संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !

सचीन जी's picture
सचीन जी in काथ्याकूट
19 Jun 2008 - 2:34 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

काथ्याकूट करण्यासाठी नवीन विषय हाजीर आहे.
कोणत्याही संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !
सुरवात नवीन संगीतकारांपासुन करुयात. नंतर ओघात जुने संगीतकाराही येतीलच.

१. हिमेश - तेरे नाम - ( तुमसे मिलना, तेरे नाम, लगन लगी , ओ जाना ही गाणी श्रवणीय होती. आपण अभिनेता आणि गायक आहोत हा साक्षात्कार होण्याआधी हिमेश तसा बरा होता)
२. विशाल शेखर - मुसाफिर - (कोणि काही म्हणो, मुसाफिरची गाणी ट्रेंड सेटर होती. ईलेक्ट्रॉनिक संगित आणि क्लब मिक्स ताजे होते. एकाच गाण्याचे २ /३ वर्जन हा प्रकारही बराच चांगला वठला होता. सु सु सुनियो ऐकयला (आणि पहायलाही ) मस्त !
३. प्रितम - चॉकलेट - ( हल्का हल्कासे ये नशा, मम्मीसे ना कहना ठेका धरायला लावणारी. पण रॉक - खलीशसी है अप्रतिमच.
४. शंकर, एहसान, लॉय - दिल चाहता है
५. अनु मलिक - जानम - ( राहुल रॉय, महेश भट्टच्या या पडिक चित्रपटातली गाणी मात्र जमली होती. एकाच चित्रपटातली सगळी गाणी जमून येणं ही तशी दुर्मीळ गोष्ट. पण जानमच्या सगळ्या गाण्यावर एक अलग अशी छाप होती.)
६. जतीन ललित - खामोशि द म्युझिकल - ( संजय लीला भंसाली बिघडण्याच्या आधीचा, म्हणजेच त्याचा पहीला चित्रपट. ये दिल सुन रहा है सारखी अनेक श्रवणीय गाणी यात आहेत.
७. बप्पि लाहिरी - जिंदगी एक जुवा - ( प्रकाश मेहराचा महत्वकांक्षी पडेल सिनेमा. आशा़जींच्या मधाळ आवाजातले ये जिंदगी है एक जुवा आणि दिल तो दिल है एकदम क्लास.)

चला तर मग मंडळी, अजून बरीच नावं बाकी आहेत. पंचमदा, ए. आर. तुमच्या साठी सोडलेत.
प्रचंड मारामारी होणार आहे, हे मला माहीती आहे.

हिंदी चित्रपटांचा पंखा,
सचीन जी

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

19 Jun 2008 - 3:02 pm | अनिल हटेला

नदीम श्रवण :- चित्रपट "दीवाना" ...

अतिशय सुमधुर गीत ..आणी सहज सुन्दर सन्गीत...

सोचेन्गे तुम्हे प्यार करे के नही.....
ये सनम हम तो सिर्फ तुम से प्यार करते है.....
पायलीया हो हो हो हो
ऐसी दीवानगी ...

एकापेक्षा एक श्रवणीय गाणी होती...

विशेष म्हणजे ह्या सिनेमात दिव्या भारती होती.......

फक्त दिव्या साठी शतरन्ज सारखे रद्दड सिनेमे आम्ही ५-५ वेळा पाहीलेत ...

असो ...

(दिव्या चा चाहता)

बैल...

विदुषक's picture

19 Jun 2008 - 3:13 pm | विदुषक

मै ने प्यार किया
'राम लक्ष्मण' या गुणी सन्गीतकाराचा चित्रपट ....
काही गाणी ईन्ग्रजी गाण्यावरून ढापली होती .. पण सगळी छान जमून आली होती ....
विशेषतः शीर्षक गीत

मजेदार विदुषक

सचीन जी's picture

19 Jun 2008 - 3:38 pm | सचीन जी

>>'राम लक्ष्मण' या गुणी सन्गीतकाराचा चित्रपट ....
>>काही गाणी ईन्ग्रजी गाण्यावरून ढापली होती .. पण सगळी छान जमून आली होती ....
>>विशेषतः शीर्षक गीत

मैने प्यार किया - I just call to say - Steve Wonder
तुम लडकी हो - Tarzen Boy - Baltamoria
मेरे रंगमे रंगने वाली - Final Countdown - Europe

सहज's picture

19 Jun 2008 - 3:19 pm | सहज

अन्नु मलीक - फिर तेरी कहानी याद आई. - पिक्चर झेल पण गाणी छान . हे गाणे व अजुन दोन तीन छान आहेत.

