राजीव इंदिरायुगीन भारतवर्ष

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in काथ्याकूट
22 May 2012 - 5:35 am
गाभा: 

राजीव गांधी ह्यांना सध्या भावपूर्वक श्रद्धांजली सध्या सर्वत्र वाहिली जात आहे.
कदाचित भविष्यात राजधानी राजीव गांधी टर्मिनल मधून दिल्लीकडे कूच करेल.
तेव्हा राजीव ह्यांच्या काळात भारतात घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणे मला गरजेचे वाटले.
राजीव गांधी ह्यांचे थोडक्यात वर्णन माझ्या लेखी
लोकशाहीच्या नावाखाली एकाधिकारशाही राबविण्यात व सर्व सूत्र स्वतः कडे ठेवण्याचा अट्टाहास करणाऱ्या आईचा मुलगा शेवटी जे पेराल तेच उगवेल ह्या न्यायाने काळाच्या पडद्याआड गेला.
दिल्लीतून गल्लीची सर्व सूत्रे स्वतः चालविण्याचा अट्टाहास व स्वतःभोवती खुशमस्करे व जोडे उचलानार्यांची भाऊ गर्दी ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खास वैशिष्ट्ये

पंजाबात घडलेल्या रक्तरंजित घडामोडी त्यांनतर इंदिराजी ह्यांची हत्या व त्या नंतर झालेले शिखांचे हत्याकांड व आजही रस्त्यावर मोकाट फिरणारे आरोपी ह्या गोष्टी विसरता येत नाही. त्यांच्या युवानेते ते पुढे प्रगल्भ व अनुभवी नेते ह्या कारकीर्दीच्या टप्प्यात ह्या घटना घडल्या त्याचे पडसाद व जखमा आजही समाजात पूर्णतः भरल्या नाही आहेत.

स्वतः पंतप्रधान झाल्यावर आईच्या योजना पुढे राबवत दक्षिणेत एक नवा नवीन घाशीराम जन्माला घालण्याचे पवित्र कार्य राजीव ह्यांनी पार पाडले. व आपल्या स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीच्या इतिहासातील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे श्रीलंकेत शांतीसेना पाठविण्याचा अनाकलनीय निर्णय ( आज जर्मनीत अनेंक तमिळ निर्वासित आहेत. त्यांच्याकडून त्या काळात घडलेल्या अनेक घटना मी येथे लिहू शकतो पण लिहिणार नाही. कारण मनी रत्नं ने दिल दे मधून हाच मुद्दा मांडायचा प्रयत्न केला पण भारतीय लोकांना तो पचनी पडला नाही.)
त्यावेळी
श्रीलंकेने प्रभाकारांशी त्यावेळी तह केला ( हा प्रभाकरन च्या कूट निधीचा परमावधी मानला जातो ) ह्यामुळे आपल्या सैन्याला नेमके आपण श्रीलंकेत का आहोत काय करत आहोत आणि पुढे काय करायचे ह्या बाबत प्रश्न उभे राहिले.

नेमका हाच प्रश्न मुशारफ ने दहशतवादी युद्धात अमेरिकेसोबत पाकिस्तानी सैन्य अफगाण मध्ये पाठविल्यावर पाकिस्तानी सैन्यात निर्माण झाला
व आज तागायत तो कायम आहे
. राजीव ह्यांच्यावर आधी प्राणघातक हल्ला होऊन सुध्धा ते तामिळनाडू येथील सभेत गेले कारण राजकारण हे ह्या परिवाराच्या रक्तात भिनले आहे. व फक्त मृत्यू त्यांना राजकारापासून विमुक्त करू शकत होता. बेनझीर ह्यांना सुद्धा त्यांचे राजकारण ब्रिटन मधून पाकिस्तानात घेऊन आले. अशी राजकारणी पार्श्वभूमी मुशरफ ह्यांना नसल्यामुळे ते पाकिस्तानात जीव धोक्यात घालून येत नाही आहेत. ते व अल्ताफ हुसेन लंडन मध्ये सुरक्षित जीवन जगत आहेत.

राजीव ह्यांच्या मृत्यू नंतर राजकारणातील एकाधिकारशाही ची प्रथा जाऊन कड्बोल्याचे अनेक पक्षीय सरकार स्थापन झाले ह्यामुळे दिल्लीतील बाबू मंडळींचे महत्व कमी होऊन विविध प्रांतातील नेते व जनता ह्यांची दखल घेतली जाऊ लागली.

एखादी ममता ,जयललिता सोनिया जींच्या पक्षाला खुलेआम आव्हान करू लागल्या. व सत्तेची गणिते सांभाळण्यासाठी कोन्ग्रेज ला आघाडी सोबत निर्णय घेणे भाग पडले.
राजीव ह्यांच्या मृत्युनंतर आपल्या परार्ष्ट्र धोरणाचे खर्या अर्थाने शिल्पकार नरसिंह राव ह्यांनी मनमोहन ह्यांच्या मदतीने देशाला मनमोहक स्वप्न दाखवले.( परकीय मिडीयाला भारत मोठी बाजारपेठ पर्यायाने जगतील मोठी लोकशाही व भविष्यातील महासत्ता असल्याचा साक्षात्कार तर सामान्य प्रगत देशातील जनतेला भारत साधू व वाघ सिंहाचा देश ते त्यांच्या नोकर्या हिरावून घेणारा देश अशी प्रतिमा निर्माण झाली )

आजतागायत अफगाण ,इराक ,इराण व पेलेस्तैन, श्रीलंकन मुद्यावर भारतने राजीव ह्यांच्या मृत्युनंतर कोणतीही आक्रमक व अनाकलनीय निर्णय घेतला नाही. म्हणून आमच्या राम नाईक ह्यांचे इराक मध्ये फुलांनी तर बुश साहेबांचे जोड्यांनी स्वागत झाले.
आज संगणक क्रांतीचे प्रणेते म्हणून राजीव ह्यांचे नाव घेतले जाते. पण मुळात मुक्त अर्थ व्यवस्था जी राजीव ह्यांच्या निधनानंतर कोन्ग्रेज तर्फे राबविण्यात आली ती ह्या माय लेकांच्या हयातीत का बरे नाही राबविण्यात नाही आली.?

आज जगाला हेवा वाटेल असा मध्यम वर्ग का बरे त्यांच्या हयातीत निर्माण झाला नाही.
चीन आपल्यापुढे आहे ह्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भारताच्या १2वर्ष आधी चीन ने त्यांची आज आहे त्या अर्थव्यवस्थेची निव रचली. तेव्हा आपला शेजारचा कम्युनिस्ट देश स्वतःला परिवर्तीत करत आहे. तेव्हा आपण सुद्धा आपल्या देशाचे बेसिक धोरण तपासले पाहिजे असा विचार राजीव ह्यांच्या मनाला शिवला नाही.

नरसिंह राव ह्यांच्यावर त्यांनी सोनिया गांधी व पर्यायाने गांधी परिवाराला राजकारापासून वंचित ठेवले असा आरोप त्यांच्यावर केला जातो. पण जर त्यांनी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारलीच नसती किंवा राजीव ह्यांचा मृत्यू झाला नसता व नरसिंह राव व मनमोहन हे राजकारणात आले नसते तर तीच जुनाट अर्थव्यवस्था व तेच जुनाट दूरदर्शन आपल्या नशिबी असते.
आज देशात २जि ते ४जि तंत्राञान ज्या अप्लावधीत आले ते पाहता भारतात दूरध्वनी आपल्यापासून सेम ह्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली क्रांती ह्यामधील कालावधी लक्षात घेतला तर एक गोष्ट लक्षात येते. कि ५० निरकुंश सत्ता ( आणि बाणीचा काळ वगळता ) ह्या मायलेकांनी उपभोगली. मात्र देशात विकास कूर्मगतीने का निर्माण झाला.

त्याकाळात बांगलादेश निर्माण झाल्यावर अमेरिकन मदत आपल्याला बंद झाली व ७० ते ८० च्या दशकात निर्माण झालेली बेरोजगारी ,गुन्हेगारी , फुटीर चळवळी , परदेशात होणारे ब्रेन ड्रेन व ह्या सर्व गोष्टींमुळे जनतेला आलेले नैराश्य व समाजातील घसरते नितीमुल्ये ह्या सर्व गोष्टीबद्दल चर्चा न होता फक्त दूरध्वनीच्या क्रांत्या व गांधी परिवाराच्या नावाने रस्ते व अनेक कल्याणकरी योजना ज्यात अनेक नेत्यांचे व सरकारी अधिकाऱ्यांचे कल्याण झाले व होत आहे. ह्या सर्वांचा जमाखर्च कोण मांडणार.? मुंबई मधून भारताचे बहुतांशी राजस्व येते मात्र आजोबांचा कित्ता गिरवत ह्या शहरातील समस्या व ह्या शहराचा होणारी अधोगती ज्यात गिरणी कामगारांचे उध्वस्त संसार ते दाउद चा उदय व अश्या अनेक गोष्टी घडत असतांना ह्यांनी मुंबईत येऊन हमे ये करना हे धाटणीची भाषणे फक्त दिली. मुंबईची ही कथा तर दिल्लीची बातच सोडा.
ह्यांच्या काळात सोन्याच्या आयती संबंधी धोरणे किंवा भारतात त्याकाळात चैनीच्या मानल्या जाणार्या वस्तूंचे उत्पादन न केल्यामुळे स्मगलिंग फोफावले. व सिने उद्योग जो सर्व भारतीयांचे मनोरंजन करतो त्याला उद्योगाचा दर्जा न दिल्यामुळे हाजी मस्तान ते दाउद चा ह्या शेत्रात शिरकाव व त्यांना समाजात मिळणारी लोकप्रियता हा ह्यांच्या धोरणाची फळे आहेत.
कात्रोची ला वाचविण्यासाठी अमिताभ चा राजकीय बळी हे नुकतेच बोफार्स प्रकरणी नवीन थिअरी वृत्तपत्रातून वाचनास आली . ह्या सर्व प्रकरणात खरे खोटे कितपत असले तरी ह्या प्रकाराने देशाची अब्रू धुळीत मिळाली.

भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली त्याचा एक महत्वाचा बदल जो राजकारणात झाला तो म्हणजे अनेक नवीन शेत्रे जशी आयटी भारतात उदयास आली. व त्यामुळे व्यापारी व उद्योजकांचे राजकारणावर नियंत्रण आले. ह्यामुळे आज कोणत्याही पक्षात कोणताही नेते स्वताच्या मनात येईल ते निर्णय घेऊ शकत नाही. त्याला स्वतःचा मतदार व पक्षाला निधी देणारे उद्योजक ह्यांची मते महत्वाची वाटू लागली . भांडवल शाहीमध्ये ह्या गोष्टी सर्वच प्रगत देशात घडतात त्या भारतात घडू लागल्या.
नेमके हेच नेहरू ,इंदिरा व राजीव ह्यांना नको होते. टाटा असो किंवा अजून कोणताही उद्योजक आमच्यापुढे नाक घासत आले पाहिजे ही मानसिकता मग त्यांना बाळगता आली नसती.

अफगाण मधील तालिबान उदय , अमेरिका व पाकिस्तानी मैत्री व त्यामुळे पाकिस्तानचे अण्वस्त्र सज्ज होणे व त्याच सोबत पंजाबात व काश्मिरात दहशतवाद निर्माण होणे ह्या सर्व गोष्टी घडत असतांना भारताची स्थिती जागतिक राजकारणात केविलवाणी करण्यात तसेस शीत युध्ध्तात रशियाचे प्यादे म्हणून प्रगत देशांच्या काळ्या यादीत भारताला नेण्यात ह्या माय लेकांच्या महान धोरणांचा महत्वाचा वाटा होता. ह्यांच्या काळात माझ्या वडिलांची पिढी सरकारी नोकरी हाच जगण्याचा एकमात्र निकष मानून सुस्त झाली तर कर्तबगार माणसे अमेरिकी पोहोचली व आज माझी पिढी

मात्र भारत असो किंवा परदेश खाजगीकरण व ग्लोबलायजेशन च्या लाटेत समर्थपणे पोहत आहेत. भारतातील आजची पिढी व ह्या माय लेकांच्या काळातील पिढी ह्यांच्यातील मानसिकता व राजकीय ,सांस्कृतिक व आर्थिक सामाजिक बदल सांगतांना मी जर्मनीचे उदाहरण देईल. दुसर्या महायुध्धंतर जर्मनी दोन भागांमध्ये विभागल्या गेला . वेस्ट जर्मनी म्हणजे आजचा भारत जो भांडवल शाहीमध्ये प्रगतीची फळ चाखत होता . तर पूर्व जर्मनी म्हणजे ह्या माय लेकांच्या काळातील भारत जो साम्यवादी रशियाच्या प्रभावाखाली गरिबीत जखडल्या गेला होता.
आता देश एक व लोकही तीच फक्त पूर्व व वेस्ट अशी विभागणी झाली आणि ह्या जर्मन लोकांचे राहणीमान व मानसिकता पार बदलून गेली.
भारतात सुद्धा ७० ते ८० च्या दशकातील पिढी त्यांची मानसिकता व राहणीमान व महत्वाकांशा व इंदिरा व राजीव ह्यांच्या नंतर ची ९० ते आजची पिढी ह्यांच्यात जमीन आस्मानाचा फरक दिसून येतो.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

22 May 2012 - 7:12 am | चिरोटा

भारतातल्या सर्वच समस्यांना नेहरू/गांधी जबाबदार असल्याचे दाखवत त्यांना अतोनात महत्व दिल्यासारखे वाटले.राजीव गांधी ह्यांना जावून २१ वर्षे झाली. पण आपण उल्लेखलेले अनेक प्रॉब्लेम्स अजूनही आहेत. उदारीकरण केल्यानंतर भ्रष्टाचार कमी होईल असे सांगितले होते. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कॉर्पोरेट्-सरकारी क्षेत्रातील खाबूगिरी.. हे सर्व आहे तसेच आहे. पूर्वी कमी लोकांना मलई मिळायची. उदारीकरणानंतर अनेक लोकांना मलई मिळू लागली.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 May 2012 - 7:35 am | निनाद मुक्काम प...

