क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरेंमुळे आपले जीवन किती सोपे आणि सुखकारक झाले आहे असे मला वाटत होते. पण काल मला एक धक्कादायक अनुभव आला. पुणे येथील वारजे भागातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात मी पैसे काढायला गेलो. तिथल्या यंत्राने माझे कार्ड गिळून टाकले आणि वर पुन्हा "प्लीज इन्सर्ट युवर कार्ड" अशी विनंती केली. माझे कार्ड तर आधीच 'इन्सर्ट' केलेले होते. दरवाजाजवळ बसलेल्या रक्षकाला मी ही गोष्ट सांगितल्यावर त्याने दोन तीन बटने दाबून प्रयत्न केला आणि तो असफल झाल्यानंतर जवळच असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जायला सांगितले. दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्या शाखेत गेलो. तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी महिलेने फोनवर कोणाशी बोलून चौकशी केली आणि मला माझ्या बँकेत (पंजाब नॅशनल बँकेत) जाऊन नवे कार्ड मिळवण्याबाबत कारवाई करायला सांगितले. वारंवार विनंती करूनसुध्दा बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये अडकलेले माझे कार्ड परत मिळवण्याबद्दल ती काही सांगू शकली नाही. ते जवळ जवळ अशक्य आहे असेच तिच्या बोलण्यावरून जाणवले. ते एटीएम मशीन त्या शाखेच्या अखत्यारीत येत नाही, हे काम औटसोर्स केलेले असते असे त्या बाईंनी सांगितले.
रिक्शा करून मी कोथरूड येथील पीएनबीच्या शाखेत गेलो. तेथील अधिकार्याने एक टोलफ्री नंबर दिला आणि तिथे फोन करून माझे कार्ड कँसल करायची कारवाई करावी आणि मुंबईला जाऊन माझ्या खात्यातून नवे कार्ड मिळवावे असे सांगितले. म्हणजे तेवढ्यासाठी मला लगेच मुंबईला जायला हवे. तो टोलफ्री नंबर मिळता मिळत नव्हता. दोन तास सतत प्रयत्न केल्यानंतर एकदाचा लागला आणि माझे पूर्वीचे कार्ड रद्द करण्याची कारवाई तीन तासात होईल असे आश्वासन मिळाले, पण ते केल्याची सूचना काही पुढील वीस तासात आलेली नाही.
या सगळ्या प्रकारात माझी काहीच चूक नसतांना मला जो त्रास भोगावा लागत आहे याबद्दल मी कोणाकडे तक्रार करावी याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल कां?
प्रतिक्रिया
31 May 2012 - 11:22 am | गवि
या बाबतीत फारसे काही करता येणार नाही. रिझर्व बँकेच्या बँकिंग ओम्बड्समनकडे तक्रार करूनही फारसा उपयोग नाही कारण गिळलेले कार्ड (स्वतःच्या बँकेखेरीज अन्य बँकांच्या एटीएम मधे अडकलेलं) हे त्या बँकेकडून सिक्युरिटीच्या कारणाने एक प्रोटोकॉल म्हणून कापून नष्ट केलं जातं. अनधिकृत वापर टाळण्यासाठी ही एक सेफ्टी अरेंजमेंट आहे.
एक कल्पना करा : या केसमधे तुमचं कार्ड चोरुन एखाद्याने ते इथे वापरलं असतं आणि चुकीचे पिन ट्राय करता करता ते रीटेन झालं असतं तर त्याला ते परत मिळावं अशी इच्छा तुम्ही केली असतीत का?
किंवा काही अपघाताने तुमचं कार्ड आत अडकून राहिलं आणि वाट पाहून तुम्ही निघून गेलात तर नंतर कोणीही जवळच्या ब्रांचला विनंती करुन ओळख पटवून ते कार्ड न्यावं ही व्यवस्था फुलप्रूफ नाही.
आता मुख्य विषय. तुम्ही म्हटलेली समस्या ही फक्त मोटराईज्ड कार्ड रीडर्स असलेल्या मशीन्समधे येते.

