्णी

नक्किच असते.
बायकोच्या मदति साठी असलेली सुन्दर कामवाली बायको टिकु देत नाहि....
या वरुन बायका बायकान्च्या व नव~याचा हि शतृ असतात असे म्हणावेसे वाटते

प्रभाकर पेठकर's picture

11 Jul 2012 - 12:50 am | प्रभाकर पेठकर

सुंदर, स्वस्त आणि टिकाऊ कामवाली मिळतच नाही.

Nile's picture

11 Jul 2012 - 2:52 am | Nile

टिकेल अशी मिळत नाही? मानलं ब्वॅा तुम्हाला! ;-)

सुंदर, स्वस्त आणि टिकाऊ कामवाली मिळतच नाही.

कृपया पराला संपर्क करावा. ;)

प्रभाकर पेठकर's picture

11 Jul 2012 - 12:57 am | प्रभाकर पेठकर

स्त्रिच स्त्रिची शत्रू असते हे खरे असेल तर असुरक्षितता आणि स्वामित्व भावना ह्या दोन भावनांच्या प्रचंड प्रभावाने ते घडत असावे असे वाटते.

रेवती's picture

11 Jul 2012 - 1:00 am | रेवती

मला तर वाटतं एक धागाच दुसर्‍या धाग्याचा शत्रू (किंवा जनक).;)

आत्ता खरी खोडकर झालीस.
नाहीतर तुझी सही बदलल्यापासुन मी लक्ष ठेवुन आहे, सगळ सामसुम ! अगदी एकसुरी! फक्त सही तेव्हढी खोडकर!

एका धाग्यातुन दुसरा धागा निघु नये की काय?

काय गं मुलींनो, का घाबरवतात मला? ;)

नगरीनिरंजन's picture

11 Jul 2012 - 7:56 am | नगरीनिरंजन

जसं टीव्हीवरच्या मालिकांची सुरुवातीची थिम काहीही असली तरी त्या शेवटी दोन बायकांच्या भांडणावर येऊन स्थिरावतात तसे या धाग्यांचे चालू झालेले आहे.
बाकी पेठकर काकांशी सहमत.

सस्नेह's picture

11 Jul 2012 - 11:16 am | सस्नेह

पुरुष असो किंवा स्त्री, शत्रुत्वाची भावना शेवटी व्यक्तीगत वैशिष्ट्यच आहे.
स्त्रीचे मुलायम अंतःकरण असलेले पुरुष मी पाहिलेले आहेत अन पुरुषापेक्षा कठोर काळजाच्या स्त्रियाही.
तेव्हा उगाच स्त्री-पुरुष वाद उकरण्यात काय अर्थ आहे ?

नाना चेंगट's picture

11 Jul 2012 - 11:22 am | नाना चेंगट

असं कसं ? असं कसं?

हे वाद करुन मिपावर ट्यार्पी वाढते. (मनाचं समाधान हो )

आपण कसे पुरोगामी आहोत हे दाखवता येते. (घरी बायकोला झोडतात ही गोष्ट वेगळी)

हळूच हिंदू, भारतीय, संस्कृती, श्रुती, स्मृती यांच्यावर ताशेरे मारता येतात. (घरी देवपूजेशिवाय पाण्याचा घोट घेत नाही हे वेगळे)

आपण किती उदारमतवादी असून प्रत्येक बाबतीत कसे बायकोशी सल्ला मसलत करतो हे दाखवता येते( प्रत्यक्षात आपल्याला बायको हिंग लावून विचारत नाही हे लपवून ठेवता येते ;) )

असे अनेक फायदे आहेत ते कसे विसरता येतील?

मराठमोळा's picture

12 Jul 2012 - 6:05 am | मराठमोळा

कधी नव्हे ते नाना सारखे विचार मलाही जमले की काय.. हेच मनात चाललं होत.. म्हणजे आधीच्या ट्रेंड आणीइ बाळ्या धाग्यात लिहिलं होतं ;)

माताय, मी पण नानासारखा विचारी आणि बुद्धीजीवी झालो की काय? :P

नाना चेंगट's picture

12 Jul 2012 - 2:09 pm | नाना चेंगट

>>>माताय, मी पण नानासारखा विचारी आणि बुद्धीजीवी झालो की काय? Tongue

ह्या अपमानाचा बदला भयानक रितीने घेतला जाईल.

कवितानागेश's picture

11 Jul 2012 - 12:07 pm | कवितानागेश

पुरुष पुरषांचे शत्रु नसतात का?

मोदक's picture

11 Jul 2012 - 12:23 pm | मोदक

हा पुढचा धागा..

कॉपीराईट नोंदवून ठेव....

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jul 2012 - 12:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

एकदा बायको घरी उशीरा घरी येते. नवर्‍याला सांगते की मैत्रीणी कडे गेले होते. नवरा त्याला माहीत असलेल्या तिच्या सगळया मैत्रीणींना फोन करुन विचारतो. सगळ्या सांगतात की बरेच दिवस त्या एकमेकींना भेटल्या सुध्दा नाहीत.

असाच काही दिवसांनी नवरा रात्रभर बाहेर राहून सकाळी घरी येतो व बायकोला सांगतो की रात्रभर मित्राकडे होतो. बायकोपण त्याच्या सगळ्या मित्रांना फोन करते. सगळे जण कबुल होतात की तो रात्रभर त्यांच्याच बरोबर होता. त्यातले काही जण तर तो अजुनही त्यांच्या बरोबरच आहे असा दावा करतात.

जाणकारांनी योग्य तो निष्कर्ष काढावा.

