साहित्य -
१) अंडे - एक
२) चीज स्लाइसेस - दोन
३) झाकण असलेली मायक्रोवेव्-सेफ प्लेट वा बाऊल
४) मायक्रोवेव ओवन
५) मीठ आणि मीरपूड - चवीपुरते
कृती -
१) प्लेट वर एक चीजची स्लाइस घ्या.
२) त्यावर अंडे फोडून घाला.
३) त्यावर चीजची दुसरी स्लाइस ठेवा.
४) प्लेटवर झाकण ठेवा.
५) प्लेट मायक्रोवेवमध्ये ठेऊन ४०-४५ सेकंद शिजवा.
वितळलेल्या चीजमध्ये नखशिखांत भिजलेले अंडे तयार आहे. त्यावर चवीपुरते मीठ आणि मीरपूड भुरभुरवा आणि आस्वाद घ्या!
टीपा -
१) अंडे मायक्रोवेवमध्ये फुटते तेव्हा उघड्या प्लेट अथवा बाऊलमध्ये हा पदार्थ करू नये. हलके झाकण ठेवावे.
२) चीजच्या स्लाइसला थोडे बटर लावून "चीजा-तुपाळलेले अंडे" असा पाठभेददेखिल करता येईल.
३) एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागणारे हे आम्लेट, इतर कुठल्याही आम्लेट-प्रकारापेक्षा झटपट होते.
प्रतिक्रिया
11 Jun 2012 - 6:16 pm | गणपा
फटु किधर कु है?
11 Jun 2012 - 7:15 pm | सुनील
तांत्रिक अडचण. दूर झाल्यावर छब्या चढविण्यात येतील!
11 Jun 2012 - 6:22 pm | इनिगोय
वैदिक आम्लेट हा काय प्रकार आहे?
18 Jun 2012 - 9:29 am | llपुण्याचे पेशवेll
थर्डक्लासपणा.
19 Jun 2012 - 2:45 pm | मृगनयनी
सहमत रे पुप्या... :|
आधी पप्पा'ने स्वतःचं पाळं सोडून मास्तरांचंच आडनाव चोरलं... आणि आत्ता तर काय मागची मेन्ढरं डायरेक्ट मास्तरांच्या शुद्धतेचं पेटंटही चोरायला लागलीत की ! :|
19 Jun 2012 - 3:13 pm | चैतन्य दीक्षित
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् हा श्लोक आठवला...
11 Jun 2012 - 7:24 pm | बिपिन कार्यकर्ते
ही खरोखरच एखादी रेसिपी आहे अशी आशा करतो. मात्र वैदिक ऑम्लेट असं म्हणणं हा प्रकार तितकासा आवडला नाही. वैदिक शब्दाबद्दल काही म्हणणं नाहीये.. मात्र खोडसाळपणाचा संशय येतोय त्याबद्दल म्हणतोय.
असो, चालू द्या. सुनीलराव कधी भेटले तर ही रेसिपी ते खिलवतीलच आणि आम्हीही वैदिक शब्दासकट तिचा स्वीकार करून तिला सद्गती देऊ याची खात्री आहे. ;)
11 Jun 2012 - 7:46 pm | विकास
मात्र वैदिक ऑम्लेट असं म्हणणं हा प्रकार तितकासा आवडला नाही.
सहमत
मात्र खोडसाळपणाचा संशय येतोय त्याबद्दल म्हणतोय.
खोडसाळपणाला पण माझी हरकत नाही, पण मला यात तिरस्कार दिसतो आहे. तो भावला नाही, विशेष करून सुनील यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती... असो.
18 Jun 2012 - 8:45 pm | राजेश घासकडवी
वैदिक लोकांनी आम्लेट खाणं यात विसंगत का बरं वाटावं? अनेकांच्या मते वैदिक काळात ब्राह्मण गोमांसही खायचे.
18 Jun 2012 - 9:47 pm | तर्री
गोमांसच का ?
अनेकांच्या मते यज्ञ हा विश्व विनाशासाठीच करण्यात येत असे. तसेच "नरभक्षक " ब्राम्हण ही होते असे "अनेक" विद्वान " म्हणतात.
19 Jun 2012 - 1:15 am | राजेश घासकडवी
यासाठी तुमच्याकडे काही विदा आहे का? उगीच काहीतरी भडकाऊ विधानं करू नयेत.
19 Jun 2012 - 1:52 am | तर्री
"अनेकांच्या मते" विदा असण्याची गरज नाही.
