कोणत्या मिपापटुला "मिपारत्न" द्यावे?
हा काथ्या कुटताना कामगिरी मधील सातत्य लक्षात घ्यावे.
उगाच गेले नउ महीने काहीही लिहीले नाही आणि एखाद दुसरा प्रतिसाद देणार्या ना ह्या उपाधी साठी लक्षात घेउ नये.
उपाधी देताना "का"? ची चर्चा अपेक्षित.
मी मिपाची अतिशय सुंदर,सुलक्षणी,सुसंस्कारी,सुशिक्षित,सुविचारी,सुगरण, सोज्वळ,निरागस,प्रेमळ.शुद्धलेखनात पहिला क्रमाक मिळवलेली ;) वगैरे वगैरे अशी सदस्य आहे.त्यामुळे मीच या मिपारात्न साठी योग्य आहे असे मला वाटते.त्यामुळे सर्वांनी मलाच आपले अमूल्य मत द्यावे. :)
(१) परा यांचे प्रतिसाद आणि लेख वाचून पोट दुखते (हसून की असूयेने ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार)
(२) डायरीवाटप केंद्र समीती, दुर्लक्षीत पँथर समीती वगैरेचे अध्यक्षपद त्यांनी गौरवपूर्ण रीत्या भूषविले आहे.
(३) परखड मते मांडण्यात सातत्य, नानांसारखे हुषार तसेच गाई, शेळ्या पाळणारे, चरखा कातणारे मित्र जोडून ठेवण्याची कला
आदि गुणांची कदर म्हणून परा यांना मिपारत्न पदवी देण्यात यावी.
xxxरत्न वगैरे पारितोषिक रिटायर झालेल्या किंवा 'आता हो बाबा रिटायर एकदाचा' असे ज्याला सुचवायचे आहे त्याला देतात ना*? मग आता शोधा रिटायर झालेले वा ज्यांनी रिटायर व्हावे असे वाटते असे आयडी.
*उदा. दादासाहेब फाळके पारितोषिक. चेहर्यावरच्या नि गळ्यावरच्या सुरकुत्यांची जाण ठेवता आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या हिरविणींबरोबर काम करण्याचा अट्टाहास करणारे हिरो. त्या शाहरूखला देऊन टाका हो एकदाचं (चेपुवर कॅम्पेन चालवावं का?). त्या हिरविणीही सुटतील नि आपणही.
मिपा ही तर रत्नांची खाण आहे ...
माझ्या मते रामदास सर(काका), आणी इतरही रत्ने आहेतच.
शिवाय लेखना पेक्षा त्यावर सुंदर ,चपखळ,आणी मोजकी प्रतिक्रीया देणारे जास्त हक्कदार आहेत,कारण त्यामुळेच लेखकाचे लेखन उत्तरोत्तर बहरत जाते.हे म्हणजे असे कि ,"बघणारा असेल तर नटण्यात अर्थ आहे."
........
............
नाहीतर जागू तै ना द्या
कारण लेख वाचुन पोट भरत नाही तर रेसिपी वाचून आणि बघून पोट भरते.
अनिवासी भारतीयांना काही विशेष सवलत किंवा आरक्षण आहे का ?
नुसती चौकशी केली हे माझे मत समजू नये.
पण प्राजू किंवा पिंडा किंवा गुर्जी ह्यांना हा बहुमान मिळावा. असे वाटते.
प्रतिक्रिया
2 Jun 2012 - 5:05 pm | पैसा
तुमचा चॉईस आधी सांगा की!
2 Jun 2012 - 5:10 pm | चिरोटा
प्रभूसाहेब निवड समितीवर नसतील तर त्यांच्याच नावाची शिफारस व्हावी. क्रिप्टिक लेख्,प्रतिसाद देण्यात त्यांचे सातत्य वाखाणण्यासारखे आहे.
2 Jun 2012 - 5:41 pm | जेनी...
काहि नावं तरी समोर ठेवायची होती...
आम्हा नवख्याना कस कळणार कोन कसा आहे ते?
बाकि वाचतेय .....:)
2 Jun 2012 - 6:21 pm | अत्रुप्त आत्मा
@आम्हा नवख्याना कस कळणार कोण कसा आहे ते? >>> ++++++1111111 यहीच बोल्ता है| ;-)
4 Jun 2012 - 3:38 pm | किचेन
मी मिपाची अतिशय सुंदर,सुलक्षणी,सुसंस्कारी,सुशिक्षित,सुविचारी,सुगरण, सोज्वळ,निरागस,प्रेमळ.शुद्धलेखनात पहिला क्रमाक मिळवलेली ;) वगैरे वगैरे अशी सदस्य आहे.त्यामुळे मीच या मिपारात्न साठी योग्य आहे असे मला वाटते.त्यामुळे सर्वांनी मलाच आपले अमूल्य मत द्यावे. :)
2 Jun 2012 - 5:54 pm | मनीषा
मिपा ही तर रत्नांची खाण आहे ...
2 Jun 2012 - 5:56 pm | भरत कुलकर्णी
गुर्जी तुम्ही 'मोटराईज्ड कार्ड रीडर चांगले की डिप कार्ड रीडर?' या प्रश्नाचे उत्तर दिले नसल्याने आम्ही रागावलोय. ते उत्तर द्या मगच आम्ही हा प्रश्न हातात घेवू.
2 Jun 2012 - 6:01 pm | विनायक प्रभू
डिप केंव्हाही चांगले
2 Jun 2012 - 6:37 pm | jaypal
गालीबचा शेर आठवला
...................................,
एक ढुंडो हजार मिलते है/ ;-)
शरदिनी तै च्या ऊत्तराच्या प्रतिक्षेत.
2 Jun 2012 - 6:50 pm | नाना चेंगट
आमच्या मते रामदास ! :)
का या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळच येऊ नये.
2 Jun 2012 - 7:26 pm | विनायक प्रभू
मे बी वन ऑफ द कंटेंडर
2 Jun 2012 - 7:30 pm | अविनाशकुलकर्णी
परा
2 Jun 2012 - 8:14 pm | शुचि
(१) परा यांचे प्रतिसाद आणि लेख वाचून पोट दुखते (हसून की असूयेने ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार)
(२) डायरीवाटप केंद्र समीती, दुर्लक्षीत पँथर समीती वगैरेचे अध्यक्षपद त्यांनी गौरवपूर्ण रीत्या भूषविले आहे.
(३) परखड मते मांडण्यात सातत्य, नानांसारखे हुषार तसेच गाई, शेळ्या पाळणारे, चरखा कातणारे मित्र जोडून ठेवण्याची कला
आदि गुणांची कदर म्हणून परा यांना मिपारत्न पदवी देण्यात यावी.
2 Jun 2012 - 9:53 pm | जेनी...
' क्रमशा' हा शब्द कसा लिहायचा इथे ???
( कदाचित हे पर्याच नीट सांगु शकतो ) ;)
2 Jun 2012 - 9:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे
"क्रमशा" असा :-)
4 Jun 2012 - 3:44 pm | किचेन
हा पुरस्कार तर 'परा'च्या कावळ्यालाही देऊ नये.
-१००००००००००००० सगळ्या कथा अर्धवट सोडतो मेला.
2 Jun 2012 - 8:42 pm | तिमा
गवि यांनी सातत्याने विविध विषयांवर लेखन केले असून ते प्रतिसाद देतानाही अत्यंत संयमित प्रतिसाद देतात. तरी माझे मत गविंनाच!
2 Jun 2012 - 9:38 pm | टिवटिव
माझे पण मत गविंनाच!
4 Jun 2012 - 3:46 pm | किचेन
माझे पण! गवि रोक्स........
4 Jun 2012 - 5:11 pm | ५० फक्त
ओ नक्की काय ते ठरवा एकदाच , तुम्ही का गवि, नक्की कुणाला मत आहे तुमचं ?
काय आहे पुढच्या आठवड्यापासुन प्यार्ट्या सुरु होणार आहेत, उगा नंतर घोळ नको.