सत्ता त्यांच्या हातात असल्याने व आर्थिक सामाजिक , राजकीय धोरणे व परराष्ट्र नीती त्यांचा हातात असल्याने साहजिकच त्यांना जबाबदार घारले जाणार
अजून एक उदाहरण देतो.
पूर्व युरोप हा शीतायुध्धाच्या काळात रशियन प्रभावाखाली साम्यवादी धोरणे राबवत होता. परिमाणी कमालीचे दारिद्र्य व समाजाची वाताहत त्यांच्या नशिबी आली.
खुद रशियाला त्यांच्या दुभाजन झाल्यावर त्यांच्या मुली दुबई व सध्या भारतीय बाजारपेठेत पहायची वेळ आली.
त्या मानाने वेस्ट युरोप हा सुब्बता आणि प्रगती पथावर होता.
एकच देश जर्मनी एकच भाषा पण पूर्व जर्मनी रशियन अमलाखाली पार पिचून गेली होती.
आजही एकत्र झाल्यावर त्यांना वेस्ट जर्मन एवढी प्रगती कूर्मगतीने होत आहे. कारण त्या पिढ्यांची मानसिकता हळूहळू बदलत आहे.
७० ते आजतागायत देशातील गरीब हा गरीबच राहिला.
९१ ते आजतागायत मुक्त अर्थव्यवस्थेत आपण उच्च ,मध्यम व कनिष्ट मध्यमवर्ग व ह्याच श्रेणीत श्रीमंत निर्माण केले.
मात्र दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती गरीबच राहिला.
निदान केरळी खेड्यातून लोकांनी कम्युनिस्ट राजवटीत सुद्धा आखतात जाऊन स्वतःचा आणि गावाचा विकास केला. असे देशात सर्वत्र झाले नाही
भारत व इंडिया मधील फरक कमी करणे हेच हा दशकातील आपल्यापुढे आव्हान आहे.
मात्र आज भारत रशिया व अमेरिकेला तुमची विमाने चांगली नाही त्या पेक्षा आम्ही फ्रेंच रेफाल विकत घेऊ असे ठामपणे सांगू शकतो हे काय कमी आहे.
आज माझ्या अनुभवाने सांगतो. पाकिस्तान सोडल्यास इतर सर्व मुस्लीम देशातील व्यक्ती मी भारतीय आहे हे कळल्यावर आपुलकीने बोलतात. निदान त्यांच्या बोलण्यात द्वेष जाणवत नाही.

नितिन थत्ते's picture

22 May 2012 - 7:53 am | नितिन थत्ते

आवडला लेख.

ते शहाबानो राहिलं बघा लिहायचं. तेवढं अ‍ॅड करा. ;)

क्लिंटन's picture

22 May 2012 - 9:07 am | क्लिंटन

कदाचित भविष्यात राजधानी राजीव गांधी टर्मिनल मधून दिल्लीकडे कूच करेल.

रेल्वे स्टेशनचे नाव राजीव गांधी टर्मिनस नसले तरी दिल्ली मेट्रोच्या कॅनॉट प्लेसमधील मुख्य स्टेशनचे नाव "राजीव चौक" आहे.कोणत्याही रेल्वे स्टेशनला किंवा कोणत्याही पब्लिक युटीलिटीला कोणाही माणसाचे नाव देणे हा प्रकार व्यक्तिश: मला आवडत नाही. असो. तरी हा प्रतिसादाचा मुख्य विषय नाही.

राजीव ह्यांच्यावर आधी प्राणघातक हल्ला होऊन सुध्धा ते तामिळनाडू येथील सभेत गेले कारण राजकारण हे ह्या परिवाराच्या रक्तात भिनले आहे.व फक्त मृत्यू त्यांना राजकारापासून विमुक्त करू शकत होता. बेनझीर ह्यांना सुद्धा त्यांचे राजकारण ब्रिटन मधून पाकिस्तानात घेऊन आले. अशी राजकारणी पार्श्वभूमी मुशरफ ह्यांना नसल्यामुळे ते पाकिस्तानात जीव धोक्यात घालून येत नाही आहेत. ते व अल्ताफ हुसेन लंडन मध्ये सुरक्षित जीवन जगत आहेत.

यातून तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे समजले नाही.काही झाले तरी प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतोच.राजीव गांधींवर हल्ले झाले म्हणून त्यांची सुरक्षाव्यवस्था वाढवली होती.त्याव्यतिरिक्त त्यांनी काय करणे तुम्हाला अपेक्षित आहे?प्राणघातक हल्ले झाले म्हणून सगळे सोडून घरी बसावे का?त्यातूनही जर आपला मृत्यू तामिळनाडूतील सभेच्या ठिकाणी होणार आहे हे राजीव गांधींना माहित असते तरी ते तिथे गेले असते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटात शेजारी उभ्या असलेल्या माणसाचा मृत्यू झाला असूनही दररोज लोकलने प्रवास करणारे लोक तुम्हाला सापडले तर आश्चर्य वाटू नये.असे लोक काय म्हणतील? (बहुदा) ते म्हणतील: "माझा मृत्यू जिथे आणि जसा यायचा असेल तिथे आणि तसा तो येईलच.म्हणून मी सगळे कामधंदे सोडून घरी बसू की काय?" राजीव गांधींना पण नेमके तसेच वाटत असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? यात राजीव गांधी 'राजकारणी' असल्याचा संबंध कुठे आला हे समजले नाही.आणि "राजकारणी" नसलेल्या मुशर्रफांवरही डिसेंबर २००३ मध्ये एकदा नाही तर दोनदा प्राणघातक हल्ले झाले होते.तरीही ते ऑगस्ट २००८ पर्यंत पाकिस्तानचे अध्यक्षच होते ना?तेव्हा या सगळ्यात एखादी व्यक्ती राजकारणी असण्याचा/नसण्याचा काय संबंध आला हे समजले नाही आणि या ३-४ वाक्यातून तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे अजिबात स्पष्ट नाही.

राजीव ह्यांच्या मृत्यू नंतर राजकारणातील एकाधिकारशाही ची प्रथा जाऊन कड्बोल्याचे अनेक पक्षीय सरकार स्थापन झाले ह्यामुळे दिल्लीतील बाबू मंडळींचे महत्व कमी होऊन विविध प्रांतातील नेते व जनता ह्यांची दखल घेतली जाऊ लागली.एखादी ममता ,जयललिता सोनिया जींच्या पक्षाला खुलेआम आव्हान करू लागल्या. व सत्तेची गणिते सांभाळण्यासाठी कोन्ग्रेज ला आघाडी सोबत निर्णय घेणे भाग पडले.

बरं मग?राजकारणातील एकाधिकारशाहीची प्रथा म्हणजे कॉंग्रेसचे देशभर वर्चस्व असे तुम्हाला म्हणायचे आहे असे गृहित धरतो.बाकी कोणी काहिही म्हणो १९५२ पासूनच्या निवडणुकांचा अभ्यास केला तर नेहरू-गांधी घराण्याचे वर्चस्व कमी झाले आहे हे लक्षात यायला वेळ लागणार नाही.पंडित नेहरूंच्या काळात एक १९५७ ची केरळमधली विधानसभा निवडणुक सोडली तर सर्वत्र कॉंग्रेसचा विजयच होत होता.इंदिरा गांधींच्या काळात १९६७ मध्ये कॉंग्रेसला निसटता विजय मिळाला पण १९७७ मध्ये जोरदार आपटी कॉंग्रेसने खाल्ली.राजीव गांधींचाही १९८९ मध्ये पराभव झाला.सोनिया गांधी १९९८ आणि १९९९ च्या निवडणुका पक्षाला जिंकून देऊ शकल्या नाहीत. २००४ मध्येही १४५ (१९९६ मध्ये नरसिंह रावांनीही कॉंग्रेस पक्षाला १४५ जागाच जिंकून दिल्या होत्या) तर २००९ मध्ये २०६ जागा कॉंग्रेस पक्षाला मिळाल्या.तरीही १९८४ मधील ४१५ किंवा १९७१ आणि १९८० मधील ३५१ जागांपेक्षा त्या कितीतरी कमीच होत्या.ही आकडेवारी लक्षात घेतली तर गांधी घराणे या नावाचे वर्चस्व कमी होत आहे हे समजून यायला काहीच हरकत नाही.पण लेखाचा विषय-- राजीव आणि इंदिरा गांधींच्या काळातला भारत आणि १९९१ नंतर (किंबहुना १९८९ नंतर) अनेक पक्षीय सरकारे स्थापन होणे याच्यातील अर्थाअर्थी संबंध समजला नाही.

पण मुळात मुक्त अर्थ व्यवस्था जी राजीव ह्यांच्या निधनानंतर कोन्ग्रेज तर्फे राबविण्यात आली ती ह्या माय लेकांच्या हयातीत का बरे नाही राबविण्यात नाही आली.?

मागे तुमच्याच एका चर्चेत मी एक मुद्दा मांडला होता तो परत मांडतो.नेहरूंच्या काळात लायसेन्स/कोटा/परमीट राज होते.आता याचे कारण काय होते?एक उदाहरण देऊन सांगतो.मी लहान असताना काही कारणांनी आमच्या कुटुंबाला काही काळ आर्थिक संकटातून जावे लागले होते.अशी वेळ अनेकांवर येते.त्या काळात जेवायला बाहेर जाणे तर सोडाच घरचे साधे खाणे सोडून इतर काही विशेष नसायचे. त्यावेळी महिन्यातून एक क्रिमच्या बिस्किटांचा पुडा आणला जात असे.त्यातील ८ बिस्किटांपैकी ४ बिस्किटे माझी तर ४ माझ्या बहिणीची असे "रेशनिंग" असे.आता या रेशनिंगचे कारण अगदी उघड होते--रिसोर्सेसची टंचाई. नेमकी अशीच टंचाई नेहरूंच्या काळात सुरवातीला होती आणि म्हणूनच लायसेन्स/कोटा/परमीट राज ठेऊन उपलब्ध रिसोर्सची कोणी व्यर्थ उधळपट्टी करत नाही हे बघणे आणि आहेत ते रिसोर्सेस विविध उद्योगांना पुरवून वापरावे लागत होते.आज मी दिवसाला बिस्कीटांचे १० पुडे विकत घेऊ शकत असेन पण म्हणून ४ बिस्कीटांचे तेव्हाचे रेशनिंग चुकीचे होते असे मला वाटत असेल तर ते अयोग्य आहे.आता भारतीय अर्थव्यवस्थेत हे रेशनिंग किती वर्षे चालू ठेवायला हवे होते? ५/१०/१५/२० की लागली तेवढी ४४ याविषयीची माहिती माझ्याकडे नाही.त्यामुळे त्यावर काहीही भाष्य करत नाही.

कि ५० निरकुंश सत्ता ( आणि बाणीचा काळ वगळता ) ह्या मायलेकांनी उपभोगली. मात्र देशात विकास कूर्मगतीने का निर्माण झाला.

देश स्वतंत्र झाल्यावर सगळे नंदनवन अवतरेल असे काहींचे स्वप्न असेलही.आणि ते स्वप्न प्रत्यक्षात येणे अर्थातच शक्य नव्हते.पण अशा मंडळींना कितीही वेगाने प्रगती झाली तरी ती कूर्मगतीनेच वाटेल.दुसऱ्या महायुध्दानंतर स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये एकात्मता आणि लोकशाही टिकविलेल्या थोड्या देशांमध्ये आपला समावेश होतो ही आकड्यात मांडता न येणारी अचिव्हमेन्ट तुम्ही का लक्षात घेत नाही?

तसेस शीत युध्ध्तात रशियाचे प्यादे म्हणून प्रगत देशांच्या काळ्या यादीत भारताला नेण्यात ह्या माय लेकांच्या महान धोरणांचा महत्वाचा वाटा होता.

काश्मीरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता त्यावर आपला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष presence असावा असे अमेरिका-इंग्लंडला १९४७ मध्ये वाटले असेल तर त्यात फारसे आश्चर्य करण्यासारखे नाही.आणि नेहरूंच्या भारतापेक्षा पाकिस्तानच असे आपल्याला करू देईल हे त्या महासत्तांच्या लक्षात नक्कीच आले होते. परिणामी अगदी पहिल्या दिवसापासून इंग्लंड-अमेरिकेचे पाकिस्तानला समर्थन होते.त्यामुळे रशियाच्या बाजूने जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता. तरीही आपण रशियाचे प्यादे नव्हतो. प्यादे जर कोणी असेलच तर पाकिस्तान अमेरिकेचे प्यादे होता.

७० ते ८० च्या दशकात निर्माण झालेली बेरोजगारी ,गुन्हेगारी , फुटीर चळवळी , परदेशात होणारे ब्रेन ड्रेन व ह्या सर्व गोष्टींमुळे जनतेला आलेले नैराश्य व समाजातील घसरते नितीमुल्ये ह्या सर्व गोष्टीबद्दल चर्चा न होता फक्त दूरध्वनीच्या क्रांत्या व गांधी परिवाराच्या नावाने रस्ते व अनेक कल्याणकरी योजना ज्यात अनेक नेत्यांचे व सरकारी अधिकाऱ्यांचे कल्याण झाले व होत आहे.

