गाभा:
मी माझी राहती जागा चांगली ऑफर आल्यामुळे विकून टाकली, आणि दुसर्या जागेचा शोध सुरू केला. पण त्याच वेळी मार्केटमधले दर वाढल्यामुळे नवी जागा परवडत नाही असे लक्शात आले. आता मी भाड्याच्या घरात राहातोय. मूर्ख लोक घर बांधतात आणि शहाणे लोक त्यात रहातात, असे म्हणतात. माझा कोणता निर्णय बरोबर ते समजत नाही.
प्रतिक्रिया
24 Oct 2007 - 6:28 pm | विसोबा खेचर
आपल्याला लवकरात लवकर आपल्या मालकीची आणि मनासारखी जागा मिळो हीच सदिच्छा!
तात्या.
24 Oct 2007 - 6:33 pm | उदय ४२
तात्या,
नुसत्या शुभेछांवर घरे, जागा मिळत नसतात, हीच समस्या आहे...
24 Oct 2007 - 6:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
<<नुसत्या शुभेछांवर घरे, जागा मिळत नसतात, हीच समस्या आहे...
मग तोपर्यंत, बिनभाड्याच्या घरात राहण्यास जावे ! :)
(हलकेच घेरे भो )
24 Oct 2007 - 6:51 pm | सहज
घर, ते सुद्धा पूर्ण मालकीचे एक पैसा लोन नसलेले, आपल्या ऐपतीत देखभालीचा खर्च असलेले असण्यासारखे सुख नाही. (हो नाही तर अलीशान महाल काय करायचा त्याचे रक्षण, डागडूजी, प्रॉपर्टी इ. ) ते विकताना तुमचा नक्की विचार व भविष्यातील रहाण्याच्या जागेचा काय विचार होता?
जरा आकडे, रकमा, गरजा सांगा म्हणजे निर्णय बरोबर की कसा ते सांगता येइल व जमल्यास समस्या निराकरण करायचा उपाय बघता येईल.
24 Oct 2007 - 7:12 pm | विकेड बनी
घर असेल तर नवं घर घेणं परवडणारं नाही हेच खरं. तिथले भाव आभाळाला पोहोचले आहेत. तेव्हा सध्या जागांचे भाव खाली उतरण्याची वाट पाहत बसणे इतकेच तुमच्या हातात दिसते.
दुसरं घर हातात किंवा डोक्यात असल्याशिवाय असे कसे राहते घर विकून बसलात?
24 Oct 2007 - 7:13 pm | उदय ४२
मुंबैच्या एका उपनगरात राहणार्या मला, हार्ट ऑफ सिटी'त जायचं स्वप्न पडलं होतं. माझी मूळची जागा विकून त्यात थोडी (कर्जाची) भर घालून मी मध्य मुंबईत जायचा विचार करत होतो. पण कसचे काय, तेल गेले तूप गेले, हाती आले धुपाटणे, तशी, स्वप्नातली जागा राहोच, आता जिथे जागा होती, त्याच्या आसपासही जागा घेणं मुश्किल झालंय. हातातली रक्कम आणि गरजेचा आकडा यांचा मेळ जमत नाहीये. भाव एकदम दुप्पट वाढलेत. तितक्याच रकमेचं कर्ज काढावं लागेल.
24 Oct 2007 - 7:20 pm | विकेड बनी
मला वाटलंच की गोष्ट मुंबईची आहे म्हणून.
आमच्या एका नातेवाईकांनी उपनगरात स्टेशनजवळ चांगले घर मिळते म्हणून जागेत पैसे घातले आहेत पण दुर्दैवाने त्या जागेचे काम थांबले. आता ते पैसे काढून घ्यायचे म्हटले तर त्या पैशांत दुसरी जागा त्या उपनगरात येणे अशक्य झाले आहे, पैसे काढून घेतले आणि जागेचे काम सुरु झाले तर हातात काहीच नाही असे होईल. ते ही अशा दुविधेत सापडले आहेत.
तूर्तास, जे होते ते पाहत राहणे एवढेच हातात आहे असे वाटते.
24 Oct 2007 - 8:04 pm | सहज
अरे बापरे, थोड्या कर्जावरून एकदम निम्मे अजून घ्यावे लागणार?
गणितं चांगलीच चुकली म्हणायची की...
असो जास्त विचार करण्यापेक्षा काही उपाय
१) जरा लांब पण आधीच्या बजेट प्रमाणे किंमत असेल तिथे घर घेणे
२) पाहीजे त्याच जागी जरा लहान घर, रीसेल मार्केट मधले घेणे
३) इतर खर्च, गुं तवणूक जरा इकडे फिरवता आली तर नशीब समजून घेणे पण अगदीच झेपणार नाही असा सौदा नको बर का.
