कुछ मीठा हो जाय..

गवि's picture
गवि in पाककृती
3 Jun 2012 - 8:00 pm

गोड खाण्याचं टेम्प्टेशन एकदा का झालं की ते जाम जोरात होतं. सध्या अधूनमधून खाण्यावर कंट्रोल ठेवण्याचं भूत मानगुटीवर बसत असल्यामुळे गोडाशी संबंध संपल्यात जमा आहे. हो.. मोडायचाच निग्रह तर मासेमटणासाठी मोडावा, गोडासाठी नको..

पण आज पोराचा बालहट्ट झाला..

मुळात झालं असं होतं की मी माझ्या शाळकरी वयात रुचिराकृपेने एक चॉकलेटची पाककृती करायचो. ती एकदम जमून गेली होती. माझे बाबा मी बनवलेल्या चॉकलेटचं ताट रिकामं करुन टाकायचे. मग माझी कॉलर ताठ.

बाबा गेल्यावर बरीच वर्षं, बरीच म्हणजे वीसेक वर्षं हे बनवलंच नाही. मग मलाच पोरगं झालं तेव्हा बनवलं. त्याला न कळत्या वयात ते तितकंच आवडलं जितकं माझ्या बाबांना आवडायचं. तसाही एरवी बर्‍याचदा तो माझा बाप असल्यासारखा वागत असतोच. म्हणून मलाही बाबांना परत एकदा चॉकलेट करुन दिल्याचं समाधान मिळतं. म्हणून मग हे पुन्हा बर्‍याचदा बनवलं जायला लागलं.

हे चॉकलेट फाईव्ह स्टार किंवा डेअरी मिल्कसारखं गुळगुळीत मऊ नाही. ही तर चॉकलेटची वडी. पण तिचं वैशिष्ट्य असं की ती खूप खुटखुटीत आणि खमंग असते. तुम्ही करुन पहा, तुम्हालाही कदाचित एकदम आवडेल.

पहिल्यांदा खाली दाखवलेलं सामान गोळा करा:

-एक वाटी साखर, खूप गोड आवडत असेल तर दीड वाटी.
-एक वाटी मिल्क पावडर. नेसले एव्हरीडे अत्यंत रेकमेंडेड. शक्यतो दुसरी नकोच.
-एक वाटी लोणी. घरच्या शुभ्र लोण्याने अनेकदा ही कृती केली पण नंतर शोध लागला की अमूल बटरने खूप जास्त अफलातून स्वाद येतो. त्यामुळे एक पॅक अमूल बटर.
-ड्रिंकिंग चॉकलेट पावडर किमान सहा चमचे. कितपत डार्क हवंय त्यावर सात किंवा नऊ चमचेही घेऊ शकता. प्युअर कोको वापरलात तर तो कडू असतो. तो चारच चमचे घ्या.
-आवडत असले तर तीनचार काजू आणि बेदाणे. नसले तरी चालेल.

साखर एका विस्तीर्ण कढईत घ्या. आवेशाने ढवळ ढवळ ढवळायला पुष्कळ वाव हवा. छोटी कढई नको.

त्यात साखर जेमतेम भिजण्याइतकं पाणी अतिशय बेताने घाला. साखरेला लगेच पाणी सुटत असल्याने एकदम भसकन पाणी घालू नये हे वेगळं सांगायला नको. पाणी जास्त झालं तर तितका जास्त वेळ आटवत बसून हाताला रग लागेल.

दूधभुकटी आणि ड्रिंकिंग चॉकलेट किंवा कोको पावडर एकत्र करुन घ्या. एव्हरेडीखेरीज अन्य दूधभुकटी असेल तर सरळ चाळणीतून पाडून घ्या म्हणजे एकदम सुंदर मिश्रण होईल. चाळणीची स्टेप फक्त स्मूथनेससाठी आहे. टाळली तरी चालेल.

