फाटकी चड्डी

कवटी's picture
कवटी in काथ्याकूट
20 Jun 2012 - 10:13 am
गाभा: 

कालच बातमी वाचली. (तुम्ही ही वाचली असेलच. पण प्रथा म्हणून इथे पेस्टत आहे.)
<बातमी >
"कर्जाच्या सापळ्यात सापडलेल्या १७ युरोपीय देशांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निधीसाठी भारत १० अब्ज डॉलरची मदत करणार आहे. भारताबरोबरच ब्रिक गटाचे सदस्य असलेल्या पाच देशांनी या निधीसाठी मदत करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्रिक गटाच्या येथील अनौपचारिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जी-२० देशांच्या शिखर परिषदेआधी ही बैठक झाली. भारताशिवाय चीन, रशिया, ब्राझील व दक्षिण आफ्रिका हे ब्रिक गटाचे इतर सदस्य देश होत. यापैकी चीन ४३ अब्ज डॉलरची, तर रशिया आणि ब्राझील प्रत्येकी १० अब्ज डॉलरची मदत करणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा वाटा दोन अब्ज डॉलरचा असेल.
युरोपमधील कर्जसमस्या हा जागतिक प्रश्न आहे. त्यातून जगभर आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. या प्रश्नावर परस्पर सहकार्यातून तोडगा काढण्याची गरज आहे, यावर ब्रिक गटाच्या नेत्यांचे एकमत झाले. "
<\बातमी >
मला एक कळत नाही. आपल्या भारतात अर्थव्यवस्थेची इतकी वाट लागलीय. महागाई गगनाला भिडलीय. कसले कसले ग्रोथ रेट बोंबललेत आणि त्यावर काही ठोस उपाय न करता त्या युरोपीय देशांना १० अब्ज डॉलर (~५५० अब्ज रुपये) देण्याची भारताला काय गरज आहे? इथल्या लोकाना खायला अन्न नाही. हजारो टन अन्न निट साठवले गेले नाही म्हणून दर वर्षी सडतय.
त्या५५० मधले ४-५ अब्ज रुपये जरी चांगली गोदामे बांधण्यात खर्च केले तरी सडण्या ऐवजी कितीतरी गरीबांच्या पोटात २ वेळचे अन्न पडेल.
हेच रुपये आपली अर्थ व्यवस्था कणखर करण्यासाठी वापरले तर 'युरोपीय अर्थव्यवस्था बोंबलली तर आपली (आधीच खड्यात गेलेली) अर्थव्यवस्था पण धोक्यात येईल म्हणून त्यांना मदत' करायची गरज पडणार नाही.
हेच रुपये आपल्या देशातले रोड चांगले करण्यासाठी वापरले तर मालाची ने आण करणे सोपे पडेल तसेच गाड्यांचे मायलेज सुधारून पर्यायाने पेट्रोल डिझेल च्या वाढलेल्या किमतींपासून थोडासा दिलासा मिळेल. हेही अगदीच करायचे नसेल तर त्या टोलवाल्यांचे जे काय राहिलेले पैसे असतील (पेपरातल्या बातमी नुसार किर्कोळ कोटी मधे आहेत किमती) ते एक रकमी फेडून निदान रस्ते तरी टोल मुक्त करा.
हे म्हणजे स्वतःच्या *डीला नाही चड्डी आणि शेजारचा काकडतोय , ती थंडी आपल्याला लागू नये म्हणून त्याला स्वेटर घालण्यासारखे झाले.

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2012 - 11:30 am | संजय क्षीरसागर

माझे काँटॅक्ट्स आहेत आणि मी तुमच्याशी सहमत आहे. आपण सर्व शक्तीनिशी या प्रपोजलला प्रतिबंध करू

तिमा's picture

20 Jun 2012 - 11:40 am | तिमा

अकाउंटमधे बॅलन्स नसताना चेक द्यायला काय जातंय ?

तुम्ही थांबा, च्यायला हे बघायलाच हवं

पप्पुपेजर's picture

20 Jun 2012 - 11:47 am | पप्पुपेजर

काही चुकते आहे का? जर युरोप महासंघाला मदत नाही केली तर त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर पण पडणार आहे.
चीन ला सगळ्यात जास्त धोका आहे कारण त्यांची अर्थव्यवस्था "export " (मराठी शब्द) वर टिकली आहे.

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2012 - 11:50 am | श्रीरंग_जोशी

निर्यात हा शब्द आहे...

पप्पुपेजर's picture

20 Jun 2012 - 1:11 pm | पप्पुपेजर

धन्यवाद

वेगळं आणि अशी डायरेक्ट मदत करणं वेगळं.