2 Jun 2012 - 10:25 pm | स्पा
janatl manatl : ramdas kaka. ja ku. gavi. para. bika
pakru : ganpa sanika swapnil mrunalini
bhatkanti kaladalan : valli ofcourse
kaula : internet snehi
kathyakut : vishwanath mehendale. 50 fakt . an all other 99 % of mipakars :D
2 Jun 2012 - 10:50 pm | जोशी 'ले'
काय हे, मोबायलात अजुन मागे... :-( , तुझ्या सारख्या आयडी नाय सोबलं बग. :-)
2 Jun 2012 - 10:46 pm | भरत कुलकर्णी
उदो बोला उदो
बाकी आमचे नाव नाही त्या बद्दल निषेध!
:-)
2 Jun 2012 - 11:14 pm | पक पक पक
आमच्या मते अत्रुप्त आत्म्यास मिपारत्न देण्यात यावे...
2 Jun 2012 - 11:28 pm | रमताराम
xxxरत्न वगैरे पारितोषिक रिटायर झालेल्या किंवा 'आता हो बाबा रिटायर एकदाचा' असे ज्याला सुचवायचे आहे त्याला देतात ना*? मग आता शोधा रिटायर झालेले वा ज्यांनी रिटायर व्हावे असे वाटते असे आयडी.
*उदा. दादासाहेब फाळके पारितोषिक. चेहर्यावरच्या नि गळ्यावरच्या सुरकुत्यांची जाण ठेवता आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या हिरविणींबरोबर काम करण्याचा अट्टाहास करणारे हिरो. त्या शाहरूखला देऊन टाका हो एकदाचं (चेपुवर कॅम्पेन चालवावं का?). त्या हिरविणीही सुटतील नि आपणही.
3 Jun 2012 - 12:27 am | रघु सावंत
मिपा ही तर रत्नांची खाण आहे ...
माझ्या मते रामदास सर(काका), आणी इतरही रत्ने आहेतच.
शिवाय लेखना पेक्षा त्यावर सुंदर ,चपखळ,आणी मोजकी प्रतिक्रीया देणारे जास्त हक्कदार आहेत,कारण त्यामुळेच लेखकाचे लेखन उत्तरोत्तर बहरत जाते.हे म्हणजे असे कि ,"बघणारा असेल तर नटण्यात अर्थ आहे."
........
............
नाहीतर जागू तै ना द्या
कारण लेख वाचुन पोट भरत नाही तर रेसिपी वाचून आणि बघून पोट भरते.
3 Jun 2012 - 3:40 am | जेनी...
रघु काकांशी एकदम सहमत ....
हवांतर : मीपा ' रत्न ' आणि मिपा ' रत्ना' असे दोन ' नग ' निवडावेत ;)
3 Jun 2012 - 10:41 am | निनाद मुक्काम प...
अनिवासी भारतीयांना काही विशेष सवलत किंवा आरक्षण आहे का ?
नुसती चौकशी केली हे माझे मत समजू नये.
पण प्राजू किंवा पिंडा किंवा गुर्जी ह्यांना हा बहुमान मिळावा. असे वाटते.
3 Jun 2012 - 4:16 pm | अप्पा जोगळेकर
जयंत कुलकर्णी यांचे लिखाण सुंदर असते.
बाकी मिपारत्न वगैरे पदव्या कोणाला चिकटवू नयेत असे वैयक्तिक मत आहे.
4 Jun 2012 - 9:11 am | घाशीराम कोतवाल १.२
मास्तर ही मिपारत्न हि काय भानगड आहे हो?
न्हाई म्हटल आपल्या चपला तयार आहेत
4 Jun 2012 - 12:12 pm | श्रीरंग_जोशी
मिपारत्न घोषित करून काही ज्येष्ठ सदस्यांना (सन्माननिय) निवृत्तीच सल्ला दिला जातोय की काय अशी शंका येत आहे?
4 Jun 2012 - 1:06 pm | घाशीराम कोतवाल १.२
आमचे धुम्रवलयांकित धमाल महाराज देशमुख बारामतीकर ह्या उपाधीला शोभतात
पण सध्या त्यांची आंतर्जालिय समाधीवस्था आहे
4 Jun 2012 - 4:22 pm | jaypal
कुणी काहीही म्हटल तरी आपल मत एकदम फिक्स
नाडी वाले बाबा की जय हो