20 Jun 2012 - 7:12 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. "अनेकांच्या मते"ला विदा असण्याची गरजच नाही ना 'त्या अनेकांना' मते व्यक्त करायला प्रमाण. :)
20 Jun 2012 - 8:45 am | राजेश घासकडवी
विदा हवा असेल तर तसं सरळ सांगा की....
http://www.hindu.com/2001/08/14/stories/13140833.htm
वरील दुव्यावरची काही वेचक विधानं देत आहे:
Many gods such as Indra and Agni are described as having special preferences for different types of flesh - Indra had weakness for bull's meat and Agni for bull's and cow's. It is recorded that the Maruts and the Asvins were also offered cows. In the Vedas there is a mention of around 250 animals out of which at least 50 were supposed to be fit for sacrifice and consumption. In the Mahabharata there is a mention of a king named Rantideva who achieved great fame by distributing foodgrains and beef to Brahmins.
Taittiriya Brahman categorically tells us: `Verily the cow is food' (atho annam via gauh) and Yajnavalkya's insistence on eating the tender (amsala) flesh of the cow is well known. Even later Brahminical texts provide the evidence for eating beef. Even Manusmriti did not prohibit the consumption of beef.
http://books.google.com/books?id=vTrKWRUOpbcC&printsec=frontcover&source...
वरील दुव्यावर दिव्येंद्र नारायण झा यांनी लिहिलेलं 'The myth of the holy cow' हे पुस्तक वाचायला मिळेल.
20 Jun 2012 - 10:47 am | तर्री
कुणा एकाचे फुसकट विधान. खरे ही असेल. पूर्वी यज्ञात / "देव" पूजेत बळी दिला जात असे.शंकाराचार्यनी ती प्रथा बंद करून श्रीफळ वाढवण्याची प्रथा सुरु केली त्या कडे आपण (समुदाय , व्यक्ती विशेष नाही ) दुर्लक्ष करालच.
20 Jun 2012 - 11:00 am | नितिन थत्ते
छ्या !!! तुम्ही विदा म्हणून शेवटी इंग्रजी वर्तमानपत्राचेच दुवे दिलेत. आम्ही अस्सल सावरकरी दुवे दिले असते.
20 Jun 2012 - 11:25 am | मृत्युन्जय
अस्सल सावरकरी दुवे
नीट कळले नाही. सावरकरी दुवे म्हणजे काय?
20 Jun 2012 - 11:57 am | राजेश घासकडवी
पण वर्तमानपत्राचं नावच 'द हिंदू' आहे याबद्दल काही पॉइंट्स तरी द्या की मास्तर!
11 Jun 2012 - 7:39 pm | रेवती
आधी फटू मग प्रतिसाद. ;)
11 Jun 2012 - 8:14 pm | JAGOMOHANPYARE
वैदिक विमानात पूर्वी वैदिक मायक्रोवेव असायचे.. तिथे विमानात नाष्ट्याला हे द्यायचे, म्हणुन वैदिक अऑम्लेट असे नाव आहे.
11 Jun 2012 - 9:11 pm | सुनील
@ बिका
ही खरोखरच एखादी रेसिपी आहे अशी आशा करतो
अर्थात! अनेकवेळा Tried and tasted! झटपट आणि पोटभर नाश्ता.
सुनीलराव कधी भेटले तर ही रेसिपी ते खिलवतीलच
ते तर करूच. पण तोपर्यंत तुम्हीही एकदा ट्राय करून पहा. फार कॅलरी कॉन्शस असाल तर, दोन ऐवजी चीजची एकच स्लाइस टाका!
@बिका आणि विकास
वैदिक शब्द वापरण्याबाबत - खोडसाळपणा जरूर आहे ;) (तो तर आमच्या रक्तातच आहे - नाविलाज!!). पण तिरस्कार? कुणाचा? कशासाठी? नाय बॉ!
11 Jun 2012 - 9:22 pm | विकास
पण तिरस्कार? कुणाचा?
अहो त्या शब्दाचा आणि कदाचीत शब्दाबरोबर असलेल्या इतिहासाचा देखील.
कशासाठी?
आता हे काय विचारणं झालं?
नाय बॉ!
ठिक आहे, तुम्हाला जर तसे वाटत नसेल आणि तसा तुमचा उद्देश नसेल तर उत्तमच आहे. :-)
11 Jun 2012 - 9:23 pm | मुक्त विहारि
वैदिक ह्याचा अर्थ, वेद-कालीन किंवा प्राचीन काळातील असा होतो.त्या काळात हिंदूस्थानांत "चीझ" मिळत असेल असे वाटत नाही.