नगरीनिरंजन's picture

20 Jun 2012 - 11:56 am | नगरीनिरंजन

यावर काथ्या कुटून झाला आहे.
http://www.misalpav.com/node/19295

जर एखादी गोष्ट पटली नाही आणि आपण त्याविरोधात आपल्याला शक्य आहे तेवढा प्रतिकार केला नाही तर काय अर्थ आहे? त्यांनी दुवा मात्र अजून दिलेला नाही

कवटी's picture

20 Jun 2012 - 12:21 pm | कवटी

हि घ्या लोकसत्तेतली बातमी... टि.व्ही. वर पण काल होती बातमी.

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=233351:...

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2012 - 12:32 pm | संजय क्षीरसागर

ते कर्ज आहे, `मदत' या शब्दावरनं अर्थ क्लिअर नव्हता. तरीही आता बघतो आणि कळवतो

चिरोटा's picture

20 Jun 2012 - 12:54 pm | चिरोटा

भारत तरी युरोपिय देशांना कर्ज देणार ही बातमी वाचून छाती अभिमानाने भरून आली.

नाना चेंगट's picture

20 Jun 2012 - 12:55 pm | नाना चेंगट

मिपावरील मान्यवर अर्थतज्ज्ञांच्या विश्लेषणात्मक प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

बर्याचदा अशी मदत बलन्स ओफ ट्रेड आणि पेयमेंट व्यवस्थापनाचा भाग असते. जर आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असेल तर डेफीसिट होतो (भारत ह्या मध्ये मोडतो). तो सांभाळण्यासाठी (बलन्स) देश इतर देशांना मदत करतात.

मध्यंतरी नैसर्गीक आपत्तीवेळी भारताने इतर देशांची मदत नाकारली होती. हा सुद्धा बलन्स ओफ ट्रेड आणि पेयमेंट चाच भाग होता. पण सरकारने अभिमानाची बाब नोंदविली.

दादा कोंडके's picture

20 Jun 2012 - 10:45 pm | दादा कोंडके

बलन्स ओफ ट्रेड आणि पेयमेंट व्यवस्थापनाचा भाग असते

आग लागो तुमच्या या व्यवस्थानाच्या भागाला. :) नुसतेच कुठलेतरी पुस्तकी शब्द वापरून समर्थन करता येइल का?

मध्यंतरी नैसर्गीक आपत्तीवेळी भारताने इतर देशांची मदत नाकारली होती. हा सुद्धा बलन्स ओफ ट्रेड आणि पेयमेंट चाच भाग होता. पण सरकारने अभिमानाची बाब नोंदविली.

काय _ट फरक पडला यानी? हे आहे असं आहे, पैश्याचं सोंग घेउ नये. आहे ना गरज, माग भिका आणि जाळा पोटं आमची. जेंव्हा वर्षभरात शंभरपेक्षा कमी भुकबळी जातील तेंव्हा तुमचा अभिमानकी काय तो दाखवा म्हणावं.

कवटी's picture

21 Jun 2012 - 12:05 pm | कवटी

दादांशी सहमत!

भारताचे सुयोग्य निर्णयाबद्दल अभिनंदन!

विकास's picture

20 Jun 2012 - 7:14 pm | विकास

हे काही पहील्यांदाच होत नसून कधीपासून होत आले आहे आणि त्यात काहीच गैर नाही. डिटेल्स माहीत नाहीत, पण वरकरणी योग्य निर्णय नक्की आहे.

आपण जेंव्हा "तिसर्‍या जगातले गरीब राष्ट्र" म्हणून धरले जायचो, तेंव्हा देखील आपण आपल्यापेक्षा गरीब राष्ट्रांना आर्थिक मदत करायचोच. ह्यात राष्ट्रीय हितसंबंध असतात आणि राष्ट्रीय (स्ट्रॅटेजिक, आर्थिक, धंद्याचा) स्वार्थ देखील असतो. त्याचा फायदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तळागाळापर्यंत पोचण्यास होत असतो.

सोनियाताई युरोपच्या आहेत

मग अर्थतज्ञ 'मनि'मोहनना कोण पुसतो

ऋषीकेश , विकास, एक शुन्य शुन्य,
हा निर्णय सुयोग्य कसा आणि याने भारताचा काय आणि कसा फायदा होणार आहे तसेच हे पैसे तिकडे न देता भारतातल्या पायाभूत सोयींवर खर्च केले तर आपले काय नुकसान होणार आहे हे जरा डिटेलवारी सांगता का?

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 6:20 am | श्रीरंग_जोशी

जरासे उसवलेल्या वस्त्राला सरळ सरळ फाटके म्हणावे?