साखरेच्या कढईखाली ग्यास पेटवा. मध्यम आचेवर पाकाला उकळी येऊ द्या. मधेमधे घोटत रहा आणि करपून कॅरेमलाईज होऊ देऊ नका.

सगळी साखर विरघळली आणि उकळता पाक जरा घट्ट वाटायला लागला की त्यात मिल्क पावडर आणि ड्रिंकिंग चॉकलेट पावडरचं मिश्रण घाला आणि तातडीने ढवळायला सुरुवात करा.

आता गुठळ्या होऊ न देणं, मिश्रण बाजूला न चिकटू देणं, करपू न देणं हे सगळं अत्यावश्यक असल्याने फोटू काढायला दुसर्‍या कोणालातरी बोलवा. पोराबाळांना काय बनतंय ते उंच उचलून दाखवायचं असेल तर आत्ताच पटकन दाखवून घ्या. कारण आता सटासट ढवळण्याचा अखंड कार्यक्रम चालू होतोय.

त्या पाघळलेल्या रटरटत्या मिश्रणात बटर घाला आणि त्याला विरघळताना बघत बघत एक "सिनफुल फीलिंग" घ्या.

मिश्रण दहाएक मिनिटं ढवळत ढवळत मध्यम आचेवर ठेवलं की हळूहळू घट्ट व्हायला लागेल

आता ढवळताना अधिकाधिक जोर लागायला लागेल. अशा वेळी ढवळण्याचा वेग अतीतीव्र करा. यावर स्मूथनेस अवलंबून आहे.

एका ताटाला थोड्याश्या लोण्याचा हात लावून तयार ठेवा. हे आधीच करुन ठेवलं तरी चालेल. ढवळण्यातून फुरसत मिळायला अवघड.

काजू किंवा इतर नट्स आवडत असतील तर या स्टेजला ते मिश्रणात तुकडे करुन घाला. बेदाणे आत्ता घालू नका. ते फुगून येतील.

मिश्रण ढवळता ढवळता आता ते घट्ट झाल्याचं लक्षात येईल. नेमकं केव्हा खाली उतरवायचं हा अनुभवाने शोधण्याचा पॉईंट आहे. पण अंदाज येण्यासाठी फोटो देतो आहे. फार घट्ट होऊ देऊ नका. नपेक्षा हत्यार म्हणून किंवा गोळाफेकीसाठी वापर करावा लागेल. फार आधी उतरवलं तर फाईव्हस्टारसारखं मऊशार आणि दाताला चिकटणारं होईल.

बटरचा हात लावलेल्या ताटात हे मिश्रण झटझट ओतून घ्या.

ते सेट होण्यासाठी ताटाला हलवा. या स्टेजला त्यात बेदाणे रुतवा.

अर्ध्या-एक तासाने सुरी किंवा उलथन्याने वड्या कापा.

अशा रितीने खुटखुटीत आणि खास आपल्या हातचा टच असलेल्या चॉकलेट वड्या तयार. पोरं जाम म्हणजे जाम खूश होतात. कढईतली उरलेली खरपूडही चाटून काढतात मांजरासारखी.

ही घ्या:

आणखी हवीत?

बनवा.. आणि कशी लागतात सांगा.. खूप सोपी आहे ही चीज.

"कुछ मीठा हो जाय"चे खूप प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येवोत ही शुभेच्छा.. (लगेच टेन्शन कशाला घेताय? इतरही बर्‍याच प्रकारच्या "गुड न्यूज" असतात की हो..

प्रतिक्रिया

मन१'s picture

3 Jun 2012 - 8:12 pm | मन१

चविष्ट लेखन....

चॉकोलेट फजची आठवण आली तुमचे फोटू पाहून.
छान पाकृ.