मोटराईज्ड कार्ड रीडर :
त्यात कार्ड आत घेऊन रीड केलं जातं.. ही योजना अत्यंत जुन्या मशीन्समधे केवळ शिल्लक असून ती आता कालबाह्य झाली आहे. ९५ % मशीन्स आता "डिप कार्ड" रीडरसहित येतात. यात कार्ड सरकवून पुन्हा बाहेर काढून घ्यायचं असतं. कार्ड रीटेन होणं ही गोष्ट यात होऊच शकत नाही.
डिप कार्ड रीडर :
मोटराईज्ड कार्ड रीडरमधे एकदाच कार्ड आत टाकून एकामागून एक दोनतीन ट्रान्झॅक्शन्स करता यायची. मग प्रत्येक ट्रान्झॅक्शनला पुन्हा पासवर्ड विचारणं कंपल्सरी झालं आणि त्यातही पासवर्ड (पिन) पुन्हापुन्हा टाकायला लागायचा. डिपकार्ड रीडरला एकदा कार्ड दाखवलं आणि काढलं की एकच ट्रान्झॅक्शन करता येतं, मग सेशन एण्ड. .. दुसर्या (उदा मिनी स्टेटमेंट) पुन्हा कार्ड घालावं लागतं.
पण डिपकार्डमधे फ्रॉड्स करायला खूप कमी वाव राहतो ही बाजू महत्वाची.
तात्पर्य. आता जे झालं ते झालं, यापुढे डिप कार्ड रीडर असलेल्या एटीएम मधेच कार्ड वापरत जावे.. विशेषत: अन्य बँकेच्या एटीएमवर असलात तर. तुमच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएममधे कार्ड राहिल्यास ते कार्ड कॅश लोडिंग एजन्सीकडून गोळा करुन तुमच्या ब्रांचकडे परत पाठवलं जातं आणि तुम्ही चारपाच दिवसांनी स्वत:च्या मूळ ब्रांचमधून ते घेऊन जाऊ शकता.
बादवे : एटीम आणि त्यातल्या कॅश मॅनेजमेंटचे काम सर्वत्र आउटसोर्सच केलेलं असतं, काही दूरच्या ग्रामीण ब्रांचची एटीएम्स वगळता.
31 May 2012 - 11:34 am | मोदक
धन्यवाद गवि... :-)
31 May 2012 - 8:34 pm | रमताराम
गविशेट. एकदम मस्त प्रतिसाद.
तसेही ते मशीन आहे हो सायबा, कधीतरी बिघडणारच की. विचार करा एका मुंबईत अशी लाखात एटीएम असतील त्यात किती टक्के ट्रान्सॅक्शन्स अशी त्रासदायक होत असतील. शंभर टक्के यशस्वितेची खात्री माणसाचीही देता येत नाही, मशीनची कशी देणार?
हे खरे की आपल्याला त्रास झाला की आपली प्रतिक्रिया तीव्र उमटते त्यात गैर नाही, पण अशा एखाद्या त्रासामागे किती वेळा सुरळित काम झाले याचा विचार केला तर त्रास थोडा कमी होतो आपला. बँका मॅन्युअल ट्रान्सॅक्शन करीत होत्या तेव्हा डुप्लिकेट सही करून किती फ्रॉड होत होते हे आज आपण विसरलो असलो तरी तेव्हाची बँकिंग व्यवस्था आजच्यापेक्षा सरस होती नि कम्प्युटरायजेशन मुळे हा असला त्रास आहे असे विधान करणारी फारच थोडी माणसे सापडतील (त्यातही पेन्शनर वगळाल तर ही संख्या नगण्य होईल.) नवी व्यवस्था नव्या संभाव्य चुका घेऊन येणारच, त्याच्या सकट ती व्यवस्था स्वीकारायला हवी. आपल्या रोजगाराच्या ठिकाणी आपली स्वतःची यशाची टक्केवारी (डुईंग इट राईट फर्स्ट टाईम.... ऑफ कोर्स विदाउट डिफाईनिंग राईट = व्हॉटेवर यू डू.) किती याचा विचार केला तर व्यवस्थांनाही चूक करण्याची मुभा आपण द्यायला हवी. शेवटी व्यवस्था देखील तुमच्या आमच्या सारख्या माणसांनीच उभ्या केल्यात ना.