आता आहे असे आहे. तुम्ही रहाता तिथली भाडीपण काही स्वस्त नसतील. तो सुद्धा हिशोब बघीतला पाहीजे. तसेच नवीन घरासाठी जे कर्ज घ्याल त्याचा व्याजदर व हप्ता एकदम सही असेल असेच घ्या. थेंबे थेंबे दीर्घ मुदतीत बराच फरक पडतो.
अरे बापरे, थोड्या कर्जावरून एकदम निम्मे?
24 Oct 2007 - 7:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उदय राजे,
खरे तर तुमचे बजेट किती आहे, तेही जरा कळाले असते तर अधिक मदत करता आली असती.
पण मध्यमवर्गीय माणसाला परवडेल असा एक भाग ठाण्यातील ( नवी मुंबई ) एरोली सेक्टर क्रमांक १ ते २० परिसरात आणि घनसोलीत आपल्याला चांगली घरे मिळतील असे वाटते ! अर्थात तिथे राहणे आपण पसंत कराल तरच हा सल्ला !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
24 Oct 2007 - 8:01 pm | उदय ४२
सर,
घणसोलीमधले घर म्हणजे हार्ट ऑफ द सिटी मधून पार्ट ऑफ द सिटी मध्ये गेल्यासारखे वाटते हो.आणि तिथून फोर्टला कामावर यायचं म्हंजे .....काय करू?
24 Oct 2007 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर,
घणसोलीमधले घर म्हणजे हार्ट ऑफ द सिटी मधून पार्ट ऑफ द सिटी मध्ये गेल्यासारखे वाटते हो.आणि तिथून फोर्टला कामावर यायचं म्हंजे .....काय करू?
फोर्टलाच घर असेल तर आपण म्हणाल महाग आहे, स्वस्त दाखवले तर म्हणाल लांब आहे.
त्यापेक्षा तुम्हीच विकलेली जागा थोडे अधिक पैसे देऊन खरेदी करावी, असा आमचा या प्रकरणातला शेवटचा सल्ला आहे. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
24 Oct 2007 - 9:34 pm | विकेड बनी
फोर्टलाच घर असेल तर आपण म्हणाल महाग आहे, स्वस्त दाखवले तर म्हणाल लांब आहे.
असं नसतं. मुंबईत बोरीवलीला राहणारा विरारला राहायला तयार होत नाही. यांत अनेक प्रश्न असतात. मुंबईचा असल्याने उदयचा प्रॉब्लेम मला कळतो. त्याला एकच करता येईल. आहे ते स्वप्न सोडून देणे. उपनगरात थोडी आत एखादी लहान जागा मिळते का ते पाहणे. १ रु. - २ रु. किचन का होईना त्यात काही गैर नाही. तरूणपणी अनेक जुगार खेळता येतात. आज लहान जागा घेतली, काही वर्ष तिथे काढली तर नंतर मोठी उडी मारता येईल.
हे जर करायचे नसेल तर भाड्याच्या जागेत राहून भाव उतरायची वाट पाहावी.
24 Oct 2007 - 9:37 pm | प्रकाश घाटपांडे
व्यावसायिक लोक हे क्षमता असेल तरी बंगला भाड्याने घेतात. अनेक वर्श लिव्ह ऍन्ड लायसन वर राह्तात. पुर्वी लोक चाळी बांधून भाड्याने द्यायचे आता " सेकंड होम" देतात. माझ्या मित्राने केवळ बायकोची मनातील असुरक्षीतता जावी म्हणून प्लॉट घेउन ऑफिस जवळ बंगला घेतला. अन्यथा आयुष्यभर तो भाड्याने ब़गल्यात राहिला असता. अजुन ऑफीस भाड्याच्या बंगल्यातच आहे.
आजही पुण्यात नुंबईवाल्या लोकांनी फ्लॅट घेतले आणी कुलुप लाबून कैक वर्षे बंद ठेवले आहेत. लीजवर पण देत नाहीत.
स्वत:च हक्काचे घर असणे हे प्रत्येकाला वाटते. काही लोक कबुल करत नाही एवढेच.
प्रकाश घाटपांडे
25 Oct 2007 - 9:51 pm | दिनेश५७
असं केलत, तर हातातले पैसे वाचतील, आणि घरही मिळेल. पण `वजन' वापरायचं जमलं पायजे.
26 Oct 2007 - 7:11 am | गुंडोपंत
जितके जमेल तितके
त्वरीत घर विकत घ्या!
घरांच्या किंमती कधीच खाली येत नसतात
हे आणि हेच सत्य आहे...
मृगजळाच्या मागे धावू नका!
आपला
इतके समजूनही अजून भाड्याच्याच घरात असलेला... पण प्रयत्नवादी,
गुंडोपंत
26 Oct 2007 - 9:10 am | दिनेश५७
गुंडोपंत,
अभिनंदन!
मूर्ख लोक घर बांधतात आणि शहाणे लोक त्यात रहातात...
उदयराव म्हंतात, तसे तुम्ही आहात!