11 Jun 2012 - 10:31 pm | सुनील
वैदिक ह्याचा अर्थ, वेद-कालीन किंवा प्राचीन काळातील असा होतो.
नाय बॉ. असे काही नाही, असे नुकतेच समजले. ;)
11 Jun 2012 - 11:21 pm | मुक्त विहारि
मग तुम्हाला समजलेला "वैदिक" ह्या शब्दाचा अर्थ सांगाल का?
12 Jun 2012 - 3:00 pm | मृगनयनी
वैदिक ह्याचा अर्थ, वेद-कालीन किंवा प्राचीन काळातील असा होतो.
अरे बाप रे.. नुकतेच समजले? ... कुठे भारतातच जन्मलात ना!! की श्रीलन्केत? ... :| ...
असो.. 'वैदिक संस्कृती' ही फार पूर्वीपासून भारतात रुजलेली संस्कृती आहे.... (त्यामुळेच स्कोअर सेटल'साठी पवित्र "वैदिक" शब्दाचा ऑम्लेट'शी सम्बंध जोडणे... निषेधार्ह वाटते..)
तरीपण धन्दा / धागा रेटण्यासाठी आपल्यासारख्या लोकांना आजही "वैदिक" या शब्दाचा आधार घ्यावाच लागतो... =)) =)) =)) हे पाहून अम्मळ मौज वाटली... ;) ;) :)
बाकी..... आजकाल जिलब्या'पण खाता.. की ऑम्लेट'वरच भागवता? ;)
की 'हॉटडॉग'मध्ये 'कुत्रा' का घातला नाही..म्हणून हॉटेलवाल्यांशी वाद घालता? =)) =)) =)) =)) =)) ;)
12 Jun 2012 - 4:15 pm | ऋषिकेश
वैदीक ऑमलेट झणझणीत होते का हो सुनीलभाऊ? ;)
केवढी ती धग.. बरेच काही पेटले आहे! :P
11 Jun 2012 - 11:24 pm | जेनी...
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
:D
11 Jun 2012 - 9:43 pm | कवितानागेश
ही पाककृती तुळशीची पाने घालून केलेली चालेल का? :)
12 Jun 2012 - 12:58 am | सुनील
ही पाककृती तुळशीची पाने घालून केलेली चालेल का?
रोचक पाठभेद! करून बघायला हवा.
12 Jun 2012 - 2:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खास परासाठी प्रतिसादः
तुझ्याइथे तुळस मिळत नसेल तर बाझिल (basil) घाल. ते भारताच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशांना मिळते. बाझिलमुळे तुळशीसारखं पवित्र वगैरे वाटलं नाही तरी तुळशीसारखी हटके चव नक्कीच मिळेल.
मूळ पाकृसाठी: दोन दिवस उशीर केलात सुनीलशेट! मी अगदी दोन दिवसांपूर्वीच मायक्रोवेव्हमधे आमलेट बनवायचं भांडं घेऊन आले. आता त्याचं काय करू?
पाकृ आवडली हे वेगळे सांगणे न लगे.
अवांतरः खरंतर फोटोचा धागा अपेक्षित होता.
12 Jun 2012 - 1:17 pm | परिकथेतील राजकुमार
अदिती ह्यांच्या अभ्यासू आणि मोलाच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
परवाच इकडून काही बायका गुरुमाउलींच्या आशिर्वादाने वारीसाठी भारताकडे कूच करून गेल्या. जाताना त्यांनी डोक्यावरती तुळशीची रोपे घेतली होती. त्यातील एक रोप स्वामींच्या आशिर्वादाने मला प्राप्त झाले. नुकतेचे ते बेडरुमच्या मनी प्लँट शेजारी लावले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे आज सकाळीच त्या रोपाला काही मंजीर्या, कृष्णकमळाची एक कळी आणि खालच्या बाजूला बिल्वपत्रे उगवली आहेत. एकदम तळाला काही काळी काळी पाने देखील आली होती, पण तो गांजा असावा असे वाटून मी खुडून टाकला आहे.
श्री. सुनील
खाली दिलेल्या कुलकर्णी* पद्धतीपेक्षा ही वैदिक पद्धत सोपी आणि/किंवा जलद कशी ते समजावून द्यावे.
१५ रुपये घ्यावे
ऑम्लेटच्या गाडीवरती जावे
आम्लेट खाऊन परत यावे.
*मला आमच्या कुलकर्णी बाईंनी ही शिकवली म्हणून कुलकर्णी पद्धत
मारिन गुद्दे
18 Jun 2012 - 6:27 am | सुनील
खाली दिलेल्या कुलकर्णी* पद्धतीपेक्षा ही वैदिक पद्धत सोपी आणि/किंवा जलद कशी ते समजावून द्यावे
आमच्या (वैदिक) पद्धतीत ४०-४५ सेकंद ही कन्सिस्टन्सी आहे. तीत बदल होणे नाही. याउलट तुमच्या (कुलकर्णी) पद्धतीत बर्याच डिपेन्डन्सी आहेत.
१) अंतर - तुमचे घर आणि आम्लेटची गाडी यांतील अंतर.
२) रहदारी - रह्दारीमुळे वेळेत पडणारा फरक.
३) बंद - एखाद्या पक्षाने वा संघटनेने केलेले बंद्/हडताळाचे आवाहन. परिणामी गाडी उपलब्ध नसणे.
४) पोलिसी कारवाई - गाडी अवैध असेल तर, त्यावर झालेली पोलिसी कारवाई.
५) गिर्हाइकांची गर्दी - आधीच आलेल्या गिर्हाइकांची सोय प्रथम पाहताना लागणारा वेळ.
६) किंमत - कालपावेतो १५ रुपये असणारी किंमत आजपासून वाढवली गेली तर पुन्हा घरी ये-जा करण्यात गेलेला वेळ.
ह्या सर्व बाबी लक्षात घेतल्यास, आमची पद्धत अधिक कन्सिस्टन्ट आणि डिपेन्डन्ट आहे, हे अपॉप सिद्ध व्हावे!!!
अवांतर - ठाण्याच्या मॉडेला चेच्कनाक्यावर (रात्री बारानंतर) मिळणार्या आम्प्लेट-पावाला जगात तोड नाही!
11 Jun 2012 - 10:50 pm | ५० फक्त
कृती -
१) प्लेट वर एक चीजची स्लाइस घ्या.
२) त्यावर अंडे फोडून घाला.
३) त्यावर चीजची दुसरी स्लाइस ठेवा.
४) प्लेटवर झाकण ठेवा.
५) प्लेट मायक्रोवेवमध्ये ठेऊन ४०-४५ सेकंद शिजवा.
वितळलेल्या चीजमध्ये नखशिखांत भिजलेले अंडे तयार आहे. त्यावर चवीपुरते मीठ आणि मीरपूड भुरभुरवा आणि आस्वाद घ्या!
टीपा -
१) अंडे मायक्रोवेवमध्ये फुटते तेव्हा उघड्या प्लेट अथवा बाऊलमध्ये हा पदार्थ करू नये. हलके झाकण ठेवावे.
वर गडद केलेली दोन्ही वाक्ये एकमेकांशी जुळत नाहीत, का बरे असा का.कु. टाकावा काय. असो ते वैदिक या शब्दाच्या उल्लेखाबद्दल श्री. बिका आणि श्री. विकास दोघांशी सहमत.
12 Jun 2012 - 1:01 am | सुनील
वर गडद केलेली दोन्ही वाक्ये एकमेकांशी जुळत नाहीत
खालील दोन वाक्ये वाचायची राहून गेली का?
३) झाकण असलेली मायक्रोवेव्-सेफ प्लेट वा बाऊल
...
...
४) प्लेटवर झाकण ठेवा.
12 Jun 2012 - 7:05 am | राजेश घासकडवी
पाककृती छान आहे. पण मला वाटतं शब्दांचा वापर योग्य प्रकारे केलेला नाही. वैदिक आम्लेट किंवा वैदिक पाककृती म्हणणं योग्य नाही. वैदिक हा शब्द वापरताना 'झटपट वैदिक पाककलाशास्त्र' असं या कृतीला म्हणायला हवं होतंत. वैदिक शब्दाचं वजन तोलून धरण्यासाठी तितकाच वजनदार शब्द नको का?
12 Jun 2012 - 9:35 am | सुनील
मुद्दा विचार करण्यासारखा आहे!
12 Jun 2012 - 9:48 am | सहज
अग्नीला आवाहन करुन पाकृची सुरवात केली नाही की वदनी कवल... म्हणूनच खा अन्यथा पोषण मुल्य कमी होते ही वॉर्निंग दिली नाही. फटू नाही ह्या निकषावरही बादच!!!
18 Jun 2012 - 10:02 am | रामदास
मूळ शब्द बैदीक असा आहे. बैद्याचे ते बैदीक .