3 Jun 2012 - 4:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण प्रतिसाद धन्स.
-दिलीप बिरुटे
31 May 2012 - 11:41 am | आनंद घारे
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी स्वत: शक्यतोवर डीप कार्ड रीडरचे यंत्रच पसंत करतो कारण त्यात कार्ड अडकण्याची भीती नसते. योगायोग म्हणा किंवा आळ्शीपणा किंवा घाई या कारणांमुळे मला पुण्यामधील तात्पुरत्या राहण्याच्या ठिकाणाजवळ जे एटीएम मिळाले ते वापरले. त्यातून एवढा मोठा गोंधळ होऊ शकेल हे माहीत असले तर मी दुसरे मशीन शोधण्याचा प्रयत्न केला असता.
31 May 2012 - 12:16 pm | संजय क्षीरसागर
मिसेस रोहिणी जोशी, बँक ऑफ इण्डिया, लक्ष्मी रोड ब्रँच, फोन ०२० २४४ ८८ ४०६. मी त्यांना तुमचं कार्ड परत देण्याविषयी बोललो पण आरबीआय इंस्ट्रकश्न्सनुसार (गविनं वर म्हटलय तसं ) त्यांनी ते क्रॅश केलय. तुम्हाला रिप्लेसमेंट कार्ड तुमच्या बँकेकडून सहज मिळेल, दिलेल्या फोनवर चौकशी करा (माझा रेफरन्स द्या) आणि निर्धास्त रहा.
31 May 2012 - 12:23 pm | इरसाल
गिळलेले कार्ड ब्यांकेकडुन ३/४ दिवसात तुमच्या ब्यांकेत दिलेल्या पत्त्यावर येते. (सौ. एचेस्बीसी ब्यांक)
31 May 2012 - 12:32 pm | गवि
त्याच बँकेच्या एटीएममधे गिळलं असेल तर मिळतं परत.
उलट एकदा एचेस्बीसी कार्ड आयसीआयसीआय बँक एटीएममधे अडकवून पहा. ;)
पद्धतः
-एटीएममधे कार्ड गिळले जाणे.
-कॅश लोड करणारा आउटसोर्स्ड कंपनीचा मनुष्य कॅश लोड करताना आत पडलेली कार्डे गोळा करुन घेऊन जाणे.
-ती कार्डे त्या एटीएमवाल्या बँकेकडे (म्हणजे त्याच्या क्लायंटकडे) परत करणे.
-बँकेकडे कार्डे आल्यावर, स्वत:च्या ग्राहकाचं असेल तर त्या ग्राहकाच्या ब्रांचमधे किंवा घरी पोचवणे. दुसर्या बँकेच्या ग्राहकाचं असेल तर ब्लॉक करुन नष्ट करणे.
31 May 2012 - 10:53 pm | भरत कुलकर्णी
मोटराईज्ड कार्ड रीडर चांगले की डिप कार्ड रीडर?
31 May 2012 - 11:04 pm | दादा कोंडके
असो,
या एटीएम वरून आठवलं गेली अनेक वर्षे 'पीन नंबर उलटा एंटर केल्यावर मशीन मधून पैसे येतात आणि जवळच्या पोलीसांना सुद्धा माहिती जाते' असा एक भंपक मेल फिरत आहे. हा मेल मिळाल्यावर मी खरच नंबर उलटा देउन बघितला होता. :)
1 Jun 2012 - 10:08 am | मोदक
माझा पिन २२२२, ४४४४ किंवा २११२, ९८८९ असा आहे आता बोला सरळ काय नी उलटा काय.. :-)
1 Jun 2012 - 10:39 am | रमताराम
हा नागरगप्पांचा एक नमुना होता. दुवा क्र. १ दुवा क्र. २
पुढे जाऊन काही दिवस खरेच अशी काहीतरी योजना असावी असा प्रयत्न झाला, परंतु त्यात एकाहुन अधिक एजन्सीजचा - बँक, एटीएम उत्पादक, एटीएम चालक, टेलेफोन एजन्सी, होमलँड सिक्युरिटी इ. इ. - संबंध असल्याने नि मुख्यतः एटीएम चालवणार्या संस्थांनी (या बँकांनी ठेका दिलेल्या स्वतंत्र कंपन्या असतात) याबाबत आवश्यक ते बदल, उपाययोजना करण्यास असमर्थता दाखवल्याने बारगळला. ही सारी माहिती एका फोरमवर वाचण्यात आली होती. दुर्दैवाने दुवा आता हाती नाही. विकीचा दुवा
3 Jun 2012 - 4:36 pm | बॅटमॅन
+१.
नागरगप्पा हा शब्द आवडल्या गेला आहे :)
3 Jun 2012 - 5:30 pm | दादा कोंडके
हा हा, सहमत. लेख सुद्धा छान!
पण गेली ७-८ वर्षे बघतोय, ९९%* मेल फॉरवर्ड्स भंपक असतात. बहुतेक मेल्स ऑन बेन्च असणार्या आयटीवाल्यांकडून तयार केल्या जात असतील असा माझा कयास आहे**. :) आणि लोक सुद्धा अश्या मेल्स आल्या की डोकं गहाण ठेउन फोर्वर्डवर क्लिक करत असतात.
*विदा मागितल्यास अपमान करण्यात येइल. :)
**एखादं दुकान चालत नसेल तर पुर्वी (आताही गावाकडं) दुकानदार एक अफवा पसरवत असे. ती अफवा १००० जणांपर्यंत पोहोचली की दुकान चालणार असा त्यांचा (वाणी समाजाचा) विश्वास असे. तद्वत, तो मेल १००० जणांना गेल्यास ऑनसाईट मिळेल असा काही आयटीत समज आहे का? ;)
1 Jun 2012 - 12:27 pm | आनंद घारे
सर्व प्रतिसादांना एकत्र उत्तर देत आहे. सर्वांचे आभार.
"क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरेंमुळे आपले जीवन किती सोपे आणि सुखकारक झाले आहे असे मला वाटत होते." असे मी सुरुवातीलाच लिहिले होते अर्थातच त्यांचा लाभ मी पुढेही घेणारच आहे. ही सारी व्यवस्थाच वाईट आहे असे मी सुचवलेले नाही किंवा त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही.
एकाद्या दुकानात किंवा हॉटेलात आपले कार्ड न चालणे, एकाद्या एटीएम मशीनमधून पैसे न मिळणे यासारखे अनुभव भारतात अधून मधून येत असतात. त्यावेळी पैशाची पर्यायी व्यवस्था कशी करायची याची आपण तयारी ठेवलेली असते. दोन वेळा माझे कार्ड एटीएम मशीन्समध्ये अडकले होते, पण ती यंत्रे ज्या बँकांच्या ज्या शाखांमध्ये ठेवली होती तिथे माझी खाती असल्यामुळे मला माझी कार्डे सुखरूपपणे परत मिळाली होती. या पूर्वानुभवामुळे या वेळचा अनुभव धक्कादायक वाटला आणि ही घटना परगावी झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे तितकेसे सोपे नव्हते.
मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि यंत्रांमध्ये बिघाड होण्याची कारणे, त्यांचे स्वरूप, परिणाम, त्यापासून होऊ शकणारे धोके वगैरेचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करणे हा माझ्या कामाचा भाग होता. एटीएम मशीन्सच्या बाबतीतल्या अशा य़ोजना माझ्या मते पुरेशा नाहीत. भारतातील बँकांच्या कार्यपध्दती सुरक्षिततेच्या दृष्टीने कदाचित अधिक चांगल्या असतील, पण उपभोक्त्याच्या दृष्टीने नक्कीच त्रासदायक आहेत. अशा प्रकारचे यांत्रिक बिघाड परदेशात सहसा घडत नाहीत आणि तसे झालेच तर त्यातून मार्ग काढण्यासाठी एक टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल पुरेसा असतो आणि दिवसभरात नवे कार्ड मिळून जाते असे ऐकले आहे.
1 Jun 2012 - 12:35 pm | संजय क्षीरसागर
तुमच काम झालं की नाही? म्हणजे कार्डाचा तपास लागून रिप्लेसमेंट कार्डची प्रोसिजर कार्यान्वित झाली की नाही?
2 Jun 2012 - 9:11 pm | आनंद घारे
मला मुंबईला परत गेल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल. गोखले बाईंना फोन करून पाहिला, त्या जागेवर नव्हत्या. स्क्रॅप झालेले कार्ड कोणालाही मिळणार नाही अशीच माहिती मिळाली. आपला प्रतिसाद वाचून त्याबद्दल आता निश्चिंत झालो आहे.
3 Jun 2012 - 4:51 pm | पैसा
संजय क्षीरसागर यानीही कष्ट घेऊन कार्डाचा शोध लावला त्याबद्दल त्यांचं कौतुक!
मी बँकेत काम करते आणि या प्रकारच्या श्टोर्या माहिती असल्यामुले कार्ड न गिळणारं मशीन बघूनच पैसे काढते. तरीही, एटीएम ऑफलाईन असणे, शाखेचे नेटवर्क ठप्प असणे या आणि असल्या कारणांमुळे खात्यात पैसे डेबिट झाले पण मला प्रत्यक्षात मिळाले नाहीत असे प्रकार ३ वेळा झाले आहेत.
अर्थात टोल फ्री नंबरला फोन करणे आणि २/३ इमेल्स एवढ्यावर साधारण ४/५ दिवसात माझे पैसे दर वेळी खात्यात परत क्रेडिट झाले होते. त्यामुळे आता एटीएम मधून पैसे मिळाले नाहीत तरी मी बिनधास्त असते.
रिप्लेसमेंट कार्डबद्दल सांगायचं तर आता निदान आमच्या बँकेत तरी ताबडतोब, शाखेतच कार्ड इश्यु करायची व्यवस्था आहे. तुम्ही दुसर्या ठिकाणी असल्यामुळे तुमची गैरसोय झाली आहे.
3 Jun 2012 - 5:32 pm | संजय क्षीरसागर
तितका भारी इश्यू नव्हता. इथे पोस्ट पब्लिश झाल्यावर एका तासात कार्ड कुठेय हे कळवलं पण (वीस तास चिंतेत घालवलेले असताना सुद्धा) काही प्रतिसाद नाही, पुन्हा व्य.नि. केला त्यालाही उत्तर नाही, शेवटी इथे दुसर्या दिवशी पुन्हा विचारलं तेव्हा (दोन दिवसानी) निश्चींत झाल्याचा प्रतिसाद! पब्लिकला प्रश्न सोडवण्यापेक्षा माहिती गोळा करण्यात रस आहे का?
9 Jun 2012 - 11:32 am | आनंद घारे
तुमच्याच शब्दात "जाऊ द्या हो"! तुमच्याप्रमाणे चोवीस तास आंतर्जालावर असणे आमच्या भाग्यात नाही. त्यातून सतत मिसळपाववर 'पडून' राहणे तर शक्यच नाही. मला जेंव्हा आपला प्रश्न कोणापुढे मांडावा हेच सुचत आणि समजत नव्हले लेंव्हा हा मार्ग दिसला. त्यावेळी मिपाचा मोठा आधार मिळाला. गवींनी दिलेल्या सविस्तर उत्तरानंतर मला याबद्दलची माहिती मिळाली. तसेच या बाबतीत आपल्याल काहीही करता येण्यासारखे नाही आणि यातून आपल्याला फारसा धोका नाही हे समजले.
आपण प्रयत्न करून माझ्या चर्चाप्रस्तावावर माहितीपूर्ण प्रतिसाद दिलात एवढेच नव्हे तर व्यनि पाठवलात याबद्दल आभारी आहे. पण परगावी असलेला माणूस इंटरनेटवर बसून राहिलेला असावा आणि त्याने मिसळपाववर काय चालले आहे हे पहात रहावे व लगेच उत्तरे, प्रत्युत्तरे देत रहावीत या अपेक्षा मला जराशा अवास्तव वाटतात.
9 Jun 2012 - 12:02 pm | संजय क्षीरसागर
धन्यवाद!
13 Jun 2012 - 12:08 pm | राघव
इतका त्रास अन् त्रागा? बाकी ते अध्यात्म वगैरे बद्दल भलेमोठे लेख लिहिणारे तुम्हीच ना हो? नाही, सहज शंका आली म्हणून विचारले.