पैजारबुवा,

शिल्पा ब's picture

11 Jul 2012 - 12:49 pm | शिल्पा ब

फेसबुकावरचा विनोद आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jul 2012 - 6:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

अभिनंदन,

आत्मशून्य's picture

11 Jul 2012 - 6:17 pm | आत्मशून्य

पुरुष पुरषांचे शत्रु नसतात का?
असतात की, पण निदान स्त्रियाच पुरुषांच्या शत्रु आहेत, आपण स्त्रियांची बरोबरी केली पाहिजे असा खोटा समज तरी बाळगत/पसरवत नाहीत ? असो, बाकी स्त्रियांनी स्त्रियांचे जरुर शत्रु असावे(च), व यासाठी काही मदत हवी असल्यास मी त्याबाबत काहीही करणार नाही, पण नैतीक पाठींबा जरुर आहे हे नमुद करुन मी तुमच्या प्रतिक्रीयेच्या प्रतीकुल प्रतीसाद प्रतीसादत नाही याचीही नोंद ठेवावी ही याचना 0:)

कवितानागेश's picture

12 Jul 2012 - 12:03 pm | कवितानागेश

म्हणजे स्त्री-पुरुष एकमेकांचे शत्रु नाहीत की काय? :P

आत्मशून्य's picture

12 Jul 2012 - 2:17 pm | आत्मशून्य

स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच असेल व पुरुष पुरुषांचे शत्रु असतील तर स्त्री-पुरुष एकमेकांचे शत्रु कसे ? तसही पुरुष कधी स्त्रिला आपली शत्रु मानणार नाही मग भलेही ती जागतीक महायुध्दाचे कारण का असेना. ;)

प्रत्येक गोष्टीला दूसरी बाजु असते. एकच बाजु घेवून बोलले तरी दूसरी बाजु नसतेच असे होत नाही....

स्त्री ही दुर्लक्षित आहे, पुरुषांच्या अत्याचाराने पिडीत आहे हे कितपत सत्य आहे? आणि आजच्या जगात?

स्त्री ही दूर्लक्षित नक्कीच नाहिये.. आणि अत्याचाराने पिडीत पुरुष ही आहेत आणि स्त्रीया हि.. प्रमाणाचे म्हणाल तर स्त्रीयांच्या पुरुषांवरील अत्याचारापेक्षा , पुरुषांचे स्त्रीयांवरील अत्याचार जास्त आहेत .
आजचे जग म्हणजे काय..? नात्यांचे बंध सैलावुन आपल्याच स्वप्नांशी पाठशिवणीचा खेळ खेळत जगणे असेच चालु आहे.

प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना जातीप्रमाणे आरक्षण देणे पटत असले तरी स्त्रिया याचा जातीयवादाप्रमणे दुरुपयोग करत नसाव्यात का?

प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना जातीप्रमाणे आरक्षण देणे पटत असणे हेच चुकीचे आहे माझ्या मते... स्त्री ही अबला नाही हे मान्य केले तर या आरक्षणाला अर्थ उरत नाहि..आरक्षणा पेक्षा ही स्व रक्षण करता येणे महत्वाचे. आणि स्वताच्यात असणार्या गुणांवरुन मला तरी आरक्षणाची गरज स्त्री ला आहे असे वाटत नाही..
असो आरक्षणचा मुद्दा येथे उपस्थीत होतो आणि कोणीतरी आणखिन एक धागा काढेल या भितीने येथेच हा मुद्दा थांबवू.

जातीयवादाप्रमाणे एखादी स्त्री सासू-सारर्‍यांवर आणि नवर्‍यावर सरळ 'केस' करुन फायदा घेत नसेल याची खात्री काय?

फायदा घेवू शकते... हे सत्य आहे, पण तसा कायदा नसला तर स्त्री वरती होणारा जाच कमी करण्याची ताकद ही आपल्या कायद्यात नाहि म्हणुन हा एक खडतर आणि एकसुरी रस्ता निवडला गेला आहे.
आणि हा कायदा वयक्तीक चुकीचा वाटतो पण असे अनेक कायदे आहेत ते पण बंद करता येण्याची धमक सरकार मध्ये.. जनते मध्ये हवी आहे.. जातीवरुन शिविगाळ केली या एका कारणाने ( पुरावा नसताना) ही बरेच जण फायदा घेत असतात.. तेथे ही बोललेच पाहिजे..
स्त्री ही सबला असली तरी, स्त्री ला जी शक्ती मिळाली आहे तीच कधी कधी तीची वाट खडतर करते आहे, बलात्कार झाल्यावर पुरावे दाखवा म्हणणारा ही आपलाच कायदा आहे.. हे ही विसरुन चालणार नाहि.

खरं तर स्त्रियांची शत्रू स्त्रीच आहे का? असा हा चर्चाप्रस्ताव आहे

एकाच बाजुने विचार केला तर उत्तर हो आहे, कारण पुरुष प्रधान संस्कृती मध्ये, आपल्याला हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्त्री सोडुन अजुन तरी घरातील स्त्रीला कोणावर इतका वचक ठेवता येत नाहि . आणि स्त्रीचे माणसिक खच्चिकरण न करता स्त्रीला नविन आकाश मिळवून देण्यास जर स्त्री नेच सुरुवात केली तर हे बदलेल असे वाटते..

मराठमोळा's picture

12 Jul 2012 - 6:08 am | मराठमोळा

>>आणि स्त्रीचे माणसिक खच्चिकरण न करता स्त्रीला नविन आकाश मिळवून देण्यास जर स्त्री नेच सुरुवात केली तर हे बदलेल असे वाटते..

हे मात्र जाम पटले.. धन्यवाद गणेशा. :)

स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच का?

निदान माझ्या लेकीच्या शिक्षिका तरी हेच म्हणत असतील. ;)