पैसा's picture

3 Jun 2012 - 8:56 pm | पैसा

आमच्या डायटची वाट लावा! पण फारच मस्त लागत असणार! आमच्याकडे रुचिरा नवीन होतं तेव्हा एकदा माझ्या आईने दहीदुधाच्या वड्या केल्या होत्या त्यात बघून. त्याचं मिश्रण जास्त वेळ आटवलं गेलं आणि मग काय? असं काही चिकट आणि टणक झालं की ज्याचं नाव ते! आधी ताटातून काढता येईना. मग ओढाताण करून ताटातून एखादा भाग टण्णकन आवाज करून बाहेर निघायचा आणि तो खायला गेला तर दात गळून पडतात की काय असं वाटायचं तेव्हापासून घरी केलेल्या वड्या म्हटलं की भीतीच वाटायला लागली. फक्त नारळाच्या वड्या ताबडतोब तयार होतात म्हणून ठीक!

प्रभाकर पेठकर's picture

3 Jun 2012 - 9:03 pm | प्रभाकर पेठकर

तिचं वैशिष्ट्य असं की ती खूप खुटखुटीत आणि खमंग असते.

वर्णनावरून मला 'रावळगाव टॉफी'ची प्रकर्षाने आठवण झाली. अतिशय स्वादिष्ट.

पण आता ह्या वयात काय खायचं आणि काय नाही हे, मी नाही तर, माझे डॉक्टर ठरवतात. त्यामुळे गविसाहेब, नुसत्या कल्पनेनेच तुमची ही पाककृती मस्तंच असणार ह्या खात्रीलायक विचाराने, अभिनंदन.

मुक्त विहारि's picture

3 Jun 2012 - 9:14 pm | मुक्त विहारि

लगेच करून बघतो...

खाण्यात पण भरारी. नक्कीच करुन बघेन
gavi

भडकमकर मास्तर's picture

3 Jun 2012 - 9:56 pm | भडकमकर मास्तर

रुचिरात वाचून हीच्च पाककृती शाळेत असताना करत असे त्याची आठवण झाली...

त्यात दोन ( की तीन) प्रकार होते.... एकात दूध असे आणि एकात मिल्क पावडर असे...

उतरवायचं टायमिंग जमणं / न जमणं क्रिटिकल हे सारं आठवलं...

निवेदिता-ताई's picture

3 Jun 2012 - 10:11 pm | निवेदिता-ताई

सुंदर झाल्या आहेत....नक्की करुन पाहीन.

निवेदिता-ताई's picture

3 Jun 2012 - 10:11 pm | निवेदिता-ताई

सुंदर झाल्या आहेत....नक्की करुन पाहीन.

JAGOMOHANPYARE's picture

3 Jun 2012 - 10:22 pm | JAGOMOHANPYARE

छान

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2012 - 10:28 pm | अत्रुप्त आत्मा

आज आत्मा त्रुप्त जाहला...

एकदा बनवून पाहणेत येईल.

सोत्रि's picture

4 Jun 2012 - 12:00 am | सोत्रि

मस्त !

घरी चॉकलेटचे मोल्ड आणून वेगेवेगळ्या आकाराची चॉकलेटे केली होती त्याची आठवण झाली...अरे..हो ती चॉकलेटे बायकोने केली होती हां...मी नाही ;)

- ( चॉकलेट न आवडणारा ) सोकाजी

राजहंस's picture

4 Jun 2012 - 1:10 am | राजहंस

चॉकलेट म्हणजे सगळ्यात आवडता खाद्यपधार्थ ;)......गवि जी, केव्वळ अप्रतिम, साधी सरळ, सोप्पी आणि सहजपणे करता येण्यासारखी पाककृती आणि फोटो सुद्धा.....आणि हे वाक्य सुद्धा आवडलं कि - Life is like Chocolate...Sometimes u gotta deal wid nuts.....क्या बांत हे

गविजी मस्तच हो येकदम झक्कास ..... कुछ मिठा हो जाये :) आवडेश व्वा व्वा तों पा सु..... हे वेगळे सांगायला नकोच....

स्पंदना's picture

4 Jun 2012 - 8:07 am | स्पंदना

हो जाय ! ह्हो जाय!