गवि, माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. माझेही कार्ड असेच एकदा अडकले होते, पण आयसीआयसीआय बँकेचेच एटीएम व कार्ड असल्याने परत मिळाले. फक्त त्यावेळेस आधी कार्ड टेम्पररी ब्लॉक करून ठेवले होते. परत कधी मोटराईज्ड कार्ड रीडर असलेल्या ठिकाणी पैसे काढण्याच्या भानगडीत पडलो नाही. मित्राला सांगीतले तेव्हा म्हणाला, "ठीकच केले पण एकदा पैसे भरणारे लोक्स येतात त्यांना गाठून बघायचे होतेस, कदाचित लवकर काम झाले असते." ;)
राघव
13 Jun 2012 - 12:21 pm | संजय क्षीरसागर
छान!
11 Jun 2012 - 9:23 am | आनंद घारे
तात्या अभ्यंकरांनी 'मिसळपाव' सुरू केला तेंव्हापासून मी त्याचा सदस्य आहे. पण वयापरत्वे 'वरणभात' हा हल्ली माझा नित्याचा आहार झाला असल्यामुळे मी अलीकडे मिपावर सक्रिय नाही एवढेच. मधूनच सुरसुरी आली तर एकादी चक्कर टाकून येतो. अलीकडे असाच इथे आलो असतांना माझ्या मनात एक प्रश्न होता, त्याचे उत्तर मिळावे अशा इच्छेने मी एक टुकार धागा टाकला. त्यावर उत्तरादाखल एटीएम मशीन्सची तपशीलवार तांत्रिक माहिती मिळाली तसेच त्यांचा 'चालवता धनी वेगळाची' असतो, याबाबतीत रिझर्व बँकेने केलेले नियम आणि त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते वगैरे उपयुक्त माहिती मिळाली. शिवाय बहुधा बेंचावर बसलेल्या रिकामटेकड्या ....कडून नागरगप्पा सुरू होतात आणि आंतर्जालाच्या सौजन्याने त्या इतक्या पसरतात की खर्या वाटायला लागतात वगैरे मनोरंजक माहिती मिळाली. माझ्या किंचित कडवट अनुभवाबद्दल सहानुभूती, हळहळ, अनुकंपा, सांत्वन वगैरे वाचायला मिळाले आणि आभारप्रदर्शनही झाले. पुणेरी शालजोडीत गुंडाळून केलेले 'कांगावखोर, कृतघ्न' वगैरे आहेर मिळाले. चामडे आता जरा निब्बर झालेले असल्यामुळे त्यांचीही गंमतच वाटली. अशा प्रकारे ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी मला यावेळी अपेक्षेपेक्षा जास्तच मिळाल्या. या वेळी फारसे जुने ओळखीचे चेहेरे किंवा मुखवटे दिसले नाहीत, तरीसुध्दा जेवढी वाचने झाली आणि प्रतिसाद मिळाले यावरून मिसळपाव हे स्थान आता नवचैतन्याने सळसळले असल्याचे जाणवले.
इतके सारे रामायण घडले तरी "रामाची सीता कोण?" हा प्रश्न मात्र तसाच राहिला. माझा अनुभव सांगून झाल्यानंतर "या सगळ्या प्रकारात माझी काहीच चूक नसतांना मला जो त्रास भोगावा लागत आहे याबद्दल मी कोणाकडे तक्रार करावी याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल कां?" असा प्रश्न विचारला होता. त्याच्या मागे माझे दोन उद्देश होते.
१ ज्या एटीएम मशीनमध्ये जो काही बिघाड झाला होता त्याची तक्रार संबंधित संस्थेकडे केल्यास कदाचित त्या यंत्राची दुरुस्ती केली जाईल.
२. ग्राहकाची काहीच चूक नसतांना त्याला गैरसोय, मनस्ताप, त्रास वगैरे सहन करावा लागणे बरोबर नाही याची संबंधित लोकांना जाणीव झाल्यास त्यांना त्यावर काही उपाययोजना करता येईल.
गवींनी दिलेल्या पहिल्याच प्रतिसादाचा अपवाद वगळता इतर कोणी माझ्या प्रश्नाकडे लक्ष दिलेले दिसले नाही. माझ्या प्रश्नाचे नेमके उत्तर कदाचित नसेलही. पण असा एकादा मंच असायला हवा ना?
11 Jun 2012 - 9:23 am | आनंद घारे
तात्या अभ्यंकरांनी 'मिसळपाव' सुरू केला तेंव्हापासून मी त्याचा सदस्य आहे. पण वयापरत्वे 'वरणभात' हा हल्ली माझा नित्याचा आहार झाला असल्यामुळे मी अलीकडे मिपावर सक्रिय नाही एवढेच. मधूनच सुरसुरी आली तर एकादी चक्कर टाकून येतो. अलीकडे असाच इथे आलो असतांना माझ्या मनात एक प्रश्न होता, त्याचे उत्तर मिळावे अशा इच्छेने मी एक टुकार धागा टाकला. त्यावर उत्तरादाखल एटीएम मशीन्सची तपशीलवार तांत्रिक माहिती मिळाली तसेच त्यांचा 'चालवता धनी वेगळाची' असतो, याबाबतीत रिझर्व बँकेने केलेले नियम आणि त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते वगैरे उपयुक्त माहिती मिळाली. शिवाय बहुधा बेंचावर बसलेल्या रिकामटेकड्या ....कडून नागरगप्पा सुरू होतात आणि आंतर्जालाच्या सौजन्याने त्या इतक्या पसरतात की खर्या वाटायला लागतात वगैरे मनोरंजक माहिती मिळाली. माझ्या किंचित कडवट अनुभवाबद्दल सहानुभूती, हळहळ, अनुकंपा, सांत्वन वगैरे वाचायला मिळाले आणि आभारप्रदर्शनही झाले. पुणेरी शालजोडीत गुंडाळून केलेले 'कांगावखोर, कृतघ्न' वगैरे आहेर मिळाले. चामडे आता जरा निब्बर झालेले असल्यामुळे त्यांचीही गंमतच वाटली. अशा प्रकारे ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी मला यावेळी अपेक्षेपेक्षा जास्तच मिळाल्या. या वेळी फारसे जुने ओळखीचे चेहेरे किंवा मुखवटे दिसले नाहीत, तरीसुध्दा जेवढी वाचने झाली आणि प्रतिसाद मिळाले यावरून मिसळपाव हे स्थान आता नवचैतन्याने सळसळले असल्याचे जाणवले.
इतके सारे रामायण घडले तरी "रामाची सीता कोण?" हा प्रश्न मात्र तसाच राहिला. माझा अनुभव सांगून झाल्यानंतर "या सगळ्या प्रकारात माझी काहीच चूक नसतांना मला जो त्रास भोगावा लागत आहे याबद्दल मी कोणाकडे तक्रार करावी याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल कां?" असा प्रश्न विचारला होता. त्याच्या मागे माझे दोन उद्देश होते.
१ ज्या एटीएम मशीनमध्ये जो काही बिघाड झाला होता त्याची तक्रार संबंधित संस्थेकडे केल्यास कदाचित त्या यंत्राची दुरुस्ती केली जाईल.
२. ग्राहकाची काहीच चूक नसतांना त्याला गैरसोय, मनस्ताप, त्रास वगैरे सहन करावा लागणे बरोबर नाही याची संबंधित लोकांना जाणीव झाल्यास त्यांना त्यावर काही उपाययोजना करता येईल.
गवींनी दिलेल्या पहिल्याच प्रतिसादाचा अपवाद वगळता इतर कोणी माझ्या प्रश्नाकडे लक्ष दिलेले दिसले नाही. माझ्या प्रश्नाचे नेमके उत्तर कदाचित नसेलही. पण असा एकादा मंच असायला हवा ना?
11 Jun 2012 - 9:29 am | गवि
सॉरी. ती माहिती द्यायची राहिली. तुम्हाला तक्रार करायची असली तर खालील फॉर्म भरा :
https://secweb.rbi.org.in/BO/compltindex.htm
बँकिंग ओम्बड्समन या व्यक्तीकडे ही तक्रार जाते. त्यावर निश्चित कारवाई होते आणि बँक्स या प्रोटोकॉलला खूप गांभीर्याने घेतात.
बँकला उत्तर द्यावंच लागतं.
धन्यवाद.
13 Jun 2012 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार
ह्याच सगळ्या प्रकारांना कंटाळून मी आता दुसर्यांचीच कार्डं वापरतो. अडकले तरी त्यांना भुर्दंड, आपण मोकळे.
*अशी कार्डे कशी मिळवायची ते विचारु नये. फोलीसात खंप्लेट केल्या जाईल.