७० आणि ८० च्या दशकात तुम्ही म्हणता त्या गोष्टींची चर्चा होत नव्हती ही माहिती तुम्हाला कोणी दिली?

असो. इतर अनेक गोष्टी लिहिता येतील.पण सध्या इतकेच.

नितिन थत्ते's picture

22 May 2012 - 8:24 pm | नितिन थत्ते

>>७० आणि ८० च्या दशकात तुम्ही म्हणता त्या गोष्टींची चर्चा होत नव्हती ही माहिती तुम्हाला कोणी दिली?

सहमत आहे. त्यावेळी टेलिफोन क्रांती ही मूर्ख स्वप्नाळूपणा आणि संगणक हा बेकारी वाढवणारे उपकरण समजले जात होते.

चित्रगुप्त's picture

22 May 2012 - 9:35 am | चित्रगुप्त

माझे एक स्नेही 'मविओ' दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात रशियन भाषेचे दुभाष्ये होते. त्यांच्या या क्षेत्रातील वादातीत कौशल्यामुळे इंदिरा गांधी व अन्य सर्व पंतप्रधान आवर्जून त्यांनाच रशिया भेटीच्या वेळी नेत.
इंदिरा व राजीव यांच्या एकत्र रशिया भेटीचे वेळी राजीव एका पायावर दुसरा पाय आडवा ठेउन बसले होते, तेंव्हा इंदिराजींनी त्यांना हिंदीत "टांग नीचे कर" असे सांगितले. त्या ठिकणी त्यावेळी फक्त हे तिघेच हिंदी समजणारे होते. केवळ हा प्रसंग मनात ठेऊन त्यापुढे राजीव यांनी आयुष्यात कधीही 'मविओ' यांना कोणत्याही प्रसंगी आपल्या बरोबर येऊ दिले नाही.
अश्या लहान -सहान प्रसंगातून मनुष्याची मनोवृत्ती दिसून येत असते...

अर्धवटराव's picture

22 May 2012 - 10:00 am | अर्धवटराव

एकतर बकर्‍याने कसायाच्या हाती आपली मान देउ नये.. आणि दिली तर मरण आनंदाने भोगावे.

राजीव गांधींचं मुल्यमापन करताना एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, कि काँग्रेस पक्षाने एका राजकारण इल्लिटरेट व्यक्तीच्या हाती देशाची कमान दिली... ज्या भारत देशाचे राजकारण राजकीय जीवनात तपं मुरवलेले मुरब्बी राजकारणी हाताळु शकत नाहित त्या देशाचे नेतृत्व एका अजाण पोराच्या हातात खेळणे द्यावे इतक्या सहजपणे गेले. जिथे आढ्यातच पाणि नव्हते तिथे पोहोर्‍यात काय येणार? अर्थनिती, परराष्ट्रीय धोरण, शेती, उद्योअगधंदे, संरक्षण... अश्या कुठल्याच पूर्वतयारीविना राजीव गांधी राजकारणाच्या आखाड्यात उतरला... असा व्यक्ती निर्णय घेताना अगदी स्वाभावीकपणे सल्लागार समितीवर निर्भर असतो (ज्याला विरोधक खुशमस्करे म्हणतात). नवीन पॉलीसी इंप्लीमेंट करतो म्हटलं तर त्याविषयी इनसाईट तर हवी... नाहितर मनुष्य पुर्वापार चालत आलेले फॉर्म्युलेच अजमावणार. याच निकशांवर राजीवजींचं मुस्लीम तुष्टीकरणाचं, उद्योग धंद्यावर सरकारी नियंत्रणाचं, वा लिट्टेबाबत घेतलेल्या निर्णयाचं मुल्यमापन व्हायला हवं. आणि प्रोब्लेम असा कि जुनीच पॉलीसी वापरताना देखील नव्या संदर्भांचे, परिस्थितीचे भान ठेवावे लागते... पण तेव्हढा अभ्यास करायला राजीवकडे फुरसतच नव्हती. एकाच वेळी देश चालवणे आणि पार्टी चालवणे खायचे काम नाहि. व्हिपी सिंगांसारखे मार्गात खोडे घालणारे मित्रं आणि जनसंघासारखे विरोधक... काय करणार एकटा माणुस?

हीच कथा सोनिया गांधींची. मागच्या पंचवीस वर्षातल्या राजकारण्यंमध्ये सर्वात आदरणीय नाव कोणाचे असेल तर ते सोनीया गांधी. तिची राजकारणातल्या प्रवेशाची पार्श्वभुमी बघा. नरसिंहराव-मनमोहनसिंग प्रणीत एक संपूर्णतः नवीन अशी अर्थनिती भारतात मुळं धरतेय... त्याच्या सक्सेस-फेल्युअरवर १०० कोटी लोकांचं, आणि पर्यायाने जगातल्या अनेक लोकांचं भवितव्य अवलंबुन आहे. भारतात केंद्रीय सत्तेच्या शक्तीची वाताहत झाली आहे आणि देश अराजकाच्या वाटेवर आहे... अश्यावेळी आपापसातले मतभेद जरा काळ बाजुला ठेऊन पवार-ममो-प्रणवदा आणि अश्याच धुरीणांनी एक कोअर कमिटी बनवुन सर्वात प्रथम राजकीय-आणि पर्यायाने आर्थीक स्थैर्याला अधिष्ठान द्यायला हवे होते... पण या सर्वांनी अत्यंत कोत्या मनाचे प्रदर्शन करत सोनीया गांधीला राजकारणात आणले. सोनीयाने वेगळे काहिच केले नाहि... तिने एक विश्वासु सल्लागार समिती नेमली, आपल्या निष्ठावंत मतदारांना कोंग्रेस पार्टीच्या जीवंतपणाची खात्री दिली, आणि वेट अँण्ड वॉच पॉलिसी नुसार योग्य संधीची वाट बघितली. हे काम सोनिया शिवाय उर्वरीत काँग्रेसला करता आले नसते काय? आज ना उद्या सत्ता त्यांना मिळालीच असती. पण कॉग्रेस धुरीणांनी एकमेकांवर विश्वास ठेवण्याऐवजी भारतीय राजकारणाचा-समाजमनाचा-भारताच्या समस्यांचा गंध नसलेल्या एका परक्या देशाच्या व्यक्तीच्या हाती चाव्या दिल्या. आणि सोनीया गांधीने आपली जवाबदारी उत्तमरित्या पार पाडली. आज देशात जे काहि अराजक सदृश वगैरे परिस्थिती आहे ति परिस्थिती निवळयाची कुवत सोनीया गांधींत नाहि, पण तिच्याकडुन ती अपेक्षा देखील नाहि. तिने कॉग्रेस पार्टी वाचवायचे आपले कर्तव्य चोख बजावले आहे. राहुल गांधीवर आपल्या वडीलांसारखी भांबावल्याची परिस्थिती येऊ नये या करता सोनिया फार उत्तम रितीने त्याचे ट्रेनींग करते आहे... आता त्याच्या गुरु समुहात दिग्वीजय सिंहासारखे लोकं भरवुन तिने फार मोठी चुक केली हा भाग वेगळा... राहुलला नरसिंहरावांसारखे गुरु हवे होते... आर एस एस शी राहुलने अत्यंत मुर्खपणे पंगा घेतला... नरसिंहरावांसारख्याने त्याला असे करु दिले नसते. खैर... हे झाले अवांतर.

सांगायचा मुद्दा असा, कि राजीवजींच्या हाती काँगेसने-पर्यायी या देशाने आपली मान दिली.. तेंव्हा सुरी गोड मानुन घ्यावीच लागेल. त्यातही दुर्दैव असं कि झालेल्या चुकांपासुन धडा घेऊन नव्याने राजकारणाची बांधणी करत असतानाच राजीव गांधीचा बळी गेला... दैवं दैव म्हणतात ते हेच असावं बहुतेक.

अर्धवटराव

चिरोटा's picture

22 May 2012 - 10:55 am | चिरोटा

अर्थनिती, परराष्ट्रीय धोरण, शेती, उद्योअगधंदे, संरक्षण... अश्या कुठल्याच पूर्वतयारीविना राजीव गांधी राजकारणाच्या आखाड्यात उतरला

राजकारणातील हाय प्रोफाईल जॉब करण्यासाठी प्रचंड अनुभव वगैरे लागतो हा गैरसमज आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा ८० वर्षाचे आहेत तर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना फक्त ३५ वर्षाची आहे.मनमोहन सिंग ८० वर्षाचे आहेत तर ओबामाने पन्नाशीही पार केलेली नाही. ऑस्ट्रेलियातील भारताचे राजदूत ५६-५७ वर्षाचे आहेत तर अफगाणिस्ताचे ऑस्ट्रेलियातील राजदूत ३३ वर्षाचे आहेत.

अर्धवटराव's picture

22 May 2012 - 8:12 pm | अर्धवटराव

इनसाईट तर लागेल... किमान इच्छाशक्ती... (आता राजीवने ते पद स्विकारले म्हणजे तो इच्छुक होता असा सरळ सरळ अर्थ निघु शकतो... पण तो संजयचा प्रतिस्पर्धी/सहाय्यक अश्या कुठल्याच भुमीकेत सुरुवातीला दिसला नाहि)

अर्धवटराव

भरत कुलकर्णी's picture

8 Sep 2012 - 8:55 am | भरत कुलकर्णी

अनुभव कसला घेवून बसलात? अहो राजकारणात अचानक कुणा गॉडफादर/ मदर भेटली अन त्या योगे वरची जागा भेटली तर सहाय्य करण्यासाठी लटांबर मंडळी तयार असतेच की. साध्या प्रसंगात, समारंभात काय बोलायचे काय नाही हे देखील ठरवणारी सहाय्यक सचिव मंडळी असतातच. परराष्ट्रिय चर्चांमधील मुद्दे आधीच ठरलेले असतात.

एखादा आगळा आपल्या मनातले बोलतो, करतो व त्याचा शशी थरूर, आर आर किंवा दादा, राज होतो.

नगरीनिरंजन's picture

22 May 2012 - 10:13 am | नगरीनिरंजन

छे छे छे, निनादराव
काँग्रेसच्या नेत्यांचे विशेषतः नेहरु-गांधी घराण्याचे आत्ताच्या परिस्थितीवरून आणि आता झालेल्या ज्ञानावरून मूल्यमापन करू नका.
त्यांच्या काळात ते बरोबरच होते आणि द्रष्टे वगैरेही होते. "सगळा देश" त्यांच्या पाठीशी होता. नंतरच्या लोकांनीच त्यांनी पाहिलेले भविष्य बदलले त्याला ते तरी काय करणार?
लेख अजिबात आवडला नाही. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हयात असतानाच तुम्ही विरोध का केला नाही? आता त्यांना अपयशी वगैरे ठरवण्याचा तर तुम्हाला अधिकारच नाही.
राहुल गांधीवर बोला काय बोलायचे ते. तो तुमचा समकालीन आहे.

प्रभाकर पेठकर's picture

22 May 2012 - 10:23 am | प्रभाकर पेठकर

आपल्या स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीच्या इतिहासातील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे श्रीलंकेत शांतीसेना पाठविण्याचा अनाकलनीय निर्णय.

निनाद, राजकारणात मला गती नाही पण त्याकाळी श्रीलंकेच्या मदतीला जाण्यास अमेरिका उत्सुक होती आणि पाकिस्तान अमेरिकेच्या प्रभावाखाली असताना, चीनशी आपले शत्रूत्व ही वस्तुस्थिती असताना पुन्हा श्रीलंकेत, इतक्या जवळ, अमेरिकेस पाय रोवण्यास संधी देणे ही घोडचूक झाली असती म्हणून जलद गतीने निर्णय घेऊन शांतिसेनेला श्रीलंका सरकारच्या सहकार्यार्थ पाठविण्यात आले असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. देश चालविताना नुसते आर्थिक प्रगती, अंतर्गत सुरक्षा ह्यांचा विचार न होता सामरिक नितीचाही विचार करावा लागतो आणि त्यामुळेच असे सामान्य जनतेला 'अनाकलनिय' निर्णय घेतले जातात.

संपत's picture

22 May 2012 - 4:54 pm | संपत

शांती सेना पाठवण्यामागाचा एक उद्देश भविष्यातील 'विशाल तमिळ देशम' ला आवर घालणे हा देखील होता असे ऐकिवात आहे. हे अर्थातच तुम्हाला तमिळ निर्वासितांकडून कळले नसेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 May 2012 - 5:43 pm | निनाद मुक्काम प...

