पेसरट्ठू

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in पाककृती
20 Jun 2008 - 12:10 pm

पेसरट्ट्
साहित्य-एक कप हिरवे मूग,कांदा व मिरची बारीक चिरलेली, मीठ,तेल्,डोसा तवा
क्रुति-रात्री मूग पाण्यात भिजवावेत.सकाळी त्याची हिरवी साले वरती येतील,ती फेकून द्यावीत व खाली राहिलेले मूग मिक्सरवर वाट्।वेत.त्याचे थोडे पाणी घालून सैलसर मिश्रण करावे.चवीपुरते मीठ घालावे,तवा तापवून त्यावर हे मिश्रण साधारणपणे अर्धा कप ओतावे,सर्व बाजूनी मिश्रण सारखे पसरेल असे पहावे.बाजूने तेल सोडावे.थोडे शिजत आल्यावर त्यावर चिरलेला कांदा व मिरची घालावी.पूर्ण शिजल्यावर तव्यावरच त्याचा रोल करावा.कोणत्याही चठणीबरोबर खावा्. हा पदार्थ अतिशय रुचकर आणि पौश्ठिक असतो.लहान मुले व म्हातारी माणसे ह्यांच्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे.हा आंध्र प्रदेशातील पदार्थ आहे.

प्रतिक्रिया

ऋचा's picture

20 Jun 2008 - 12:15 pm | ऋचा

मस्त आहे हा पदार्थ.
ह्याला मुगाचे घावन म्हणतात :)

आवांतर : नाव वाचुन वाटले काहीतरी कानडी आहे.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

धनंजय's picture

20 Jun 2008 - 10:31 pm | धनंजय

(म्हणजे "जीजाजी पोस्टात नोकरी करतात" असा अर्थ घेऊ नये.)
मी मूग (कडधान्य) भिजवतो, आणि मोड आल्यावर त्याचे धिरडे (वरील प्रमाणे) बनवतो. कित्येकदा कांदा, मिरची मिक्सरमध्येच टाकतो. सालांसकटच मोड आलेले मूग वाटतो, कारण साले पौष्टिक असतात. वाटणाचा हिरवागार रंगही सुंदर दिसतो.

प्रियाली's picture

20 Jun 2008 - 10:34 pm | प्रियाली

मला वाटलं की तुम्ही भरभक्कम शिवी हाणताय. ;-) ह. घ्या. पण साला म्हणजे मेव्हणा ना? जिजाजी/ भाऊजी कसे झाले?

पेसरट्टू बनवताना मीही सालांसकट वाटते त्यामुळे चव आणि रंग या दोहोंत फरक पडतो आणि पदार्थाची पौष्टीकताही वाढते. कांदा मिरची मात्र मिक्सरमध्ये नाही टाकत. एवढेच काय कोणत्याही पदार्थाला लागणारा कांदा किंवा टोमॅटो फूड प्रोसेसरमधून काढत नाही. आपला हात जगन्नाथ!

पिवळा डांबिस's picture

20 Jun 2008 - 11:24 pm | पिवळा डांबिस

पेसरट्ट्
हा पदार्थ तर सोडाच, पण शब्दही आज प्रथमच वाचला!:)
आमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याबद्द्ल वैशाली ताई प्रथम तुमचे आभार!!

लहान मुले व म्हातारी माणसे ह्यांच्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे.
तरीच आम्ही खाल्ला नसावा! (ह. घ्या)

हा आंध्र प्रदेशातील पदार्थ आहे.
पुढच्या वेळी तात्याच्या घरी गेलो की याचीच फर्माईश केली पाहिजे!!:)

सिरियसली - वैशालीताई एका नवीन पाककृतीबद्दल धन्यवाद. मिपावर तुमचे स्वागत आणि अशाच पाककॄती येऊ द्यात...
पुढील लेखनासाठी (आणि आमचा निर्विष टवाळखोरपणा सहन करण्यासाठी:)) शुभेच्छा!

-पिवळा डांबिस

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 7:55 am | विसोबा खेचर

पुढच्या वेळी तात्याच्या घरी गेलो की याचीच फर्माईश केली पाहिजे!!

नक्की रे डांबिसा! :)

आपला,
(अनुष्काप्रेमी) तात्या.

चतुरंग's picture

21 Jun 2008 - 1:38 am | चतुरंग

हैद्राबादला असताना पहिल्यांदा खाल्ला. ह्याच्या बरोबर 'घोंगुरा पिक्कल' (म्हणजे अंबाडीचे लोणचे) एकदम जबरा!
आमच्या सौ. फर्मास पेसरट्टू बनवतात.

(मी कांदा वगैरे चिरुन बाजूला होतो, हो 'मदत' केल्यामुळे पदार्थ बिघडला असे व्हायला नको! ;)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 7:56 am | विसोबा खेचर

वैशाली, सह्हीच पकृ दिली आहेस..

हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे! :)

तात्या.

चित्रा's picture

21 Jun 2008 - 9:45 am | चित्रा

पौष्टिक नक्कीच, आणि फार त्रास न होता करता येऊ शकणारा पदार्थ.

सहज's picture

21 Jun 2008 - 10:36 am | सहज

सोपी तसेच पौष्टिक डिश. लवकरच करुन पाहीलीच पाहीजे.

धन्यवाद.

[साले - फोलकटे स्वाद वाढवतात की रसभंग करतात हा निर्णय राखीव]

माझी बायको मघ्यप्रदेशातील आहे. तिथे हयाला "मुगाचे चीले" म्हणतात .
आम्ही नेहेमी बनवुन खातो(हे अमेरीकेत देशी फास्ट फुड आहे). फार सोपी पण पौष्टिक डिश आहे. हे मी टमाटर चटणी, या सुकी लसणाच्या चटणी बरोबर खातो.
आम्ही सालाची मुगाची डाळ वापरतो, त्यामुळे मलातरी वाटतो की स्वाद वाढतो.

मला तर स्वप्नातही भुक लागते.... ;)