प्रचेतस's picture

4 Jun 2012 - 9:05 am | प्रचेतस

एकदम सोपी पाककृती.
मस्त.

या आता तुम्ही इथं पण आलात, इथंच तेवढे कमी होतात.
असो, या रविवारी करुन पाहेन आणि फोटो अप्डेटवेन. आशीर्वाद असावा ही विनंती,

व्वा झकास जमलियेत चॉकलेट :)
मी देखील अशीच बनवते पण त्यात कधी कधी क्रिस्प येण्याकरीता चॉकलेट वेफर्सची भुकटी घालते सही लागतात :)

या सदरात देखील तुमचा शिरकाव बघुन छान वाटले.

अवांतर - चॉकलेट आवडत नाहीत पण जरूर बनवून बघेल (इतरांसाठी)

अमृत

अनिरुद्ध प's picture

16 Aug 2013 - 5:26 pm | अनिरुद्ध प

हरकत नाही आधी साम्पल पाठवा,आवडल्यावर पुढचे पाहु.(आमचा गावठी ईनोद बरका)

प्यारे१'s picture

4 Jun 2012 - 1:07 pm | प्यारे१

>>>या आता तुम्ही इथं पण आलात, इथंच तेवढे कमी होतात.

+१११११ टु ५० राव! सगळीकडंच कसं हो जमतं तुम्हाला गविशेट?

मी-सौरभ's picture

4 Jun 2012 - 8:02 pm | मी-सौरभ

आपल्याला (तुम्हा आम्हाला) एक गोष्ट धड जमत नाही यार :(
गवि: फुडच्या कट्ट्याला या घेऊन संपवून टाकू ;)

स्मिता.'s picture

4 Jun 2012 - 1:12 pm | स्मिता.

चॉकलेटची घरगुती पाकृ एकदम मस्त! फोटू पाहूनच कळतंय की ही चॉकलेट खमंग लागत असणार.

स्वगतः गविंनी आता पाककृती सदरातही पदार्पण करून एकूण एक सदरात विहार केला आहे.

गणपा's picture

4 Jun 2012 - 1:31 pm | गणपा

या माणसाने कुठलाही लेखन प्रकार शिल्लीकच ठेवायचा नाही असा विडा उचललेला दिसतोय. ;)

गोंधळी's picture

4 Jun 2012 - 1:43 pm | गोंधळी

online चव घेण्याची व्यवस्था असती तर बरे झाले असते.

कवितानागेश's picture

4 Jun 2012 - 3:55 pm | कवितानागेश

या प्रकाराला मी काकू, आजी, मावशी अश्या बायकांकडून 'कोकोच्या वड्या' हे नाव ऐकलय.
बटर आधीच विरघळवून , त्यातच पिठीसाखर घातली तर अजून पाणी वगरै घालावे लागत नाही.
मग मिल्क पावडरचे घट्ट दूध करुन त्यात घालून कोको पावडर घातली की गुठळ्यापण होत नाहीत.
नट्स वेगळे भाजून वरुन घातले तर अजून मस्त लागतात.

आयला, गवि, लाळेरं घ्यावं लागणार रे, हे असलं पाहून.....

आता मी पण करून खाईन.... ;-)

सही दिसताहेत चॉकलेटस :)
कृती पण सोपी दिसतेय...... नक्की करून बघणार :)

कानडाऊ योगेशु's picture

4 Jun 2012 - 7:56 pm | कानडाऊ योगेशु

भन्नाट पाककृती.
साधारण खर्च किती येतो?
आणि बाजारात मिळणार्या तितक्याच वजनाच्या चॉकलेटपेक्षा किफायतीशिर आहे का?

सानिकास्वप्निल's picture

5 Jun 2012 - 1:20 pm | सानिकास्वप्निल

वाह! चॉक्लेटच्या वड्या भन्नाट दिसत आहे :)
नक्की करून बघणार :)

सुहास..'s picture

5 Jun 2012 - 2:53 pm | सुहास..

लय भारी !!