शांती सेना ह्या संबंधी एक वेगळा लेख काढू का माझ्या नेहमीच्या प्रतिसाद हा मूळ लेखाहून जास्त ह्या तत्वानुसार एक प्रतिसाद देऊ अश्या विचारात आहे. पण सवड मिळताच लिहीन ह्या बद्दल-
संपत भाऊ
मुळात विशाल तमिळ देशम ला आवर घालणे ......
मुळात ह्या संघटनेची उभारणी , निर्मिती मागील उदिष्टे कोणी आणि का केली हे जाणण्यासाठी तुम्हाला किंवा मला एखाद्या तमिळ निर्वासीताशी भेटायची गरज नाही.
मुळात माझ्या लेखात मी नवीन घाशीराम असा उल्लेख केला आहे.
तू नळीवर घाशीराम कोतवाल हे नाटक अस्तित्वात आहे.
ह्या नाटकाच्या मध्यंतराला नाटकाच्या पुनर्जीवन करणार्या विद्वान माणसाने ह्या नाटकाची प्रस्तावना दिली आहे. ती जरूर पहा.
थोडक्यात सांगायचे तर श्रीलंकेतील निरपराध तमिळ नागरिक . दिल्लीमधील दंगलीत मारल्या गेलेले शीख बांधव ., संयुक्त महाराष्टाच्या चळवळीतील हुतात्मे
आणि मोहनदास गांधीच्या मृत्युनंतर त्यांच्या अहिसंक तत्वाला हरताळ फासून झालेली ब्राह्मणाची हत्या हे सर्व निरपराध बळी ह्या परिवाराच्या माथी आहेत.
मात्र आमच्या समकालीन युवराजांच्या पक्षाकडून जेव्हा मोदींना जेव्हा क्रूर कर्मा वैगैरे प्रकारची विशेषण लावली जातात. तेव्हा मात्र गंमत वाटते.
युवराजांनी मुंबई येऊन लोकल ने प्रवास केला तेव्हा त्यांनी तिकीट काढले हे आम्ही टीवीवर पहिले. मात्र बहुदा त्यांच्या सुरक्षा रक्षकांचा मंथली पास असावा म्हणून त्यांची तिकिटे मात्र काढली नसावीत.
आजही एखाद्या गावात ज्याचे एका गरीब कुपोषित बालकाला उचलून घ्यायचे. किंवा त्यांची झोपडीत एक दिवस राहायचे असे कालबाह्य फंडे वापरून निवडणुका जिंकता आल्या असत्या तर अखीलेख च्या एवजी राहुल नाव उत्तर प्रदेशात सर्वमुखी झाले असते.
युवराजच्या तळमळ ,गरिबांसाठी असलेली बांधिलकी व आपुलकी व विरोधी पक्षावर नाकर्ते पणाचा आरोप करतांना आपल्याकडे जनतेच्या भल्यासाठी काय योजना आहेत त्याचे प प प कधीच तयार असते. मात्र भारतीय जनतेला बहुदा हिर्याची पारख नसावी. असे मला वाटते.

संपत's picture

22 May 2012 - 7:39 pm | संपत

तुम्ही दक्षिणेतला घाशीराम बोलल्यावर मला तेच नाटक आठवले आणि वाटले कि तुम्ही शिवसेनेबद्दल बोलताय.. नंतर लक्षात आले कि ती 'चूक' (अत्रे, तेंडूलकर आणि लाल झेंड्याच्या मते) तर त्यांच्या आईच्या सेनापतीची (वसंतराव नाईक ).

तुमच्या यादीत काश्मीर, आसाम, नक्षलवाद राहून गेलं.. :)

माझ्यामध्ये राजीव गांधी महान नेते वगैरे नसले तरी अगदीच टाकाऊ नव्हते. पण श्रीलंकेबाबत त्यांना काही पर्याय नव्हता असेच वाटते. एका बाजूला अमेरिकेचा धोका होताच पण तमिळ इलम भारतात येण्याची देखील तयारी चालू होती. ही चळवळ रोखण्यासाठी ती श्रीलंकेतच थोपवणे भाग होते.

तुमच्या राहुल गांधींच्या मताशी मात्र सहमत आणि मोदींबद्दल मतांशी किंचित असहमत.

नितिन थत्ते's picture

22 May 2012 - 8:17 pm | नितिन थत्ते

देशभक्तांच्या पक्षात पण त्याच घराण्याचे दोन खासदार आहेत याकडे लक्ष वेधू इच्छितो.
(अर्थात त्या पक्षात आलं की घराणेशाहीचा कलंक ऑपॉप पुसला जात असावा). ;)

अर्धवटराव's picture

22 May 2012 - 8:28 pm | अर्धवटराव

अहो अतीपुरातन-अतीदेशभक्त पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापीत केली आहे ना? (त्यांनीच तिची वाट लावली हा मुद्दा गौण आहे ) मग त्याच लोकशाहीअनुसार गेली दोन बापडी इकडे तिकडे... त्यात काय विशेष? जन्मभर संघपरिवाराची बौद्धीके घेणार्‍या शंकरसिंह वाघेला, अती उजव्या भगव्या परिवारातील राणे प्रभृती याच परम पवित्र पक्षात येऊन पावन झालेत ना... तसच काहितरी समजा... ;)

अर्धवटराव

विकास's picture

22 May 2012 - 8:44 pm | विकास

जन्मभर संघपरिवाराची बौद्धीके घेणार्‍या शंकरसिंह वाघेला, अती उजव्या भगव्या परिवारातील राणे प्रभृती याच परम पवित्र पक्षात येऊन पावन झालेत ना.

त्याहूनही अधिक... छगन भुजबळ शिवसेनेत असताना निवडणूकींच्या धामधुमीत बाळासाहेब परत एकदा गांधीजी का नथुरामवरून बोलले... अर्थातच कोलाहल झाला. माध्यमांनी (तत्कालीन potential CM candidate) छगन भुजबळांना यावरून प्रश्न विचारला तेंव्हा ते बाळासाहेबांचे (आणि नथुरामचे) समर्थन करत जे काही म्हणाले होते ते येथे लिहीण्याचे टाळतो... पण मुद्दा इतकाच की त्यांनाच नंतर काँग्रेसमधे घेतले गेले (नंतर ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेले).

राहता राहीला प्रश्नः मनेका गांधी आणि वरूण गांधींचा. त्यांच्या "गांधी" या आडनावाचा वापर करत भाजपाने निवडणुका लढवल्याचे ऐकीवात नाही... तसेच देश त्यांच्या शिवाय चालू शकणार नाही असे या गांधीद्वयींच्याच काय पण वाजपेयी-आडवाणी आदी कुठल्याच व्यक्तीच्या नावाने केलेले आढळत नाही. (हे मी भाजपाच्या प्रचारासाठी लिहीत नाही, तर फक्त फरक दिसावा म्हणून लिहीत आहे.) . जेंव्हा सोनीया गांधींनी राष्ट्रपतींची भेट झाल्यावर पंतप्रधान कधी होणारच नव्हते असे सांगत मनमोहन सिंग यांचे नाव पुढे केले तेंव्हाअथवा त्याही आधी राजीवहत्येनंतर सोनीयांनी राजकारणात येणार नाही म्हणून सांगितल्यावर जशी रडारड झाली तशी भाजपाच काय इतर कुठल्याही पक्षात झाल्याचे दिसत नाही.

नितिन थत्ते's picture

22 May 2012 - 8:56 pm | नितिन थत्ते

>>त्यांच्या "गांधी" या आडनावाचा वापर करत भाजपाने निवडणुका लढवल्याचे ऐकीवात नाही

:)
हो का?

मी फक्त गांधी घराण्याचा प्रसार कुठवर झालेला आहे एवढेच सांगितले.

विकास's picture

22 May 2012 - 9:16 pm | विकास

त्यांच्यामुळे भाजपा (आत्ता) प्रमुख विरोधी पक्ष तरी होऊ शकला असे वाटते का? मनेका गांधींना तर आता मला वाटते पब्लीक संजय-इंदीरा पेक्षा कुत्र्यांमुळेच आणि संदर्भातील animala rightsमुळेच जास्त ओळखते... यात कुणाची कुचेष्टा नाही पण खरेच वास्तव आहे.

हुप्प्या's picture

22 May 2012 - 9:03 pm | हुप्प्या

ह्या खोडसाळपणाला उत्तर म्हणजे फिरोझ गांधी. काँग्रेसचा अनुयायी, गांधी हे नाव नेहरु घराण्याला आंदण देण्याचे जबरदस्त कर्तृत्व. जवाहरलाल सासरा, इंदिरा सून. पण नेहरुला विरोध केला. त्याची लफडी कुलंगडी उघडी पाडली. त्यामुळे तमाम लाळघोटे ह्या माणसाला विसरले.
दहातील आठ सरकारी योजनांना राजीव गांधी चे नाव मिळते पण फिरोझ गांधी? ना जयंती, ना मयंती ना कुठला चौक ना उद्यान. विमान तळ आणि बंदरांची तर बातच नको.
तेव्हा नेहरु गांधी घराण्याच्या मुख्य प्रवाहात असणारे लोकच ह्या सन्मानाला पात्र आहेत.
मुघल घराण्यात कसे अकबर, शाहजहान, औरंगजेब लक्षात राहतात. त्याची भावंडे, ज्यांचे खून झाले, डोळे काढले असे दारा शुकोह प्रभुती असून नसल्यासारखे तसेच हेही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 May 2012 - 10:46 pm | निनाद मुक्काम प...

क्लिंटन

शापित घराणी.

पाकिस्तान व भारतात भुट्टो व गांधी परिवार हा राजकारणाने बाधीत होता.

जनतेला भावनिक भाषणे ,वचने देणे उद्योगपतींना आपल्या दावणीला बांधणे .आणि एखाद्या महासत्तेची मैत्री ठेवणे व त्या जोरावर हम करे सो कायदा म्हणत सरकार चालवणे हे ह्या दोन घराण्याच्या राजकीय कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्ये
इंदिरा इज इंडिया ह्या चालीवर राजीव इज इंडिया करण्याचा प्रयत्न राजीव ह्यांच्या अंगाशी आला.
सत्ता व राजकारण आई व मुलाने लहानपणापासून पहिले. इदिराजी लहानपणी महात्मा गांधीच्या सहवासात लहानाच्या मोठ्या झाल्या मात्र गांधी ह्यांच्या विचारसरणी व इंदिरा ह्यांची विचारसरणी ह्यात काही साम्य आढळेल का ?

तुमच्याकडे वेळ आणि आवड असेल तर एका बीबीसी लंडन ची ब्रिटीश शीख तरुणीने सुवर्ण मंदिरावरील कारवाई बद्दल एक डॉक्युमेंटरी बनविली आहे.
संत भिन्द्रवाले व इंदिरा ह्यांचे बाजू न घेता ह्या विषयाच्या सर्वागाने मुलाखत घेतली आहे.
ह्यात तिने घेतलेल्या प्रमुख मुलाखती १) संत भिन्द्रवाले ह्यांच्या शाळेतील गुरुंची मुलाखत २) लष्करी कारवाईचे वरिष्ठ अधिकारी व आजतागायत अज्ञातवासात राहणारे अधिकारी ब्रार ह्यांची मुलाखत व गेली २४ वर्ष भारतात राहणारे बीबी सी चे वार्ताहर जे इंदिरा गांधी ह्यांचे निकटवर्तीय व ह्या सर्व प्रसंगाचे साक्षीदार
ह्याची मुलाखत होय.
पंजाबात अकाली दलाचा बिमोड करण्यासाठी इंदिराजी ह्यांनी संजय गांधी ह्यांना सांगितले व त्यांनी शोर्ट लिस्ट केलेल्या २० तरुणांमध्ये संत भिन्द्रवले होते.
पुढे सरकारशी फारकत घेऊन पुढील सर्वांना माहित असलेले रामायण घडले.
ह्यात बीबीसी चा वार्ताहर सांगतो त्याप्रमाणे बियंत सिंग हा सहपत्नी सुवर्ण मंदिर पाहून आला होता व इंदिरा ह्यांना सर्व पातळीवरून त्यास आपल्या सेवेत न ठेवण्याची सूचना केली होती. पण जनसामान्य पंजाबातील त्यांच्या कारवाई वर असंतुष्ट असल्याने त्यांना मी शीखविरोधी नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी बियंत सिंग ह्यांना आपल्या सेवेत ठेवले ( राजकारण रक्तात भिनले होते )
आपल्या आजोबांचा कारकिर्दीत बापूजींच्या निधनानंतर हिसंक जमावाने भटांना लक्ष्य केले तसेस इंदिरा गांधी ह्यांच्या मृत्युनंतर राजीव ह्यांच्या काळात हिसंक जमावाने शिखांना लक्ष्य केले. आता दोन्ही प्रकारांत दोषी व्यक्तींवर कारवाई न होणे हा मी निव्वळ योगायोग मानतो ( अजून काय मानावे हा एक प्रश्न आहे )
दुर्दीवाने अन्याय सहन करणे शिखांना जमले नाही.( ह्याबाबतीत त्यांनी ब्राह्मणांचा आदर्श ठेवायला हवा होता ) असा एक उपहास करावासा वाटतो.
राजीव ह्यांच्या कारकिर्दीची महान सुरवात इथून झाली.
शांती सेनेबाबत नंतर सविस्तर पणे
राजीव ह्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले होते व त्यांना भविष्यात लक्ष्य केले जाणार हे ठावूक असून त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी सर्व सूचना नाकारून तामिळनाडू दौरा केला.

मुशारफ साहेबांवर एक सखोल लेख लिहीन तेव्हा अधिक विस्ताराने सांगेन पण
थोडक्यात सांगयचे तर त्यांच्यावर दहशतवादी हल्ले झाल्यावर त्यांच्या हत्त सर्व सत्ता व लष्कर होते. व त्या नंतर त्यांनी सत्तेवर असे पर्यंत ज्या दहशतवादी संघटना त्यांनी पोसल्या व आता त्यांच्यावर उलटल्या त्यांचा त्याच पद्धतीने काटा काढला ह्यात लाल मज्जीद च्या कारवाई मुले भारतातील व जगभरातील सामान्य मुस्लीम सुद्धा त्यांच्या द्वेष करू लागले.
आता ते आणि अल्ताफ हुसेन हे लंडन मध्ये विजनवनात आहेत. मूष ह्यांनी मी पाकिस्तानात येणार व निवडणुका लढवणार अश्या दोन वेळा घोषणा देऊन प्रत्क्षात मात्र अजून तेथे जात नाही आहेत कारण आता पाकिस्तानात सत्तेची कवचकुंडले न घालता ते आलेत तर मारल्या जातील ह्यांची त्यांना जाणीव आहे.
हीच जाणीव मुजाहीर लोकांचे मसीहा अल्ताफ हुसेन ह्यांना आहे.
मात्र पाण्याविना मासोळी जशी तडफडते तसे सत्तेविना बेनझीर तळमळत होत्या.
माझे काही बरे वाईट झाले तर त्याला जबादार माझी आय एस आय चे प्रमुख , मुशारफ ह्यांचे गुरु व काश्मीर दहशतवादाचे शिल्पकार व आय एस आय ला पाकिस्तानात अढळ स्थान मिळवून देणारे निवृत्त जनरल हमीद गुल असतील असे जाहीर पत्र लिहीन त्या पाकिस्तानात आल्या व मारल्या गेल्या.
आता त्यांच्या आहुतीवर जरदारी राज्य करत आहेत.
गांधी घराण्य्याप्रमाणे राजकारणातील कुरघोडी व चुकीच्या अविवेकी निर्णयाने जुल्फिकार अली भुत्तो त्यांच्या मुलगा व मुलगी बेनझीर मारल्या गेल्यात व राजीव व इंदिरा सुद्धा
आज तामिळनाडू व पंजाबात मतांचे राजकारणासाठी युवराज व त्यांच्या मम्मी
फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी रदबदली करत आहेत.
कारण जनतेचा अजूनही ह्या परिवारावर रोष आहे. हे नुकतेच पंजाबात उसळलेल्या जमाव पहिला तर ह्या जखमा किती खोल आहेत हे लक्षात येते.
आज भारतीय परराष्ट्र धोरण खूपच समतोल आहे. अफगाण मध्ये लष्करी कारवाई न करता तालिबान विरुद्ध नॉर्दन अलायन्स ला उभे न करता भारत तेथे विकास काम करत आहे. म्हणूनच अमेरीएकला सढळ हस्ते मदत करणाऱ्या पाकिस्तान विषयी अफगानिस्तानात रोष तर वैद्यकीय सुविधा व विकास काम करणार्या भारतीयांविषयी ममत्व मी स्वतः येथे अनुभवले आहे.
सध्या इतकेच

सुनील's picture

22 May 2012 - 10:48 pm | सुनील

म्हणूनच अमेरीएकला सढळ हस्ते मदत करणाऱ्या पाकिस्तान विषयी अफगानिस्तानात रोष तर वैद्यकीय सुविधा व विकास काम करणार्या भारतीयांविषयी ममत्व मी स्वतः येथे अनुभवले आहे

कालच हे वाचले.

बाकी चर्चा वाचीत आहेच!

विकास's picture

22 May 2012 - 11:06 pm | विकास

याच संदर्भात एक गंमतीशीर अनुभव (कदाचीत रीसायकल करत असेन ;) )

वॉशिंग्टन डिसी भागात टॅक्सीने जात असताना ड्रायवर भारतीय-पाकीस्तानी वाटेल असा होता. त्याचे नाव देखील काहीतरी खान असे होते. गाडी चालू झाल्यावर गप्पा मारायला लागला. तू (म्हणजे मी) कुठला, काय करतोस वगैरे प्रश्न विचारत असताना, मी मधेच अंदाज घेत विचारले, "तुम्ही पाकीस्तान मधले का?" तो तात्काळ ओरडत म्हणाला, "NO! I am your friend, not from Pakistan, I am from Afganistan!" त्यात वर आलेला दुहेरी मुद्दा अगदी टॅक्सी ड्रायवरच्या विचारात पण प्रकर्षाने जाणवला: भारताविषयी आस्था आणि पा़कीस्तानबद्दल तिरस्कार.

अजून एकः भारत इराणला दुखवू इच्छित नाही याचे कारण देखील अफगाणीस्तान आहे. कारण पाकीस्तान ओलांडून जाण्याऐवजी आपण अरबी समुद्रावरून इराणमार्गे जाणे पसंत करतो....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 May 2012 - 11:40 pm | निनाद मुक्काम प...

कट्टरपंथीय सुन्नी विचारसरणीच्या पाकिस्तानी दहशवादी संघटना व सुन्नी पंथीय तालिबान हे अफगाण व पाकिस्तानमधील शिया मुस्लिमांचा तिरस्कार करतात किंबहुना पाकिस्तानात शिया मुसलमानांच्या लग्नात किंवा मशिदीत आत्मघाती हमले होतात. तेव्हा तालिबान चा अफगाण मध्ये विस्तार होऊ नये ही भारताची ( कारण ते कट्टर पंथीय पाक धार्जिणे आहेत ) व इराणचे सामाईक लक्ष्य आहे. हेच अमेरिकेचे आहे. म्हणुनच शशी थरूर ह्यांनी इराण व अमेरिकेच्या मध्ये आईस ब्रेक करायला भारत मदत करू शकतो असे विधान केले(.फार पूर्वी )
पाकिस्तानच्या लागून इराण ची सीमा आहे. व अफगाण मधून इराण पर्यंत रस्ता
आणि इराणच्या बंदराचा भारतातर्फे विकास हे पुढे भारताला व्यापार करण्यासाठी इराणशी व त्यामार्गे जगाशी सोयीचे जाणार आहे.
मात्र इराण च्या अणू कार्यक्रमामुळे ज्यू लॉबी रागावणे साहजिक आहे. व म्हणून अमेरिकेने इराणवर डूख धरणे हे तत्कालीन कारण ( सौदी च्या पाठोपाठ इराण मधील तेलसाठ्यांवर मुले ह्यांच्या जिभेला पाणी सुटते हे खरे कारण आहे )
ह्यात इराण शी इतर देशांची केला तसा भारताला व्यापार करायचा आहे.
भारतीय तेल कंपन्यांना इराण मध्ये प्रवेश मिळत आहे. व व्यापाराच्या अनेक संधी आपल्याकडे आहेत ( जगणे इराण शी नाते आखडते घेतल्याने भारताचा पर्याय इराण ला महत्वाचा वाटतो. म्हणजे व्यापारात भारताची भूमिका वरचढ राहते )
आणि आता भारतीय उद्योजोक स्वतःच्या फाय्द्यापुढे महासत्ता असो किंवा अजून कोणी कोणाचीही पत्रास ठेवायला मागे पुढे पाहत नाही आहे. म्हणून इराण प्रश्नी मनमोहन सरकारला हिलरी पुढे शब्दांची कसरत करावी लागत आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Sep 2012 - 7:11 am | निनाद मुक्काम प...

धन्यवाद सुनील हा दुवा येथे दिल्याबद्दल

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Sep 2012 - 7:11 am | निनाद मुक्काम प...

धन्यवाद सुनील हा दुवा येथे दिल्याबद्दल

क्लिंटन's picture

23 May 2012 - 4:28 pm | क्लिंटन

या लेखात आणि प्रतिसादात अनेक गोष्टींचा उल्लेख आहे तेव्हा तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे याबद्दल थोडा गोंधळ उडायची शक्यता आहे.तुमचा मुद्दा-- इंदिरा आणि राजीव गांधींच्या कारकिर्दीतला भारत असा असेल तर त्यावरील चर्चेत मुशर्रफ, बेनझीर भुत्तो, अल्ताफ हुसैन, तालिबान, आजचे परराष्ट्र धोरण इत्यादी कुठून आले?

राजीव ह्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले होते व त्यांना भविष्यात लक्ष्य केले जाणार हे ठावूक असून त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी सर्व सूचना नाकारून तामिळनाडू दौरा केला.

निवडणुक प्रचारासाठी केलेले सगळे दौरे हे "सत्ता मिळविण्यासाठी"च असतात असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.आपण तामिळनाडूत गेलो तर खात्रीने मरणार हे राजीव गांधींना माहित असूनही "सत्ता मिळविण्यासाठी" तिथे जाण्याइतके ते खुळे नसावेत. पंजाबमधील दहशतवाद्यांच्याही हिटलिस्टवर राजीव गांधी होतेच.आणि पंजाबमधील दहशतवाद्यांनी दिल्ली शहराला राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतच अनेकदा लक्ष्य केले होते.मग तुम्ही म्हणता त्या न्यायाने राजीव गांधींनी दिल्ली शहरातही राहायला नको होते!!

बियंत सिंग हा सहपत्नी सुवर्ण मंदिर पाहून आला होता व इंदिरा ह्यांना सर्व पातळीवरून त्यास आपल्या सेवेत न ठेवण्याची सूचना केली होती. पण जनसामान्य पंजाबातील त्यांच्या कारवाई वर असंतुष्ट असल्याने त्यांना मी शीखविरोधी नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी बियंत सिंग ह्यांना आपल्या सेवेत ठेवले ( राजकारण रक्तात भिनले होते )

शीखांना अंगरक्षक म्हणून ठेऊ नका असा सल्ला IB प्रमुख रंगनाथ काव यांनी इंदिरा गांधींना दिला होता.पण त्यावर इंदिरा गांधींनी "Are we not secular?" असा शेरा मारून तो कागद बाजूला ठेऊन दिला होता.तो कागद इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर मिळाला. त्यातही सगळे शीख इंदिरा गांधींच्या विरोधात होते असे अजिबात नाही. Operation Blue Star मध्ये भारतीय सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व केले होते कुलदिप सिंह ब्रार या शीख अधिकाऱ्यानेच. त्याचप्रमाणे १९८० पासून आपल्या सेवेत असलेला बियंत सिंह हा आपल्या विरोधात नसेल असे इंदिरा गांधींना वाटले असेल तर ती त्यांची error of judgment झाली आणि त्याची किंमतही त्यांनी चुकवली. पण नेमक्या त्याच अंगरक्षकाने त्यांची हत्या केल्यामुळे त्यांचे विरोधक "रक्तात भिनलेले राजकारण" असे म्हणायला मोकळे आहेत. आणि इंदिरा गांधीही बियंत सिंह पासून आपल्याला धोका आहे हे माहित असूनही राजकारण खेळायला का जातील? आपण जिवंतच राहिलो नाही तर कसले राजकारण आणि कसले काय हे लक्षात न येण्याइतक्या इंदिरा गांधीही खुळ्या नसाव्यात.

बाकी मी राजीव गांधींच्या श्रीलंकाविषयक धोरणांना विरोध करतो ते शांतीसेना पाठवायच्या निर्णयाला नव्हे तर शांतीसेना पाठवायच्या दोनच महिने आधी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी श्रीलंकेची हद्द ओलांडून जाफनामध्ये तिथल्या तामिळांसाठी (read LTTE साठी) धान्य आणि इतर सामुग्री टाकली होती याचा मी विरोध करतो. तसेच LTTE ला इंदिरा गांधींच्या काळापासून भारत सरकारचे समर्थन होते आणि प्रभाकरन स्वतः तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.जी.रामचन्द्रन यांना जाऊन भेटला होता या गोष्टी जगजाहिर आहेत. तामिळनाडूतील राज्यकर्त्यांच्या "तामिळ राष्ट्रवादापुढे" आपल्या दिल्लीतील राज्यकर्त्यांनी लोटांगण घालून श्रीलंकेतील निरपराध लोकांच्या हत्येत सामील होणे कितपत समर्थनीय आहे?मग पाकिस्तानला आपण कोणत्या तोंडाने नावे ठेवावीत?

बाकी इंदिरा गांधींच्या कारकिर्दीचे मूल्यमापन करायचे असेल तर १९७१ चे युध्द, इंदिरा गांधींचे "कमिटेड ज्युडिशिअरी" आणायचे प्रयत्न आणि अर्थात आणीबाणी आणि पंजाब प्रश्न हे महत्वाचे मुद्दे आहेतच. तसेच त्यांचे कणखर धोरण, भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवायचे प्रयत्न यांचा उल्लेख नसेल तर तो लेख एकांगी होईल असे मला वाटते. असेच राजीव गांधींविषयीही त्यांच्याबद्दलच्या चांगल्या-वाईट मुद्द्यांविषयी लिहिता येईल.

विकास's picture

23 May 2012 - 4:46 pm | विकास

क्लिंटन यांच्या वरील प्रतिसादाशी सहमत.

काही मुद्दे:

आपण तामिळनाडूत गेलो तर खात्रीने मरणार हे राजीव गांधींना माहित असूनही "सत्ता मिळविण्यासाठी" तिथे जाण्याइतके ते खुळे नसावेत.

खात्रीने मरणार असे कुणालाच सांगता आले नसते अर्थात त्यात मोठा कट असला आणि त्यात जर इतर नॉन-एलटीटीई भारतीय / पुढारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामील असले तर. राजीव गांधींच्या हत्येसंदर्भात एक विस्मयकारक गोष्ट होती: (हे सांगताना मी कुणावरही प्रत्यक्ष आरोप करत नसून केवळ निरीक्षण म्हणून सांगत आहे) - सोनीया गांधी ह्या राजीवजींबरोबर कायम सावली सारख्या असायच्या पण केवळ याच दौर्‍यात त्या दिल्लीत राहील्या होत्या. इंदीरा-संजय प्रमाणेच राजीव गांधींबरोबर देखील कायम मंत्री-संत्री हुजरे सर्वत्र मागेपुढे असायचे. केवळ याच वेळेस नव्हते. फक्त ते आणि त्यांचा अंगरक्षक...जे कोणी पुढारी हजर होते (त्यात एक चिदंबरमपण होते मला वाटते), ते सर्व स्फोटापासून लांब होते त्यामुळे जखमी देखील झाले नाहीत. (त्यांनी व्हावे अशी इच्छा नाही/नव्हती पण किती लांब होते याची कल्पना यावी या साठी)

बाकी इंदिरा गांधींच्या कारकिर्दीचे मूल्यमापन करायचे असेल ...तर तो लेख एकांगी होईल असे मला वाटते. असेच राजीव गांधींविषयीही त्यांच्याबद्दलच्या चांगल्या-वाईट मुद्द्यांविषयी लिहिता येईल.

