अंत्यक्रिया अथवा दहनसंस्कार

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
5 Jun 2012 - 3:32 pm
गाभा: 

Muslim boy designs green crematorium for Hindus

http://timesofindia.indiatimes.com/home/environment/developmental-issues...

माणसांची जी काही अनेक धर्म / पंथ आहेत त्यात माणसाच्या उत्तर्क्रियेसाठी वेगवेगळी प्रथा आणि परंपरा सांगितली आहेत. उदा हिंदुमध्ये सर्वसाधारण पणे दहन केले हाते तर मुस्लिमबांधवामध्ये दफन ( मातीत पुरण्याचा विधी) तर पारसी समाजात प्रेत पक्षांसाठी ठेवले जाते असे ऐकिवात आहे. चुक भुल देणे घेणे.

सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदुसमाजातील दहनक्रियेसाठी लाकंडाचा साठा लागतोच लागतो. काही ठिकाणी विद्युत भट्ट्या आहेत असे ऐकतो परंन्तु त्यास आपल्या बांधवांचा प्रतिसाद कसा असेल याबद्दल शंकाच वाटते.

वरील लेखात दिल्याप्रमाणे गोबरगॅसवर जर दहन होत असेल तर स्वागतच करावयाला हवे.

वाढती लोकसंख्या आणि दहन्/दफन / समाधी इत्यादी साठी काही अनूभव / शिफारस असेल तर कृपया सांगणे.

प्रतिक्रिया

आधी जगणे तर सुसह्य होवु द्या मग मरणानंतर काय करायचे त्याचा विचार करु ,कसे ;)

बाकी गोबरगॅसवर दहन याचे स्वागत !

वाढती लोकसंख्या आणि दहन्/दफन / समाधी इत्यादी साठी काही अनूभव / शिफारस असेल तर कृपया सांगणे.
हे वाक्य समजले नाहिये ,याचा अर्थ सांगाल ?

Dhananjay Borgaonkar's picture

5 Jun 2012 - 4:15 pm | Dhananjay Borgaonkar

+ ५००

कर्ण's picture

5 Jun 2012 - 7:01 pm | कर्ण

+ ५००

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2012 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार

सर्व मिपाकरांनी वर्तमानपत्रे घेणे बंद करावे आणिउर्जा वाचवावी अशी विनंती.

आजकाल मिपावर लॉग इन केले आहे, का वेबदुनीया वरती तेच पटकन लक्षात येत नाही.

तर नवी पोस्ट टाकली! असो, `सदेह वैकुंठवास' हा एक पर्याय आहे बघा!

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2012 - 4:37 pm | परिकथेतील राजकुमार

तर नवी पोस्ट टाकली! असो, `सदेह वैकुंठवास' हा एक पर्याय आहे बघा!

वैकुंठवास नंतर हो. आधी वैकुंठगमन. ;)

कौतिक राव's picture

10 Jun 2012 - 2:41 am | कौतिक राव

परा.. तुम्च्या सुक्ष्म निरिक्षण क्षमतेला सलाम!!
:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

विनायक प्रभू's picture

5 Jun 2012 - 4:24 pm | विनायक प्रभू

मिपावर वावरणार्‍या सर्व भुतांनी आप्पापले अनुभव सर्वांना सांगावेत ही विनंती.
ते वाचुन चॉईस ठरवता येइल.

गणपा's picture

5 Jun 2012 - 4:37 pm | गणपा

देह दान.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2012 - 4:38 pm | परिकथेतील राजकुमार

अश्लील अश्लील..

देह दानात दुला वाकडं काय दिसले बे?

असो तो सल्ला मागे घेतो. सगळ्यांनी देह दान केल तर हास्पीटलवाले रडतील.

दोन चार ठिकाणी आणूबांब टाका. हा का ना का?

jaypal's picture

5 Jun 2012 - 11:34 pm | jaypal

>>>>>देह दानात दुला वाकडं काय दिसले बे?

गनाभाय त्या **** पराला हल्ली सरळ असल तरी वाकडच दिसत .... ;-)

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2012 - 11:38 pm | संजय क्षीरसागर

हे सरळ आणि वाकडं काय चाललय?

jaypal's picture

5 Jun 2012 - 11:46 pm | jaypal

गणपानी पा.क्रु. टाकली नसल्याने बोंबिल आणि कोलंबी विषयी चर्चा चालु आहे ;-)

विनायक प्रभू's picture

5 Jun 2012 - 4:39 pm | विनायक प्रभू

वैकुंठ गमन करायच्या आधी काशीला भेट द्यायची असते असे म्हणतात रे परा.
तुझे काय मत आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2012 - 4:42 pm | परिकथेतील राजकुमार

पण मग उगा अशा भेटी देऊन उर्जा वाया जाणार नाही का ? गुढघेदुखी होईल ती वेगळीच.
मग पुन्हा चांदीच्या पेल्याचा खर्च आला.