सस्नेह's picture

5 Jun 2012 - 3:06 pm | सस्नेह

पाकृ जुनीच असली तरी सर्व स्टेप्स एकदम डीटेल घेतल्याने अन सोबत त्यान्चे फोटोही डीटेल दिल्याने मस्त झाली आहे. करायलाही सोपी अन मुलांच्या आवडीची !
धन्यवाद गवि .

मनीषा's picture

5 Jun 2012 - 3:18 pm | मनीषा

छानच आहे पा.कृ.

चिगो's picture

5 Jun 2012 - 8:00 pm | चिगो

धन्य हो तुम्ही गवि, धन्य.. लै म्हंजे लैच भारी. करुन बघण्यात येईल..

स्वाती दिनेश's picture

5 Jun 2012 - 10:32 pm | स्वाती दिनेश

वड्या छानच दिसत आहेत,
ह्या आमच्या कोकोच्या वड्या
स्वाती

भरत कुलकर्णी's picture

6 Jun 2012 - 2:21 am | भरत कुलकर्णी

गवि तुम्हालाच सारं कसं झकास झकास जमतं हो? ओ सांगा ना एकदा काय ते.

सहज's picture

6 Jun 2012 - 2:41 pm | सहज

गवि चांगली आठवण करुन दिलीत! फार फार वर्षांपूर्वी गर्लफ्रेंड्ने (तेव्हाची गर्लफ्रेंड तीच आजची बायको) एका उन्हाळ्याच्या सुटीत स्व:ता अश्या वड्या बनवून, चॉकलेट आहे म्हणून प्रेमाने खायला घातल्या होत्या. तूर्तास तुम्हाला खास हे घ्या.

मुक्त विहारि's picture

15 Aug 2013 - 5:16 pm | मुक्त विहारि

आणि

मुलांनी १० मिनिटांत संपवल्या...

थ्यँक्स अ लॉट

भाते's picture

16 Aug 2013 - 8:46 pm | भाते

तिकडे पेठकर काकांनी आणि सानिका ताईने आधीच श्रावणात मासांहारी पाकृ दाखवुन अर्धा जीव घेतलेला असताना हि असली जिवघेणी पाकृ पुन्हा वर काढताय? जरा विचार करा हो आमचा.

तिमा's picture

17 Aug 2013 - 12:58 pm | तिमा

आधी हे सांगा की ढवळताना किती कॅलरीज खर्च होतात ? त्यानुसारच पाकृ करायची की नाही ते ठरवता येईल.

सुबोध खरे's picture

17 Aug 2013 - 1:34 pm | सुबोध खरे

गोड खाण्याचं टेम्प्टेशन एकदा का झालं की ते जाम जोरात होतं. हे म्हणजे आमच्या अगदी मनातील बोललात. आमच्या घरी फक्त मला गोड आवडते. बायकोला नाही आणि मुले आईवर गेली आहेत. परंतु आमच्या पेशंटची कृपा असल्याने पेढे किंवा कैडबरी अधून मधून मिळतच असते. पण सारखे गोड खाल्ल्याने बायकोची बोलणी पण खावी लागतात. तसे आमचे वजन किंवा साखर पूर्ण नॉर्मल असूनही. त्यामुळे अशी पाककृती पाहिली कि लाळ टपकायला लागतेच. चोकलेट ची वडी कितीही खा तोंडात किंवा टाळूला चिकटत नाही. त्यातून गवि साहेबांचे वर्णन करण्याचे कौशल्य म्हणजे काय झालेच

वाटूळ's picture

19 Aug 2013 - 2:16 pm | वाटूळ

Waaa!!

उर्मिला००'s picture

19 Aug 2013 - 2:31 pm | उर्मिला००

सचित्र रेसीपीमुळे प्रत्यक्ष खाल्ल्याचा भास झाला.नक्की करुन बघेन.