अगदी १००% सहमत. फक्त असेच इतरांच्या बद्दल केले जाईल/जाते का? त्यात एक सध्याचे उदाहरण मोदींचे देता येईल. :-)

क्लिंटन's picture

23 May 2012 - 5:32 pm | क्लिंटन

सोनीया गांधी ह्या राजीवजींबरोबर कायम सावली सारख्या असायच्या पण केवळ याच दौर्‍यात त्या दिल्लीत राहील्या होत्या.

सोनिया गांधी राजीवजींबरोबर निवडणुक प्रचारालाही जात होत्या की नाही याची कल्पना नाही.

जे कोणी पुढारी हजर होते (त्यात एक चिदंबरमपण होते मला वाटते), ते सर्व स्फोटापासून लांब होते त्यामुळे जखमी देखील झाले नाहीत

चिदंबरम होते की नाही याची कल्पना नाही.कदाचित नसावेत. कारण त्यावेळी चिदंबरम हे एवढे महत्वाचे नेते नव्हते. आणि त्यांचा लोकसभा मतदारसंघ-- शिवगंगा तामिळनाडूच्या दक्षिण भागात आहे आणि तो श्रीपेरूम्बुद्दूरपासून तसा दूर आहे. त्यावेळी चिदंबरम स्वतःच्या मतदारसंघात असायची शक्यता जास्त. (राजीव गांधींच्या तामिळनाडू दौर्‍यात पुढे त्यांची शिवगंगामध्ये प्रचारसभा होती की नाही याची कल्पना नाही).

त्यावेळी सभेच्या ठिकाणी कोण होते? तर तामिळनाडू Congress चे प्रदेशाध्यक्ष वझापडी के. राममूर्ती, ज्येष्ठ नेते जी.के.मूपनार आणि श्रीपेरूम्बुद्दूरच्या Congress उमेदवार मर्गथम चंद्रशेखर. राममूर्ती आणि मूपनार यांना काहीच जखम झाली नाही. तर मर्गथम चंद्रशेखर त्या स्फोटात जखमी झाल्या. त्यांना मद्रासमधील (सद्यकालीन चेन्नई) अपोलो रूग्णालयात दाखल केले होते आणि स्फोटाच्या घटनेनंतर ६ दिवसांनी त्यांना राजीव गांधींचा त्याच स्फोटात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

फक्त असेच इतरांच्या बद्दल केले जाईल/जाते का? त्यात एक सध्याचे उदाहरण मोदींचे देता येईल.

कोणत्याही राजकिय नेत्याचे चांगल्या आणि वाईट या दोन्ही अंगांनी मूल्यमापन व्हायला हवे.

विकास's picture

23 May 2012 - 7:17 pm | विकास

सोनिया गांधी राजीवजींबरोबर निवडणुक प्रचारालाही जात होत्या की नाही याची कल्पना नाही.

सोनिया कायम त्यांच्याबरोबर असायच्या. कदाचीत त्या वेळच्या बातम्यांची कात्रणे मिळाली तर अधिक समजू शकेल. परत स्पष्ट करतो: यात मला त्यांचा संशय येतोय अथवा त्यांच्या विरुद्ध (त्या जागी इतर कोणीही असले तरी तेच) संशय तयार करायचा नाही अथवा कॉन्स्पिरसी थिअरी तयार करण्याचा उद्देश नाही.

चिदंबरम होते की नाही याची कल्पना नाही.कदाचित नसावेत.

बरोबर (म्हणूनच आधी देखील "असे वाटते" म्हणले होते). मोपनार हजर होते तसेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मर्गथम चंद्रशेखर हजर होत्या. तत्कालीन खासदार जयंती नटराजन देखील होत्या, पण त्यांना श्री. गांधी यांनी विदेशी पत्रकार (न्यू यॉर्क टाईम्स) ची काळजी घेण्यासाठी पाठवले होते.

----------------

राजीव ह्यांच्यावर आधी प्राणघातक हल्ला होऊन सुध्धा ते तामिळनाडू येथील सभेत गेले कारण राजकारण हे ह्या परिवाराच्या रक्तात भिनले आहे. व फक्त मृत्यू त्यांना राजकारापासून विमुक्त करू शकत होता. या मूळ मुद्याबाबत आत्ता अजून एक आठवले त्या आठवणीतूनः

सर्वप्रथम, राजकारणी माणसाने जर राजकारणाचा विचार केला नाही तर काय उपयोग? अर्थात त्याच बरोबर समाज आणि देशाचा विचार करणे, दिशा देणे हे प्रामुख्याने असायलाच हवे. पण त्या वेळेस राजीव गांधी निवडणूकीच्या धामधुमीत होते त्यामुळे अग्रक्रम सत्तासंपादनाच्या राजकारणास असला तर त्यात काही गैर नाही. (हा या खेळाचा नियम आहे, जो त्यातील सगळ्याच खेळाडूंना लागू आहे)

राजीव गांधी जेंव्हा प्रथम पंतप्रधान झाले तेच इंदीरा हत्येमुळे आणि त्यांच्या जीवाला अर्थातच शिख आणि नंतर तामिळ अतिरेक्यांकडून धोका होता. त्यामुळे त्यांच्या सभोवताली इंदीराजींच्या वेळेसही जसे नसायचे* तसे चुकीतून शहाणपण शिकून सुरक्षयंत्रणेने सुरक्षा कवच तयार केले होते. परीणामी त्यांचा प्रत्यक्ष लोकसंपर्क नसायचा. इंदीराजींच्या तुलनेत तर ते अधिकच प्रकर्षाने जाणवत होते. ८९ साली व्हि पी सिंगाच्या समोर काँग्रेसने निवडणूक हरण्याचे एक महत्वाचे कारण हे राजीव गांधींचे जनसामान्यांपासून दूर असणे हे धरले होते. त्याला प्रतिक्रीया म्हणून राजीव गांधींनी जनसामान्यात मिसळून जाण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे त्यांचे सुरक्षा अधिकारी वैतागले देखील होते...

मार्क टलीच्या "No full stops in India" पुस्तकात त्याने या संदर्भात २० मे ची एक आठवण दिली आहे. (ती पण आठवणीतून, समोर पुस्तक नाही). राजीव गांधी आणि मार्क टलींची भेट झाली होती. राजीवजींना परत सत्ता मिळणार याची खात्री होती, त्यात त्यांचा उत्साह दिसत होता. लोकांना प्रत्यक्ष भेटून सतत हस्तांदोलने करून त्यांच्या हाताची बोटे सुजली होती त्यामुळे त्यांना त्यांची वेडींग रींग देखील काढावी लागली होती. पण नंतर २१ मे उजाडला...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 May 2012 - 11:46 pm | निनाद मुक्काम प...

राजीव सोबत सोनिया प्रचारासाठी सावली सारख्या असायच्या ही गोष्ट विकासजी सांगतात ती गोष्ट त्या काळी त्यांना टीवी वर जोडीने पाहिलेले कोणीही सांगेन.

आता क्लिंटन साहेब राजीव जी बद्दल त्यांच्या राजकारणावर एवढे भरभरून लिहितात आणि एवढी साधी गोष्ट त्यांना ठाऊक नाही ह्याचा अर्थ नरो व कुंज रोवा का घ्यायचा.
बाकी ह्या माय लेकांच्या जीवावर त्यांचीच एकेकाळी निर्माण केलेल्या संघटना का उठल्या ?
आमच्या गुजराल , वी पी सिंग , देवीगौडा , आणी अनेक पंतप्रधान मात्र एकही प्राणघातक हल्याशिवाय आपल्या कार्यकाल का पुरा करू शकले.
राजकारणात अतीमहत्वाकांशा ही पुढे विवेकाशी फारकत घेऊन राजकारण करायला लावते त्याची परिणीती जे पेराल तेच उगवणार ह्या न्यायाने होते.
अहो राजीव ह्यांच्यावर श्रीलंकेत तमिळ टायगर ने श्रीलंकन आर्मी मानवंदना देत असतांना हल्ला झाला होता ह्याचे विस्मरण क्लिंटन ह्यांना कसे होते.
तमिळ टायगर ह्यांना सहानभूती आणि पाठिंबा तामिळनाडू मधे स्थानिक लोक , वायको सारखे राजनैतिक नेते आणि ही संघटना उभी करणारे आपल्या सरकारी त्यात गुप्तचर आणि इतर यंत्रणेचे लोक असल्याने त्यांचे हात खोलवर पसरले होते.
इंदिरा गांधी ह्यांना सुवर्ण मंदिराच्या कारवाई नंतर अंत्यंत सावध राहायचा इशारा दिला होता खुद त्यांना त्यांच्या घातपाती मृत्यू होणार ही कल्पना होती. असे त्यांनी राहुल ला सांगितले होते. इति सोनिया गांधी
बाकी मुशारफ आणि बेनझीर व तालिबान ह्यांचा संबंध किंवा संधर्भ मी दिला.?
राजकारण असो किंवा अजून कोणतेही शेत्र
सर सलामत तो पगडी पचास ही म्हण सर्वांना लागू पडते. पण भुत्तो घराणे आणि गांधी घराण्यात का खुनी सत्र पार पडले. कारण जैसी करणी, वैसी भरनी

ह्याचे कारण मुशारफ ह्यांच्या जीवावर एकदा हल्ला झाल्यावर ते परत अजून पाकिस्तानात येत नाही आहेत. मात्र बेनझीर ह्यांना स्पष्ट कल्पना असून त्या मृत्युच्या खाईत पाकिस्तानात आल्या. आणि तालिबान चा उल्लेख म्हणजे
इंदिरा व राजीव ह्यांच्या मृत्यू नंतर आपले परराष्ट्र धोरण नरसिंह राव ह्यांनी अमुलाग्र बदलले. कोणताही अविवेकी ,आत्मघाती , निर्णय किंवा कोणतीही संघटना निर्माण किंवा एखाद्या संघटनेला भारताने पोसले नाही. ह्या मायलेकांनी अमेरिका व वेस्ट युरोपशी वैर असल्यासरखे संबंध ठेवले.
आज त्यांच्याशी सबंध ह्यांच्या नंतर , नरसिंह , वाजपेयी व मनमोहन ह्यांनी
सात्यत्याने सुधारले.

ज्यू राष्टाची मैत्री आज भारताला कितीतरी वेगवेगळ्या रुपात फायदेशीर ठरत आहेत व ठरणार आहे मात्र ह्यांनी त्या राष्ट्र्याचे अस्तित्व बाबुजीना मान्य नाही व नेहरू ह्यांनी एक धोरण बनविले तेच ह्यान्नी कायम ठेवले. ज्या काळात ज्यू अनिवासी उद्योगपती आपल्या मायदेशी गुंतवणूक करून तेथे विकास व रोजगार देश युद्धग्रस्त असतांना सुद्धा करत होते. तेथे आमच्या कडे ह्यांच्या राज्यात सगळाच आनंदी आनंद होता.

मुळात खलिस्तान व काश्मीर चळवळीला पाकिस्तान खुलेआम मदत करत आहे.
अश्या वेळी दक्षितेतील श्रीलंकेच्या इथे वेगळी फळी उभारायची दुर्बुद्धी कशी बरे सुचली.?
एकदा रशियाचे आता नाव आठवत नाही पण अध्यक्ष भारत भेटीवर आले असता
ते म्हणले की आमच्यात देव मनात नाही पण तो आहे हे भारतात आल्यावर मान्य करावे लागते कारण इथला सर्वच कारभार देवाच्या हवाल्यावर चालतो.

क्लिंटन साहेब तुम्हाला इंदिरा जी चे हितचिंतक स्वराज पॉल ह्या अनिवासी लंडन स्थित भारतीयांच्या आत्म चरीत्रामधील एक उदाहरण देतो.
त्यांचा भारतात व्यापार होता पण मुलीच्या कर्क रोगावर इलाज करण्यासाठी लंडनला आले नी तेथेच स्थायिक झाले. त्यांच्यावर इंदिराजींचा पैसा लपवून ठेवल्याचा आरोप झाला हे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.
निवडुका हरल्यावर इंदिरा जी लंडन मध्ये आल्या होत्या तेव्हा स्वराज ह्यांनी भारतात गुंवणूक करायच्या उद्देशाने एक भव्य प्रकल्प इंदिराजी ह्यांना सांगितला.
परकीय गुंवणूक हा शब्द म्हटल्यावर खर तर .......
पण इंदिराजी ह्यांनी त्यास हो म्हटले किंबहुना वचन दिले.
मात्र इथे भारतात राजीव ह्यांच्या सल्लागार मित्रांनी त्यांचे कान फुंकले व ह्या प्रकल्पाला विरोध करून तो कागदावर राहिला. स्वराज जेव्हा भारतात आले तेव्हा राजीव ह्यांना त्यांच्या समक्ष इंदिराजी ह्यांनी ठणकावले. की नेहरू घराण्यात दिलेल्या शब्दाला जगायची रीत आहे. मात्र त्यांच्या मृत्यू नंतर सर्वच बारगळले.

