साहित्य--एक वाटी चणा डाळ,एक वाटी गूळ,एक वाटी ,वेलची पूड,एक वाटी मैदा, तेल
क्रुती--प्रथम चणा डाळ शिजवून कोरडी करुन घ्यावी,त्यात गूळ घालून परत ५मिनिटे शिजवावी,वरून वेलची पूड घालावी.मैद्यात थोडे तेल व पाणी घा लून भिजवावां. नंतर सारण जाडसर वाटावे.सारणाचे लहान लहान गोळे करावेत.मैद्याची पारी मोठ्या पुरीसारखी लाटावी.त्यात सारणाचा लहान गोळा भरून सारण सर्वत्र पसरेल इतपत हलक्या हाताने लाटावे.तव्यावर तूप घालून खरपूस भाजावे.दोन्ही बाजूने भरपूर तूप सोडून भाजावे.
वि.सू.-हा पदार्थ भरपूर तूपयुक्त असल्यामुळे उश्मांक जागरुक असण्यारांनी थोडाच खावा.