गाभा:
पुणे येथिल फर्गुसन कालेज मधिल ३ अंध विद्यार्थी यांनी या वेळी मे २०१२ मधिल घेतल्या गेलेल्या बारावी च्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले ,या मध्ये
प्रविण गिते याने ७८.३३ टक्के गुण मिळ्वुन प्रथम क्रमांक मिळ्वला आहे,तर ७७.८३ टक्के गुण मिळ्वुन सनी गायकवाड दुसरा आला. ७१.७७ टक्के गुण मिळालेला नितिन पवार व ६८.९ प्रतीशत गुणासह राजु नखाते हे गुणवत्ता यादित आहेत. ब्रेल लिपीतिल पुस्तके स्वत वाचुन तर कधी ईतर विद्याथ्र्यांचे एकुन त्यानी अभ्यास केला,विशेष म्हणजे नितिन पवार याने ईंग्रजी माध्यमातुन ही परिक्षा दिली,फग्रुसन कालेज मधे वसती ग्रुहात राहाताना यांनी स्वतचे कपडे धुण्यापासुन सर्व कामे स्वत करुन हे यशाचे शिखर गाठ्ले.या बद्दल सनी गायकवाड म्हणाला की त्याचि वकिल होण्याचि ईछा आहे,शुभेछया,
कदाचित हा देशातिल पहिला अंध वकिल असेल----
प्रतिक्रिया
5 Jun 2012 - 1:18 am | जेनी...
प्रविन ,नितीन आणि सनी , राजु...मनापासुन अभिनंदन .
विश यु ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर :)
5 Jun 2012 - 1:08 am | श्रीरंग_जोशी
प्रविण गिते, सनी गायकवाड, नितिन पवार व राजु नखाते यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
5 Jun 2012 - 1:15 am | विकास
प्रविण ,नितीन आणि सनी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
कदाचित हा देशातिल पहिला अंध वकिल असेल----
केवळ दृष्टीदोषाला अंध म्हणत असाल तर खरे असेल ही कदाचीत. पण म्हणून इतर वकील "डोळस" ठरतात का, हा मोठ्ठा प्रश्न आहे! ;)
5 Jun 2012 - 11:19 am | निश
अभिनंदन व शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
5 Jun 2012 - 11:38 am | परिकथेतील राजकुमार
एस के रुंगठा हे एक अंध वकिल ऑलरेडी कार्यरत आहेत आणि प्रमोशन देखील मिळवत आहेत.
बाकी तुमचे धागे बघितले की आजकाल घरचे वर्तमानपत्र बंद करावे का काय असा विचार राहून राहून मनात येतो.
असो...
5 Jun 2012 - 12:07 pm | प्रभाकर पेठकर
तुमचे धागे बघितले की आजकाल घरचे वर्तमानपत्र बंद करावे का काय असा विचार राहून राहून मनात येतो.
१०० टक्के सहमत.टिव्ही-वर्तमान पत्रातील, चर्चेस पात्र नसलेल्या, बातम्या पुन्हा मिपावर डकवायच्या ह्यात काय विशेष आहे हेच कळत नाही.
३३१ वाचने, ६ प्रतिक्रिया ह्यावरून तरी बोध घ्यावा.
10 Jun 2012 - 2:30 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा! एक जुना धागा आठवला! ;)
10 Jun 2012 - 5:05 am | कौतिक राव
अन्फेअर डिस्क्रीमिनेशन अॅक्ट खाली तुम्च्यावर कार्वाई का करु नये?
10 Jun 2012 - 5:11 am | कौतिक राव
प्रिय सिनिअर मिपाकरानो..
क्रुपया..आम्च्या सारख्या नवसभासदान्ची अशी कुचम्बणा करु नका...
तुम्हाला हे लेख आवडले नाहीत तर वाचु नका.. पण अश्या जहाल प्रतिक्रियानि हिर्मोड करु नका.. क्षमस्व..
10 Jun 2012 - 8:30 pm | फारएन्ड
या तिघांचेही अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!