(नसत्या ) ब्यादी /बयादी हा शब्द जवळचा आहे पण बैदीक सोबत त्याचा काही संबंध नाही
18 Jun 2012 - 9:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा थोडा व्रज, वंगभाषेचा परिणाम आहे हो. आपल्या व चा त्यांच्या भाषेत ब होतो.
विहार - बिहार
वंग - बाँग (बंगालीत थोडा ऑकारही येतो. ओंकाराशी उच्चारसाधर्म्यामुळे एक्स्ट्रा पावित्र्यही येत असेल.)
सौरव -सौरभ
व्रज - ब्रिज
वन - बन (ओ एन इ नव्हे!)
वैदिक - बैदिक!
वेदांमधे कदाचित आधी कोंबडी का आधी अंडं याचंही उत्तर असेल म्हणून अंड्याला बैदा हे नाव मिळालं असेल.
18 Jun 2012 - 9:50 pm | बॅटमॅन
हे लिहिणार होतोच, असो...
बंगाली अॅक्सेंटनुसार वैदिक हा शब्द "बोयदिक" असा उच्चारला जातो. आपला व तो त्यांचा ब, आपला य तो त्यांचा ज. (बाकी य=ज हे उत्तर भारतात अन्य काही ठिकाणी देखील आढळते.) आपला ऐ तो त्यांचा "ओइ" व आपला औ तो त्यांचा "ओउ" असतो. त्यामुळे "तैयारी" हा शब्द ते "तोयरी" असा उच्चारतात, तर सौरभ हा शब्द "सोउरभ" असा उच्चारतात. त्यामुळे वैदिक हा शब्द बोयदिक असा उच्चारला जातो.
अवांतरः
बंगाली लोक व चा ब कसा करतात याचे उदाहरण "कहानी" या बॉलीवुडपटात आहेच. शिवाय व=ब आणि य=ज हे माझ्या एका मित्राच्या उच्चारावरून समजलं-सणसणीतच. असच काहीतरी चाललं होतं, आणि गाडी आली मुळाक्षरांवर.
"चो छो जो झो, पो फो बो भो, जो रो लो बो?" हे ऐकून हसायला आलं नीटच.
बंगाल्यांचे असे उच्चार का असतात? हा प्रश्न मला पडला होता. अर्धवट उत्तर मिळाले ते असे की बंगाली ही इंडो आर्यन भाषा असली तरी मुंडा भाषांचा प्रभाव देखील तिच्यावर आहे- सबस्ट्रेट रूपाने. आणि अ चा ओ/ऑ हे साधारणतः इ.स. १४०० पासून झालेले रूपांतर आहे असे सुनीतिकुमार चॅटर्जी यांनी एके ठिकाणी लिहिलेले आहे असे माझ्या एका बंगाली मित्राकडून मी ऐकले. त्याचा भरवसा धरायला हरकत नाही, कारण त्याला १५-२० भाषा येतात. :)
18 Jun 2012 - 9:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यमुना - जमुना हे उदाहरण चालेल का हो बॅटमॅन?
आणि दुष्यंताचा दुश्मनो/दुष्मनो कसा होतो?
ज आणि य ची गंमत युरोपीय भाषांमधेही आहे. J चा उच्चार ज (जंगलमधला हार्ड ज, किंवा तसा काहीसा) इंग्लिश, फ्रेंचमधे होतो. जर्मन, पोलिश, फिनिश आदी भाषांमधे य. स्पॅनिशमधे ह. बंगालीवर मुंडा भाषेच्या प्रभावामुळे य चा ज होतो का हे माहित नाही, पण युरोपीय भाषांमधेही समांतर उदाहरणं आहेत एवढीच आपली माहितीची देवाणघेवाण.
अदिती जोशी(जॉशी/झॉशि/होसि/योशी.)
18 Jun 2012 - 10:28 pm | बॅटमॅन
>>यमुना - जमुना हे उदाहरण चालेल का हो बॅटमॅन?
अगदी अगदी. ते क्लासिक उदाहरण आहे या केसचे.
>>आणि दुष्यंताचा दुश्मनो/दुष्मनो कसा होतो?
नै माहिती. किंबहुना असा उच्चार होतो की नाही हेही माहिती नाही. दुष्यंताचा दुश्शोन्तो होतो इतके महिती आहे. एग्झॅक्ट कारणमीमांसा बंगाली मित्राला विचारून सांगतो.
>>बंगालीवर मुंडा भाषेच्या प्रभावामुळे य चा ज होतो का हे माहित नाही.