क्लिंटन साहेब ज्या ब्रार साहेबांचा आपण उल्लेख केला ते ह्या कारवाई नंतर
आजतागायत अज्ञात वासात आहेत. त्यांची मुलाखत
बाकी अरुण वैद्य ह्यांची निवृत्त झाल्यावर झालेली हत्या ह्या कारवाईचे गंभीर परिणाम सांगतात.
सध्या इतकेच

क्लिंटन's picture

23 May 2012 - 11:56 pm | क्लिंटन

राजीव सोबत सोनिया प्रचारासाठी सावली सारख्या असायच्या ही गोष्ट विकासजी सांगतात ती गोष्ट त्या काळी त्यांना टीवी वर जोडीने पाहिलेले कोणीही सांगेन.
आता क्लिंटन साहेब राजीव जी बद्दल त्यांच्या राजकारणावर एवढे भरभरून लिहितात आणि एवढी साधी गोष्ट त्यांना ठाऊक नाही ह्याचा अर्थ नरो व कुंज रोवा का घ्यायचा.

मी लिहिलेले वाक्य नीट वाचा. माझे वाक्य आहे: "सोनिया गांधी राजीवजींबरोबर निवडणुक प्रचारालाही जात होत्या की नाही याची कल्पना नाही". परदेश दौऱ्यांच्या वेळी आणि इतर कार्यक्रमांना सोनिया राजीव गांधींबरोबर नेहमी असायच्या हे मलाही माहित आहे.पण निवडणुक प्रचाराच्या वेळी दिवसातून ८-१० सभा घ्यायच्या ठिकाणीही सोनिया त्यांच्याबरोबर जायच्या का याची मला खरोखरच कल्पना नाही. तेव्हा हे "नरो वा कुंजरो वा" तुम्हाला वाटत असले तर जरूर वाटू दे. बाकी गेल्या २०-२२ वर्षातील भारतीय राजकारणातल्या कोणत्या "साध्या" गोष्टी मला माहित आहेत किंवा कोणत्या नाहीत याची पूर्ण कल्पना मला आहे. ज्या गोष्टी मला ठाऊक आहेत त्या गोष्टींचा उपयोग बाकी कुठे होत नसला तरी मिसळपावर राजकारण विषयक प्रतिसाद देताना मात्र नक्कीच होतो.

बाकी ह्या माय लेकांच्या जीवावर त्यांचीच एकेकाळी निर्माण केलेल्या संघटना का उठल्या ?

तुम्हीच एका प्रतिसादात गांधी घराण्याला शापित का काहितरी बोलला होतात. असो. इंदिरा आणि राजीव गांधींची हत्या नक्की कोणत्या कारणाने झाली याची पूर्ण कल्पना मला आहे आणि मला काय माहित आहे/नाही यावर इतर कोणालाही काही बोलायचे असेल तर जरूर बोलू दे. तुमचाच मुद्दा होता-- तामिळनाडूत त्यांच्या जीवाला धोका आहे हे माहित असून राजीव गांधी "सत्ता मिळवायला" तिथे गेले आणि याचे कारण राजकारण त्यांच्या रक्तात भिनले होते!! त्यावर आपल्या जीवाला धोका आहे म्हणून काही न करता त्यांनी घरी बसणे तुम्हाला अपेक्षित आहे का किंवा पंजाबमधील दहशतवाद्यांचा त्यांना अगदी दिल्लीतही धोका होता म्हणून त्यांनी दिल्ली सोडून जायला पाहिजे होते का या प्रश्नांना तर तुम्ही अगदी बगलच दिलीत.

दुसरे म्हणजे जी काही चूक इंदिरा आणि राजीव गांधींनी केली त्याचे परिणाम त्यांनी स्वतःचा जीव देऊन भोगलेच.

अहो राजीव ह्यांच्यावर श्रीलंकेत तमिळ टायगर ने श्रीलंकन आर्मी मानवंदना देत असतांना झाला होता ह्याचे विस्मरण क्लिंटन ह्यांना कसे होते.

राजीव गांधी मानवंदना घेत असताना श्रीलंकन (बहुदा नौदलाच्या) सैनिकाने त्यांच्यावर बंदुकीच्या दस्त्याने हल्ला केला होता याचे विस्मरण मला झाले होते हा दृष्टांत तुम्हाला कुठून झाला? अजून ऐकायचे आहे का? २ ऑक्टोबर १९८६ रोजी राजघाटवर गांधीजयंती निमित्त राजीव गांधी गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडायचा प्रयत्नही झाला होता. हे हल्ले त्यांच्यावर झाले हे मलाही माहित आहे. पण त्यावरचे तुमचे पुढचे तर्क-- राजकारण अंगात भिनले म्हणून राजीव गांधी जीव धोक्यात आहे हे माहित असूनही तामिळनाडूला गेले हा काही मला अजिबात पटला नाही. पण मग त्यांनी काय करणे तुम्हाला अपेक्षित होते याचे उत्तर मात्र तुम्ही दिलेच नाहीत. पंजाबमधील दहशतवाद्यांकडून दिल्लीमध्येही त्यांना धोका होता म्हणून त्यांनी दिल्ली सोडून जावे का? बरं पंजाबमधील दहशतवादी अगदी पुण्यात येऊन अरूणकुमार वैद्यांची हत्या करू शकले, कर्नाटकात बिदरमध्ये एका सिनेमा थेटरात स्फोट घडवू शकले इतकेच काय तर कॅनडातून येणारे विमान उडवू शकले आणि बरोबर त्याच दिवशी कार्गोमध्ये वेळेपूर्वी स्फोट झाला नसता तर जपानहून येणारे दुसरे विमानही त्यांनी उडविले असते. तेव्हा इतकी ग्लोबल रिच असलेल्या दहशतवाद्यांना राजीव गांधींवर हल्ला करायचा होता आणि त्याला घाबरून राजीव गांधींना पळायचे म्हटले असते तर बहुदा पृथ्वी सोडूनच अंतराळात जावे लागले असते. तेव्हा राजीव गांधींना धोका सगळीकडे होता म्हणून त्यांनी काही न करता घरी बसावे ही तुमची अपेक्षा आहे का याचे उत्तर काय?

इंदिरा गांधी ह्यांना सुवर्ण मंदिराच्या कारवाई नंतर अंत्यंत सावध राहायचा इशारा दिला होता खुद त्यांना त्यांच्या घातपाती मृत्यू होणार ही कल्पना होती. असे त्यांनी राहुल ला सांगितले होते. इति सोनिया गांधी

राहुललाच काय त्यांनी ते सगळ्या देशाला सांगितले होते. त्यांची हत्या व्हायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांनी ओरिसात केलेल्या भाषणात त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती याचे स्पष्ट संकेत मिळतात. "If I die a violent death, violence will not be in my death but in the act of assassin. If I were to die tomorrow, each and every drop of my blood will invigorate the nation" असे काहीसे त्या भाषणात म्हणाल्या होत्या. हे वाक्य इंदिरा गांधींनी छापिल भाषण नेले होते त्यात नव्हते पण ते त्या अजाणतेपणी बोलून गेल्या. ओरिसाचे राज्यपाल बी.एन.पांडे यांनी त्यांना रात्रीच्या डिनरच्या वेळी राजभवनात तुम्ही असे का म्हणालात हे विचारले तेव्हा इंदिराजींनी आपल्याला मृत्यू उभे असतानाच हवा आहे असे म्हटले होते. तसेच नंतर इंदिरा गांधींना विमानतळावर सोडायला गेलेल्या जानकी वल्लभ पटनायकांनी त्यांना परत ओरिसा दौरा कधी हा प्रश्न विचारला त्यावर मंद स्मित करत "if I remain alive" असे इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या होत्या. पुपुल जयकरांनी लिहिलेल्या इंदिरा गांधींच्या चरित्रात असा स्पष्ट उल्लेख आहे की शेवटच्या महिन्यांमध्ये मृत्यू आपल्या खूप जवळ आहे ही जाणीव इंदिरा गांधींना झाली होती. आता असे होऊनही त्यांनी पावले का उचलली नसतील? मला वाटते की माणसाला एकदा आपला मृत्यू जवळ आहे ही जाणीव झाली की मग काहीही करून उपयोग नाही अशी हतबलता येते त्यातूनच इंदिरा गांधींनी काही पावले उचलली नसतील. दुसरे म्हणजे इंदिरा गांधींच्या जीवावर उठलेल्या अनेक संघटना होत्या. तेव्हा म्हटला तर धोका अनेकांपासून आहे. पण नक्की पावले उचलायची म्हणजे कोणाकोणापासून संरक्षण करायचे हा प्रश्नही आहेच ना.

(अवांतरः प्रमोद महाजनांवर प्रवीण महाजनने गोळ्या झाडायच्या ८-१० दिवस आधी प्रमोद महाजन आसामात निवडणुक प्रचारासाठी गेले होते. तिथे एका बंदुकधारी व्यक्तीला पोलिसांनी पकडले. त्यावर महाजन त्या पोलिसाला म्हणाले होते--"इथे आसामात मला मारायला कोण येणार? मला मारणारे घरचेच असतील". आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे "अंगात राजकारण भिनलेल्या" प्रमोद महाजनांनी आपल्याच भावापासून आपला बचाव करायला योग्य ती पावले उचलली नाहीत!!)

मुशारफ ह्यांच्या जीवावर एकदा हल्ला झाल्यावर ते परत अजून पाकिस्तानात येत नाही आहेत. मात्र बेनझीर ह्यांना स्पष्ट कल्पना असून त्या मृत्युच्या खाईत पाकिस्तानात आल्या.

थोडी गफलत होत आहे का? मुशर्रफांवर डिसेंबर २००३ मध्ये एकदा नाही दोनदा हल्ले झाले होते आणि ते पाकिस्तानातून निघाले त्यानंतर ५ वर्षांनी. तेव्हा मुशर्रफ ५ वर्षे त्याच मृत्यूच्या खाईत राहत होते त्याचे काय? बेनझीर भुत्तो परत आल्यानंतर कराची विमानतळावर उतरल्यानंतर काही तासातच त्यांच्या स्वागतासाठी काढलेल्या यात्रेत स्फोट झाला होता आणि त्या त्यातून थोडक्यात वाचल्या. तरीही पुढचे दोन महिने त्या त्याच मृत्यूच्या खाईत होत्या. तरीही यातून तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे समजले नाही आणि आता समजून घ्यायची गरजही नाही.

ह्या मायलेकांनी अमेरिका व वेस्ट युरोपशी वैर असल्य्सारखे संबंध ठेवले. आज त्यांच्याशी सबंध ह्यांच्या नंतर , नरसिंह , वाजपेयी व मनमोहन ह्यांनी सत्यात्याने सुधारले.

अगदी १९४७-४८ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला समर्थन दिल्यामुळे आपल्याला रशियाच्या गोटात जाण्याशिवाय पर्याय नव्हता हे वरच्या एका प्रतिसादात म्हटले आहेच.आणि हे मायलेक १९८९ पूर्वी सत्तेत होते त्यावेळी शीतयुध्द चालू होते तेव्हाच्या परिस्थितीत अमेरिका/वेस्ट युरोपच्या जवळ जायचे म्हटले तरी मर्यादा आल्या असत्या. आणि नरसिंह राव, वाजपेयी आणि मनमोहन सिंह यांच्या कारकिर्दीत शीतयुध्द चालू नव्हते आणि जागतिक राजकारणाचे सगळे संदर्भच त्यामुळे बदलले होते या सत्य परिस्थितीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष का?

ज्यू राष्टाची मैत्री आज भारताला कितीतरी वेगवेगळ्या रुपात फायदेशीर ठरत आहेत व ठरणार आहे मात्र ह्यांनी त्या राष्ट्र्याचे अस्तित्व बाबुजीना मान्य नाही व नेहरू ह्यांनी एक धोरण बनविले तेच कायम ठेवले.

परत वरचाच मुद्दा. भारत तेलासाठी इस्त्राएलच्या शत्रूंवर अवलंबून होता त्यामुळे इस्त्राएलच्या किती जवळ जायचे यालाही मर्यादा होत्या. भारताने इस्त्राएलचे राजनैतिक अस्तित्व पहिल्यांदा मान्य केले १९९२ मध्ये. पहिल्या आखाती युध्दानंतर पी.एल.ओ आणि इस्त्राएल यांच्यात पडद्याआड वाटाघाटी चालू झाल्या होत्या आणि त्याचा परिणाम म्हणून सप्टेंबर १९९३ मध्ये (खरे) बिल क्लिंटन अध्यक्ष असताना त्यांच्या पुढाकाराने व्हाईट हाऊसमध्ये इस्त्राएलचे पंतप्रधान राबीन आणि पी.एल्.ओ चे अराफात यांच्यात शांतता करार झाला. १९७० च्या दशकात जॉर्डनने पी.एल.ओ ला अम्मानमधून हाकलून दिले होते.तरीही इस्त्राएलचे अस्तित्व जॉर्डनने मान्य केले नव्हते.पण पी.एल.ओ आणि इस्त्राएलमध्ये शांतता करार झाल्यानंतर फेब्रुवारी १९९४ मध्ये जॉर्डननेही इस्त्राएलशी शांतता करार केला. या बदलत्या परिस्थितीत भारताला इस्त्राएलशी संबंध प्रस्थापित करणे अधिक सोपे गेले.ती परिस्थिती "मायलेकांच्या" काळात नव्हती. तसेच अरब राष्ट्रांना फार न दुखावायचे धोरण भारताने नंतरच्या काळातही अवलंबलेच होते.२००० साली दुसऱ्या इंतिफादाच्या वेळी दगडफेक करणाऱ्या पॅलेस्टिनी तरूणांवर इस्त्राएली सैनिकांनी गोळीबार केला आणि त्यात शंभर-सव्वाशे पॅलेस्टिनी तरूण मृत्यूमुखी पडले म्हणून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये इस्त्राएलची निंदा करणाऱ्या ठरावाला भारताने पाठिंबा दिला होता. आजही इस्त्राएलशी संबंध ठेवतानाच इराणला फार न दुखावण्याची कसरत आपल्याला करायला लागते त्याचे तेल हे एक मोठे कारण आहे. आता इराणपासून जॉर्डन-सिरीयापर्यंत सर्वत्र मुस्लिम बहुसंख्या असलेले देश आहेत म्हणून भारतातल्या मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यासाठी म्हणून इस्त्राएलविरोधी भूमिका भारताने घेतली असा सोयीस्कर अर्थ लावला जातो.अशा मंडळींना मला एक प्रश्न नेहमी विचारावासा वाटतो: तेल तुमचा काका आणून देणार होता का?

असो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 May 2012 - 1:13 am | निनाद मुक्काम प...

@भारत तेलासाठी इस्त्राएलच्या शत्रू अवलंबून होता त्यामुळे इस्त्राएलच्या किती जवळ जायचे यालाही मर्यादा होत्या

आता ९२ पासून आपण ह्या देशाचे मित्र आहोत. त्यांच्या शत्रूंनी का बरे आपला तेल पुरवठा थांबवला नाही. त्यांच्या शत्रू मधील आपले दोन तेल पुरवठादार इराण व सौदी अरेबिया जे स्वतः एकमेकाचे शत्रू आहेत. पण सध्या त्यांचा सामाईक शत्रू हे ज्यू राष्ट्र तर सामाईक मित्र भारत का आहे?
मुळात तुम्हाला एक साधी गोष्ट कळली नाही. कि इस्त्राएलच्या शी संबंध सुरळीत करण्याच्या आधी अमेरिकेशी संबंध चांगले हवे. भारताने १९९२ नंतर तेच केले.
म्हणून तर सौदी अरेबियाने मनमोहन ह्यांना अति महत्वाच्या व्यक्तीचा दर्जा देऊन त्यांची आपल्या देशात खातिरदारी केली व अनेक व्यापारी करार केले.
कतार ने तेच केले.

तटस्थ राहून बड्या लोकांना फुकाचे उपदेश देण्यापेक्षा दोन्ही बाजूने मैतीपूर्ण संबध ठेवायचे होते. आज सर्वच प्रमुख व प्रगत देशांची आपले व्यापारिक व राजनैतिक संबंध आहे.व असे असणारा भारत व हा एकमेव देश आहे.

@थोडी गफलत होत आहे का? मुशर्रफांवर डिसेंबर २००३ मध्ये एकदा नाही दोनदा हल्ले झाले होते आणि ते पाकिस्तानातून निघाले त्यानंतर ५ वर्षांनी.

तुम्हाला लहान मुलासारखे नीट समजून सांगतो.
मूष ह्यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते पाकिस्तानातील लष्कर , व देशाचे प्रमुख होते. व आय एस आय मध्ये त्यांच्या मर्जीचे लोक होती. सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानी लष्कर मूष ह्यांनी अमेरिका व नाटो च्या मर्जीने तालिबान विरुद्ध युद्धात गुंतवले व द्रोण हल्ले व नाटो ला रसद पुरवायला रस्ता अश्या अनेक अतर्क्य गोष्टी त्यांनी केल्या. म्हणून नाटो व अमेरिकेला मूष सत्तेत असणे म्हत्वाचे वाटत होते. त्यांच्या सुरक्षेची जणू त्यांनी जबाबदारी घेतली होती.
खुद पाकिस्तान चे लष्कर व तहीरेके तालिबान ह्यांच्यात युद्ध सुरु झाले म्हणजे काट्याने काटा निघतो म्हणून भारतीय सरकार व आर्मी खुश होते.३००० सैनिक ज्यात अनेक वरिष्ठ अधिकारी ,आय एस आय चे अधिकारी व ब्रिगेडियर मारल्या गेला आहे )
मूष हे सत्तेवर जो पर्यंत होते ते पाकिस्तानात राहिले. त्यांनी स्वताचा जीव वाचवण्यासाठी आतंकवादी संघटनावर चाप लावला त्यांनी स्वतः एकेकाळी ह्या संघटना उभारल्या होत्या म्हणून त्यांचा काटा कसा काढायचा हे हे मूष ला व्यवस्थित माहित होते. त्याने सरकारी यंत्रणा, लष्कर व प्रगत देशांचा पाठिंबा ह्यांच्या सहाय्याने काढला. ह्या संघटनावर कारवाया केल्या व चीन सोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले.मात्र एकदा सत्तेतून हाकलले गेल्यावर लंडन येथे विजनवासात गेल्यावर ते आता परत पाकिस्तानात येत नाही आहेत.
ह्या आधी बेनझीर व नवाब शरीफ हे दोघेही विजनवासात जाऊन परत पाकिस्तानात आले आहेत. नवाब ह्यांचे मूष दुश्मन होते आता नवाब अंदर आणि मूष बाहेर आहे.
मतितार्थ असा कि राजकारणासाठी जीव आसुसलेला असला तरी येत्या अजून दहा वर्षात मूष पाकिस्तान मध्ये परत येण्याची चिन्हे नाही. कारण सर सलामत तो पगडी पचास.

@
अगदी १९४७-४८ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला समर्थन दिल्यामुळे आपल्याला रशियाच्या गोटात जाण्याशिवाय पर्याय नव्हता हे वरच्या एका प्रतिसादात म्हटले आहेच.आणि हे मायलेक १९८९ पूर्वी सत्तेत होते त्यावेळी शीतयुध्द चालू होते तेव्हाच्या परिस्थितीत अमेरिका/वेस्ट युरोपच्या जवळ जायचे म्हटले तरी मर्यादा आल्या असत्या
अत्यंत चुकीची आणि बिनबुडाची माहिती
पाकिस्तान हा अमेरिकेचा विश्वासात कधीच नव्हता. त्यांचे दोन राष्ट्रात जसे सबंध असतात तसे सबंध होते. पण फार काही जवळचे नव्हते.
अगदी १९७१ च्या युद्धात भुत्तो ह्यांना युन चे सुरक्षा परिषद व प्रगत राष्ट्रांकडून वाटण्याच्या अक्षता मिळाल्यावर साश्रू नयनाने भुत्तो ह्यांनी हे गमतीदार भाषण केले.
कराराचा मसुदा युन मध्ये फाडून निघून आले.
आपल्या माहितीसाठी भारताच्या आय आय टी च्या स्थापनेत अमेरिकेचा महत्वाचा सहभाग व आपल्या रॉ ह्या प्रीमियम हेर खात्याच्या स्थापनेत सी आय ए चा वाटा होता. नेहरू ह्यांनी बड्या राष्ट्रांना शांततेचे बाळकडू आंतरराष्ट्रीय राजकारणात पाजतांना स्वतः च्या देशात संयुक्त महाराष्ट्र प्रकरणी मग्रुरीची भाषा किंवा गांधी वधानंतर विसंगत असे हिसंक धोरण स्वताच्या देशात काही लोक करत असतांना त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले
ह्या हत्याकांडातील सूत्रधाराला अजूनही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही.
चीन विरुद्ध हेरगिरी करणे हे अमेरिका व भारताच्या त्यावेळी समाईक मुद्दा होता. कारण चीन अणुचाचणी करणार ही अमेरिकेला कुणकुण होती, ती चीन ने १९६४ साली करून दाखवली. नेहरू ह्यांनी आयत्या वेळी कच खाल्ली अहो मुळात हेरगिरी करण्यासाठी आय एस आय च्या दर्जाची हेरखाते तेव्हा आपल्याकडे नव्हते ते १९६८ साली ६५ च्या युद्धानंतर रॉ च्या स्वरुपात बनले.
असे हेरखाते जे देशासात्ठी परकीय भूमीवर मिशन करू शकतील म्हणजे सी आय ए किंवा के जी बी
आणि ह्या दोन राष्ट्रात महायुद्धाच्या शेवटी जगभर शीत सुद्ध सुरु झाले तरी ह्या प्रकारचे हेरखाते देशासाठी आवश्यक आहे हे नेहरू ह्यांना उमजले नाही मात्र १९४८ साली पाकिस्तानने भारताला उद्देशून आय एस आय स्थापन केली.
नेहरू ह्यांच्या बद्दल सविस्तर परत कधीतरी ह्या सर्व गोष्टीमुळे अमेरिका भारतापासून दुरावली मात्र रशिया अफगाण मध्ये येण्या अगोदर पाकिस्तानला प्रगत देशाच्या तुलनेत क दर्जाचे महत्व होते. मुळात सर्व प्रगत राष्ट्रांच्या प्रत्यक्ष व अप्रत्क्ष पाठींब्याने ज्यू राष्ट्राची स्थापना झाली त्यांचे अस्तित्व फक्त बापुजी ह्यांना मान्य नाही म्हणून नाकारायचे असा व बराच काही अगोचर पणा केल्यावर अमेरिका काय ह्यांची तळी उचलून धरेल.
नशीब तो रशिया मोडला व जगाचे अनेक दृष्टीने संधर्भ बदलले व आपण जगाच्या मुख्य प्रवाहात दाखल झालो.
आणि नेहरू ह्यांच्या तटस्थ राजकारणाची ह्या माय लेकरांनी वासलात लावून स्वताला के जी बी च्या दावणीला लावले असा आरोप सुब्रामाण्याम स्वामी ह्यांनी केला आहे.
खरे खोटे देव जाणो
आज रशियाचे धार्जिणे देश दारिद्र्यात (पूर्व जर्मनी ) तर अमेरिका धार्जिणे ( वेस्ट जर्मनी प्रगतशील ) एकाच राष्ट्र एकाच भाषा तीच माणस असून सुद्धा केवळ संगंत कोणती व कोणाशी करायची ह्यावर त्या भागातील पिढ्यांचे भवितव्य ठरले.
आणि नेहरू मग ह्या मायलेकांनी चुकीची संगत धरली त्यामुळे पूर्व युरोपासारखे दारिद्र्य आपल्या नशिबी आले. आणि म्हणूनच त्यांनी काही चांगली कामे केली असली तरी
एक उदाहरण देतो.
आपल्या वेळी शाळेत शाळांत परीक्षेत तुम्ही नापास झाला म्हणजे ३४ टक्याहून कमी टक्के मिळाले कि मग ३३ टक्के कश्यात मिळाले म्हणजे गाळलेल्या जागा किंवा शास्त्रीय कारणे ह्याला अजिबात महत्व नसते.
नापास म्हणजे नापास
भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या वेळी गरिबी , निरक्षरता , जातीयवाद , आणि लोकसंख्या असे काही ठळक मुद्दे व प्रमुख समस्या होत्या. व आजही तेच मुद्दे कायम आहेत. तेव्हा हा परिवार
परीक्षेत अनेक संधी मिळवून सपशेल नापास झाला आहे.
अवांतर
माझा मात्र असा ठाम म्हणजे अगदी ठाम विश्वास आहे की जे ह्या घराण्यात कोणालाही जमले नाही ते सध्याच्या युवराजांना जमणार आहे.
अतुलनीय भारताचा निर्माण

मला तर वाटत कल्की चा अवतारच भूतलावर अवतरला आहे. त्यांनी राज्यकारभार हातात घेतल्यावर भारत महासत्ता झालाच म्हणून समजा.

क्लिंटन's picture

19 Apr 2013 - 6:22 pm | क्लिंटन

अशी राजकारणी पार्श्वभूमी मुशरफ ह्यांना नसल्यामुळे ते पाकिस्तानात जीव धोक्यात घालून येत नाही आहेत.

मुशर्रफला पाकिस्तानी पोलिसांनी अटक केल्याचे ऐकले.आता मुशर्रफ राजकारणी झाला की काय अशी उगीच शंका आली. :(

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Apr 2013 - 7:58 pm | निनाद मुक्काम प...

राजीव व इंदिरा ह्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या पायी त्यांना मृत्यू आला.
मुशरफ इतके दिवस येत नव्हता तो निवडणुकीच्या काळात आला
मात्र मी जेव्हा वरील विधान केले होते तेव्हा तालिबान शी गुप्त खलबते करून अमेरिका २०१४ ला सैन्य माघारीच्या गोष्टी करत नव्हत्या.
ओबामा चे परत निवडून येणे , व त्याने निग्रहाने सैन्य माघारी घेण्याच्या घोषणेवर कायम राहणे ह्यामुळे राजकीय समीकरणे बदलली.
माझ्या वरच्या एका प्रतिसादात म्हटले त्याप्रमाणे मूष हे सत्ता हातात असतांना प्रचंड प्रो वेस्ट धोरण राबवत होते , ह्यामुळेच त्यांनी पाकिस्तानात ज्या ज्या गोष्टी केल्या त्यामुळे त्यांना सध्या अटक झाली व निवडूक लढवता येत नाही आहे.
मात्र आता त्यांचे येणे म्हणजे प्रगत देशांची एक खेळी आहे ,
ते त्यांचे मोहरे बनून आले आहेत.
मी वरचे विधान केले तेव्हा मलाच काय कोणालाही पाकिस्तान मधील झरदारी सरकार पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा आपला कार्यकाल पूर्ण करेल व निवडणुकांच्या घोषणा करेल.
पण मायलेकांच्या प्रमाणे मूष ला सुद्धा जीवांच्या धमक्या येत आहेत
जैसी करणी वैसी भरणी