विनायक प्रभू's picture

5 Jun 2012 - 4:47 pm | विनायक प्रभू

आरे परा तुला समजत कसे नाही तुला.
त्या नान्याच्य नादाला लागु नकोस हां.
अरे तिथे गुडघे दुखी ने त्रस्त असलेल्यांसाठी पेशल स्पा असतो म्हणे.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2012 - 6:51 pm | परिकथेतील राजकुमार

अरे तिथे गुडघे दुखी ने त्रस्त असलेल्यांसाठी पेशल स्पा असतो म्हणे.

मग काशी घातलीच पाहिजे तिकडे.

>>वाढती लोकसंख्या आणि दहन्/दफन / समाधी इत्यादी साठी काही अनूभव / शिफारस असेल तर कृपया सांगणे.
लोकसंख्या वाढवण्यात अजूनपर्यंत माझा काहीच वाटा नाही त्यामुळे त्यावर कमेंट करता येणार नाही. दहन्/दफन / समाधी जिवंतपणी घेणे शक्य नाही त्यामुळे त्याचा अजून अनुभव नाही. त्यामुळे सध्या गप्प बसत आहे.

वाढती लोकसंख्या आणि दहन्/दफन / समाधी इत्यादी साठी काही अनूभव / शिफारस असेल तर कृपया सांगणे.

वाढती लोकसंख्या - अनुभव नाही
दहन्/दफन / समाधी - याचाही अनुभव नाही. तरीही, जुने पडके बंगले, विहिरी तसेच वडा-पिंपळाची झाडे (शक्यतो ओसाड माळरान अथवा घनदाट जंगल यापैकी एखाद्या जागी) या माझ्यामते जागेसाठी चांगल्या कल्पना असू शकतात (दहन्/दफन / समाधी - गरज नाही) . तेवढाच थोडा टाईमपास !

कोणतीही विद्युत दाहिनी वापरात आणण्याअगोदर जाती -धर्मप्रमुखांची परवानगी लागते. ज्या महापालिकेसाठी विद्युत दाहिनी बसवायची आहे ती पालिका, ज्या जाती जमाती दहन संस्काराने अंत्यविधी करतात त्या जाती धर्मातील प्रमुख लोकांना बोलावून एका बेवारस मृतदेहाचे दहन करुन दाखवतात. लाकडाव्यतिरीक्त कोणताही अग्नी मृतदेहाला सरळ संपर्कात येउ नये अशी संकल्पना असल्याने विद्युत्दाहिनीत मृतदेहाचे दहन हे सुपरहिटेड हवेमुळे होते.

विद्युतदाहिनीत इलेक्ट्रीक हिटींग इलेमेंट्स असतात . हे इलिमेंट्स दाहिनीतील रिफ्राक्टरी विटांना उर्जा प्रदान करतात.
ह्याविटा लाल उष्ण झाल्यानंतर आतील हवा गरम होते. ह्या अति गरम ( सुपरहिटेड) हवेच्या संपर्कात मृतदेह आल्याने त्याचे ज्वलन होते.

काही डिझेल बर्नर आधारित दहिन्या सरळ बर्नरची ज्वाळा मृतदेहावर मारुन दहन साधतात. असे दहन धर्मशास्त्र्यांना मान्य होत नाही. हे गोबरगॅसवाले काय करतात ते अभ्यासायला हवे.

परंतू विद्युतदाहिनीत वर उल्लेखल्याप्रमाणे गरम हवेमुळे दाह्संस्कार होतो. त्याचप्रमाणे मृत्देहाचे दहन होताना निर्माण झालेली उर्जा रिफ्राक्टरी विटांमध्ये साठवली जाते. त्यामुळे एका दहनानंतर लागोपाठच्या पुढच्या दहनास फारशी उर्जा लागत नाही. अश्या प्रकारे आपण आयुष्यभर उर्जा खर्च केली जाता "जाता जाता" थोडीफार उर्जाबचत करुन जातो.

बाहेर जाणार्‍या गरम प्रदूषित हवेवर योग्य ती प्रक्रिया करुन ती हवा उंच चिमणीवाटे वातावरणात सोडली जाते.
आम्ही तर एका प्रोजेक्ट्मध्ये ह्या गरम हवेच्या सहाय्याने हीट एक्सचेंजरमध्ये पाणी गरम करुन दिले होते. हे पाणी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मंडळींना वापरण्यासाठी दिले जायचे. तसेच हे पाणी ती पालिका स्मशानाशेजारच्या लॉन्ड्रीला कपडे धुण्यासाठी विकूनपैसे कमवत असे. अजूनही कमवत आहे. बघा " जाता जाता" उर्जा बचत!!

(दोन विद्युतदाहिन्या एका पालिकेला कमिशन आणि हस्तांतरित केलेला- डोंब -) कपिल काळे

आनंदी गोपाळ's picture

5 Jun 2012 - 10:41 pm | आनंदी गोपाळ

लाकडाव्यतिरीक्त कोणताही अग्नी मृतदेहाला सरळ संपर्कात येउ नये अशी संकल्पना असल्याने विद्युत्दाहिनीत मृतदेहाचे दहन हे सुपरहिटेड हवेमुळे होते.

हे कुठे आहे लिहिलेले? कोन म्हन्ले?
त्ये ओंकारेश्वरावर ठेका घेऊन घाऊक दरात आत्मे स्वर्गात पोचविणारे काली-पीली गाडीचे डाय्वर लोक्स का?

हिन्दु बान्धव झाडे कापुन त्यांचा विधी उरकून घेता.. त्यामुळे मुस्लिम आणि इसाई बान्धवांना त्यांचे विधी उरकाय्ला मोकळी जागा मिळते.. त्यामुळे एक्मेकान्मधे बन्धुभाव वाढीस लागतो.. त्यामुळे क्रुपया जे अनादि कालापासुन चालत आलय ते चालु द्या.. एक्मेका साय्य करु अवगे धरु सुपंथ...

हे गोबर गॅस चे फन्डे देणारे समा़जकंटक आहेत..

कलंत्री's picture

10 Jun 2012 - 1:55 pm | कलंत्री

आपल्या विस्तृत आणि सखोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

खरेतर निसर्गात प्रत्येक मृतदेह ( प्राणी / पक्षी / माणसे इत्यादी) आपोआपच इतर किडी / किटकांद्वारे सपुष्टात आणण्याची व्यवस्था असते. परन्तु आपल्या अनेक भावना मृतदेहाशी निगडीत असल्यामूळे अंत्यसंस्कार आवश्यक होत जाते. नकळतच लाकडांचा अपव्यय अथवा दफन केल्यास ती जागा कायमीचा वापरण्यासाठी अपात्र ठरत जाते.

जाता जाता एक किस्सा नमुद करावासा वाटतो. परवाच एका नातेवाईकाचे मृत्यु झाल्याचे समजले. अंत्यसंस्कार कोठे होणार असे विचारता त्यांनी एका दुरच्या स्मशान भूमीचे नाव सांगितले. मी विचारले अरे जवळच अमूक अमूक अशी स्मशान भूमी आहे ना? त्यावर उत्तर आले की ती इतर जातीच्या लोकासाठी वापरली जाते. जींवतपणी तर जात पिच्छा सोडत नाही तर मेल्यावरही ती अश्याप्रकारे आपापले प्रस्थ वाढवित असते.

मग सावडायच्या विधिच काय? म्हन्जे काहि हाडं राख उर्ते कि नहि?

काय कालपासुन ..' म्रुत्यु ' , ' अंतक्रिया ' ,दहनसन्स्कार ' :(

मिपावर येण थोडे दिवस बंद करावं लागनार बहुतेक .
सगळ्यांचे अंत्यसन्स्कार विधी आटोपले कि एक नविन धागा कढा ( जगले वाचलेत त्यानी)
' जन्म ,नवजीवन '
मग लॉग इन होऊ

:(

प्रभाकर पेठकर's picture

5 Jun 2012 - 8:54 pm | प्रभाकर पेठकर

मिपावर येण थोडे दिवस बंद करावं लागनार बहुतेक.

असं करू नका. उगीच लोकांना वाटायच खपला-बिपलात की काय?

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2012 - 9:03 pm | अत्रुप्त आत्मा

@उगीच लोकांना वाटायच खपला-बिपलात की काय?>>>

कौतिक राव's picture

10 Jun 2012 - 2:49 am | कौतिक राव

तुम्ही या धाग्यावर प्रतिक्रिया द्याय्ला एलिगिबल असलेले एक्मेव सभासद आहात..
तेव्हा सुटा आणि भर्गोस प्रतिक्रिया द्या.. आम्ही आतुर झालो आहोत तुम्चे अनुभवाचे बोल ऐकायला.. :wink:

जेनी...'s picture

5 Jun 2012 - 9:09 pm | जेनी...

:-o

:(( :-(( :cry:

ज्यांना खरंच जायचं असतं ते असं विचार करत बसत नाहीत हो काका. त्यामुळे चिंता नको. ;)

जेनी...'s picture

6 Jun 2012 - 5:30 am | जेनी...

मी नै जानारे कै सुड ... :P
उगाचच तुला खुश करण्यासाठी म्हण्लं होतं :D

आंबोळी's picture

10 Jun 2012 - 7:42 pm | आंबोळी

वा वा वा!!
मृत्यू, अंत्यसंस्कार, दहन... आवडीचा विषय काढल्या बद्दल कलंत्रींचे अभिनंदन!
गोबरचा गॅस करून मग त्यावर दहन करण्यापेक्षा त्या गोबरच्या शेण्या लाउन त्यावर दहन करणे जास्त सोपे आणि उर्जा/श्रम वाचवणारे आसेल असे वाटते...
तसा प्रयोग पुण्यात होत असे असे ऐकले होते.. जाणकार प्रकाश टाकतील काय?

स्वगतः आंबोळ्या दहनाचे नवनविन मार्ग समोर येतायत... जी भरके कंदील लावायला हरकत नाही. (ते धम्या हल्ली दिसना कुठ)