नाही बहुतेक. मुंडा भाषेचा प्रभाव हा अॅ वगैरे स्वर, तसेच कूडी (म्हणजे २०)हा शब्द अशा काही फिचर्सपुरता मर्यादित आहे.
>>ज आणि य ची गंमत युरोपीय भाषांमधेही आहे. J चा उच्चार ज (जंगलमधला हार्ड ज, किंवा तसा काहीसा) इंग्लिश, फ्रेंचमधे होतो. जर्मन, पोलिश, फिनिश आदी भाषांमधे य. स्पॅनिशमधे ह.
रोचक. जर्मनमध्ये असे आहे हे माहिती होते, उदा. योहान केप्लर. पोलिश आणि फिनिश बद्दल माहिती नाही. एक शंका: फिनिश ही इंडोयुरोपीअन भाषा नाहीये तर मग तिच्यात हे फीचर आजूबाजूच्या इंडोयुरोपीअन भाषांमधूनच घुसले असावे. पण ज चा ह होणे हे रोचक आहे नक्की. सॅन होजे / जोसे हे त्याचे उदा. मला तरी नेहमीच विचित्र वाटत आले आहे. अर्थात इंडोआर्यन चष्म्यातून बाकी भाषांकडे पाहिल्याचा हा परिणाम असावा, दुसरे काही नाही.
18 Jun 2012 - 11:11 pm | Nile
या बॅटमॅनसारख्या पाश्चात्य लोकांनी आमचा इतिहास पार गढूळ केला आहे. तरी स्थानिकांनी ते काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नये!
18 Jun 2012 - 11:21 pm | बॅटमॅन
नाईल साएब, तुमीपन आफ्रिकेचे हौत बरंका ;) दोघेही भाएरचे तवा कोन कोनाला बोल्नार ;)
19 Jun 2012 - 1:38 am | Nile
इजिप्त पासून ब्रह्मदेशापर्यंत जूना "हिंदूस्थान" होता म्हणलं. बघा बरं आमची त्वचा पण तशीच आहे का नाही ते. शिवाय क्लिओपात्रा आणि शोभना समर्थ काय डिट्टो शिमीलर दिसतात! चुलत डीनएशीवाय शक्य आहे का हे?
19 Jun 2012 - 2:52 am | बॅटमॅन
आवो तशे तर मंग समदे आफ्रिकनच हैत ;)
18 Jun 2012 - 11:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शकुंतलेच्या हिरोला आपण दुष्यंत म्हणतो. बंगालीत दुश्मनो/दुष्मनो म्हणतात. आता ही उच्चारांचीच गंमत आहे का वेगळी हे मलाही माहित नाही. (मी उगाच आपल्याला हज्जार भाषिक मित्र-मैत्रिणी आहेत याची जाहिरात करत होते.)
बर्याचशा यूरोपीय भाषांमधे J या वर्णाचा उच्चार जे असा होत नाही; J चा उच्चार य असा होतो. (स्पॅनिशमधे ll चा य होतो.)
आणि शिवाय h जवळजवळ नसल्यासारखाच. फ्रेंच, स्पॅनिशमधे h चा उच्चार होतच नाही. स्पॅनिशमधलं hastala vista ऐकून माहित असेलच, त्याचा उच्चार अस्ताला विस्ता (विस्तव अस्ताला गेला?) असा होतो. पॉश इंग्लिशमधेही herb या शब्दाचा उच्चार अर्ब (अऽऽर्ब्) असा होतो, ह चा उच्चार केला-न-केल्यासारखा! हा मात्र बहुदा इंग्लिशने फ्रेंच पॉश मानण्याचा प्रभाव असावा. (आपल्याकडेही संस्कृतास उच्च दर्जा दिला जातो तसाच प्रकार! आणि मग संस्कृतचे शुद्धलेखन नियम प्रमाण मानून मराठी लोकं आपली नावं दीर्घान्त लिहीतातच असंही नाही.)
असो. वैदिक आमलेटं चिक्कार हायजॅक केली. सुनीलशेट आता धक्के मारून हाकलून देतील त्यांच्या पुनर्जन्म झालेल्या धाग्यावरून! शिवाय अवांतराची परात्यांना जाहीर लाज, शरम वाटेल, माफी मागावी लागेल, ते वेगळंच.
18 Jun 2012 - 11:50 pm | बॅटमॅन
बाकी सगळं मान्य. पण दुष्यंतचा दुश्मनो/दुष्मनो बंगालीत नाही होत हे कन्फर्म. हे छातीठोकपणे सांगण्याचे कारण म्हणजे आत्ता आमच्या फ्ल्याटवरती २ बंगाली हैत, त्यांना विचारले :)
असो. वैदिक आमलेट सोडून आता अवैदिक मूलनिवासी आंबोळी करू :)
12 Jun 2012 - 10:24 am | ऋषिकेश
फटु लाव प्रतिक्रीया पाव!
12 Jun 2012 - 2:13 pm | नाना चेंगट
बनवतांना म्हणावयाचे मंत्र कुठे आहेत?
12 Jun 2012 - 2:32 pm | राजघराणं
जिव्हाधींनं जगत सर्वम
कुकुटाधीन खलु जिव्हा
तै कुकुटा अंडोध्भवा
अंडा खलु दैवतम
12 Jun 2012 - 3:21 pm | नाना चेंगट
हॅ ! पाणिनीय संस्कृतमधले काय वैदिक मंत्र असतात का? काहीही !!
थोडं असं करा ...
कुकुट धीन खलु जिव्हा अधींन वै जगत सः
सर्व तै कुकुटा अंड उद्भव मघोनी दैवत वा एता
12 Jun 2012 - 3:21 pm | राजघराणं
:-)
:Sp
18 Jun 2012 - 5:45 pm | बॅटमॅन
खाद्येषु प्राणिनो रम्या: रम्यस्तत्रापि कुक्कुटः|
कुक्कुटो जायते यस्मात् अंडम् तद्दैवतम् परम् ||१||
मांसं प्रतिदिनं खाद्यं भृशं रुचिकरं खलु |
जिह्वायै रोचते यत्तत् पोषयत्यपि तत् खलु ||२||
देवासुराश्च सर्वे ऽपि स्वर्गे ऽपि नरके ऽपि च |
प्रतिदिनं हि खादन्ति तस्मात् खाद्यं तु सर्वथा ||३||
इति श्री चंगळपुराणे खाद्याध्याये अभक्ष्यभक्षणविषये श्लोकत्रयः समाप्तः|
;)
19 Jun 2012 - 1:26 pm | नाना चेंगट
सिद्धांत कौमुदीची छाप दिसत आहे.
फलश्रुती नाही त्यामुळे पाणिनीपूर्व असल्याची शक्यता निर्माण होते
लेखकाचे नाव आंग्ल भाषेच्या प्रभावाचे असल्यामुळे वसाहतकालीन लेखक असल्याचा भास निर्माण होतो
मंगल सुचक सुरवात नसल्याने वेदांती मतानुसार असल्याचा भास होत काळ ८ वे शतक ते १४ वे शतक असू शकते अशी शक्यता निर्माण होते.
थोडक्यात इसवी सन ३०१२ मधे कुणी वरिल श्लोकाचा काळ ठरवू गेल्यास त्याचा वैदिक भेजाफ्राय होणार हे निश्वित
19 Jun 2012 - 1:32 pm | बॅटमॅन
बाबा बाबौ बाबा:!!!!!!!!!!!!
20 Jun 2012 - 7:24 am | विकास
मिपावर एव्हढे संस्कृत? ;)
20 Jun 2012 - 8:30 am | सुनील
मिपा सुसंकृत होत चालले आहे ;)
बाकी बनविताना मंत्र कुठलाही चालेल पण खाण्यापूर्वी "सह नौ भुनक्तु" म्हटलेच पाहिजे, नाही का?
नौ वगैरे म्हटलं की अगदी खरेखुरे वैदिक वाटते नाहीतर आहेच अर्वाचिन पाणिनीय!
20 Jun 2012 - 8:36 pm | विकास
मिपा सुसंकृत होत चालले आहे
ती तुमची अंडश्रद्धा आहे. अशा अंडश्रद्धेचे निर्मूलन झालेच पाहीजे! ;)
12 Jun 2012 - 3:19 pm | Dhananjay Borgaonkar
झटपट गणिते सोडवण्यासाठी वैदिक पद्धत वापरतात हे ठाऊक होते. पण वैदिक ऑम्लेट हे नविनच...
वैदिकचा या शब्दाचा अर्थ बहुतेक माहित नसावा असे दिसत आहे.
असो..अडाणीपणाचे ढोंग घेतलेल्याला कोणीच काही करु शकत नाही.
12 Jun 2012 - 3:53 pm | मृगनयनी
१०८ % सहमत.. धनन्जय'जी... आपल्या देशात ढोन्गी अडाणी लोकांना काही बोलायची सोय.. घटनेने करूनच ठेवलेली नाही हो!!!! :|
पूर्वीच्या काळी "वैदिक संस्कृती"नुसार लोककल्याणासाठी, पर्जन्यासाठी वगैरे केल्या जाणार्या यज्ञात शुद्ध तूप, समिधा, सुगन्धी द्रव्ये यांची आहुती दिली जायची..
आणि त्याच वैदिक यज्ञांचे अनुकरण करून पण वेगळ्या वाईट उद्दीष्टांसाठी समाजाचे स्वास्थ्य बिघडवू इच्छिणारे, तन्त्र, मन्त्र, जादू टोणा वगैरे शिकणारे लोकही वाईट कामांसाठी.. यज्ञ करायचे.. पण त्यात कोणत्याही पवित्र आहुती न देता प्राण्यांचे मुन्डके, हाडे, मांस, लिम्बू.. इ.पवित्र यज्ञासाठी अशुभ मानल्या गेलेल्या वस्तू टाकायचे... आणि त्या त्या क्षूद्रदेवतांना प्रसन्न करवून घ्यायचे...
अर्थात काही बन्गाली तान्त्रिक आजकालदेखील असे काही प्रकार करतात.. असे ऐकीवात आहे...
... बाकी "वैदिक" या शब्दाचे आकर्षण या लोकांना अज्जुनही वाटत आलेले आहे.. हे मात्र पटले...
:)
_________________________
असो!.. "बाबा वाक्यं प्रमाणं" या वाक्यात "बाबा" म्हणजे नक्की कोण.. हे अचूक सांगणार्यास माझ्याकडून एक चीझ घातलेला उकडीचा मोदक सप्रेम भेट...!!! ;)
12 Jun 2012 - 4:02 pm | सुहास..
चान चान
झटपट वैदिक मटन या पाकृ च्या प्रतिक्षेत ;)
12 Jun 2012 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वैदिक आम्लेट. (मेलो) :)
आम्लेट तर साध्याच पद्धतीचं दिसतं. आम्लेटमधे वैदिक काय आहे ? (शब्द सोडला तर)
मला वाटलं काही मंत्रोच्चार करत करायची एखादी पाच-सात हजार वर्षापूर्वीची पाककृती आहे की काय ?
असो...
-दिलीप बिरुटे
12 Jun 2012 - 4:19 pm | मोहनराव
चीजाळलेले अंडे ----
भटकलेली पाककृती व वरती 'वैदीक' मसाला...चर्चा वाढ्वण्यासाठी...
चालु द्या!!
18 Jun 2012 - 12:22 am | सुनील
वैदिक (वा तत्सम) विशेषण वापरून कुठल्याही गोष्टीला "शुचिर्भूत" करण्यावरून केलेल्या सदर पाकृ-विडंबनास, सारासार विचार करून, पुनःप्रकाशित केल्याबद्दल संपादक मंडळास धन्यवाद!
18 Jun 2012 - 1:40 pm | नाना चेंगट
सहमत आहे.
चला यामुळे आता आम्ही वैदिक पाककृती टाकण्यास मोकळे झालो.
18 Jun 2012 - 2:05 pm | श्रावण मोडक
सारासार विचार वगैरे ठीक. पण हे तुम्ही कसं करून घेतलंत, हे व्यनितून कळवा. ;-)
18 Jun 2012 - 2:16 pm | नाना चेंगट
अशातशा नोंदी करणार्या माणसास व्यवस्थेविरुद्ध लढायचे झाल्यास व्यवस्थेचा एक भाग बनल्यास कधी कधी सोपे जाते हे माहित नसावे ! :)
18 Jun 2012 - 2:42 pm | प्यारे१
शेवटी '!' ह्याच्या ऐवजी '?' हे हवे होते ना नाना? ;)
18 Jun 2012 - 2:56 pm | नाना चेंगट
म्हातारपणामुळे होतात अशा चुका... लगेच बोल नाही लावू !!
18 Jun 2012 - 5:47 pm | श्रावण मोडक
हो ना... ते कळलंच नाही. कळलं तोवर इतकं अंतर कापलेलं होतं की आता मागं वळून व्यवस्थेत जाता येत नाही. मग, उरलो नोंदींपुरता... ;-)
18 Jun 2012 - 6:34 pm | नाना चेंगट
हा हा हा ! खल्लास !!!
18 Jun 2012 - 11:02 pm | Nile
आजच्या वैदिक लोकांना अंड चालत नाही हो, अंड न घालता हीच पाकृ कशी करायची ते सांगा ना त्यांच्यासाठी!
-आजचा सैतान