इस्माईल दरबार - हम दिल दे चुके सनम. जवळजवळ सगळी गाणी.

बाकी आठवावे लागतील.

गिरिजा's picture

19 Jun 2008 - 4:01 pm | गिरिजा

एम. एम. क्रीम (बहुतेक.. :/ )
सूर.. कभी शाम ढले..

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

सचीन जी's picture

19 Jun 2008 - 4:15 pm | सचीन जी

एम. एम. क्रिमच्या जिस्मच्या गाण्यांना तोड नाही. माझ्या मते जिस्मच संगीत या दशकतील सर्वोत्तम चित्रपट संगीत आहे.

सचीन जी.

गिरिजा's picture

19 Jun 2008 - 4:10 pm | गिरिजा

आणि शंकर-एहसान-लॉय त्रिकुटाची बरीच..
लक्ष्य:
कितनी बातें..
दिल चाहता है:
तनहाई..
डॉन:
आज की रात..
अरमानः
मेरी जिन्दगी मे आये हो..
सलाम-ए-इश्क:
बंटी और बबली:
कभि अलविदा ना केहना:
कल हो ना हो:
सर्वच..

(आणि खूप काही...)

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

गिरिजा's picture

19 Jun 2008 - 4:16 pm | गिरिजा

आणि एक राहिलच..
हॄदयनाथ मंगेशकर: निवडुंग
:)

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

अन्या दातार's picture

19 Jun 2008 - 6:05 pm | अन्या दातार

या चित्रपटातली गाणी आहेत का हो कोणाकडे? असतील तर मला इ मेल करा amdatar@gmail.com वर

मनस्वी's picture

19 Jun 2008 - 5:15 pm | मनस्वी

भरपूर आहेत.

काही निवडक हिंदी :
ए.आर्.रेहेमान : रोजा, बॉम्बे
बप्पी लाहिरी : शराबी
शंकर-एहेसान-लॉय : मेरे मन ये बता दे तू.. मितवा (कभी अलविदा..)
आर्.डी : तुझसे नाराज़ नही ज़िंदगी (मासूम)

काही निवडक मराठी:
श्रीधर फडके : ऋतू-हिरवा (अलबम)

आठवतील तशी लिहीन.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

सुचेल तसं's picture

19 Jun 2008 - 5:46 pm | सुचेल तसं

आनंद-मिलिंद => कयामत से कयामत तक..............

http://sucheltas.blogspot.com

नाखु's picture

23 Jun 2008 - 2:02 pm | नाखु

सगळी गाणी जबरदस्त.................

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

II राजे II's picture

23 Jun 2008 - 2:07 pm | II राजे II (not verified)

येशूदास कोणाला आठवतो काहो ???

असेल तर त्याची गाणी कोठे भेटलीत तो दुवा द्या ;)

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

सचीन जी's picture

24 Jun 2008 - 4:33 pm | सचीन जी

दुवा नाही माहीत पण माझ्याकडे काही गाणी सी. डी. वर आहेत.
माना हो तुम, सावनको आने दो वगैरे .

सचीन जी

नाखु's picture

25 Jun 2008 - 9:23 am | नाखु

राजे...

एच एम व्ही ने खास येसुदास सी डी / कएसेट काढली आहे.

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

सध्या नवीन बॉलिवुड संगीतकारांविषयी बोलुया (१९९० पासून पुढील):---
(Disclaimer: ही लीस्ट ही माझी आवड आहे. तुमचे मत वेगळे असु शकेल).

A R Rahman: Roja, Bombay, dil-se, swades, jodha-akbar, lagaan, rangeela, taal, saathiya, RDB, takshak, pukar.

Shankar/Ehsan/loy: dil chahta hai, lakshya, KANK, banti-aur-babli, KHNH, mission kashmir

Jatin/Lalit: Jo jeeta..., DDLJ, kuch kuch hota hai, khiladi, kabhi ha kbahi na, sarfarosh, Fanaa.

Pritam: Singh is Kinng, jab we met, dhoom, woh lamhe, gangster.

Vishal/Shekhar: Zinda, Dus, bluffmaster, musafir

Anand/Milind: QSQT, baghi, vansh, beta.

Vishal Bhardwaj: Omkara, Maachis.

Anu Malik: baazigar, akele hum akele tum, virasat, josh, asoka, murder.

Nadeem/Shrawan: Aashiqui, dil hai ke manta nahi, saajan, sadak, pardes.

जुन्या संगीतकारांविषयी नंतर बोलू. तो खूप मोठा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे :)